विषय «इतर»

मनकवडे- ‘मनांधळे’

माणसे स्वभावतःच मनकवडी असतात. इतरांचे मनोव्यापार कल्पनेने तपासण्याचे माणसांचे कौशल्य हे भाषेचा वापर किंवा बोटांपुढे आणता येणाऱ्या अंगठ्याच्या दर्जाचे मानवी वैशिष्ट्य आहे. ते इतक्या सहजपणे आपण वापरत असतो की तसले काही कौशल्य आहे हेच आपल्याला सुचत नाही. पण चार वर्षांच्या मुलाचे या क्षेत्रातले कौशल्य बहुतांश प्राण्यांमध्ये आढळत नाही. आपण जगात येतो तेच ‘इतर मनांचे आराखडे’ घडवत आणि सामाजिक प्रतिसादांप्रमाणे आराखडे बदलून घेत.

1980-90 च्या दशकाच्या मध्याजवळ सायमन बॅरन कोहेन या ब्रिटिश मानसशास्त्रज्ञाने काही सहकाऱ्यांसोबत लहान मुलांच्या मनकवडेपणाबद्दल एक महत्त्वाचा प्रयोग केला.

पुढे वाचा

प्राथमिक शिक्षणात गणित विषयाचे अध्यापन आणि अध्ययन-एक चिंतन (भाग २)

संख्यांची लेखनपद्धती 0, शून्याची संकल्पना साकारल्याशिवाय हे शक्य होणार नव्हते. म्हणून दशक संकल्पनेनंतर ) ची संकल्पना सुचणे हा गणिताच्या प्रगतीतील महत्त्वाचा टप्पा समजला जातो. पण मोठ्या संख्या लिहिता येण्यासाठी आणखी एका संबोधाचे आकलन होणे आवश्यक होय. लिहिताना आपण कागदाच्या पानाचा, किंवा फळ्याचा (जमिनीवरील धुळीचासुद्धा) उपयोग करतो. पानाला डावी बाजू, उजवी बाजू, तसेच खालची बाजू असते. पानावर उभी रेघै ओढल्यास रेघेच्या डावीकडे आणि उजवीकडे अशा बाजू असतात. 0 ते 9 ह्या दहा चिह्नांचा उपयोग करून दोन अंकी संख्या लिहू शकू का? दोन अंकी संख्येत किती दहा आहेत आणि (दहा पेक्षा कमी) सुटे एकक किती हे सांगता येत असल्यामुळे रेघेच्या डावीकडे दशक अंक लिहून आणि उजवीकडे (एकाच ओळीत) एकक लिहून इष्ट संख्येचा बोध होतो.

पुढे वाचा

‘आम्ही नागरिक’

शासनाच्या क्रियांमुळे व निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या हक्कांमध्ये सतत झीज होत असल्याचे आपण सारे अनुभवत आहोत. हे राजकीय, आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत घडत आहे. आता ही झीज थांबवून एकत्रित नागरी क्रियांमधून नागरिकांचे हक्क पुन्हा मागण्याची वेळ आली आहे. या हेतूने ‘आम्ही नागरिक’ (We, The People) या नावाने एक संस्था स्थापण्यात येत आहे

. 1) केंद्रीभूत मुद्दे : खालील बाबतीत नागरिकांच्या हक्कांचे पुनःप्रस्थापन करणे – क) कायद्याचे राज्य, नेमकेपणाने सांगायचे तर नागरिकप्रेमी कायदा, सुव्यवस्था व निराकरणाच्या यंत्रणांची मागणी करणे. ख) समन्यायी, परिणामकारक व कार्यक्षम तऱ्हेने सार्वजनिक सेवा (Public Services) लोकांपर्यंत पोचवणे.

पुढे वाचा

सर्व काही पूर्वनियत आहे काय ?

