विषय «इतर»

महाराष्ट्रातील पोरके पाणी (लेख-२)

धनवान व निर्धनातील भेदरेषा पाण्याने आखल्या जाणाऱ्या जलविषमतेची वाटचाल आपल्याला इथिओपिया व सोमालियातील हिंसक अनागोंदीकडे नेऊ शकते. काही राजकीय नेते, काही अधिकारी यांना याचे भान आहे. त्यांच्यामुळे काही सकारात्मक पावले उचलली जात आहेत.
चेन्नईजवळ मोठी नदी नसल्याने पिण्याच्या पाण्याची कायम रड असते. चेन्नई ते महाबलिपुरम परिसरातून पाणी उपसून टँकर सदासर्वकाळ पळताना दिसतात. ही पाण्याची खाण असली तरी ती काही अक्षय नाही. पातळी झपाट्याने घटू लागली. ती कोरडी पडली तर चेन्नई महानगरीची तहान भागविण्याकरिता रेल्वेने पाणी आणण्याशिवाय इलाज नाही, हे लक्षात आल्यावर पाणीपुरवठा सचिव शीला नायर यांनी पाण्याच्या उपशावर नियंत्रण आणले आणि समस्त इमारतींना पावसाचे पाणी साठवणे अनिवार्य असल्याचा आदेश काढला.

पुढे वाचा

परस्परावलंबनाविषयी आणखी काही (१)

अंदाजे दोन वर्षांपूर्वी मी काही अर्थकारणविषयक लेख लिहिले. ह्या लेखांची सुरुवात खादीपासून केली असली तरी त्यांचा प्रतिपाद्य विषय ‘अर्थकारणातील सुधारणा’ हा आहे. माझ्या ह्या लेखांवर काही चांगल्या प्रतिक्रिया आल्या. त्यांमध्ये मुख्यतः डॉ. चिं. मो. पंडित आणि श्री. भ. पां. पाटणकर ह्या दोघांनी माझ्या लेखांत मनापासून स्वारस्य दाखविले. पाटणकरांच्या आणि पंडितांच्या काही मुद्द्यांवर माझे म्हणणे मी सुधारकाच्या अंकांमधून मांडले असले तरी त्यांच्या सर्व मुद्द्यांचा परामर्श व्यवस्थितपणे घेण्याची गरज आहे.

डॉ. पंडित ह्यांनी माझ्या सर्व लिखाणाचा अत्यन्त साक्षेपाने विचार केलेला आहे. अनेक ठिकाणी त्यांना माझ्याकडून अधिक स्पष्टीकरण हवे आहे; त्याचप्रमाणे जेथे त्यांचा-माझा मतभेद आहे, असेही मुद्दे त्यांनी निःसंकोचपणे मांडले आहेत.

पुढे वाचा

गांधीवाद विरुद्ध नथुरामवाद

संदर्भ : आ.सु. डिसेंबर 02 मधील श्री. मधुकर देशपांडे यांचा ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हा लेख एप्रिल 03 मधील श्री. शांताराम कुळकर्णी यांचा ‘हे चित्र पहा,’ हे पत्र:
कोणत्याही संत-महात्म्याच्या किंवा महापुरुषाच्या संदर्भात जनसामान्यात प्रामुख्याने तीन प्रकारचे लोक असतात. (1) द्वेषी (2) प्रेमी (3) कुंपणावरचे. रा.स्व.संघ, म.गांधी, पं.नेहरूंचा द्वेषी होता. ‘प्रेमी’ मध्ये दोन प्रकारचे लोक असतात. भक्त आणि वादी. भक्त आपल्या प्रिय संतमहंताचे गुणगान, आरत्या, भजने, भाषणे जोशात करतील, पण आचरण करीत नसतात (थोडेसे अपवाद वगळता). आचरणाच्या वेळी त्यांचा स्वार्थ उफाळून येतो.

पुढे वाचा

मांसाहार की शाकाहार?

