स्त्री मुक्ती चळवळ, स्त्रीवाद याकडे सुजाण पुरुष नेहमीच आपुलकीनं आणि मैत्रीपूर्ण नजरेनं पाहात आला आहे. पण असं मी म्हणालो, की माझ्या स्त्रीवादी मैत्रिणी म्हणतात ”आहे कोठे तो सुजाण पुरुष?”
हा काय तुमच्या समोर उभा आहे, असं गंमतीत त्यांना सांगावसं वाटतं. पण त्यांचा हा प्रश्न हसण्यावारी नेण्यासारखा नाही, त्यामागे त्याचं अनुभवसिद्ध निरीक्षण आहे याची मला जाणीव आहे. सुजाण पुरुषांची संख्या अजाण पुरुषाच्या तुलनेनं कमी आहे हे त्यांना यातून सुचवायचं होतं हे उघड आहे. आणि त्याचं निरीक्षण चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही.
विषय «विवेकवाद»
मन केले ग्वाही (भाग २)
प्रजा अडाणीच ठेवावी!
भारताच्या स्वातंत्र्यचळवळीचे बहुतेक नेते उच्चशिक्षित होते. बरेचसे बॅरिस्टर होते. इतर बरेच मानव्यविद्यांचे विद्यार्थी होते. यामुळे सुरुवातीची मंत्रीमंडळेही बहुतांशी उच्चशिक्षित असत. कायदा-मानव्यविद्यांसोबत त्यांत काही डॉक्टर -इंजिनीयरही असत. हे स्वाभाविक होते कारण चळवळींचे नेते लढाऊ असावे लागतात, तर मंत्री व्यवहारी आणि नियोजनाचा विचार करणारे असावे लागतात.
पहिली चाळीस-पन्नास वर्षे मंत्रिमंडळे अशी वेगवेगळ्या विषयांतील तज्ज्ञांमधून निवडली जात. अगदी सुरुवातीला तर हे फारच आवश्यक होते, कारण तुटपुंज्या संसाधनांमधून नवे, महाकाय राष्ट्र उभारायचे होते, आणि यासाठी योद्ध्यांऐवजी तंत्रज्ञ जास्त आवश्यक होते. त्याहीपेक्षा आवश्यक होते शिक्षक, जे चांगले, तंत्र जाणणारे नागरिक घडवू शकतील.
विवेक आणि नीति यांच्यात विरोध?
बरोबर काय आणि चूक काय, न्याय्य आणि अन्याय्य, चांगले आणि वाईट, यांची समज किंवा ज्ञान माणसाला, उपजत बुद्धीनेच मिळतात, असे मला वाटते. जन्मानंतरच्या संस्कारांनी व शिक्षणाने या समजेत आणि ज्ञानात भर क्वचित् आणि थोडीच पडते. उलट संस्कारांनी आणि शिक्षणाने या संकल्पना पूर्णपणे उलट्या किंवा विकृत होण्याची शक्यता खूपच असते-विशेषतः धार्मिक संस्कारांनी, उदाहरणार्थ दोन शतकांपूर्वी सवर्ण हिंदूंना अस्पृश्यता, सती जाणे, विधवेचे विद्रूपीकरण या गोष्टी न्याय्य आणि बरोबरच वाटत होत्या – इतकेच नाही तर खुद्द अस्पृश्य आणि विधवा यांनादेखील या गोष्टी बरोबरच वाटत होत्या!