(स्टीफन हॉकिंग ह्यांचा परिचय आजचा सुधारकच्या वाचकांना करून देण्याची आवश्यकता नाही. “Black Holes and Baby Universes and other Esays” ह्या पुस्तकातील “Is Everything Determined” ह्या लेखाचे भाषांतर/रूपांतर खाली आहे. हा लेख म्हणजे हॉकिंग ह्यांनी 1990 मध्ये केंब्रिज विश्वविद्यालयात दिलेले व्याख्यान आहे. हा लेख प्रकाशित करण्यास हॉकिंग ह्यांनी दिलेल्या परवानगीकरता मी त्यांचा आभारी आहे. सुधाकर देशमुख)

शेक्सपियरच्या ज्युलियस सीझर या नाटकात कॅशियस ब्रूटसला म्हणतो “काही वेळा तरी माणूस आपल्या प्राक्तनाचा नियंता असतो.” खरोखरच आपण दैवाला आपल्या मुठीत ठेवू शकतो का? का आपण जे काही करतो ते सर्व पूर्वनियत असते?

पुढे वाचा

‘व्हाय आय अॅम नॉट अ मुस्लिम ?’ च्या निमित्ताने (भाग-१)

इब्न वर्राक या अल्जेरियन अरबाने ‘व्हाय आय अॅम नॉट अ मुस्लिम?’ मी मुसलमान का नाही — हे पुस्तक लिहिले-ते 1995 मध्ये अमेरिकेमध्ये प्रसिद्ध झाले. वर्राक यांनी हे पुस्तक कसे काय लिहिले, याचे आश्चर्य तर वाटलेच; पण तेवढीच या लेखकाबद्दल काळजीदेखील वाटली. आपापल्या धर्माची चिकित्सा सतत केली जाणे हे त्या त्या धर्मप्रवृत्तींना, त्या त्या समाजाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असते. त्यामुळेच तो समाज विकसनशील होत जातो. परंतु दिसते असे की तो मार्ग मुस्लिम मानसिकतेने मोकळ्या मनाने अंगीकारलेला नाही. हिंदूधर्मामध्ये तर आरंभापासूनच असंख्य वेळा धर्मचिकित्सेचे लहानमोठे प्रयत्न होत राहिले.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

डॉ. निखिल जोशी, ‘तत्त्वबोध’, हायवे, माथेरान रोडजवळ, नेरळ, रायगड – 410101 (10-03-2004) पृ. 489 वरील परिच्छेद 3 मधील आध्यात्मिकांच्या दाव्यातील एक भाग “…आत्माच… भौतिक गोष्टींचे नियंत्रण करतो….” सिद्ध झालेला नाही. तर्काला किंवा मानवी संवेदनांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जाणविणारी वस्तू अशी भौतिक वस्तूची व्याख्या आहे. म्हणूनच, भौतिक उपकरणांना न जाणवणाऱ्या आत्म्याचे अस्तित्व आत्म्याच्या व्याख्येमुळे कधीही मान्य केले जाणार नाही. त्यासाठी प्रयोगाचीही गरज नाही. चांगल्या वैज्ञानिक कल्पनेचे (hypothesis) दोन अत्यावश्यक गुणधर्म असे की तिच्यामध्ये किमान घटक (factor) असतात आणि तिला तपासणारा प्रयोग त्या कल्पनेमध्येच सुचविलेला असतो.

पुढे वाचा

माहितीचे दुर्भिक्ष म्हणून विरोधाचा सुकाळ!

31 ऑक्टोबर 2002 ला एका जनहित याचिकेवर निर्णय देताना भारताचे तेव्हाचे सरन्यायाधीश बी.एन. किर्पाल यांनी केंद्र सरकारला नद्या-जोडणी लवकर करण्याचा आदेश दिला. नद्या-जोडणी अत्यंत निकडीची आहे आणि ती लवकरात लवकर करण्याचा आमचा निर्धार आहे, अशा अर्थाची विधाने राष्ट्रपती व पंतप्रधानांनी केली. त्यासाठी (माजी मंत्री व शिवसेनेचे खासदार) सुरेश प्रभूंच्या अध्यक्षतेखाली एक कृतिदल (Task Force) घडवले गेले. मधल्या काळात किर्पाल यांनी आपण केवळ सूचना केली, आदेश दिला नाही, असे सांगितले. राष्ट्रीय जनआंदोलन संघटन (NAPM), मेधा पाटकर व इतरांनी नद्या-जोडणी चुकीची असल्याचे सांगितले.

