जिची मासिस्ट मंडळी केवळ औपचारिक स्वातंत्र्य म्हणून हेटाळणी करतात ती – म्हणजे लोकशाही – वस्तुतः सर्व हितांचा आधार आहे. हे केवळ औपचारिक स्वातंत्र्य म्हणजे जनतेचा आपल्या शासनकर्त्यांची परीक्षा करून त्यांना अधिकारावरून दूर करण्याचा हक्क. राजकीय शक्तींच्या दुरुपयोगापासून आपले रक्षण करण्याचा तो एकमेव ज्ञात उपाय आहे. ते शासितांकडून शास्त्यांचे नियंत्रण आहे.आणि राजकीय शक्ती आर्थिक शक्तींचे नियंत्रण करू शकत असल्यामुळे, राजकीय लोकशाही ही आर्थिक शक्तींवर नियंत्रण ठेवण्याचाही एकमेव उपाय आहे. लोकशाही नियंत्रण जर नसेल तर शासनसंस्थेने आपली राजकीय आणि आर्थिक शक्ती नागरिकांच्या स्वातंत्र्याच्या रक्षणाहून अतिशय भिन्न अशा हेतूंकरिता का वापरू नये याचे कसलेही कारण राहणार नाही.’
विषय «इतर»
आगरकर-वाङ्मयातील एक कूटस्थळ
आगरकरांचे लेखन म्हणजे प्रसादगुणाचा नमुना. त्यात ओजही अर्थात् भरपूर आहे, परंतु त्याचे त्यांच्या प्रसादगुणावर आक्रमण होत नाही. त्यांना काय म्हणायचे आहे याविषयी वाचकांची बुद्धि द्विधा होईल असे स्थळ शोधूनही सापडायचे नाही, इतके त्यांचे लेखन पारदर्शक आणि सुबोध आहे. त्यांची विवेचनपद्धतीही अशीच सुसंगत आणि तर्कशुद्ध. ज्याचे पूर्वग्रह फार पक्के नाहीत अशा कोणालाही सामान्यपणे पटेल अशीच ती असते. पण त्यांच्या वाङ्मयात एक स्थळ असे आहे की ते वरील दोन्ही नियमांना अपवाद आहे. हे स्थळ म्हणजे ‘देवतोत्पत्तीविषयी शेवटचे चार शब्द या लेखाचा शेवट. (आगरकर वाङ्मय, संपादक नातू देशपांडे, खंड २, पृष्ठे २०६—७).
ज्ञानप्रसारक डॉ. केतकर
डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकरांना आपण ज्ञानकोशकार म्हणतो. ते स्वतःही हे बिरुद मोठ्या आवडीने मिरवीत. पण केतकरांनी केवळ ज्ञानसंग्रह केला नाही. ज्ञानाचा विस्तार केला. प्रसार केला. तरी त्यांना ज्ञानकोशकार ही पदवी भूषणास्पद आहेच. कारण त्यांच्या आधी मराठीत कोणीही हा गड सर करू शकले नव्हते. हे काम त्यांनी ज्या अवधीत पूर्ण केले तो एकै विक्रम आहे. राजाश्रय नसताना कल्पकतेने लोकाश्रय मिळवून त्यांनी हा वाङ्मयव्यवहार तडीस नेला. अशी तडफ त्यांच्याआधी कोणी दाखविली नव्हती आणि नंतरही दाखविली नाही. बारा वर्षांत ज्ञानकोश हातावेगळा केला. तो आता शेवटास जाणार हे दिसू । लागताच कादंबरीलेखनास त्यांनी हात घातला.
धर्म, सुधारणा आणि विवेक
हे धर्मसुधारणेचे युग आहे. अनेक शतके स्थाणुवत् अपरिवर्तमान राहिलेल्या हिंदुधर्मामध्ये गेल्या शतकापासून तो आजपर्यंत अनेक सुधारणांचा पुरस्कार करण्यात आला आहे. रानडे, टिळक, गांधी, कर्मवीर शिंदे इत्यादि धर्मसुधारकांनी आपापल्या परींनी ग्रंथनिविष्ट हिंदू धार्मिक परंपरेचे नवीन अर्थ लावले आहेत. सावरकर, गोळवलकर गुरुजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बौद्धिक प्रमुख नवनवीन बदल सुचवीत आहेत. काही बाबतींत तर हिंदुधर्म टाकून वेगळ्या धर्मात एक नवा पंथ स्थापण्यापर्यंत सुधारणेने मजल मारली आहे. या सर्व विविध धर्ममंथनांसंबंधी विचार करू लागल्यावर एक गोष्ट मनात उभी राहते ती ही की धर्मसुधारणा या संकल्पनेत काही तरी विपरीत अभिप्रेत नाही काय ही शंका.
नियमबद्धतानियमाच्या मर्यादा
मला विश्वातील सर्व रचनांची या क्षणीची स्थाने आणि गती सांगा, म्हणजे मी आत्तापासून अनंत काळापर्यंतच्या त्यांच्या (सर्व रचनांच्या) स्थानांचे आणि गतींचे भाकित वर्तवून दाखवीन” – हे लाप्लासचे वाक्य म्हणजे वैज्ञानिक नियमबद्धतावादाचे ब्रीदवाक्य मानले जाते. खरे तर “मानले जात असे” असे म्हणणे जास्त योग्य.
लाप्लासने हे विधान केले तेव्हा न्यूटन नुकताच “होऊन गेला होता. गुरुत्वाकर्षणाने आणि गतीच्या नियमांनी विश्वातील सर्व रचनांबाबतच्या भविष्यकथनांची शक्यता निर्माण झाली, असे भासत होते. एक अंतिम, मूलभूत निसर्ग-नियम सापडला आहे, आणि यापुढे फक्त तपशील भरून काढायचे काम उरले आहे, अशी जबर आत्मविश्वासाची भावना काही वैज्ञानिकांमध्ये बळावली होती.
