जगभरातील अफवा आणि त्यांचे बळी
जगभरात ठिकठकाणी हैदोस घालत असलेल्या करोना विषाणूमुळे भीतीचे व अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून जगातील एकूण एक राष्ट्र भांबावून गेलेले असताना या भीतीची तीव्रता वाढविण्यात समाजमाध्यमावरून पसरत असलेल्या अफवांना कसे अटकाव करावे हा मोठा प्रश्न सर्व संबंधितांच्या समोर उभा आहे. करोना संसर्गाला आटोक्यात आणून ठप्प झालेल्या जागतिक स्तरावरील सर्व व्यवहारांना पूर्वस्थितीवर आणण्यासाठी सर्व पातळीवरून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य, प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन इत्यादींसकट संपूर्ण यंत्रणा वेळ व श्रम खर्ची घालत असताना या अफवांमुळे त्यांच्या या प्रयत्नांना खीळ बसते आहे.