पुढे वाचा

पाण्याचे व्यवस्थापन आणि कायदेकानू (भाग २)

“माती धरून ठेवा, पाणी अडवा आणि जमिनीत मुरवा” हा आजकालचा मंत्र झाला आहे पण त्याला म्हणावा तसा जोर येत नाही. पाणलोटक्षेत्र संवर्धन (Catch- ment area Management) आणि वनीकरण (Afforestation) यांनाही जोर येत नाही याला कारणे आहेत. ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ हे एक प्रमुख कारण आहे. वनवासी गिरिजनांनी वृक्षसंपत्ती जपावी पण लाभ मात्र मैदानी लोकांचा अथवा जंगल खात्याचा व्हावा, हे बरोबर नाही. जपणाऱ्यांनाही समृद्धीचे आयुष्य का जगता येऊ नये? मुंबईने शहापूर तालुक्याचे पाणी ओढून आणावे पण शहापूर तालुक्यातील पाणलोटक्षेत्रांच्या संवर्धनाची जबाबदारी घेऊ नये, उलट धरणे गाळाने भरताहेत म्हणून ओरड करावी हे कितपत सयुक्तिक आहे?

पुढे वाचा

नैतिक बुद्धिमत्ता

सर्व पालकांना वाटते की आपली मुले आज्ञाधारक असावीत. त्यांना सिगरेट, दारू, अमली पदार्थ यांचे व्यसन असू नये. त्यांनी बाहेर मारामारी किंवा दंगेखोरपणा करू नये. त्यांनी नातेवाईकांशी व मोठ्यांशी आदराने वागावे. परंतु यासाठी नेमके काय करावे हे पालकांना समजत नाही. सदाचाराने कसे वागावे यासाठी कोणतेही नीतिनियम नाहीत. शाळेत मूल्यशिक्षणाचे पाठ गिरवून अनैतिक वर्तणुकीस आळा बसतोच असे नाही. मुलांना सारखे ‘हे कर’ आणि ‘ते करू नकोस’ असे सांगितल्याने मुलांमध्ये सदाचाराचा विकास होत नाही. मुले लहान असताना धाकाने एक वेळ ऐकतील. परंतु मोठे झाल्यावर लादले गेलेले नीतिनियम ती झुगारून देतात.

पुढे वाचा

राग आणि अभिव्यक्ती

श्री विजय तेंडुलकरांच्या वक्तव्यांवर नेहमीच वाद निर्माण होत असतात. असे का होत असावे, हा प्रश्न सर्वांनाच पडतो. तेंडुलकर हे विचार करणारे व्यक्तिमत्त्व आहे. शिवाय ते मनाने अधिक संवेदनशीलही आहेत. त्यांनी मांडलेले मत किंवा व्यक्त केलेले विचार बुद्धीने व मनाने समजावून घ्यावे लागतात. त्यांच्या वक्तव्यांचा अर्थ, त्यांमागची भूमिका समजावून घेतली तरच समजते. ते केवळ कोरडे विचारवंत नाहीत. मनाने ते एक सर्वसामान्य माणूस आहेत. जेव्हा ते नरेंद्र मोदीचा खून करायला निघतात तेव्हा ते खराखुरा खून करायला निघतात, असे नाही. समजा त्यांच्या हातात खरोखरच बंदूक दिली तर ते नरेंद्र मोदींवर गोळ्या झाडतील काय?

पुढे वाचा