डॉ. भा.वि.देशकर, ४१, समर्थनगर, पश्चिम, वर्धारोड, नागपूर-५.
श्री. टी.बी. खिलारे यांचे आगस्ट ९६ च्या अंकातील पत्र वाचले. ईश्वराच्या जवळिकीचा दावा त्याच्या मुळापेक्षा फळावरून शोधावा हे विल्यम जेम्स ह्या मानसशास्त्रज्ञाचे म्हणणे अगदी योग्यच आहे.
मी सीतारामचंद्रनच्या विधानाकडे एका न्युरोसायंटिस्टच्या दृष्टिकोणातून पाहत आलो आहे. ते हिंदू आहेत, परंपरावादी आहेत व त्यात ते ब्राह्मण आहेत हे मला खिलारे यांच्या लेखातूनच कळले.
सायंटिस्ट म्हणून जात, धर्म कुण्याही विज्ञानवाद्याला मान्य नसावे हे मी आजपर्यंत मानत आलो आहे. विज्ञानातही पौर्वात्य व पाश्चात्त्य विज्ञान असा फरक मानत नाहीत.
विषय «इतर»
इमान
पाकिस्तानात १९५३ साली अहमदिया पंथाविरुद्ध धर्मवादी गटाने आंदोलन केले. या आंदोलनाचे पर्यवसान लाहोर येथे अहमदियाविरोधी क्रूर दंगली होण्यात झाले. या दंगलींची चौकशी करण्यासाठी पाकिस्तान सरकारने न्या.मू. महंमद मुनीर आणि न्या.मू. कयानी यांची नियुक्ती केली. पाकिस्तानातील धार्मिक नेत्यांना श्री. मुनीर यांनी भारतीय मुसलमानांसंबंधी एक प्रश्न विचारला. भारत-पाकिस्तान युद्ध झाले तर भारतीय मुसलमानांनी कसे वागावे ? सर्वांनी भारतीय मुसलमानांनी पाकिस्तानच्या हिताच्या विरुद्ध वागता कामा नये असे उत्तर दिलेले आहे. मौ. मौदुदी म्हणाले, भारतीय मुसलमानांनी कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानच्या विरुद्ध वर्तन करता कामा नये. त्यांची निष्ठा पाकिस्तानलाच असली पाहिजे.
‘गुजराथ्यांचे (गुरु)महाराज’
कोणाचेहि वास्तविक दोष काढून दाखविणे म्हटले म्हणजे मोठे कठीण काम होय. जरी आपण त्यांचे हित इच्छून प्रीतीने उपेदश केला तरी तो त्यांस कडू लागेलच. तथापि परस्परांस सन्मार्गास लावण्यास प्रयत्न करीतच असावें; हा आपला धर्म आहे, असें जाणून कोणाची भीड न धरितां आपलें काम बजवावें. या मुंबईत गुजराथी लोकांचे गुरु जांस साधारण शब्दकरून महाराज असी संज्ञा आहे, त्यांचे महात्म फार वाढले आहे. युरोप खंडांत रोमन क्याथोलीक पंथाचा मुख्य गुरु जो पोप त्याचप्रमाणे एथें चारपांच पोप आहेत. यांचा लोकांचे मन, बुद्धी, विचार, आत्मा यांवर इतका अधिकार आहे, की ते सर्वस्वी त्यांचे दासानुदास किंकर होऊन बसले आहेत.
पुस्तक परामर्श गांधीनंतरचा भारत
रामचंद्र गुहा यांच्या गांधीनंतरचा भारत या पुस्तकासंबंधी त्यांची एक मुलाखत अंजली पुरी यांनी घेतली. ती ७ मे २००७ च्या आउटलूक मध्ये प्रकाशित झाली आहे. ह्या मुलाखतीत अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या. त्यांचा अल्पसा आढावा पुढे सादर केला आहे.
