प्रस्तावना: एखाद्या माणसाच्या गुणधर्मांपैकी कोणते आनुवंशिक असतात आणि कोणते संगोपनामधून आणि संस्कारामधून घडतात, हा एक जुनाच प्रश्न आहे. स्वभाव विरुद्ध संस्कार (Nature versus Nurture) ह्या नावाने तो अनेकदा मांडला जातो. सुट्या माणसांच्या पातळीवर प्रश्न असा असतो —- “ह्या व्यक्तीचे कोणते गुण आईवडलांकडून आनुवंशिकतेने आलेले आहेत आणि कोणते पालनपोषणाच्या काळात संस्कार झाल्याने रुजले आहेत?’ पूर्ण मानवजातीच्या पातळीवरही आपण हा प्रश्न विचारू शकतो —- “कोणते गुण उत्क्रांतीतून घडलेले आहेत आणि कोणते सामाजिक संस्थांमुळे घडलेले आहेत?”
सुधारणा करू इच्छिणाऱ्यांच्या दृष्टीने हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
विषय «इतर»
अरवली गाथा
श्री. जयंत फाळके यांचे वरील मथळ्याखाली आ. सु.मध्ये दोन लेख छापल्याबद्दल अभिनंदन. बरेचसे सामाजिक बदल हे आर्थिक बदलांमुळे होत असतात. असे असूनही आ.सु.मध्ये तात्त्विक आणि तत्त्वज्ञानाच्या चर्चांना खूप जास्त प्रमाणात जागा दिली जाते असे माझे मत झाले आहे उ. ११ व्या वर्षातही ‘विवेकवाद’ कशाला म्हणायचे यावर लिखाण चालू असते.
जयंत फाळके यांनी कथन केलेले तरुण भारत संघाचे काम खरोखरच प्रशंसनीय आहे. एखाद्या दुर्गम भागात जाऊन, मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समाजात आपली मते आणि स्व बाजूला ठेवून स्थानिक समाजाचा स्वाभिमान जागृत करून त्याला एकसंध कार्यप्रवृत्त करणे खरोखरीच फार अवघड आहे.
निरामय जीवनासाठी
सीने में जलन, आँख में तुफान सा क्यों है?
इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है? आजकाल आजूबाजूला पाहिले तर आपल्या संपर्कात येणारे नातेवाईक जवळचे दूरचे, मित्रमैत्रिणी, सहकारी, कामाला येणारी बाई, दुकानदार, बँका ऑफिसेसमधील कर्मचारी, विद्यार्थी, इतकेच काय पण प्रवासात होणारी घडीभराची संगत, अशा सर्व व्यक्ती ‘सीने में जलन’ व ‘आँखों में तूफान’ घेऊन वावरताना दिसतात. आपापल्या ‘परेशानी’ त बुडून गेलेली व त्याचा आविष्कार त्यांच्या बोली व शारीर भाषेतून (body larguage) प्रकट करताना दिसतात. जीवन धकाधकीचे झाले आहे. सतत स्पर्धेला तोंड द्यावे लागते.
मानवी जीनोम (जैनिक संचित)
२६ जून २०० हा दिवस जीवशास्त्राच्या प्रगतीतील सोन्याच्या अक्षरांनी लिहिण्याजोगा ऐतिहासिक दिवस ठरला. त्या दिवशी वॉशिंग्टन (डी. सी.) येथून प्रसिद्ध होणाऱ्या ‘सायन्स’ या जागतिक प्रतिष्ठेच्या वैज्ञानिक साप्ताहिकात ‘मानवी जीनोम’ निचित करण्याचे कार्य जवळपास ९७% पूर्ण झाल्याची अधिकृत घोषणा प्रसिद्ध झाली व सर्व जगातील प्रसार माध्यमांच्या उत्साहाला उधाण आले. वृत्तपत्रे, नियतकालिके, टेलेव्हिजन, इंटरनेट, रेडियो या सर्वांनी या वैज्ञानिक उपलब्धीचा जयजयकार केला. त्याचसोबत या वैज्ञानिक ज्ञानामुळे जणू मानवाने निसर्गच जिंकला अशा थाटात लेखक व प्रवक्ते यांच्या लेखण्या व जिव्हा झिजू लागल्या! परंतु सामान्य-जनांना नेमके काय घडले व कशाबद्दल एवढा जल्लोष चालला आहे याचे नीटसे आकलन झालेच आहे असे म्हणता येत नाही.
सुधारक कुसुम शर्मा
१९४९ चा तो काळ होता. स्वातंत्र्य मिळून जेमतेम दोन वर्षे झाली होती. आता स्वराज्याचे सुराज्यात स्पान्तर करावयाचे म्हणून पुष्कळसे देशभक्त धडपड करीत होते. कुसुमताई शर्मा त्यांच्यांतल्याच एक होत्या. विचाराने त्या साम्यवादी होत्या; आणि जाज्वल्य देशाभिमान त्यांच्या प्रत्येक कृतीत सळसळत होता. त्या दिवशी नागपूरच्या भंगीपुयाच्या सर्व घरांतील लोक बाहेर येऊन निचितपणे बसले होते. त्यांना कुसुमताईंच्या अटकेची कुणकुण लागली होती. तेवढ्यात अटक वॉरंट घेऊन आलेले पोलीस कुसुमताईंचा बारकाईने शोध घेत तेथे येऊन पोचले. त्यांनी घराघरांतून पुष्कळ तपास केला. पण व्यर्थ. खूप वेळ घालवूनही त्यांना काही त्या गवसल्या नाहीत.
धोरण देशभक्तीचे, की परधार्जिणे?
