Category «इतर»

समतेचे मिथ्य!

गेल्या काही अंकांत सुरू असलेल्या स्त्रीस्वातंत्र्याच्या चर्चेत नी. र. वऱ्हाडपांडे यांचा “समतेचे मिथ्य” हा लेख काही मौलिक भर घालील असे वाटले होते, परंतु तसे झाले नाही. उदाहरणार्थ, समता, न्याय या संदर्भात दि. य. देशपांडे म्हणतात तसे वऱ्हाडपांडे वेड घेऊन पेडगावला जातात. पूर्वी दसर्यानला एका ताटात तांदूळ घेऊन, त्यात “रावण” रेखूनत्या रावणाला मारीत असत. वऱ्हाडपांडे असेच करतात.
जेव्हा आपले विवेचन एखाद्या पूर्वपक्षाला दिलेल्या उत्तराच्या रूपात असते, तेव्हा पूर्वपक्ष निःपक्षपातीपणाने व त्याच्या सर्व बलस्थानांसह मांडून मगच त्याचा समाचार घ्यायला हवा. त्याऐवजी पूर्वपक्षाचे दुर्बल व विकृत रूप मांडण्याने चर्चेची पातळी खालावते.

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ

विक्रमादित्याला आता अनेक शतके वेताळाला खांद्यावर घेऊनच हिंडायची सवय झाली होती. त्याचे उत्तर तयार होते. ‘वेताळा, मला संभ्रमात पाडण्याचे तुझे नियत कार्य तू आपल्यापरीने केलेस. तसे करताना तू मूळ प्रश्नावर अनेक रंगांचे थरही दिलेस. तणाव असह्य होऊन कोवळ्या वयात आत्महत्या करणे भाग पडावे ही घटना निःसंशय दुष्ट.’
‘जगातले सर्व विचारवंत एखादी कृती करणे असेल तेव्हा प्रश्न व्यक्तिगत, फार तर कौटुंबिक पातळीवर सोडवतात. तुझ्या तिरस्काराला पात्र असलेल्या इंग्रजीत याला micro-level असे म्हणतात. जेव्हा क्रिया करणे नसेल तेव्हा तोच प्रश्न व्यापक पातळीवर macro-level वर नेऊन सर्वव्यापी उत्तर शोधतात.

पुढे वाचा

चर्चा : खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (भाग ६)

स्त्रियांवर अन्याय करणारी, मुख्यतः त्यांनाच दुःखात लोटणारी विवाहसंस्था व तिच्यासोबत उदय पावलेले अनेक समज- उदा. पातिव्रत्य, प्रत्यक्ष परमेश्वरानेच घालून दिलेल्या पतिपत्नींच्या गाठी, जन्मोजन्मी एकच पती असावा असा फक्त स्त्रियांवर केला जाणारा संस्कार, (जन्मोजन्मी एकच पत्नी असावी असा पुरुषाने विचार करून त्यासाठी काम्य व्रतांचे पालन केल्याचे कोठे ऐकिवात नाही. उलट त्याने आपल्या धर्मपत्नीला टाकून देऊन तिची परोपरीने कुचंबणा केल्याची उदाहरणे अनंत आहेत!) त्याच अनुषंगाने विवाहविधीचेआणि स्त्रीयोनीचे पावित्र्य – हे सारे मानवनिर्मित आहेत; त्यांविषयीच्या कल्पना भिन्नभिन्न काळांत व प्रदेशांत बदललेल्या आहेत; त्यांमध्ये सनातन किंवा शाश्वत असे काही नाही हे एकदा मनामध्ये स्पष्ट झाले की स्त्रियांचे दुःख कमी करण्यासाठी सध्याच्या एतद्विषयक परिस्थितीमध्ये परिवर्तनीय काय आहे हे ठरविण्याची आपल्यावर जबाबदारी येते.

