विषय «इतर»

फिटम् फाट: तस्लीमा नासरीनची कादंबरिका

तस्लीमा नासरीनमुळे या कादंबरिकेकडे आपले लक्ष जाते, अपेक्षाभंग मात्र होत नाही. जेमतेम ८७ पानांचा विस्तार, तोही प्रकाशकांनी बळेबळेच वाढवलेला. पण विचारांचा ऐवज लहान नाही. किंबहुना तेच या कादंबरिकेचे बलस्थान.

तस्लीमा ‘लज्जा’मुळे प्रकाश झोतात आली. पण ‘शोध’ ही तिच्याही आधी ६ महिने प्रकाशित झालेली. ‘फिट्टे फाट’ हे या ‘शोध’चे भाषांतर. बंगालीत ‘शोध’चा अर्थ संस्कृत ‘प्रतिशोध’ला जवळचा. ‘बदला’–‘सूड’ ‘परतफेड’ असा काहीसा. अशोक शहाण्यांनी अनुवादात बोलभाषेचा सहजपणा राखायचा बुद्ध्या प्रयत्न केलेला आहे. तो नावात आला. ऑगस्ट ९२ मध्ये ‘शोध’ आली. जुलै ९३ मध्ये ‘लज्जा’वर बंदी येईपर्यंत ‘शोध’च्या ५ आवृत्त्या निघाल्या होत्या.

पुढे वाचा

विल देअर बी एनी होप फॉर द पुअर?

(२२ मे २००० च्या ‘टाईम’ साप्ताहिकाचे सूत्र आहे ‘व्हिजन २१ — आपले काम, आपले जग.’ या अनुषंगाने लिहिलेल्या लेखांमध्ये एक लेख अमर्त्य सेन यांचा आहे, ‘विल देअर बी एनी होप फॉर द पुअर?’, नावाचा. या वाक्यातील काळाबाबतचे व्याकरण मजेदार वाटले —- “आशा ‘असेल’ का?’, असा प्रश्न आहे, “आहे का?” असा प्रश्न नाही ! सेन यांचा लेखही ठामपणे आशावादाला थारा देणारा नाही.)

प्रगती होते आहे की नाही हे तपासायला तुटवड्यांचा विचार करणे, तुटवड्यातली घट मोजणे, हे गर्भश्रीमंतीत होणाऱ्या वाढीच्या विचारापेक्षा जास्त चांगले.

पुढे वाचा

पुतळा धुणारे आजचा सुधारकचे सल्लागार !

मी संपादकांना लिहिलेले पत्र व आ. सु. चे एक सल्लागार प्रा. भा. ल. भोळे यांनी त्यास दिलेले उत्तर संपादकांनी जूनच्या अंकात प्रसिद्ध केल्याबद्दल संपादकांचे आभार मानतो. मी उपस्थित केलेल्या मूळ मुद्द्याला प्रतिमुद्द्याने उत्तर देण्याऐवजी प्रा. भोळ्यांनी आपली राजकारणी संधिसाधू भूमिका विस्ताराने मांडून आम्हाला “अलबत्या गलबत्या’ संबोधून आपले स्वतःचे व्यक्तिमत्त्व मात्र अधिक उत्तुंग करून घेतले आहे ! मी प्रा. भोळ्यांचा शिवाशिवीवरील विश्वास व त्यांनी महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला झालेला तथाकथित विटाळ (?) धुऊन काढण्याची त्यांची कृती आ. सु. च्या वाचकांच्या निदर्शनास आणल्यामुळे त्यांचा तथाकथित तत्त्वचिंतकाचा व सुधारकाचा मुखवटा ढासळून त्याखालील त्यांचा उचापती संधिसाधू राजकारण्याचा चेहरा उघडा पडल्यामुळे, प्रा.

