2012 वर्षाच्या शेवटी जेव्हा सर्व न्यूज चॅनेल्स दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेसंबंधित बातम्या दाखवत होते. तेव्हा बिझनेस चॅनेलवर मात्र फिस्कल क्लिफ हा शब्द ऐकू येत होता. अमेरिकेत त्या संदर्भात काय निर्णय होत आहे याकडे जगातील सर्व शेअरबाजार श्वास रोखून बघत होते. फिस्कल क्लिफ म्हणजे काय अगदी थोडक्यात सांगायचे तर अमेरिकेत करदात्यांना काही सवलती दिलेल्या होत्या, त्या 1 जानेवारी 2013 पासून रद्द होणार होत्या. तसेच अमेरिकेचे सरकार आपल्या खर्चात खूप कपात करणार होते, कारण त्या सरकारवर 16.4 ट्रिलियन डॉलरचे महाप्रचंड कर्ज आहे आणि त्यांची वित्तीय तूटही मोठी आहे.
विषय «इतर»
एकोणिसाव्या शतकातील भारतीय स्त्रीशिक्षणाचा औपचारिक आरंभ
स्त्रियांना शिक्षणाचा शताकनुशतके नाकारला गेलेला जन्मसिद्ध हक्क त्यांना नुकताच प्राप्त होऊ लागला आहे. स्त्रीशिक्षण हा शब्द आणि संकल्पना एकोणिसाव्या शतकारंभी औपचारिकदृष्ट्या रूढ झाली. पाश्चात्त्य वाङ्मय आणि संस्कृतीच्या परिशीलनाने एकोणिसाव्या शतकातील विचारवंतांनी स्त्रीशिक्षणाच्या प्रयत्नांना सुरुवात केली. स्त्रीशिक्षणाच्या अभावातच स्त्रीजीवनातील गुलामगिरीची बीजे रुजली असल्याची जाणीव या विचारवंतांत हळूहळू दृढ होत गेली. भंग्याची मुलगी राष्ट्राध्यक्ष व्हावी असे महात्मा गांधींनी त्यामुळेच म्हटले होते. एका स्त्रीच्या शिकण्याने सारे कुटुंब सुशिक्षित बनते; आणि कुटुंब हा समाजजीवनाचा पाया स्त्रीशिक्षणाच्या अभावी रोवला जाणार नाही अशा विचारांची खूणगाठ तत्कालीन विचारवंतांनी निश्चित केली.
सत्य
सत्याचे आह्वान, बुद्धीचे विधान
सत्याचे स्वरूप, दमणूक.
सत्य काडीमोड, सत्यप्रतिशोध
सत्य तो आनंद, परावलंबी.
सत्य प्राणिमात्र, सत्य सर्व गात्र
गात्रांचे नवल, सत्यशोध.
आभास सत्य, विश्वास सत्य,
अश्रद्ध सत्य, ऐहिकाचे.
सत्य पंचतत्त्व, सत्य गुणसूत्र
सत्य अणुस्फोट, पृथ्वीवरी.
सत्य गरजवंत, सत्य प्रज्ञावंत
सत्य अदलाबदल, दोघांचीही.
सत्य जीवशास्त्र, सत्य गर्भज्ञान
सत्य संगतीच्या, निर्जीवाचे.
सत्य आसवांत, सत्य विचारात
सत्याची कायम, हालचाल.
सत्यविलासात, सत्य संन्यासात
सत्याचे पाय, फरपटते.
सत्य लिंग फक्त, सत्य योनीमात्र
सत्याचा ओरखडा, एकमेकां.
सत्य भूक जोर, सत्य पचन थोर
सत्याचे आतडे, लांबवर.
कातडे सत्य, बचाव सत्य,
सत्य मांसगोळा, भौतिकाचा.