पुढे वाचा

तेहतीस कोटी देव आणि एक असहाय अबला

हिंदू कायदा स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती धरत नाही, नवर्या.ची मालकी मानतो. इंग्रजी सरकार सामाजिक रूढीत हात घालायचा नाही म्हणून स्वस्थ बसते. ही तटस्थता जिथे लाभाचा प्रश्न येतो तेव्हा का दाखवत नाही? पारंपारिक हिंदूपेक्षा हे सरकार जास्त जुलमी आहे. कारण एका बाजूला ते स्त्रीला शिक्षण व स्वातंत्र्य घ्यायला सांगते आणि रखमाबाईसारखी एखादी सुशिक्षित स्त्री नकोशा नवर्याषची गुलामगिरी नाकारू लागली तर तिला बंधनात बांधायला साधन होते. माझा हिंदू कायद्याचा अभ्यास आहे, त्यात अशा प्रकारची सरकारची कृती कुठेही बसू शकत नाही. हिंदू कायद्यानुसार नवर्यासकडे न गेल्यास तिला जातिनियमाने काही शिक्षा होऊ शकेल.

पुढे वाचा

धर्म आणि मूलगामी मानवतावाद (Radical Humanism)

Radical Humanism (मूलगामी मानवतावाद) या नावाने सुमारे साठ वर्षे अस्तित्वात असलेल्या तत्त्वज्ञानाचे मुखपत्र ‘The Radical Humanist’ या नावाने श्री. व्ही. एम. तारकुंडे यांच्या संपादकत्वाखाली दिल्लीहून प्रसिद्ध होत असते. मानवेंद्रनाथ रॉय यांनी स्थापन केलेल्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक तत्त्वज्ञानाच्या प्रसाराकरिता त्याचे प्रकाशन होत असते. विवेकवाद (rationalism) आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्यावर आधारलेल्या आणि स्वातंत्र्य, समता व न्याय या मूल्यांचा पुरस्कार करणाच्या विचारसरणीचा प्रसार करण्याकरिता Radical Humanist Association ही संस्था प्रयत्न करीत असते.
या संस्थेचे स्मरण आज होण्याचे कारण तिच्या मुखपत्राच्या फेब्रुवारी ९५ च्या अंकात प्रसिद्ध झालेला संपादकीय लेख.

पुढे वाचा

स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य

श्री. दिवाकर मोहनी यांच्यावर टीकेचा भडिमार न होण्याचे कारण त्यांचे स्त्रीमुक्तीवरील सर्वच विचार पटण्याजोगे आहेत हे नाही एवढेच त्यांना कळावे हा पत्र लिहिण्याचा उद्देश.
स्त्रीमुक्तीचा एक भाग म्हणून स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य द्यावे हा श्री मोहनी यांचा विचार आंधळ्याला बघण्याचे किंवा बहिर्‍याला ऐकण्याचे स्वातंत्र्य देण्यासारखा आहे. याचे कारण कळण्यासाठी आजचा सुधारक मार्च ९२ च्या पान क्र. २९ वरील श्री. विठ्ठल प्रभु यांच्या पत्रातील तिसरा परिच्छेद वाचावा.
स्त्रीला लैंगिक स्वातंत्र्य द्यावे म्हटल्यावर पुरुषासही लैंगिक स्वातंत्र्य देणे हे क्रमप्राप्तच आहे. सध्या पुरुषासही लैंगिक स्वातंत्र्य आहे असे म्हणता येणार नाही.

पुढे वाचा

बंडखोर पंडिता (भाग २)

एखाद्या महाकाव्याचा विषय व्हावा असे रमाबाईंचे जीवनचरित्र आहे. कलकत्याहून रमाबाई पुण्याला आल्या खर्या , पण मध्यन्तरी अशा काही घटना घडल्या की कदाचित् त्या कधीच पुण्याला आल्या नसत्या. कारण त्यांनी लग्न करून आसामात सिल्चर येथे संसार थाटला होता. हे लग्नही जगावेगळे होते. त्यांचा भाऊ श्रीनिवास याचे एक बंगाली मित्र बिपिनबिहारी दास मेधावी यांनी त्यांना मागणी घातली होती. भावाच्या आकस्मिक मृत्यूनंतर त्या एकाकी झाल्या होत्या. त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला. बिपिनबाबू ब्राह्मोसमाजी होते. पण बंगाल-आसामकडच्या रिवाजाप्रमाणे ते शूद्रच गणले जात. तिकडे ब्राह्मणआणि शूद्र असे दोनच वर्ण मानत.