पुढे वाचा

आम्हाला आमच्या ज्येष्ठांची लाज वाटते हो

आम्हा तरुण पिढीच्या वाचकांना असे वाटत होते की, आजचा सुधारक या मासिकामधून जुन्या पिढीचे अनुभवी, ज्ञानी, शांतपणे विचार करणारे लोक आम्हाला जगात कसे वागावे व तर्कशुद्ध आणि विज्ञाननिष्ठ जीवन कसे जगावे हे शिकवतात. पण अलीकडे आजचा सुधारक हे मासिक घाणेरड्या जातीय राजकारणाचे घासपीठ होऊ लागले आहे. सोनीया गांधीची सभा यशस्वी व्हावी म्हणून आंबेडकराचा पुतळा धुणारे लोक आम्हाला पूर्वी विचारवंत व आमच्या नागपूर विद्यापीठाचे भूषण वाटत होते. पण आता त्याबद्दल संशय वाटू लागला आहे. बाटलेला पुतळा धुऊन पवित्र करणे हा पोरखेळ वडीलधारी माणसे करू शकतात व या कृतीमुळे दलित बांधवामध्ये या वडिलधाऱ्यांविषयी आपुलकी उत्त्पन्न होईल यावर विश्वासच बसत नाही.

पुढे वाचा

पत्र व्यवहार

नाशिकचे नाव–
आजचा सुधारक जून २००० च्या अंकात ‘मुक्काम नासिक’ मथळ्याखाली नाशिकच्या वाचक मेळाव्याचे वर्णन लिहिताना लेखकांनी नाशिक किंवा नासिक शब्दाची भौगोलिक व्युत्पत्ती देण्याचा प्रयत्न केला आहे. मला वाटते, या शब्दाचा संदर्भ जास्त करून रामायणकालीन असावा. याच ठिकाणी लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले यावरून या स्थानाचा निर्देश नासिक असा करू लागले असावेत हे अधिक समर्पक वाटते. अंक आवडला.
गं. र. जोशी
७, सहजीवन हौ. सोसायटी, ‘ज्ञानराज’ सिव्हिल लाइन्स, दर्यापूर, अमरावती — ४४४ ८०३

अलबत्ये गलबत्ये, उपटसुंभ आणि हडेलहप्पी
जून २००० च्या आजचा सुधारक च्या अंकात श्री.

पुढे वाचा

देवदानवां नरें निर्मिलें . . .

आमच्या देशात आजही यंत्रसंस्कृतीपेक्षा मंत्रसंस्कृतीचाच पगडा अधिक आहे. आणि ती केवळ ब्राह्मणांपुरतीच मर्यादित नाही. दर मंगळवारी गणपतीपुढे नारळ, उदबत्त्या, पेढ्यांचे पुडे घेऊन तास न् तास हजारो माणसे उभी राहतात, ती काही फक्त ब्राह्मणच नसतात. ही माणसे वैयक्तिक नवस आणि परलोकात स्वतःची सोय करू पाहतात. … पण अशी रांग इस्पितळाच्या पुढल्या पेट्यांतून स्प्रया-सव्वा रुपया टाकायला कधी उभी राहत नाही. परलोक, स्वर्गलोक ह्या मंत्रसंस्कृतीतल्या पगड्यामुळे आम्ही मंत्रमुग्ध होऊन विचाराची दारे बंद करून झोपेत चालल्यासारखेच जीवनात चालतो आहोत. ह्या मंत्रसंस्कृतीतच जन्मजात शुद्धाशुद्धत्वाच्या कल्पना स्तलेल्या असतात.