हम
हल की तरह
कुदाल की तरह
या खुरपी की तरह
पकड भी लूँ कलम को
तो भी फसल काटने को
मिलेगी नहीं हमको।
हम तो जमीन ही तैयार कर पायेंगे
क्रान्तिबीज बोने कुछ बिरले ही आयेंगे।
हरा-भरा वही करेंगे मेरे श्रम को
सिलसिला मिलेगा आगे मेरे क्रम को।
कल जब फसल उगेगी लहलहायेगी
मेरे न रहने पर भी हवा से इठलायेगी
तब मेरी आत्मा सुनहरी धूप बन बरसेगी
जिन्होंने बीज बोया था उन्हीं के चरन परसेगी।
काटेंगे उसे जो, फिर वही उसे बोयेंगे
हम तो धरती के नीचे दबे सोयेंगे
(क्रांती, प्रगती, उन्नती, प्रबोधन ह्या सर्वांमधील कवीची भूमिका काय असते वा असावी ते फार स्पष्ट शब्दांत सांगणारी सर्वेश्वरदयाल सक्सेना ह्यांची ही कविता त्यांच्या प्रतिनिधि कविताएँ ह्या संग्रहालून घेतली आहे.)
एक डॉक्टर असलेला इंजिनीअर!
डॉक्टर चिंतामणी मोरेश्वर पंडित किंवा सी.एम. पंडित यांच्याशी झालेली माझी पहिली ओळख लोकविज्ञान संघटनेच्या माध्यमातून, लोकविज्ञानच्या सुरुवातीच्या काळात सर्व बैठका श्री.म.ना.गोगटे यांच्या ‘ताडदेव एअर-कंडीशन्ड मार्केट’मधील कार्यालयात व्हायच्या. मी अधून मधून त्यात सहभागी व्हायचो. पंडितांचे कार्यालयही तिथेच होते. गोगटे आणि पंडित दोघेही स्थापत्यतज्ज्ञ आणि दोघेही मराठी विज्ञान परिषदेचे संस्थापक सदस्य त्यामुळे लोकविज्ञानच्या काही बैठकांत दोघांचाही सहभाग असायचा. मला वाटते 1976-77 चा सुमार होता तो. मी वास्तुरचनेचा व्यवसाय नुकताच सुरू केला होता. त्यामुळे या दोघांच्याही कार्यालयात थोडाफार वेळ घालवायला मला आवडायचे. पंडितांच्या कार्यालयाबाहेरील ‘डॉ.सी.एम.पंडित,
चंपारणचा नीळविरोधी सत्याग्रह: स्वातंत्र्यलढ्याचा अहिंसात्मक शुभारंभ
चंपारणचा नीळविरोधी सत्याग्रह इ.स.1917 चा आहे. दक्षिण आफ्रिकेतन गांधीजी 1915 साली भारतात परतले. त्यावेळी ते महात्मा झाले नव्हते. दक्षिण आफ्रिकेतील बावीस वर्षांच्या कालावधीत त्यांनी बौद्धिक आदांना व्यावहारिक रूप दिले होते. रस्किनची Unto this Last पुस्तिका वाचून स्वतःची जीवनशैली बदलली होती. फिनिक येथे आश्रम स्थापून त्यांनी शेतकऱ्याची जीवनशैली अंगीकारली होती. द. आफ्रिकेतील लढ्यांमुळे कच्चे लोखंड पोलादात बदलले होते. व्यक्तिगत जीवन व मानवसंबंध यांबाबतचे व्यापक जीवनदर्शन त्यांच्यात विकसित झाले होते. तसेच समाजाची अर्थव्यवस्था व सरकारचे कर्तव्य यांबाबतही त्यांचे विचार स्पष्ट झाले होते.
गांधीजी भारतात परतले तेव्हा गुरुवर्य गोपाळ कृष्ण गोखल्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सार्वजनिक जीवात भाग न घेता केवळ भारत पाहण्याचे ठरविले होते.
भगवद्गीतेचे भारतात पुनरुज्जीवन
भगवद्गीता शाळेमध्ये मुलांना शिकवली जावी ह्यासाठी भारतीय जनता पार्टीचे राज्य असलेल्या कर्नाटक व मध्य प्रदेश ह्या राज्यांनी तशी विधेयके आणून ती सम्मत करून घेतली आहेत. कर्नाटकचे मंत्री कागेरी ह्यांनी तर अल्पसंख्यक धर्मांना – बुद्ध, ख्रिश्चन, मुसलमान यांना अशी समज दिली की गीता शाळेत शिकवणे मान्य करा अथवा भारतातून निघून जा(1) मध्यप्रदेशातील कथोलिक बिशप कौंसिल यांनी नुसतीच गीता न शिकवता साऱ्या धर्मांचा सारांश शिकवावा असा अर्ज केला. पण त्यावर म. प्र. उच्च न्यायालयाने, गीता हा काही धार्मिक ग्रंथ नाही, त्यामुळे गीता शिकवण्यास आपत्ती नसावी असा निकाल दिला.
