अर्जेंटिना हा भौगोलिक क्षेत्राच्या दृष्टीने जगातील (भारताच्या सातव्या क्रमांकानंतरचा) आठवा मोठा देश आहे. भारताचे भौगोलिक क्षेत्रफळ ३२,८७,२६३ चौ. कि. मी. इतके आहे, तर अर्जेंटिनाचे २७, ७६, ६५४ चौ. कि. मी. आहे. लॅटिन (दक्षिण) अमेरिकेत ब्राझील सगळ्यात मोठ्या भौगोलिक प्रदेशाचा (८५,११,९६५ चौ. कि. मी.) देश आहे, तर अर्जेटिना क्र. २ वर आहे. भारताची लोकसंख्या सुमारे १०२ कोटी आहे, ब्राझीलची १६.५ कोटी आहे, तर अर्जेंटिनाची ३.६ कोटी आहे. १९९५ च्या जागतिक आकडेवारीनुसार (मनोरमा इयरबुक, १९९९) अर्जेंटिनाचे दरडोई वार्षिक उत्पन्न ८११० डॉलर्स होते, तर भारतातील दरडोई उत्पन्न ३८५ डॉ.लस
विषय «इतर»
ऐपत
शिवसेनेला सत्ताधीश होण्याची आकांक्षा निर्माण झाल्यानंतर तिने झोपड-पट्ट्यांतील रहिवाशांची एकगठ्ठा मते मिळविण्याच्या हेतूने मुंबईमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी पक्की घरे बांधण्याची एक योजना तयार केली. कोणालाही आपल्या पूर्वीच्या राहत्या घरातला हिस्सा द्यावा न लागता झोपडपट्ट्या नष्ट करण्याची ती कल्पना चांगली होती. पण ती व्यवहारात उतरू शकली नाही. ती व्यवहार्य नाही ह्याचे चांगले भान ती योजना बनविणाऱ्यांना असावे; पण राजकीय पक्षाला काही कार्यक्रम हवा असतो. अशा कार्यक्रमाच्या गरजेपोटी पुष्कळ समस्या चिघळत ठेवाव्या लागतात. राजकीय पक्षांना प्रजेचे मोठे प्रश्न सोडविण्यात स्वारस्य नसते. ते चिघळत ठेवण्यात असते.
खरेच देवा तू असशील तर . . .
खरेच देव असता तर जग असे राहिले नसते, हजारो प्राण्यांची कत्तल होऊन त्यांच्या चमचमीत डिशेस बनल्या नसत्या. हिंदू-मुसलमान-शीख-इसाई सगळे गुण्या-गोविंदात नांदले असते, विश्व-व्यापार केंद्राच्या टॉवर्सवर अल-कैदाने हल्ले केले नसते. भ्रष्टाचारी, पाखंडी आणि चोर लोकांना आम्ही नेते केले नसते, पृथ्वीवरच्या काश्मीर नावाच्या स्वर्गात रक्ताचे पाट वाहिले नसते. दुःख, यातना, अन्याय, शिक्षा हे शब्द आपल्या शब्दकोषात नसते, कोवळ्या बालिकांवर थेरड्या नराधमांनी बलात्कार केले नसते. आम्ही कोणाचे चोरले नसते, कोणी आमचे चोरले नसते, रावण, कंस, दुर्योधन, बाबर, औरंगजेब, हिटलर, मुसोलिनी, ओमर, लादेन असले दुष्ट जन्मले नसते.
सांप्रदायिक दंगे: एक अभ्यास
विभूति नारायण राय यांनी ‘सांप्रदायिक दंगे और भारतीय पुलिस’ नावाचा एक प्रबंध लिहिला आहे. हैदराबादच्या पोलीस अकादमीने श्री रायना यासाठी विद्यावृत्ती दिली होती. राय यांचा अभ्यास इंग्रजी राजवट येण्याआधीच्या काळापासून सुरू होतो. राज्यसत्ता पोलिसांकरवी दंगे हाताळत असते. दंगेखोरांविरुद्ध बळाचा वापर, अहवालांमधून सत्य परिस्थिती नोंदणे, दंगखोरांना पकडणे, तुरुंगात ठेवणे, न्यायासनापुढे उभे करणे, अशा साऱ्या व्यवहारात पोलीस किती निःपक्षपणे वागतात, हा प्रबंधाचा विषय आहे.
