अनेक व्यक्ती एकत्र राहतात तेव्हा समाज तयार होतो. व्यक्तींचे समूहात राहणे सुखकर व्हावे, समाज-जीवन सुरळीत चालावे व समाजाची प्रगत व्हावी यासाठी व्यक्तींनी आपल्या वर्तनावर काही बंधने घालून घेणे आवश्यक असते. किंवा दुस-या शब्दांत, समाजाने, व्यक्तीने कसे वागावे यासाठी, काही मार्गदर्शक नियम घालून द्यावे लागतात व ते नियम पाळले जातील यासाठी प्रयत्न करावा लागतो.
बहुतेक सर्व मानवी समाजांमध्ये आजतागायत ‘धर्म’ मार्गदर्शक नियम घालून देत असे. पण त्यातील अनेक त्रुटी लक्षात आल्यामुळे आता बहुतेक विचारी व्यक्ती धर्माची जागा ‘नीती’ ने घ्यावी असे मानू व बोलू लागल्या आहेत.