पुस्तकपरिचय गेम्स इंडियन्स प्ले (व्हाय वी आर द वे वी आर) – लेखक – वी. रघुनाथन
एखाद्या पुस्तकाचे नावच आपल्याला इतके वेधक वाटते की वाचावेसेच वाटते, आणि एकदा वाचू लागलो की सिंदबादच्या म्हाताऱ्यासारखे ते आपल्याला सोडत नाही. गेम्स इंडियन्स प्ले हे पुस्तक या प्रकारचे आहे.
आपण भारतीय माणसे असे का वागतो? असे म्हणजे कसे, तर भर रस्त्यावर कुणाला मारले जाते, कुणावर बलात्कार केला जातो, पण एकही माणूस अडवायला तर जात नाहीच, पण नंतर साक्षही द्यायला तयार नसतो. आपण एखाद्या रांगेत उभे असतो; अचानकपणे कुणी स्थानिक पुढारी त्याच्या चार-पाच कार्यकत्यांसह तिथे येतो. रांगेची शिस्त, न्याय वगैरे गोष्टी त्याच्या खिजगणतीतही नसतात.
पैशाने श्रीमंती येत नाही (पुढे चालू)
वैयक्तिक श्रीमंती आणि सार्वजनिक श्रीमंती यांतील फरक आतार्पत समजला असेलच. सार्वजनिक श्रीमंती कशी निर्माण करायची व वाढवत न्यायची, हे आम्हा भारतीयांना अजूनपर्यंत कळलेले नाही. त्यामुळे आमच्या देशात इतक्या समस्या (सामाजिक, आर्थिक) निर्माण झाल्या आहेत. सध्या भ्रष्टाचाराच्या अनेक घटना एकामागे एक उघडकीस येत आहेत आणि त्यांच्या खमंग चर्चा करण्यातच देशवासीयांच्या बहुमोल वेळाचा अपव्यय होत आहे.
आपल्या देशातल्या भ्रष्टाचाराला आळा कसा घालायचा ह्याचा भावी उपाय अजून सापडलेला नाही. मी एक सुचवून पाहतो. त्यासाठी आपण पुन्हा वैयक्तिक व सार्वजनिक संपत्तीकडे वळू.
एखादा माणूस भ्रष्टाचार करतो, तेव्हा त्या भ्रष्टाचाराचे स्वरूप काय असते?
कुंटणकबिला
कुटुंबाची आपली कल्पनाच पतिपत्नी आणि त्याच्या आगमागच्या नातेसंबंधांशी जोडली गेलेली आहे. या नातेसंबंधांत आईवडील, सासूसासरे, भाऊबहीण, नणंदामेव्हण्या, दीरमेव्हणे, भाचेपुतण्ये, जावा, मामामावश्या, काकाआत्या, चुलत-मामे-आते-मावस भावंडे आणि अर्थातच संबंधित पतिपत्नींची मुलेबाळे, नातवंडे, सुनाजावई असा सारा गोतावळा येतो. किंवा यावा अशी अपेक्षा असते. या गोतावळ्यातले कुणी अविवाहित किंवा लग्न मोडलेले असू शकते. कुणाचा जोडीदार किंवा जोडीदारीण मयत झालेले असू शकतात. पण असे डावे माणूसही त्या कुटुंबाचाच एक हिस्सा असते. त्याला किंवा तिला स्वतःचे नाव, बापाचे किंवा नवऱ्याचे नाव आणि आडनाव असतेच असते.
बहुतांश कुटुंबातली माणसे बोलताना ‘आमच्या घरात, आमच्या घराण्यात, आमच्यात’ असे शब्दप्रयोग वारंवार आणि सहज करत असतात.