‘जातिप्रथा आणि स्त्रिया हे भारतीय समाजातील दोन मोठे पिंजरे होत. स्त्रिया आणि शूद्र मिळून बनलेल्या ९० टक्के समाजाला अलग आणि बहिष्कृत केल्यानेच भारतीय आत्म्याचे पतन झालेले आहे.वस्तुतः ह्या दोहोंत कमालीची शक्ती आहे. परंतु हे तुरुंग कायम ठेवल्याने समाजातील सारा उल्हास, साहस आणि कर्तृत्व कुजत पडले आहे. हे दोन्ही कैदखाने परस्परसंबंधित असून परस्परांचे पोषण करतात आणि म्हणूनच ते नष्ट करण्याचे बुद्धिपुरस्सर प्रयत्न केल्याशिवाय क्रांतीची भाषा फोल आहे. आर्थिक क्रांती झाली की हे पिंजरे आपोआप तुटतील असे मानणे बरोबर नाही.
‘स्त्रियांची स्थिती तर फारच भयंकर आहे’.
विषय «इतर»
भारतीयांचे सामाजिक चिंतन
प्रस्तुत लघुलेख हा एका वैयक्तिक(?) जिज्ञासेची प्रकट मांडणी करण्यासाठी लिहीत आहे. ‘वैयक्तिक’ पुढे प्रश्नचिन्ह अशासाठी टाकले आहे की आजच्या बर्याचच विचारंवतांच्या मानसांतही कुठेतरी ही जिज्ञासा सुप्त स्वरूपात वास करत असावी अशी लेखकाची समजूत आहे. तसे असल्यास(च) या प्रकटीकरणाला थोडाफार अर्थ येईल.अन्यथा लेखकाने आपला वैयक्तिक शोध वैयक्तिकपणेच चालू ठेवणे इष्ट.
अशाच दुसऱ्या एका गोष्टीचाही खुलासा सुरुवातीलाच करणे आवश्यक आहे. ती म्हणजे प्रस्तुत लेख एका प्रामाणिक (genuine) वैचारिक जिज्ञासेपोटी लिहिला आहे. त्यामागील अज्ञानाचे कुणी वाभाडे काढले किंवा त्याची कीव केली तर त्यात वावगे काहीच ठरणार नाही कारण ती वस्तुस्थिती आहे.
जगावेगळं नातं ‘एकत्वाचं’
दूरवर बिहारमधील राजगीर परिसरातील पहाडांच्या पायथ्याशी पिलखी निवासात मिणमिणत्या दिव्यांनी दिवाळी प्रकाशली होती. सारा परिसर आनंदित होता.
प्रत्येक कुटुंब ही एक संस्था असते. तिच्यातील समाधान, प्रेम, जिव्हाळा, सुख, शांती हीच एक शक्ती बनते. त्याच शक्तीतून स्नेहाचा परिघ विस्तारत जातो. आणि मग व्यक्तिगत कुटुंबाचे विश्वकुटुंब बनते. सहजतेने समाजाशी वेगळेच स्नेहपूर्ण नाते जुळते.
असेच घडत गेले! आजपर्यंत… पण आता?माझी मैत्रीण उषा शरण सांगत होती.
‘आयुष्यात कधी-कधी अचानक अशा काही घटना घडतात की ज्यांचा अर्थ लावणं मानवी शक्तीच्या आवाक्यातलं राहत नाही.’
बिहारचे मेजर शरण व नागपूरची उषा मोहनी एकत्र का आले व आज अचानक का दुरावले, ह्याला उत्तर नाही.
बुद्धिवाद विरुद्ध भावविश्व
आंबेडकरी जीवनमूल्यांचा त्यांच्याच अनुयायांकडून पराभव आणि बुद्धिवाद्यांचा त्यांच्याच प्रकृतीकडून पराजय अशा दोन पराजय-कथा आ. सु. च्या जानेवारी अंकात आल्या आहेत. दोन्ही पराजयांचे कारण एकच आहे. ते म्हणजे बुद्धिवाद या नवीन मूल्यानेजुने सगळे काही एकदम बदलते असा समज.
श्री. भोळे यांनी पहिल्या पराभवाची मीमांसा समर्थपणे आणि विद्वत्तापूर्ण भाषेत केली आहे. त्यांच्या मीमांसेचे सार असे की संस्कृतीचे अनेक पैलू असतात, भाषा त्या सर्व पैलूंची अभिव्यक्ती करत असते, त्या संस्कृतीविरुद्ध बुद्धिवादी बंड पुकारल्याबरोबर ती बहुआयामी भाषा पूर्णपणे बदलेल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
लग्न-मुंज या समारंभाचेही असेच आहे.
कौटुंबिक समारंभातील उपस्थिती
माननीय संपादक
आजचा सुधारक,
आ. सु. मध्ये बर्याच महिन्यांपूर्वी एका वाचकाने व्रतबंध समारंभाविषयी; त्याला आस्था नसताना, उपस्थित राहावे काय म्हणून पृच्छा केली होती. त्यानंतर अलीकडे दुसन्या वाचकांनी विवाह समारंभाविषयी त्याच स्वरूपाचा प्रश्न विचारला होता. या दोन्ही वाचकांना आपण ‘‘आ.सु., १९९८, ८:११’ मध्ये वेगवेगळी उत्तरे दिली आहेत व त्यात विश्वास नसेल तर अशा समारंभांमध्ये सहभागी होऊ नये, परंतु आपले मत सौम्य शब्दांत कळवून, समारंभानंतर यथावकाश संबंधितांची भेट घेऊन त्यांची आस्थेने विचारपूस करावी असे उत्तर दिले आहे. या विषयावर मलाही काही सांगावयाचे आहे.