पुढे वाचा

प्रिय वाचक

चाटे कोचिंग क्लासेस निमित्ताने काही प्रश्न पुढे आले आहेत. सरकारी भरघोस मदतीवर शाळा कॉलेजेस चालू असताना कोचिंग क्लासेसची गरजच काय हा त्यातला एक प्रश्न. त्यांच्यावर बंदी घालावी हा तसलाच एक भाबडा उपाय. प्रचंड खर्च करून आणलेली अद्ययावत यंत्रसामग्री, सोयीस्कर इमारती आणि उत्तम तज्ज्ञ डॉक्टर सरकारी हॉस्पिटलमध्ये असताना खाजगी डॉक्टरांची, जशी आवश्यकता वाटत असते तसेच काहीसे कोचिंग क्लासेसचे आहे. दुसरे उदा. द्यायचे झाले तर प्रवासाच्या किमान सोयी पुरविणाऱ्या, माफक दरात चालणाऱ्या एस्. टी. गाड्या असता, नुसत्या दर्शनी आरामगाड्या हव्यात कशाला असाही प्रश्न पडू शकतो.

पुढे वाचा

संस्कृती व लग्नाचे वय

भारताची संस्कृती फार उच्च दर्जाची आहे, पाश्चात्त्य देशांमध्ये नीती खालच्या दर्जाची आहे, अशी एक समजूत आपल्यात आहे. आजची नाही तर गेल्या शंभर वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे. आपली संस्कृती वरच्या दर्जाची असण्याची जी अनेक कारणे मानली जातात, त्यांत लवकर लग्न करणे हे एक, आणि स्त्रियांच्या बाबत ९९ टक्के स्त्रिया व पुरुष दोघांचीही दुराचाराची शक्यता कमी होते अशी एक भ्रामक कल्पनाही आहे.

नव्याण्णव टक्के लवकर लग्न करण्याला संस्कृती व दारिद्र्य दोन्हीही गोष्टी कारणीभूत आहेत. स्त्रीला रोजगार मिळवून स्वतःच्या पायावर उभे राहता येत नसल्याने लग्न करणे प्राप्तच होते.

पुढे वाचा

कांहीही न करणारा ईश्वर

ईश्वरावरील श्रद्धा हा एक प्रकारचा पोरखेळ आहे. मनुष्यजातीच्या बाल-पणांत ही श्रद्धा शोभली असती, परंतु प्रौढ वयांत बाललीला शोभत नाहीत. ईश्वराचा मुख्य उपयोग म्हणजे पाप केले तर ते कृष्णार्पण करतां येतें, संकट आले तर जेथे स्वतःचे कांही चालत नाही तेथे ईश्वरावर हवाला ठेवून समाधान मानतां येते, आणि ईश्वराची प्रार्थना केल्याने आपल्या मनासारखे होईल अशी आशा बाळगतां येते, पण या फोल आशेचा उपयोग काय? युद्धांत दोन्ही बाजूच्या लोकांनी ईश्वराची प्रार्थना केली तर तो जय कोणाला देणार? हे देखील समजण्याची ज्यांना अक्कल नाही तेच ईश्वरावर विश्वास ठेवतात.

पुढे वाचा

प्रिय वाचक

प्रिय वाचक
आपल्या प्राचीन संस्कृतीची वैशिष्ट्ये सांगताना गुस्माहात्म्य आणि पूर्वज-पूजा यांचा उल्लेख या आधी आम्ही केला. शुद्धीचे अतोनात स्तोम हे असेच एक उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे. चित्तशुद्धीशिवाय ब्रह्मज्ञान नाही. देहशुद्धीशिवाय चित्तशुद्धी नाही अन्नशुद्धीशिवाय देहशुद्धी नाही. या अन्नशुद्धीच्या समजुतीत पोषक आहाराच्या शास्त्रीय चिकित्सेपेक्षा कल्पनारम्य भागच अधिक. उदा. अन्न शिजवणाऱ्याची तन-शुद्धी, पावित्र्य फार महत्त्वाचे. त्यासाठी त्याची जात तुमच्याइतकी किंवा जास्त शुद्ध हवी, काम शुद्ध हवे. जितके जास्त मेहनतीचे काम तुम्ही करता तेवढी तुमची जात खालची, कमी शुद्ध. म्हणून वरच्या जातीच्यांनी खालच्या जातीच्या हातचे अन्न भक्षण करू नये हा संकेत.

पुढे वाचा