खरे तर गांधीनंतरचा भारत म्हणजे स्वातंत्र्योत्तरकालीन भारताचा इतिहास असेच त्याचे स्वरूप ठरते. विषयाची कथावस्तू एवढी मोठी असल्यामुळे श्री. गुहा यांना त्याची तयारी करताना आठ वर्षे लागली. त्यांनी जुन्या दप्तरखाने व त्यांमधील कागदपत्रांचे ७० संग्रह तपासले. आपल्या पुस्तकाचा आराखडा आणि ग्रंथातील प्रकरणांची मांडणी कशी करावी हे ठरवायलाच त्यांना दोन वर्षे लागली १०० कोटी लोकसंख्या असलेला भारत, त्यात ५०० जातिजमाती आणि २३ राजमान्य भाषा हे सगळे कसे कवेत घ्यायचे ?
पुस्तक परामर्श लोकमान्य ते महात्माः लेखक – सदानंद मोरे,
राजहंस प्रकाशन पुणे यांनी “लोकमान्य ते महात्मा या शीर्षकाचा डॉ. सदानंद मोरेलिखित एक ग्रंथ दोन खंडात प्रकाशित केला आहे. या ग्रंथाचे स्वरूप “स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सत्ताकारणाचा घेतलेला वेध’, अशा प्रकारचे असल्याची भूमिका लेखकाने प्रारंभीच ठळकपणे नमूद केली आहे. पन्नास साठ वर्षांपूर्वी भारतात झालेल्या या अभूतपूर्व, ऐतिहासिक स्वातंत्र्यलढ्यावर आतापर्यंत अनेक ग्रंथ लिहिले गेले. त्यातून लोकमान्य टिळक व महात्मा गांधी याच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेसने या लढ्यात केलेल्या महनीय कामगिरीविषयी साधारणतः गौरवात्मक विवेचन आलेले आहे. तद्वतच या दोन राष्ट्रीय नेत्याच्या व विशेषतः महात्मा गांधी यांच्या त्यातील कर्तृत्वाबद्दल महाराष्ट्रात तरी भरपूर प्रतिकूल, असद्हेतूनी भरलेली जहरी टीका मोठ्या प्रमाणात केली गेली आहे.
कुरूप असण्यातही मजा
तशी ही नवल वाटावी अशी गोष्ट आहे. पण तिला भक्कम ऐतिहासिक आधार आहे. गोष्ट अशी की अगदी कुरूप माणूस असला तरी त्याने हताश होऊ नये. स्त्रियांचे अगदी रुपवतींचेसुद्धा, लक्ष, आपल्याकडे वेधून घेण्याचे प्रयत्न सोडू नयेत. ब्रिटनचे उपपंतप्रधान जॉन प्रिस्कॉट आणि त्यांचे प्रेमपात्र ह्यांच्यासंबधात उठलेले वादळ ह्याचे उत्तम उदाहरण आहे. अर्थात् ह्या प्रकरणात सत्ता ही कामात करणारी गुटी होती असे म्हणता येईल. हेन्री किसींजर अशा मामल्यांचा मोठा दर्दी अभ्यासक. त्याचा दावा असा की, सत्ताच, काय साधे अधिकारपददेखील बायकांना वश करण्याचे हुकमी साधन आहे.
भाषा बहता नीर है
कितीतरी शब्द आपण बेफिकिरीने, बेपर्वाईने वापरत असतो. त्यांच्या सांस्कृतिक संदर्भांचा आदर न ठेवता! मध्यंतरी चंद्रपूर जिल्ह्यातील वणव्याची वार्ता देताना एका वृत्तपत्राने ‘आग वडवानळासारखी पसरत आहे’ असे छापले होते. वडवानळसुद्धा अग्नीचाच अवत हे खर तील सुप्त अग्नीचा एक काल्पनिक, पौराणिक प्रकार आहे. त्या ठिकाणी ‘दावानळ’ असा शब्द साजरा नसता का ठरला ? केरळचे थोर मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते ई. एम. एस. नंबुद्रीपाद वर्षभर नियतकालिके काळजीपूर्वक वाचून पुढील वर्षारंभी मल्याळम भाषेतील प्रमाद, विसंगती, नवी वळणे यांचे विवेचन करणारा एक सालगुदस्त आढावा निरलसपणे लिहीत असत.