श्रद्धा कीं आत्मवंचना?
आम्हांला हल्ली सर्व गोष्टी कळत नाहीत हे खरें, आणि असेही पाहिजे तर म्हणू की काही गोष्टी कदाचित कधीही न कळण्यासारख्या असतील. पण त्यासंबंधीं अमुक प्रकारची श्रद्धा ठेवा असे तुम्ही कोण मला सांगणार?ज्या गोष्टी अज्ञात आहेत, त्यासंबंधी मला वाटेल ती कल्पना करण्याची मुभा आहे, तेथे श्रद्दा ठेवणे हा मूर्खपणा आहे. आत्मज्ञान वगैरे गप्पा मी ऐकणार नाही. तुम्ही ज्याला आत्मज्ञान म्हणतां ती आत्मवंचना कशावरून नाहीं?कितीही मोठा विद्वान् असला तरी त्याचे बाबतींत आत्मवंचना शक्य असते, आणि हे ज्याचे त्याला कधीही कळत नाहीं, हे सांगितलेल्या विद्वानांच्या उदाहरणावरून दिसते.
श्रद्धा प्रमाण आहे काय?
ज्ञान म्हणजे वस्तुस्थितीविषयी यथार्थ माहिती, ‘ज्ञान’ या शब्दाचा हा एकमेव अर्थ नाही. कारण संज्ञा किंवा जाणीव या अर्थानेही या शब्दाचा उपयोग होतो. या अर्थी कोणतीही जाणीव ज्ञानच आहे. त्यामुळे ज्ञानाचे दोन प्रकार आहेत, यथार्थ आणि अयथार्थ, किंवा सत्य आणि मिथ्या ज्ञान असेही म्हणतात. पण या लेखात ‘ज्ञान’ हा शब्द सत्यज्ञान या अर्थानेच वापरला आहे.
ज्ञानप्राप्तीची अनेक साधने आहेत. त्यांना प्रमाणे म्हणतात. उदा. ज्ञानेंद्रिये ही एक प्रकारची प्रमाणेच आहेत, कारण त्यांनी आपल्या शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या संवेद्य गुणांचे ज्ञान होते.
रोमन लोकशाही
रोमन नागरिकांची स्वतःच्या राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाची (identity) जाणीव दोन कल्पकथांमध्ये (myth) रुजलेली होती.
एनियस हा रोमचा मूळ पराभूत संस्थापक ट्रॉयच्या युद्धानंतर (१२०० ख्रिस्तपूर्व) वडिलांना खांद्यावर घेऊन, मुलाला हाताशी धरून निर्वासितांसह देशोधडीस लागला. त्याच्या वडिलांच्या हातात त्यांच्या देवाच्या मूर्ती होत्या. एनियस ट्रॉयमध्ये युद्धात हरणेआवश्यकच होते. कारण त्याच्या नियतीत (destiny) रोमची स्थापना करणे होते. (प्रत्यक्षात एनियसच्या नंतर अनेक पिढ्या उलटल्यावर रोमची स्थापना झाली ही गोष्ट वेगळी.)
हा एनियस वाटेत निर्वासितांसह थांबला. तिथे तो डो डो ह्या विधवेच्या प्रेमात पडला. डोडोवरच्या प्रेमामुळे त्याला पुढे निघून जाण्याची इच्छा नसते.
परिशिष्ट
ललिता गंडभीर, स.न.
‘आजचा सुधारक’मधील ‘समाज आणि लोकशाही’ हा लेख प्रभावी वाटला. महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीयांचा लोकशाही पद्धतीवरचा (आणि एकूणच जीवनावरचा) विश्वास उडत चालल्याचा भास होतो. हे विधान परंपरेने विचारी असलेल्या मध्यमवर्गास लागू होते. त्यांतले बरेचसे अमेरिकेकडे डोळे लावून असतात. त्यांच्या हा वाचनात यायला हवा असे वाटले. म्हणून तो ‘रुची’च्या पुढील अंकात (दिवाळी विशेषांक – प्रसिद्धी ३० ऑक्टोबर) समाविष्ट करावा अशी इच्छा आहे. अनुमतीसाठी हे पत्र आपणास लिहिले आहे.
सुधारक’मधील आपले लेखन वाचत असतो.‘रुची’मध्ये काही लेख पुनर्मुद्रित करीत असतो. पूर्वी यासाठी ग्रंथमाला’ नावाचे नियतकालिक असे.
कहाणी – एका ज्ञानपिपासू तपस्विनीची
१९३४ सालची गोष्ट. एका १६ वर्षांच्या उपवर मुलीचे लग्न ठरले अन् त्याप्रमाणे नाशिक क्षेत्री झाले पण. त्यावेळचे ऑल इंडिया रिपोर्टरचे संचालक श्री रा.रा. वामनराव चितळे, हे होते वरपिता. वर चि. दिनकर, वकील अन् ‘युवराज’, तर वधू होती मराठी लेखक श्री. वि.मा.दी. पटवर्धन यांची एकुलती एक भगिनी, व शेंडेफळ चि. सौ. कां. श्यामला. मुलीच्या जन्मानंतर अल्पावधीतच मातृच्छत्र हरपले व लगोलग वडील, प्रा. ग.स. दीक्षित, प्रकृति-अस्वास्थ्यामुळे पुण्याच्या फर्म्युसन महाविद्यालयांतून सेवानिवृत्त झाले. त्यामुळे ही चिचुंद्री (आजमितीसही जेमतेम ५ फूट उंचीची बुटकी अन् शिडशिडीतच मूर्ति आहे ही) तीन बंधू व वडील यांचा जीव की प्राण होती.