करुणानिधी आणि रॅशनॅलिझम
रॅशनॅलिझमचा कडवा पुरस्कार करणारे व त्याप्रमाणे वागणारे तामिळनाडूचे मुख्यमंत्री मुभूवेल करुणानिधी ह्यांनी सत्यसाईबाबाला आपल्या घरी बोलावून व त्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून rationalism च्या तत्त्वांला तिलांजली दिली, रॅशनॅलिझमच्या तत्त्वांचा करुणानिधींनी आयुष्यभर पुरस्कार केला व डीएमके पक्षासाठी आपल्या कार्यकर्त्यांनाही त्या तत्त्वानुसार आचरण करायला भाग पाडले. आयुष्यभर लोकांसमोर ते नास्तिक व एक कडवे रीिंळेपरश्रळीीं म्हणून आले. त्यापूर्वी एकदा आपल्या पक्ष कार्यकर्त्यांनी कपाळाला टिळा लावला म्हणून त्यांचा खरपूस समाचार त्यांनी घेतला होता. ‘धार्मिकतेची खूण असणारा टिळा कपाळाला लावून आपण पेरियारच्या (१८७९-१९७३) विचारसरणीस मूठमाती देत आहोत; पक्षाच्या मूलभूत तत्त्वांपासून आपण ढळत आहोत’ असे त्यांनी पक्ष-कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले होते.
विवेकवाद (Reason, Rational आणि Reasonable)
गेली कित्येक वर्षे मी स्वतःला rationalist म्हणवत आलो आहे. पण ‘rationalist’ या शब्दाच्या अर्थाची फोड मी अजून पुरेशी करू शकलो नाही असे मला वाटते. ती करण्याचा आणखी एक प्रयत्न मी करणार आहे.
त्या शब्दाची व्युत्पत्ति पाहता तो शब्द लॅटिन भाषेतील ‘ratio’ या शब्दापासून बनलेला आहे असे लक्षात येते. ‘Ratio’ म्हणजे reason; पण ‘reason’ म्हणजे काय हे सांगणे बरेच कठीण आहे. कारण ‘reason’ चे इंग्रजीत अनेक अर्थ आहेत, आणि त्या सर्वांच्या अर्थाचा शब्द मराठीत (किंवा संस्कृतात) नेमका सापडत नाही. ‘Reason’ च्या अर्थाचा चटकन् सुचणारा शब्द म्हणजे बुद्धि.
लोकांना विवेकनिष्ठ होणे शक्य आहे?
स्वतःला विवेकवादी समजण्याची मला सवय आहे; आणि विवेकवादी, माझ्या मते, दुसऱ्यांनी विवेकी व्हावे असे वाटणारा असलाच पाहिजे. पण हल्ली विवेकी विचारसरणीवर बरेच जोराचे हल्ले झाले आहेत. त्यामुळे विवेकीपणा म्हणजे काय याबद्दल कोण काय समजतो ते कळेनासे झाले आहे किंवा ते समजले तरी तो प्राप्त करणे मनुष्याला साधेल का असा प्रश्न आहे. विवेकीपणाच्या प्रश्नाला दोन बाजू आहेत, सैद्धान्तिक आणि व्यावहारिक : विवेकी मतप्रणाली कशी आहे? आणि विवेकी आचारप्रणाली कशी असते? लभ्यांशवाद (Pragmatism) विचारातल्या अविवेकावर भर देतो, आणि मनोविश्लेषणवाद (Psycho-analysis) आचरणातल्या अविवेकीपणावर भर देतो.
परंपरा, आधुनिकता आणि राष्ट्रवाद (उत्तरार्ध)
(७) विवेकनिष्ठेचा सांभाळ
पण हा विषय एवढ्यावरच सोडून द्यावा असे मला वाटत नाही. विवेकनिष्ठा मला प्रिय आहे आणि राष्ट्रवादही. म्हणून या समस्येतून मार्ग काढण्यासाठी एक उपाय सुचतो तो सांगतो.
विवेकनिष्ठा आदर्श समाजाचा आधार म्हणून इष्ट तर आहेच, पण एकूण विचार करता राष्ट्रवादालाही पोषक आहे. कारण राष्ट्रवादाला संघटनेच्या आड येणारे समाजाचे दोषही दूर करायचे असतात. हे दोष परंपरेतून, इतिहासातून निर्माण झालेले असतात. त्यांची नीट चिकित्सा झाली पाहिजे; कारण चिकित्सा झाल्याशिवाय त्यांच्यावर उपाययोजना करता येत नाही. पण आवाहनात्मक, स्फूर्तिकारक मांडणी करताना गटाच्या दौर्बल्यांचे विश्लेषण करणे टाळले जाते आणि त्याची उभारणी निरोगी पायावर होत नाही.
