प्रस्तावना
प्रस्तुत निबंधाचे तीन भाग पाडले आहेत. पहिल्या भागात आगरकरांच्या अगोदरच्या काळात महाराष्ट्रात आर्थिक चिंतनाची स्थिती काय होती हे दर्शविले आहे. दुसन्या भागात आगरकरांच्या निबंधांमधून प्रकर्षाने दिसून येणारे विचारांचे पैलू दिग्दर्शित केले आहेत. निबंधाच्या तिसऱ्या भागात त्यांच्या एकूण आर्थिक चिंतनाचे समालोचन करण्याचा प्रयत्न
केला आहे.
(१) आगरकरपूर्व आर्थिक चिंतन
१८२० च्या सुमारास पेशवाईचे पतन झाल्यानंतरही ब्रिटिशांशी लढाया करून आपले उरलेसुरले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याचे व ब्रिटिशांना घालवून देण्याचे प्रयत्न चालू होते. उत्तर भारतात हे प्रयत्न बराच काळ चालू होते. १८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम, उत्तरप्रदेश व बिहारमधील उठाव ही त्या प्रयत्नांची काही उदाहरणे आहेत.
Category «इतर»
पुरुषप्रधान समाजात स्त्री पुरुषाची मालमत्ता
स्त्रियांच्या चळवळीला स्पष्ट असे विधायक उद्दिष्ट नसल्यामुळे स्त्रिया पुरुषांपेक्षा कोठेही उण्या नाहीत हे दाखविण्यात स्त्रीचळवळीची बरीच शक्ती पाश्चात्य देशात खर्च होते…… भारतामधील स्त्री-चळवळी बलात्कार, नववधूच्या हत्या ह्या गंभीर गुन्हेगारीवर धार धरीत आहेत हे योग्यच असले, तरी हुंडा तसेच बलात्कार ह्या गोष्टी समाजात का घडतात व त्यांचे निर्मूलन कसे करता येईल ह्याचा विचार अजून सुरूही झालेला नाही. स्त्रियांवर असलेले गृहिणी, आई व मिळवती स्त्री ह्या तीन भूमिकांचे अवजड ओझे कसे कमी करता येईल ह्याचा विचार स्त्री-चळवळीने कोठेच सुरू केलेला नाही. ……. बलात्काराविरुद्ध चळवळ आहे ती बहुतांशी ‘गुन्हेगाराला शासन व्हावे ह्यासाठी आहे.
खरंच, पुनर्जन्म आहे? (पूर्वार्ध)
ऑगस्ट १९९५ च्या आजच्या सुधारक मधील हा लेख वाचून आश्चर्यच वाटले. अशा प्रकारचा लेख आजचा सुधारकमध्ये अपेक्षित नव्हता. पुनर्जन्मावरील लेख छापायला माझा आक्षेप नाही. परंतु भारावून जाऊन लिहिलेल्या लेखाऐवजी अधिक विवेचक लेख शोभून दिसला असता. केवळ एक केस-रिपोर्ट वाचून श्री. प्र. के. कुलकर्णीचा अश्रद्धपणा हादरून गेला याचा खेद वाटला. प्रा. अकोलकरांचा मूळ शोधनिबंध वाचून निर्माण झालेली आपली वैचारिक अस्वस्थता श्री. प्र. ब. कुलकर्णी यांनी मोकळेपणाने मांडली आहे. ‘खरं, पुनर्जन्म आहे?’हा लेख वाचल्यावर (बहुधा मी श्री. प्र. ब. कुलकर्णीपेक्षा कमी अश्रद्ध असूनही) माझी प्रतिक्रिया मात्र वेगळी झाली.