कुटुंब : आजचे आणि उद्याचे (भाग ३)
आपल्या भारतीय नागरित समाजामध्ये कुटुंबाची किंवा कुटुंबप्रमुखाची मुख्य जबाबदारी त्रिविध आहे हे आपण जाणतो. ती म्हणजे (१) मुलांचे आणि नातवंडांचे शिक्षण करणे, (२) त्यांना नोकरी लावून देणे व (३) त्यांची शक्य तितक्या थाटामाटात लग्ने लावून देणे ही होय. बाकीच्या सगळ्या जबाबदार्या( ह्यांच्यापुढे गौण किंवा तुच्छ मानल्या जातात. त्या जबाबदार्यांसमुळे पर्यायाने त्यांसाठी बसविलेल्या आपल्या समाजाच्या घडीमुळे आपल्या शिक्षणक्षेत्रावर जे अनेक परिणाम होतात त्यांपैकी काही आपण आतापर्यंत पाहिले. तसेच ते मुलांना नोकरी लावून देण्याच्या आणि त्यांची लग्ने लावून देण्याच्या बाबतींतही अधिक सविस्तरपणे पाहता येतील, पण मला त्याची गरज वाटत नाही.
बुद्धि उपयुक्त, की भावना?
अति शहाणा, त्याचा बैल रिकामा” अशी एक जुनी म्हण प्रचलित आहे. या म्हणीची पाश्र्वभूमी ग्रामीण महाराष्ट्र ही असली तरी तिचा वापर ग्रामीण तसेच नागरी संदर्भात होत आलेला आहे. एक शेतकरी फार बुद्धिमान होता व आपण आपल्या शेतीची दैनंदिन कामे फार हुशारीने करतो अशी त्याची समजूत होती. शेतीच्या मशागतीसाठी त्याच्याजवळ एक बैल होता. पण इतर सामान्य शेतकर्यांप्रमाणे औताला बैल जुंपण्यापूर्वी हा बुद्धिमान शेतकरी खूप सूक्ष्म विचार करी. त्यामुळे रोज त्याचे काम लांबणीवर पडत जाई व बैल रिकामाच राही. असे होता होता शेतीच्या कामाची वेळ टळल्याने या बुद्धिमान शेतकर्याकची अतोनात हानी झाली आणि बैल मात्र सदैव रिकामाच राहिला!
मराठी बाणा (एड्सग्रस्त महाटी भाषा)
मराठी अस्मिता उर्फ मराठी बाणा नामक एकेकाळी पालखीतून वाजत गाजत मिरवणारी चीज आता दुर्मिळ झाली असून, मराठी भाक्किांना वेळीच जाग आली नाही तर ती नामशेष होईल, याबद्दल विचारवंतांत तरी एकमत दिसते. प्रश्न असा की जरूर पडेल तेव्हा अमृतातें जिंकण्याची पैज मारणारी, सुबत्तेच्या काळात नूपुरात रंगणारी, प्रसंग ओळखून डफ तुणतुण्याची वीरश्रीने साथ करणारी मराठी भाषा आजच अशी मृतप्राय का व्हावी? सात कोटी लोकांच्या मुखी, निदान घरात तरी, असणार्याा या भाषेला स्वतःचे सरकार आहे. म्हणजेच ती केवळ लोकभाषा नसून राजभाषाही आहे. मग आजच तिला अशी घरघर का लागावी?
दिवाळीतील आनंद (भाग २)
अनिल अवचटांची भेट हे दिवाळी अंकांचे एक आकर्षण असते. यावर्षी ‘मौजेत ते ‘तेंदूपानांच्या प्रश्नावर काय म्हणतात हे वाचायची उत्सुकता होती. त्या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी त्यांच्या ज्या चकरा झाल्या त्यात एकदा ते आ. सुधारकच्या कार्यालयात येऊन गेले होते. अवचट संशोधक अधिक, कार्यकर्ते अधिक की लेखक अधिक असा प्रश्न पडतो. त्यांचे लिखाण वाचल्यावर विवेकशील मानवता हे जे मानवी जीवनाचे साध्य ते त्यांच्या शब्दाशब्दांतून दिसते.
बिडी उद्योगावर लाखो गरीब लोक पोट भरतात. चाळीस लाख नुसते विड्या वळणारे आहेत. विडीचे वेष्टण तेंदूपान असते. ते गोळा करणारे लाखो.
आगरकरांचे अर्थचिंतन
प्रस्तावना
प्रस्तुत निबंधाचे तीन भाग पाडले आहेत. पहिल्या भागात आगरकरांच्या अगोदरच्या काळात महाराष्ट्रात आर्थिक चिंतनाची स्थिती काय होती हे दर्शविले आहे. दुसन्या भागात आगरकरांच्या निबंधांमधून प्रकर्षाने दिसून येणारे विचारांचे पैलू दिग्दर्शित केले आहेत. निबंधाच्या तिसऱ्या भागात त्यांच्या एकूण आर्थिक चिंतनाचे समालोचन करण्याचा प्रयत्न
केला आहे.
(१) आगरकरपूर्व आर्थिक चिंतन
१८२० च्या सुमारास पेशवाईचे पतन झाल्यानंतरही ब्रिटिशांशी लढाया करून आपले उरलेसुरले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याचे व ब्रिटिशांना घालवून देण्याचे प्रयत्न चालू होते. उत्तर भारतात हे प्रयत्न बराच काळ चालू होते. १८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम, उत्तरप्रदेश व बिहारमधील उठाव ही त्या प्रयत्नांची काही उदाहरणे आहेत.