विषय «कृषी-उद्योग»

लढवय्या शेतकरी

वॉर ऑन हंगर आणि एफिशियंट मार्केट्स ‘अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूळ गरजा आहेत” हे घासून गुळगुळीत, बुळबुळीत झालेले वाक्य; पण प्रगतीचे घोडे अजून पहिल्याच पायरीवर अडलेले आहे. अर्थात, अनेकांच्या मनात पुढचे वळण घेतले की आलेच नंदनवन आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण तिथे लवकरच पोहचू हा विश्वास अटळ आणि अढळ आहेच. माणूस सर्वसुखी होण्यात अनेक नैसर्गिक अडचणींचा मोठा अडथळा आहे आणि त्यासाठी माणसाला अनेक पातळीवर युद्ध करावे लागते. त्यापैकीच एक आहे वॉर ऑन हंगर.

जगाची लोकसंख्या आज सात अब्ज आहे आणि त्यातले एक अब्ज लोक उपाशी आहेत.

पुढे वाचा

जनुक – संस्कारित बियाणे : कोणासाठी, कशासाठी?

मी गेल्या तीन दशकांपासून सेंद्रिय / नैसर्गिक शेती करीत आहे. माती, पाणी, वातावरणाचे जतन आणि विषमुक्त/सुरक्षित आहार हे प्रमुख उद्देश मनात ठेवून मी दीर्घकाळ काम केले. आरंभी देशात माझ्यासारखे मोजकेच लोक होते. नंतर हळूहळू सेंद्रिय शेतीपद्धती रुजत गेली. आज या क्षीण प्रवाहाचे मोठे पात्र होत असताना सेंद्रिय शेती तगेल की नष्ट होईल असा मला प्रश्न पडला आहे.

सेंद्रिय शेतीपद्धती नुसतीच पर्यावरणस्नेही नाही तर भूमी आणि जल ह्यांचे संवर्धन साधून जैवविविधतेत भर घालणारी आहे. याउलट जनुक-संस्कारित बियाण्यामुळे या सर्वांवर विपरीत परिणाम होऊन माणसांचे आणि पशूंचे भोजनसुद्धा प्रदूषित होत असल्याचे अनुभव आहेत.

पुढे वाचा

मुक्त अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि विदर्भातील शेतकरी – आत्महत्या

संसदेच्या कृषि स्थायी समितीने जनुकांतरित पिकाच्या विरोधात सादर केलेला भक्कम पुरावा निष्प्रभ करण्यासाठी बरेच प्रयत्न सुरू आहेत. ‘हरित कार्यकर्त्यांचे काम’ असे म्हणून त्याची हेटाळणी होत आहे. हा साडेचारशे पानांचा अहवाल हे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा समावेश असलेल्या खासदारांनी मिळून दोन ते अडीच वर्षे केलेल्या अभ्यासाचे फळ आहे. ह्या खासदारांमध्ये सत्ताधारी व विरोधी पक्षाचे, डावे आणि उजवे अशा सर्वांचा समावेश होता, ज्यांचे सर्वसाधारणपणे एकमेकांशी मतैक्य होत नाही. त्या अर्थाने ते, जनुकांतरित बियाणे बनविणाऱ्या कंपन्या, त्यांनी प्रायोजित केलेल्या स्वयंसेवी संस्था, जनसंपर्काची अभिकरणे आणि तथाकथित शेतकरी नेते ह्यांनी प्रसारमाध्यमे, जनता आणि धोरणकर्ते ह्यांच्याकडे केलेल्या एका खोट्या प्रचाराचे खंडन होते.

पुढे वाचा

जी एम शेतकऱ्यांच्या हिताचे

आज जे लोक जी. एम. मक्याला विरोध करीत आहेत, तेच लोक यापूर्वी जी. एम. कापूस (बी.टी. कापूस) भारतीय शेतकऱ्यांना दिला जाऊ नये म्हणून प्रयत्नशील होते. या लोकांच्या प्रचंड विरोधामुळे आणि दहशतीमुळे बी. टी. कापूस तब्बल ६ वर्षे (१९९६ ते २००२) भारतीय शेतकऱ्यांना मिळू शकला नाही. मध्येच बी. टी. कापसाची मोठ्या प्रमाणात चाचणी होऊन त्याचे शेतकऱ्यांना होणारे फायदे स्पष्ट झाले होते. तरीही त्या विरोधात जी. एम. मक्यासारखाच धादांत खोटा, विषारी प्रचार करून काही लोकांनी सदर बियाणे भारतात येऊ देण्यास विरोध केला होता.