स्वातंत्र्यानंतरच्या पन्नास वर्षांतील सर्वांत गंभीर अरिष्टाला भारतीय शेतीव्यवस्थेला सामोरे जावे लागत आहे. हे अरिष्ट निसर्गाच्या अवकृपेमुळे उद्भवलेले नसून, भारत सरकारच्या शेतीविषयक धोरणातून उद्भवलेले आहे. सरकारने जागतिक व्यापारी संघटनेत एप्रिल १९९४ मध्ये शेतीविषयक जो करार केला त्या कराराच्या शर्तीमुळे भारत सरकारला हे धोरण राबवावे लागत आहे. भाजप-नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जुलैमध्ये आपले शेतीविषयक धोरण जाहीर केले आहे. ‘जागतिक व्यापारी संघटनेत शेतीविषयक कराराच्या अंमल-बजावणीसाठी हे धोरण स्वीकारावे लागत आहे,’ हे सरकारने धोरण जाहीर करतानाच सांगितले आहे. या कराराची अंमलबजावणी ज्या रीतीने केंद्र सरकार करीत आहे त्यामुळे अरिष्टांत भर पडून हे अरिष्ट अधिक गंभीर बनत आहे.
आवाहन
आजकाल सामाजिक कामे करणारे, आपल्या समाजाचे जीवन सुधारायला धडपडणारे अनेक लोक एक सूत्र मांडतात—- “विचार विश्वाचा करा, आणि क्रिया स्थानिक करा.” ह्या मागची भूमिका बहुधा अशी आहे—- विश्वभरात बदल करणे अवघड असते. तसे करायला खूपच व्यापक जनाधार लागतो, जो उभारणे कठीण असते. पण आपली सुधारणेची कल्पना मात्र जगभरच ‘हवीशी’ वाटणारी असायला हवी, म्हणून विचार विश्वाचा करा. पण तो करताना स्वस्थ बसू नका, तर आपल्या नजीकच्या परिसरातली सुचणारी कामे करायला लागा.
आजचा सुधारक मधील लेखांचेही वैश्विक आणि स्थानिक असे भाग पाडता येतील.
जागतिकीकरण व मानवसमूह
माणूस हा एक सस्तन प्राणी आहे. म्हणून जीवशास्त्राचे मूलभूत नियम माणसाला लागू पडतातच. जीवशास्त्राच्या अभ्यासात पुढील नियम आपल्याला आढळतात :–
१) पर्यावरणाची विविधता प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या जाती-प्रजातींच्या उत्क्रांतीस व टिकून राहण्यास आवश्यक असते. ही विविधता नष्ट केल्यास, सरसकट सारखे पर्यावरण निर्माण केल्यास, अनेक जाती प्रजाती जैविक चढाओढीत मागे पडून नष्ट होतात. पर्यावरणाच्या स्थानिक वैशिष्ट्यांमुळे केवळ काही विशिष्ट जाती प्रजाती शिरजोर ठरत असतात. उदाहरणार्थ डोंगराच्या शिखरावर, मध्य-उतारावर, घळीमध्ये, खालच्या उतारावर, सपाटीवर वेगवेगळ्या झाडांच्या जाती आढळतात. पूर्व दिशेच्या उतारावर व पश्चिम बाजूच्या उतारावर देखील वेगवेगळ्या जातींचे प्राबल्य आढळते.
निष्ठा : दोन पैलू
अॅरिस्टॉटल हा प्रकांड ग्रीक पंडित होता हे त्याच्या ग्रंथ-निर्मितीवरून चटकन कोणाच्याही लक्षात येईल. मानसशास्त्र, तर्कशास्त्र, शरीरविज्ञान, नाट्य-शोकांतिका व इतर विषयांवर त्याने लिहिलेली विद्वत्ताप्रचुर पुस्तके हे त्याच्या पांडित्याचे पुरावे म्हणून देता येतील. प्लेटोचा तो अत्यंत आवडता शिष्य. प्लेटोने “अकॅडमी’ची स्थापना करून जनतेच्या ज्ञानलालसेला जशी चालना दिली तसाच प्रयत्न अॅरिस्टॉटलने “लायसेयम’ही ज्ञानवर्धिनी संस्था निर्माण करून आपली गुरुपरंपरा पुढे चालविली होती.
अॅरिस्टॉटल एकदा आपल्या विद्यार्थ्यांशी वर्गात तत्त्वज्ञानाची चर्चा करीत असताना एका विद्यार्थ्याने प्लेटोचे विधान त्याच्या तोंडावर फेकून अॅरिस्टॉटलला पेचात आणण्याचा प्रयत्न केला. पण प्रथम त्याने त्याकडे दुर्लक्ष केले.
पत्र-संवाद
श्याम कुळकर्णी
‘यमाई’, तंत्रनगर, औरंगाबाद — ४३१ ००५
खाजगी शिकवणी वर्ग
संदर्भ : आजचा सुधारक च्या जुलै २००० चे संपादकीय
शिकवणीवर्गाचे समर्थन विवेकवादात बसत नाही. आ. सु.च्या डिसेंबर १९९१ च्या ‘विवेकवाद’च्या १७ व्या भागात युक्त व अयुक्त कर्म तसेच कर्माची नैतिकता या चर्चेतील दोन उदाहरणे देतो. कारखानदार, व्यापारी इ. मंडळींच्या उद्योगामुळे देशाची समृद्धी वाढते, बेकारांना काम मिळते आणि सर्वांचेच राहणीमान उंचावते हे खरे आहे, पण म्हणून तेवढ्याकरिता त्यांचे उद्योग नैतिकदृष्ट्या प्रशंसनीय आहेत असे म्हणता येत नाही, ही सर्व मंडळी केवळ स्वार्थाने प्रेरित झालेली असल्यामुळे त्यांची कर्मे नैतिक या पदवीस पात्र होत नाहीत असे तेथे म्हटले आहे.