पुढे वाचा

समतेचे मिथ्य

सुधारणेची चर्चा करायची तर मूल्ये कोणती मानायची हा प्रश्न मूलभूत महत्त्वाचा ठरतो. कारण आहे त्यापेक्षा अधिक चांगले करणे यालाच सुधारणा म्हणतात व चांगलेआणि वाईट हा मूल्यांचा विचार आहे.
सुधारणेच्या बाबतीत समता हे मूल्य असल्याचा वारंवार उद्घोष करण्यात येत असतो. असा उद्घोष करणार्‍यांमध्ये अर्थमीमांसा करून युक्तिवाद करण्याचा दावा करणारे लोकही अन्तर्भूत आहेत.
पण समता या शब्दाच्या अर्थाचे विश्लेषण केले तर समता हे मूल्य मानता येईल काय? समतेचा अर्थ असा होतो की सर्वांना सारखीच वागणूक दिली पाहिजे. म्हणजे चोर असो वा साव असो, दोघांनाही तुरुंगात पाठवले पाहिजे वा दोघांनाही सोडून दिले पाहिजे, सारी गणिते बरोबर असणार्‍या व सारी चूक असलेल्या उत्तरपत्रिकेला सारखेच अंक दिले पाहिजेत, दोघांनाही शून्य द्या वा दोघांनाही शेकडा शंभर द्या.

पुढे वाचा

समतेचे मिथ्य?

आमचे मित्र डॉ. नी. र. वर्हा डपांडे यांचा ‘समतेचे मिथ्य या शीर्षकाचा एक लेख याच अंकात इतरत्र छापला आहे. त्यात त्यांनी आजचा सुधारकमध्ये प्रसिद्ध झालेल्या स्त्रीमुक्तिवादी लिखाणावर जोरदार हल्ला चढविला आहे. आजचा सुधारकमध्ये प्रसिद्ध झालेले या विषयावरील लिखाण अत्यंत अज्ञतेचे असून ते करणार्याआ लोकांचा या विषयाच्या मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय व ऐतिहासिक संशोधनाचा काडीचाही अभ्यास नसतो, एवढेच नव्हे तर ते त्या लेखकांचे ‘जैविकीचे व मानसशास्त्राचे प्राथमिक अज्ञान दर्शविते असे ते म्हणतात. लेखाच्या शेवटी ते लिहितात की आजच्या सुधारकाने अभ्यासशून्य, बेजबाबदार व पुरोगामी हा छाप आपल्यावर लागावा या एकमात्र उद्देशाने लिहिलेले लिखाण प्रसिद्ध केल्याने तो आपल्या समाजप्रबोधनाच्या कर्तव्यात कसूर करीतआहे असे म्हणण्यास जागा होते.

पुढे वाचा

चर्चा – खरी स्त्रीमुक्ती कशात आहे?

फेब्रुवारी १९९५ अंकामध्ये माझ्या लेखमालेचा पाचवा भाग प्रकाशित झाल्यानंतर मला जी पत्रे आली ती पुढे दिली आहेत. बहुतेक सार्‍या पत्रलेखकांनी सध्याच्या स्त्रीपुरुषसंबंधविषयक संकल्पनांमुळे मुख्यतः स्त्रियांवर गुलामगिरीसदृश अन्याय होतो ह्या माझ्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले आहे, त्याबद्दल मौन बाळगले आहे. त्यांनी सद्यःपरिस्थितीमध्ये माझ्या कल्पना कश्या व्यवहार्य नाहीत, रोगापेक्षा उपचार कसा भयंकर आहे, मी कसा स्वप्नात वावरत आहे किंवा माझ्या सूचनांमुळे कसा स्वैराचार माजणार आहे ह्याचाच सविस्तर ऊहापोह केला आहे. मी (दिवाकर पुरुषोत्तम मोहनी) कोणी एक राजा आहे. वा स्मृतिकार आहे व मी फर्मान काढल्याबरोबर स्त्रियांना लैंगिक स्वायत्तता प्राप्त होऊन स्त्रीमुक्ती प्रत्यक्षात येणार आहे अशी कल्पना करून घेऊन माझ्यावर बहुतेकांनी टीका केली आहे.

पुढे वाचा