पुढे वाचा

जनुक-संस्कारित अन्नापासून सावधान: डॉक्टरांचा इशारा

अमेरिकन अॅकॅडमी ऑफ एन्व्हायरन्मेंटल मेडिसिन (एएईएम) ह्या संघटनेने एकोणीस मे दोन हजार नऊ रोजी सर्व फिजिशियनना आवाहन केले की, त्यांनी आपले पेशंट, अन्य वैद्यकीय व्यावसायिक व सर्वसाधारण जनता ह्यांचे, जनुक -संस्कारित (जी एम) अन्न, शक्य तेव्हढे टाळण्याविषयी प्रबोधन करावे व जी एम अन्नाच्या आरोग्यावरील दुष्परिणामाबद्दल शैक्षणिक साहित्य त्यांना उपलब्ध करून द्यावे. ह्या संघटनेने अशीही मागणी केली की जी एम अन्नाच्या परिणामांबद्दल केल्या जाणाऱ्या दीर्घकालीन चाचण्या व त्याचे लेबलिंग अधिस्थगित करण्यात यावे. त्यांनी ह्या विषयावर प्रकाशित केलेल्या आपल्या भूमिकापत्रात असे मांडले आहे की, जी एम अन्नामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असे प्राण्यांवर करण्यात आलेल्या अनेक चाचण्यांतून सिद्ध झाले आहे.

पुढे वाचा

जी. एम. चे राजकारण

जनुक संस्कारित म्हणजेच जेनेटिकली मॉडिफाइड बियाणे, त्यातून उगवणारी पिके व ह्या साऱ्याच्या परिणामस्वरूप जी. एम खाद्यान्न हा आजच्या युगातील एक महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. आपल्या अन्नाशी संबंधित असल्यामुळे तर तो कळीचा आहेच, परंतु शेती, शेतकरी, मातीचा कस, पीक राशी (यील्ड) ह्या साऱ्या बाबींशी निगडित असल्यामुळे शेतकऱ्याच्या जगण्याच्या व्यवहार्यतेशी तो सरळ जोडलेला आहे. काय आहे ही जी एम नामक भानगड ?

सर्वसाधारणपणे लोक जी. एमला आधुनिकता व त्याला विरोध म्हणजे मागासलेपण असे समजताना दिसतात. जनुक-संस्कारित बियाण्याच्या तंत्रज्ञानाला विरोध म्हणजे विज्ञानाला विरोध, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान, असली विधाने आपल्याला त्या तंत्रज्ञानाविषयी चर्चा सुरू झाली की सर्रास ऐकू येतात.

पुढे वाचा

बीटी आणि जी.एम. वाणांना देशी वाण पर्याय

ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांची मुलाखत. प्रश्न : सध्या अनेक कंपन्या जी. एम. वाण बाजारात आणत आहेत. या वाणांमुळे पर्यावरणदृष्ट्या काय फायदे तोटे होत आहेत?

उत्तर : जी.एम. वाण पर्यावरणीयदृष्ट्या हानिकारक आहेत. त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे. सरकार पर्यावरणीय आणि शेतकऱ्यांचे हित जोपासण्याऐवजी कंपन्यांचे हितसंबंध जोपासण्यात मश्गुल आहे. बीटी कॉटनमुळे फायदा झाला असे म्हणतात, मात्र हे खरे नाही. बीटी कॉटनवर बोंड अळी येणार नाही असा दावा करण्यात येतो; मात्र आता बीटी कॉटनच्या बोंडातील विषाचे शोषण करणाऱ्या अळ्या निर्माण होत आहे. सरकारने मध्यंतरी बीटी वांगे आणण्याचा प्रयत्न केला होता.

पुढे वाचा

भविष्यकालीन शेती – साठ मजली !!!