धर्म आणि विवेकवाद -प्रा. स. ह. देशपांडे यांना उत्तर
आजचा सुधारकच्या जुलै आणि चालू अंकात डॉ. स.ह. देशपांडे यांचा ‘परंपरा, आधुनिकता आणि राष्ट्रवाद’ या नावाचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याचा उत्तरार्ध (या अंकात प्रसिद्ध झालेला) पूर्णपणे मला उद्देशून लिहिला आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की ईश्वर ही कल्पना मानवी मनातून सर्वस्वी काढून टाकणे शक्य दिसत नाही. मी या प्रश्नाशी नीट भिडत नाही. माझी उत्तरे मूळ मुद्दा सोडून असतात. मनुष्य जगात एकटा असून त्याला आधाराला ईश्वर लागतो या मुद्याचा प्रतिवाद मी केला तरी तो उपयुक्त होईल. एरव्ही ईश्वर आणि धर्म यांच्या समाजजीवनावरील प्रभावाचा मी पुरेसा विचार करीत नाही असा आरोप मला पत्करावा लागेल.
विवेकासाठी चळवळ हवी!
व्यक्तिजीवन आणि समाजजीवन सुख-शांतीचे व्हावयाचे असेल तर त्यासाठी विवेकाच्या संगोपन-संवर्धनाची नितान्त आवश्यकता आहे. बुद्धिप्रामाण्य, विज्ञाननिष्ठा आणि विवेक या संकल्पना परस्परांच्या फार जवळ आहेत. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोण आणि बुद्धिप्रामाण्य यांना सोडून विवेक असू शकणार नाही आणि विवेक नसेल तर खऱ्या अर्थाने विज्ञाननिष्ठा आणि बुद्धिप्रामाण्य असू शकणार नाहीत. विवेक ही अधिक व्यापक अशी जीवनसंवर्धक संकल्पना आहे. विवेकाची सविस्तर चर्चा केल्यास बुद्धिप्रामाण्य, विज्ञाननिष्ठा, reason, श्रद्धा, अंधश्रद्धा इत्यादी सर्व विषयांचा ऊहापोह होऊन जाईल.
सृष्टीतील अचेतन आणि सचेतन अशा सर्व वस्तूंना निश्चित गुणधर्म असतात. अचेतन वस्तूंमध्ये स्वतःच्या अंगचे चैतन्य नसते तर सचेतन वस्तूंमध्ये (वनस्पती आणि प्राणी) अंगभूत चैतन्य असते.
कालचे सुधारक- आधुनिक कामशास्त्राचे प्रणेते : रघुनाथ धोंडो कर्वे (भाग २)
खटल्यात सरकारतर्फे साक्षीदार म्हणून आहिताग्नी राजवाडे उभे राहिले. इतिहासाचार्य राजवाडे यांनी ‘धिमाधवविलासचंपू’मध्ये पूर्वी अविवाहित स्त्रियांना मुले होत असे विधान केले खरे, परंतु ते त्यांचे एक तऱ्हेवाईक मत आहे अशी मखलाशी आहिताग्नींनी केली. कर्व्यांच्या बाजूने रियासतकार सरदेसायांची साक्ष झाली. आक्षिप्त लेख शास्त्रीय दृष्टीने लिहिला आहे असा निर्वाळा त्यांनी दिला. न्यायालयाने मात्र तो मानला नाही. कर्व्यांना दोषी ठरवून १०० रु. दंड केला. ही घटना एप्रिल १९३२ मधली.. या निकालासंबंधी ‘दोन शब्द’ या लेखात कर्वे म्हणतात, ‘आमचे चुकीमुळे शिक्षा झाली नसून मॅजिस्ट्रेटला आमची मते पसंत नसल्यामुळे झाली.