हल्ली नेहमी असा प्रश्न विचारला जातो की, शाकाहार चांगला की मांसाहार चांगला? कोठेही पार्टीला जावे तर मांसाहार घेणे हे प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते. म्हणूनच अनेक लोक शाकाहार सोडून मांसाहाराकडे वळतात व त्यातच आपण धन्य झालो असे मानतात. मांसाहारामुळे शरीर धडधाकट होते व त्यामुळे दीर्घायुष्य लाभते आणि प्रकृती ठीक ठेवायची असेल, तर मांसाहार अपरिहार्य व आवश्यक आहे अशी एक विचारप्रणाली आहे. याच्या उलट शाकाहारी लोक म्हणतात की, शाकाहारी राहूनसुद्धा सुदृढ शरीर, तरतरीत मेंदू व दीर्घायुष्य मिळू शकते. याचे उदाहरण द्यायचे तर प्रसिद्ध इंग्लिश लेखक बर्नार्ड शॉ व आपल्याकडचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ सर सी.

पुढे वाचा

राजकीय व अर्थविषयक व्यवस्था : काही विचार व सूचना (लेख-१)

१. मूल्ये
न्याय, स्वातंत्र्य व समता या तीन मूल्यांवर कोणतीही मानवी व्यवस्था आधारलेली असावी. त्यामधील न्याय हे मूल्य सर्वात महत्त्वाचे आहे. कारण फक्त न्याय हे एकच तत्त्व घेतल्यास त्यातून स्वातंत्र्य व समता या दोन्ही गोष्टी योग्य प्रमाणात आपोआप विकसित होतात. न्याय म्हणजे फक्त कायद्याचे बंधन व पालन या अर्थाने नाही, तर मूलभूत अर्थाने न्याय हे तत्त्व घेतल्यास त्याचा
अतिरेक होऊ शकत नाही. त्यामुळे स्वातंत्र्य व समता नष्ट होऊ शकत नाहीत. न्यायामुळे स्वातंत्र्य व समता यांचा प्रमाणबद्ध विकास होऊ शकतो. उलटपक्षी स्वातंत्र्याचा अतिरेक झाल्यास ते विषमता व अन्याय दोन्हीला कारणीभूत होऊ शकते व पूर्ण समतेचा हट्ट धरल्यास स्वातंत्र्य व न्याय यांचा बळी जातोच, पण अखेर समताही बळी पडते.

पुढे वाचा

“धोकादायक पाणी!”

पण मौजेची गोष्ट अशी, की पाणी जरी थंडगार, मधुर आणि पारदर्शक असले तरी त्याच्या मालकीचा किंवा वाटपाचा प्रश्न मात्र अत्यंत स्फोटक, कडवट आणि गुंतागुंतीचा होऊ शकतो, एवढेच नाही तर समाजव्यवस्थेत फार मोठी उलथापालथ त्यामुळे होऊ शकते. प्राचीन इराकमधली वैभवशाली संस्कृती पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे जमीन उजाड होऊन नष्ट झाली, असे मत एरिक एकहोल्म ह्या पर्यावरणशास्त्रज्ञाने मांडले आहे. सिंधू संस्कृतीचा नाश परकीय आक्रमणामुळे झाला नसून त्यांचे पाणी व्यवस्थापनाचे तंत्र बिघडल्यामुळे झाला असे मत नवीन संशोधनाद्वारे सध्या पुढे येत आहे. शाक्य आणि कोलीम या दोन गणराज्यांमधल्या ‘रोहिणी’ नदीच्या पाणीवाटपाच्या संघर्षाचे निमित्त होऊन गौतम बुद्धाला राजत्याग करावा लागला, असे डॉ.

पुढे वाचा

तव्य (ought) आणि कर्तव्य (duty)

नीतिशास्त्रातील प्रमुख संकल्पना म्हणजे ‘साधु’ (good) आणि ‘तव्य-कर्तव्य’ (ought-duty) या. त्यांपैकी ‘साधु’ म्हणजे काय याविषयी मी अनेक लेखांत (विशेषतः गेल्या दोन लेखांत) लिहिले आहे. परंतु ‘तव्याविषयी मात्र फारसे स्पष्टीकरण झाले नाही अशी माझी समजूत आहे. ती चर्चा या लेखात करण्याचा मानस आहे.
‘कर्तव्य’ किंवा ‘तव्य’ म्हणजे काय? प्रथमदर्शनी उत्तर सुचते ते म्हणजे त्या कल्पनेत बंधकत्वाची, एखादे कर्म करण्यास बद्ध करण्याची, कल्पना प्रामुख्याने समाविष्ट आहे असे दिसते. ‘अमुक कर्म माझे कर्तव्य आहे’ म्हणजे ते कर्म करण्यास मी बांधील आहे, ते मला आवडो की न आवडो, ते कर्म करण्याची इच्छा असो की नसो.