आजतागायतच्या इतिहासात शेतीबद्दलचा एकही कायदा शेतकऱ्यांच्या सहमतीने झालेला नाही. भारतात कोणत्याही राजकीय व्यवस्थेने, कायदाव्यवस्थेने शेतीची व्याख्या आजतागायत केलेली नाही. आजची संपूर्ण कायदाव्यवस्था, न्यायव्यवस्था, शासकीय यंत्रणा आणि समस्त शहरी/महानगरी-बिगरशेती-सत्ताधारीसगळे सगळे ठार कृषिनिरक्षरच नव्हे तर कृषिकृतघ्नही आहेत. यांतील एकालाही ‘शेतीसंस्कृती म्हणजे काय’ हे नेके वैज्ञानिकदृष्ट्या सांगता येणार नाही. तथाकथित विकासकार्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करणाऱ्या कोणालाही ही व्याख्या विचारून पहा. त्याची ‘त-त-प-प’ होते की नाही ते बघाच.

शेतीची वैज्ञानिक व्याख्या
Agriculture means cultured photosynthesis. निसर्गात होत असणाऱ्या सूर्यप्रकाशसंश्लेषणाचे निरीक्षण करून मानवाने मानवी श्रमाने (बौद्धिक आणि शारीरिक) हिरव्या पानांद्वारे जाणीवपूर्वक घडवून आणलेले सूर्यप्रकाशसंश्लेषण म्हणजे शेतीसंस्कृती.

पुढे वाचा

बीज-स्वायत्ततेकडून गुलामगिरीकडे ?

मानवी प्रगतीचा एक अर्थ असा लावता येतो की अन्न, वस्त्र, निवारा वगैरे मूलभूत गरजा भागविणआाठी करायला लागणाऱ्या कष्टांचे प्रमाण आणि कष्टांचा/कामाचा कालावधी कमी-कमी होत जाणे, आणि उपभोगाचा किंवा रिकामपणाचा कालावधी वाढत जाणे. या प्रगतीची महत्त्वाची साधने दोन होती – एक म्हणजे परस्परांना मदत, सहकार्य आणि स्पेशलायझेशन. दुसरे म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर.

सहकार्यः
एकट्याने शिकार करण्यापेक्षा अनेकांनी एकत्रपणे शिकार केल्यास ती अधिक फलदायी होते हे शिकारी रानटी कुत्र्यांनाही कळते, ते आदिमानवांच्याही लक्षात आले. तेच सहकार्य हिंस्र पशुंपासून संरक्षण करण्यासाठी उपयोगी पडले. हेच सहकार्य पुढे विकसित होत, मुले सांभाळणे, हत्यारे तयार करणे, शिकार केलेल्या पशुंचे कातडे वेगळे करून त्याचे कपडे शिवणे वगैरे आवश्यक कामांच्या कौशल्यांध्ये स्पेशलायझेशन काही लोकांनी केल्यास काम अधिक चांगले होते आणि सर्वांच्याच वेळेची बचत होते, हे लक्षात येऊन परस्परांवर अवलंबून असणाऱ्यांचा एक समाज किंवा टोळी तयार झाली.

पुढे वाचा

बीजस्वायत्ततेकडून गुलामगिरीकडे – बीज-संवर्धनाचे महत्त्व

वनस्पतीः वैविध्य व अन्न
आज जगभरात वनस्पतींच्या जवळपास ३२,८३,००० प्रजातींची नोंद झाली आहे. यांपैकी २,८६,००० प्रजाती केवळ सपुष्प वनस्पतींच्या आहेत. उर्वरित प्रजातींपैकी रानात नैसर्गिक स्वरूपात वाढणाऱ्या अथवा लागवड होणाऱ्या अशा अंदाजे ७००० प्रजातींचा वापर अन्न म्हणून करण्यात येत आहे.

निसर्गात सतत बदलांना तोंड देताना वनस्पतींच्या आनुवंशिक (गुणसूत्रांच्या) रचनेत दर पिढीमध्ये सूक्ष्म बदल होत असतात. कधी कधी हे बदल अचानक देखील घडून येतात. अशा बदलjळे वनस्पतींच्या अंतर्गत व बाह्य रचनेत बदल होऊन एखादी नवी प्रजाती (species) किंवा वाण तयार होतो. हे नवे वाण दर पिढीगणिक होणारे लहान लहान बदल संकलित होत जाऊन बऱ्याच कालानंतर तयार होते.

पुढे वाचा