कुटुंब : आजचे आणि उद्याचे (भाग १)
परिपूर्ण स्त्रीमुक्तीच्या संकल्पनेला जो विरोध होत आहे त्याचे मुख्य कारण, माझ्या समजुतीप्रमाणे, त्याचा परिणाम कुटुंबविघटनामध्ये होईल अशी भीती आम्हाला वाटते; हे आहे. म्हणून जी आमची कुटुंबे आम्ही प्राणपणाने जपत आहोत त्यांचे खरे स्वरूप कसे आहे ते पाहू. त्यासाठी आपणाला कुटुंबाची शास्त्रशुद्ध व्याख्या करण्याची गरज नाही. पण साधारणपणे असे म्हणता येईल की कुटुंबामध्ये एका घरात राहणारे, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, एकमेकांशी ज्यांना आपले नाते सांगता येते असे कमीअधिक वयाचे स्त्रीपुरुष असतात. त्यांचे नाते रक्ताचे असतेच असे नाही, व त्यांचे एकमेकांशी संबंध पैशांवर अवलंबून नसतात.
कारण आणि reason
मराठीत आपण ‘कारण हा शब्द आणि त्याच्या विलोम converse अर्थाचा’ म्हणून हा शब्द अनेक अतिशय भिन्न अर्थांनी वापरतो. ‘विलोम अर्थ’ याचा अर्थ उदाहरणाने स्पष्ट करता येईल. उदा. पति याचा विलोम शब्द पत्नी’, ‘शिक्षक’ याचा विलोम शब्द ‘विद्यार्थी’. ‘अ’ चा ‘ब’ शी जो संबंध असेल त्याचा विलोम संबंध म्हणजे ‘ब’ चा ‘अ’शी संबंध. उदा. जरअ ब-पेक्षा मोठा असेल तर ब अ-पेक्षा लहान असला पाहिजे. म्हणजे च्यापेक्षा मोठा या संबंधांचा विलोमसंबंध च्यापेक्षा लहान . कारण या शब्दाचा म्हणून विलोम शब्द होय, कारण जरआपण म्हणालो की ‘अ, कारण ब, तर ‘ब, म्हणून अ असे आपण म्हणू शकतो, एवढेच नव्हे तर तसे आपल्याला म्हणावे लागते.
सततचा पहारा ही स्वातंत्र्याची किंमत आहे!
ज्ञान मिळविण्यासाठी बुद्धीला पर्याय शोधण्याच्या शक्यतांबाबतच्या चर्चेत (आजचा सुधारकऑगस्ट ९५, ऑक्टोबर ९५) आजवर अशा दोन पर्यायांचा उल्लेख झालेला आहे. एक आहे साक्षात्कारी (revelatory) ज्ञान, उदा. थिआसॉफिस्टांचे अणु-संरचनेचे ज्ञान. दुसरे आहे अंतःस्फूर्तीचे (intuitive) ज्ञान, उदा. रामानुजन, Kekule वगैरेंचे ज्ञान.
या दुसऱ्या( जातीतले ज्ञान काही बर्या.पैकी स्पष्ट अशा गृहीतकांपासून किंवा पेंद्रिय माहितीपासून काही प्रमेयांपर्यंत किंवा नव्या माहितीपर्यंत जाणारे आहे. साक्षात्कारी ज्ञानाच्या बाबतीत मात्र गृहीतके किंवा पेंद्रिय माहिती यांना पाया मानले जात नाही. एका रूपकाने हा फरक स्पष्ट करतो- एक लांब, नदीसारखे टाके आहे.
विवेकवाद्यांचे ईश्वरविषयक आक्षेप
एकीकडे स्वतःच्या आस्तिकतेचे आणि दुसरीकडे स्वतःच्या नास्तिकतेचे क्रमशः मंडन करणारे प्रा. मे. पु. रेगे आणि प्रा. दि. य. देशपांडे यांचे दोन विशेष लेख आजचा सुधारकच्या जानेवारी १९९५ च्या अंकात प्रसिद्ध झाले आहेत. ईश्वर हा जगाचे कारण आहे, हा युक्तिवाद पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात कसा मांडला जातो आणि कसा खंडित केला जातो, याचा हा भारतीय अनुवाद दिसतो. त्यात पुढीलप्रमाणे मुद्दे आलेले आहेत. विवेकवाद्यांचा ईश्वरकारणवाद
(१)‘जी कोणती वस्तू अस्तित्वात असते तिचे तिच्याहून भिन्न असे काही कारण असते आणि ह्या कारणामुळे ती अस्तित्वात आली असते. आता जग अस्तित्वात आहे.
