विषय «इतर»

विवेक म्हणजे काय?

‘विवेक’ हा शब्द ‘reason’ या इंग्लिश शब्दाचा पर्याय म्हणून आम्ही वापरत आहोत हे आमच्या वाचकांना माहीत आहे. Reason’ या इंग्रजी शब्दाला पर्याय म्हणून ‘बुद्धि’ हा संस्कृत शब्द वापरला जातो हे खरे आहे. पण ‘बुद्धि’ या शब्दाचे अनेक अर्थ असल्यामुळे तो शब्द वापरणे आम्हाला गैरसोयीचे वाटते. शिवाय आगरकरांनी ‘Rationalism’ ला समानार्थी म्हणून ‘विवेकवाद’ हा शब्द वापरला होता. त्यामुळे ‘विवेकवादी म्हणजे rationalist’ हे आम्हालाही अभिप्रेत आहे याचे वाचकांना स्मरण देऊन या लेखाच्या विषयाकडे वळतो.
या लेखाचा विषय आहे ‘विवेक म्हणजे काय?’ याचे उत्तर विवेक म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये “reason” म्हणतात ते’ हे उत्तर वर येऊन गेले आहे असे कोणी म्हणेल.

पुढे वाचा

फिटम् फाट: तस्लीमा नासरीनची कादंबरिका

तस्लीमा नासरीनमुळे या कादंबरिकेकडे आपले लक्ष जाते, अपेक्षाभंग मात्र होत नाही. जेमतेम ८७ पानांचा विस्तार, तोही प्रकाशकांनी बळेबळेच वाढवलेला. पण विचारांचा ऐवज लहान नाही. किंबहुना तेच या कादंबरिकेचे बलस्थान.

तस्लीमा ‘लज्जा’मुळे प्रकाश झोतात आली. पण ‘शोध’ ही तिच्याही आधी ६ महिने प्रकाशित झालेली. ‘फिट्टे फाट’ हे या ‘शोध’चे भाषांतर. बंगालीत ‘शोध’चा अर्थ संस्कृत ‘प्रतिशोध’ला जवळचा. ‘बदला’–‘सूड’ ‘परतफेड’ असा काहीसा. अशोक शहाण्यांनी अनुवादात बोलभाषेचा सहजपणा राखायचा बुद्ध्या प्रयत्न केलेला आहे. तो नावात आला. ऑगस्ट ९२ मध्ये ‘शोध’ आली. जुलै ९३ मध्ये ‘लज्जा’वर बंदी येईपर्यंत ‘शोध’च्या ५ आवृत्त्या निघाल्या होत्या.

पुढे वाचा

विल देअर बी एनी होप फॉर द पुअर?

(२२ मे २००० च्या ‘टाईम’ साप्ताहिकाचे सूत्र आहे ‘व्हिजन २१ — आपले काम, आपले जग.’ या अनुषंगाने लिहिलेल्या लेखांमध्ये एक लेख अमर्त्य सेन यांचा आहे, ‘विल देअर बी एनी होप फॉर द पुअर?’, नावाचा. या वाक्यातील काळाबाबतचे व्याकरण मजेदार वाटले —- “आशा ‘असेल’ का?’, असा प्रश्न आहे, “आहे का?” असा प्रश्न नाही ! सेन यांचा लेखही ठामपणे आशावादाला थारा देणारा नाही.)

प्रगती होते आहे की नाही हे तपासायला तुटवड्यांचा विचार करणे, तुटवड्यातली घट मोजणे, हे गर्भश्रीमंतीत होणाऱ्या वाढीच्या विचारापेक्षा जास्त चांगले.

पुढे वाचा

पुतळा धुणारे आजचा सुधारकचे सल्लागार !