मानवी स्वभाव व डार्विनवाद (६)
[जेनेट रॅडक्लिफ रिचर्ड्स (Janet Radcliffe Richards), यांच्या ह्यूमन नेचर आफ्टर डार्विन, Human Nature After Darwin (Routledge, 2000) या पुस्तकाचा परिचय काही लेखांमधून करून देत आहोत. विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी डार्विनचा उत्क्रांतिवाद व त्याभोवतीचे वादवादंग वापरायचे रिचर्ड्सना सुचले. त्या अनुभवांवर प्रस्तुत पुस्तक बेतले आहे.
प्रभाकर नानावटींनी संपूर्ण पुस्तकाचे भाषांतरही केले आहे व ते प्रकाशनाच्या प्रयत्नात आहेत. सं.]
आदर्श जगाच्या भ्रमात!
डार्विनवादाचा समाजरचनेवर कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो याचा अभ्यास करणाऱ्या समाज-जीवशास्त्र या विद्याशाखेवर ‘या शास्त्राला सामायिक न्याय मान्य नाही; डार्विनवादी व समाज-जीवशास्त्रज्ञ उजव्या विचारांचे आहेत’ असा आरोप केला जात असतो.
जग खाऊन टाकणारे! जनअरण्य…
जेफ्री साक्स हे आजचे आघाडीचे अर्थतज्ज्ञ आहेत. अनेक देशांचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे आणि रशियासारख्या देशांना आर्थिक संकटातून बाहेरही काढले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे ते विश्वासू मित्र. त्यांनीच ब्लेअर यांना निराळा ‘आफ्रिका निधी’ उभारायला लावला. या पैशातून गरिबी आणि अज्ञानात रेंगाळलेल्या आफ्रिकन देशांना सावरण्यासाठी मदत होते.
जेफ्री साक्स यांना यंदा बीबीसीची अतिशय प्रतिष्ठेची अशी रीथ व्याख्यानमाला गुंफण्याचा मान मिळाला. एण्ड ऑफ पॉव्हर्टी या पुस्तकामुळे साक्स जगभर परिचित आहेतच. अर्थशास्त्र हा केवळ घडणाऱ्या घटनांचा ताळा मांडण्याचा बौद्धिक खेळ नाही.
स्त्रीवादी साहित्य काय आहे?
[मार्च २००७ मध्ये नागपूर येथे वैदर्भीय लेखिकांचे सहावे संमेलन झाले. विदर्भ साहितय संघाच्या विद्यमाने ही संमेलने होतात. अध्यक्ष/अमरावतीच्या प्राचार्य विजया डबीर ह्या होत्या. त्यांचे उद्घाटनपर भाषण, स्वल्पसंपादित सं.]
येथे मंचावर उपस्थित असलेले नागपूर विद्यापीठाचे आणि विदर्भ साहित्यसंघाचे सर्व मान्यवर, साहित्यप्रेमी लेखक आणि वाचक मित्रमैत्रिणींनो,
ह्याप्रसंगी ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ विजेत्या पाच थोर लेखकांची नावे मला आठवताहेत. कलेची बूज राखून जीवनसंमुखतेला महत्त्व देणाऱ्या कुसुमावती देशपांड्यांचे योगदान आठवते आहे. आशा बगे यांना नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. त्याबद्दल मला त्यांचे अभिनंदन करायचे आहे.
हल्ली वाचनसंस्कृती लयाला जात आहे असे आपण सतत म्हणत असतो; पण त्याचवेळी लेखन भरपूर वाढते आहे असेही चित्र आपल्याला दिसते.