पुढे वाचा

उत्क्रांतीची तोंडओळख (लेख-२)

19 व्या शतकात पा चात्त्य जगातही धर्म, कर्मकांड, अंधश्रद्धा यांचे साम्राज्य होते. खरे तर डार्विनने 1838 मध्येच उत्क्रांतीची उपपत्ती (theory of cvolution) मांडणारा Origin of Specics नावाचा ग्रंथ लिहिला होता. परंतु डार्विनची ‘उत्क्रांतीची उपपत्ती’ पारंपारिक पा चात्त्य मनाला रूचणारी नव्हती. केवळ यासाठीच त्याने हा ग्रंथ उपपत्ती सुचल्यावर लगेच प्रकाशित केला नाही. एव्हढेच नव्हे, तर त्याने आपल्या पत्नीलाही सांगितले होते की उत्क्रांतीवरचे आपले लेखन अपेक्षेप्रमाणे आपल्या हयातीत झाले नाही, तर या विषयावरची आपली हस्तलिखिते आपल्या मृत्यूनंतरच प्रकाशित करण्यात यावी. ख्रिश्चन धर्मानुसार ईश्वरानेच सर्व काही घडवून आणले आहे.

पुढे वाचा

मानवतेविरुद्ध गुन्हा (लेख-२)

स्त्रियांवरील अत्याचार

“गोध्यातील मदतछावणीतील एका बलात्कारितेची कहाणी एक वारंवार घडलेला घटनाक्रम नोंदते. तिचे मूल तिच्यासमोर मारले गेले, तिला मारहाण केली, जाळले व मृत समजून सोडून दिले. कुठेकुठे वैविध्यासाठी अॅसिड टाकले गेले.” “प्रांताभरातील लैंगिक हिंसेच्या घटनांची संख्या तर अचंबित करणारी आहेच, पण मुख्यमंत्री, मंत्री, गुजरातेतील अधिकारी व सर्वात वाईट म्हणजे भारत सरकारचे मंत्री यांनी ज्या थातुर-मातुर आणि उपेक्षागर्भ (trivial and dismissive) त-हेने हे हाताळले, त्याने अचंबित होणे दुणावते.”
“जॉर्ज फर्नाडिस लोकसभेत म्हणाले (30 एप्रिल 2002), ‘गुजरातेतील हिंसेत काही नवीन नाही … गर्भार बाईचे पोट फाडणे, आईच्या पुढ्यात मुलीवर बलात्कार करणे, हे नवीन नाही.’

पुढे वाचा

महाराष्ट्रातील पोरके पाणी (लेख-१)

“पाणी नसेल तर आपले जीवन अशक्य होईल एवढी महती असूनही मुबलक उपलब्ध पाण्याला बाजारात किंमत नाही आणि यत्किंचित उपयोगी नसलेल्या हिऱ्याला अतोनात किंमत आहे.”
—- अॅडम स्मिथ
मराठवाड्यातील 43 तालुके (एकंदर 76 पैकी) टंचाईग्रस्त घोषित झाले आहेत. सध्या 1200 गावांना पाण्याची टंचाई असून पावसापूर्वी या यादीत आणखी 600 गावांची भर पडण्याची शक्यता आहे. लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांची अवस्था भीषण आहे. नमुन्यादाखल लातूर जिल्ह्याची स्थिती पाहता येईल. एकूण 943 गावांपैकी प्रत्येक वर्षी 450 ते 580 गावांना पाण्याची टंचाई असतेच. यंदा सगळीच गावे ग्रासलेली आहेत.

पुढे वाचा