मी संपादकांना लिहिलेले पत्र व आ. सु. चे एक सल्लागार प्रा. भा. ल. भोळे यांनी त्यास दिलेले उत्तर संपादकांनी जूनच्या अंकात प्रसिद्ध केल्याबद्दल संपादकांचे आभार मानतो. मी उपस्थित केलेल्या मूळ मुद्द्याला प्रतिमुद्द्याने उत्तर देण्याऐवजी प्रा. भोळ्यांनी आपली राजकारणी संधिसाधू भूमिका विस्ताराने मांडून आम्हाला “अलबत्या गलबत्या’ संबोधून आपले स्वतःचे व्यक्तिमत्त्व मात्र अधिक उत्तुंग करून घेतले आहे ! मी प्रा. भोळ्यांचा शिवाशिवीवरील विश्वास व त्यांनी महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला झालेला तथाकथित विटाळ (?) धुऊन काढण्याची त्यांची कृती आ. सु. च्या वाचकांच्या निदर्शनास आणल्यामुळे त्यांचा तथाकथित तत्त्वचिंतकाचा व सुधारकाचा मुखवटा ढासळून त्याखालील त्यांचा उचापती संधिसाधू राजकारण्याचा चेहरा उघडा पडल्यामुळे, प्रा.

पुढे वाचा

आम्हाला आमच्या ज्येष्ठांची लाज वाटते हो

आम्हा तरुण पिढीच्या वाचकांना असे वाटत होते की, आजचा सुधारक या मासिकामधून जुन्या पिढीचे अनुभवी, ज्ञानी, शांतपणे विचार करणारे लोक आम्हाला जगात कसे वागावे व तर्कशुद्ध आणि विज्ञाननिष्ठ जीवन कसे जगावे हे शिकवतात. पण अलीकडे आजचा सुधारक हे मासिक घाणेरड्या जातीय राजकारणाचे घासपीठ होऊ लागले आहे. सोनीया गांधीची सभा यशस्वी व्हावी म्हणून आंबेडकराचा पुतळा धुणारे लोक आम्हाला पूर्वी विचारवंत व आमच्या नागपूर विद्यापीठाचे भूषण वाटत होते. पण आता त्याबद्दल संशय वाटू लागला आहे. बाटलेला पुतळा धुऊन पवित्र करणे हा पोरखेळ वडीलधारी माणसे करू शकतात व या कृतीमुळे दलित बांधवामध्ये या वडिलधाऱ्यांविषयी आपुलकी उत्त्पन्न होईल यावर विश्वासच बसत नाही.

पुढे वाचा

पत्र व्यवहार

नाशिकचे नाव–
आजचा सुधारक जून २००० च्या अंकात ‘मुक्काम नासिक’ मथळ्याखाली नाशिकच्या वाचक मेळाव्याचे वर्णन लिहिताना लेखकांनी नाशिक किंवा नासिक शब्दाची भौगोलिक व्युत्पत्ती देण्याचा प्रयत्न केला आहे. मला वाटते, या शब्दाचा संदर्भ जास्त करून रामायणकालीन असावा. याच ठिकाणी लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले यावरून या स्थानाचा निर्देश नासिक असा करू लागले असावेत हे अधिक समर्पक वाटते. अंक आवडला.
गं. र. जोशी
७, सहजीवन हौ. सोसायटी, ‘ज्ञानराज’ सिव्हिल लाइन्स, दर्यापूर, अमरावती — ४४४ ८०३

अलबत्ये गलबत्ये, उपटसुंभ आणि हडेलहप्पी
जून २००० च्या आजचा सुधारक च्या अंकात श्री.