कारणाची संकल्पना आणि परमात्म्याचे अस्तित्व
याच अंकात अन्यत्र डॉ. के. रा. जोशी यांचा ‘विवेकवाद्यांचे ईश्वरविषयक आक्षेप हा लेख प्रसिद्ध झाला आहे. काही महिन्यांपूर्वी आजचा सुधारक मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘मी आस्तिक का आहे ह्या प्रा. मे. पुं. रेगे यांच्या आणि मी आस्तिक का नाही’ या माझ्या लेखांतील युक्तिवादांना ‘पाश्चात्त्य असे नाव देऊन त्याबद्दल ते पटणारे नाहीत’ असे मत त्यांनी दिले आहे. पाश्चात्त्यांच्या ईश्वरकारणतावादात त्याची मांडणी बरोबर असल्याचे जाणवत नाही आणि त्याचे खंडनही न पटणारे आहे असे ते म्हणतात. ‘वस्तुतः। ईश्वरविरोधी अर्वाचीन विवेकवाद्यांच्या प्रस्तुत आक्षेपापेक्षाही अत्यंत तर्ककठोर आणि शास्त्रीय आक्षेप चार्वाक, बौद्ध, जैन, सांख्य, मीमांसक यांनी प्राचीन काळी उपस्थित केले होते.
मनुष्याची उत्क्रान्ती आणि आधुनिक समाज
प्रत्येक व्यक्तीमध्ये जगणे, तगणे, प्रजोत्पादन करणे, वगैरेंसाठी आवश्यक असे गुण कमी जास्त प्रमाणात असतात. या गुणांच्या संचाला एकत्रितपणे “परिस्थित्यनुरूपता”म्हणतात. कोणता गुणसंच अनुरूप, हे परिस्थितीमुळे ठरते. प्रत्येक परिस्थितीत जास्त अनुरूपता असलेल्या व्यक्तींची प्रजा भावी पिढ्यामध्ये जास्त प्रमाणात टिकते, आणि याउलट कमी अनुरूप व्यक्तींचे वंश रोडावत जातात.
आपल्या शरीररचनांसाठी हे तत्त्व लावणे जवळपास सर्वमान्य आहे. उदाहरणार्थ, सूर्याकडून पृथ्वीवर येणार्या आणि जमिनीपर्यंत पोचणार्याउ किरणांना पाहू शकणारे डोळे आपल्या “इतिहासामुळे घडले. सागर तळाशी राहणार्याा माशांना आणि इतर जीवांना या किरणांशी कर्तव्य नसते, त्यामुळे त्यांचे डोळे हे किरण पाहत नाहीत.
खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (भाग ८)
ऑगस्ट अंकामध्ये म्हटल्याप्रमाणे मी प्रा. श्याम कुळकर्णी ह्यांच्या पत्रातील काही शिल्लक मुद्यांचा परामर्श घेतो व त्यानंतर ह्या चर्चेचा समारोप करतो. हा विषय आता समारोपापर्यन्त आला आहे असे वाटण्याचे कारण माझा दृष्टिकोन आता वाचकांच्या लक्षात आला आहे असे माझ्या ज्यांच्याज्यांच्याशी भेटी झाल्या त्यांनी मला प्रत्यक्ष सांगितले आहे. मी त्याबद्दल त्यांचा आभारी आहे.
मला अभिप्रेत स्वायत्तता स्त्रियांना ताबडतोब मिळू शकणार नाही ह्याची मला पुरेपूर कल्पना आहे. म्हणूनच इष्ट त्या दिशेकडे आपली वाटचाल सुरू करण्याची मला घाई झाली आहे, त्याच कारणासाठी आपण सर्वांनी मिळून पुढचा कार्यक्रम ठरविण्याची गरज शिल्लक आहे.