जगाच्या पाठीवरचे कुठलेही मूल आईबापांच्या वाटेनेच जगात आलेले असले तरी तेवढ्यावरच वाढत नाही. त्याच्या वाढण्यात भोवतालच्या प्रत्येक गोष्टीचा – माणसांचा जनावरांचा घरांचा – बागांचा रस्त्यांचा पुलांचा संस्थांचा व्यवस्थांचा – संशोधनांचा – बाजारांचा जाहिरातींचा त्यामागे असणाऱ्या मानवी मेंदूंचा – त्यांच्या क्षमतांचा, कमीअधिक समजुतदारीचा परिणाम असतो. आणि ह्या सगळ्यांमुळेच मुलांची जी काय व्हायची ती वाढ होत असते.
हेच सांगणारे एक पुस्तक – इट टेक्स अ व्हिलेज…. (लिहिले आहे, श्रीमती हिलरी रोधाम क्लिंटन ह्यांनी (रोधाम हे बाईंच्या माहेरचे आडनाव आहे, तर क्लिंटन हे सासरचे).