पुढे वाचा

बाळ : एक अज्ञातवासी ज्ञानोपासक

लहान मुलांना टी.व्ही.वरचा WWF म्हणून कार्यक्रम आहे, तो फार आवडतो. ज्यांना कोणाला तरी ठोकून काढायची इच्छा असते पण शक्य नसते अशी ही मुले असतात बहुधा. ज्ञानाच्या क्षेत्रात पुष्कळ तथाकथित मल्ल ठोकून काढायच्या लायकीचे आहेत, किंबहुना अशांचीच संख्या जास्त आहे. त्यांना सर्वांसमोर एक्स्पोज केले पाहिजे ही बाळची एक ख्वाईश होती. अधूनमधून विद्येचे असे स्वयंमन्य दिग्गज समर्थ ज्ञानोपासकांकडून चीत झालेले पाहिले की बाळला फार आनंद होत असे. त्याने स्वतःही क्वचित् संधी आली असता अशा तोतयांचे पितळ उघडे पाडले आहे. पण एकूणच असे प्रसंग त्याला कमी आले.

पुढे वाचा

कांहीही न करणारा ईश्वर

ईश्वरावरील श्रद्धा हा एक प्रकारचा पोरखेळ आहे. मनुष्यजातीच्या बाल-पणांत ही श्रद्धा शोभली असती, परंतु प्रौढ वयांत बाललीला शोभत नाहीत. ईश्वराचा मुख्य उपयोग म्हणजे पाप केले तर ते कृष्णार्पण करतां येतें, संकट आले तर जेथे स्वतःचे कांही चालत नाही तेथे ईश्वरावर हवाला ठेवून समाधान मानतां येते, आणि ईश्वराची प्रार्थना केल्याने आपल्या मनासारखे होईल अशी आशा बाळगतां येते, पण या फोल आशेचा उपयोग काय? युद्धांत दोन्ही बाजूच्या लोकांनी ईश्वराची प्रार्थना केली तर तो जय कोणाला देणार? हे देखील समजण्याची ज्यांना अक्कल नाही तेच ईश्वरावर विश्वास ठेवतात.

पुढे वाचा

प्रिय वाचक

प्रिय वाचक
आपल्या प्राचीन संस्कृतीची वैशिष्ट्ये सांगताना गुस्माहात्म्य आणि पूर्वज-पूजा यांचा उल्लेख या आधी आम्ही केला. शुद्धीचे अतोनात स्तोम हे असेच एक उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे. चित्तशुद्धीशिवाय ब्रह्मज्ञान नाही. देहशुद्धीशिवाय चित्तशुद्धी नाही अन्नशुद्धीशिवाय देहशुद्धी नाही. या अन्नशुद्धीच्या समजुतीत पोषक आहाराच्या शास्त्रीय चिकित्सेपेक्षा कल्पनारम्य भागच अधिक. उदा. अन्न शिजवणाऱ्याची तन-शुद्धी, पावित्र्य फार महत्त्वाचे. त्यासाठी त्याची जात तुमच्याइतकी किंवा जास्त शुद्ध हवी, काम शुद्ध हवे. जितके जास्त मेहनतीचे काम तुम्ही करता तेवढी तुमची जात खालची, कमी शुद्ध. म्हणून वरच्या जातीच्यांनी खालच्या जातीच्या हातचे अन्न भक्षण करू नये हा संकेत.

पुढे वाचा

अळीमिळी गुपचिळी

मी एक सामान्य उद्योजक. अर्थातच, एका उद्योगप्रधान घराण्यात जन्मल्या-मुळे पिढ्यान् पिढ्या वारसातून आणि संस्कारांतूनच उद्यमशीलता जोपासली गेलेली, त्यामुळे प्रथितयश! पण तरीही समाधानी मात्र नाही! सतत समोर प्रश्न असतात आणि त्यांची उत्तरे सुचत नाहीत त्यामुळे बेचैन असतो. आपण कोण आहोत? कशासाठी हे सारे करत आहोत? यातून नेमके साध्य काय करणार आहोत? नाहीतरी एक दिवस आपण मरणारच आणि त्यानंतर आपण जे काही, ज्या कशासाठी करत होतो, त्या कशाकशाला काही अर्थच उरणार नाही. मग हे सारे आपण करायचे तरी कशासाठी? या प्रश्नांचा भडिमार स्वतःवरच स्वतःहून करून घेत असतो.

पुढे वाचा