सांप्रदायिकता आणि त्यातून उपजणारे दंगे केवळ ब्रिटिश साम्राज्यवादामुळे सुरू झाले असे रायना वाटत नाही. असे मत त्यांना अतिसुलभीकृत वाटते.
फलज्योतिष विज्ञान का नाही?
[विद्यापीठ अनुदान आयोगाने (विअआने) वैदिक फलज्योतिष हा विभाग सुरू करण्यासंबंधीचे निवेदन’ एका परिपत्रकातून केल्यानंतरच्या चर्चेची एक महत्त्वाची कडी म्हणून मराठी विज्ञान परिषदेने (मविपने) ‘फलज्योतिष विज्ञान आहे का?’ यावर एक विशेषांक काढला (नव्हेंबर २००१). सात ‘ज्योतिर्विदां’नी मते मांडल्यावर त्यांच्या युक्तिवादाचा वैज्ञानिक वृत्तीच्या समर्थकांकडून प्रतिवाद केला गेला. हा पूर्णच अंक वाचनीय आहे, पण त्यातील जयंत नारळीकरांच्या लेखातील ‘फलज्योतिष हे विज्ञान का नाही?’ हे प्रकरण कळीचे आहे. ते मविपच्या सौजन्याने पुनर्मुद्रित करत आहोत.]
विअआने हा अभ्यासक्रम सुरू करायचे म्हटल्यावर भारतातील वैज्ञानिकांनी विरोधाची एक आघाडी उघडली आहे, ती फलज्योतिष वैदिक आहे की नाही या संबंधी नसून तिला विअआ विज्ञानाचे रंगरूप देऊ इच्छितो यासाठी आहे.
विक्रम, वेताळ आणि आधुनिक शेख महंमद
विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि आपली पावले त्याने स्मशानाच्या दिशेने वळवली. थोडे अंतर जाताच प्रेतातील वेताळ त्याला गोष्ट सांगू लागला. . . .
राजा, कोणे एके काळी केकय देशात सत्यवान नावाचा एक ब्राह्मण राहत होता. केकय देशाची परिस्थिती तशी वाईटच होती. अर्ध्याहून अधिक प्रजा अत्यंत दरिद्री होती. देशाची लोकसंख्या जशी भरमसाठ होती, तशीच तेथील बेकारी देखील. शेती सगळी पावसावर अवलंबून असलेली आणि लोक आळशी व अज्ञानी त्यामुळे इतर उद्योगधंदेही मरगळलेले.
सत्यवान देखील देशातल्या बहुसंख्य प्रजेप्रमाणे गरिबीतच आयुष्य कंठत होता.
सांस्कृतिक नेतृत्व?
महाराष्ट्रातील सांस्कृतिक नेतृत्वाने (पत्रकार, विचारवंत, संपादक, लेखक, कवी इत्यादी) या बदलत्या जगाचे, माध्यममाहितीच्या क्रांतीचे, विज्ञान-तंत्रज्ञानाचे, दोलायमान मनःस्थितीचे आणि बहुसांस्कृतिकतेचे आव्हान विचारा तही घेतलेले नाही. आपल्या मानसिकतेच्या भौतिक (जातीय आणि भाषिक) कक्षा रुंदावल्या नाहीत. आफ्रिकेपासून अमेरिकेपर्यंत आणि अर्जेटिनापासून ऑस्ट्रेलिया-पर्यंत जे नवे प्रवाह साहित्य-संस्कृतीत येत होते, लोकांचे दैनंदिन जीवन बदलत होते, नवी मूल्ये तयार होती, नाती बदलत होती, त्यांची दखल घेतलेली नाही.
या सर्व जगडव्याळ घटनांचा संस्कार साहित्यातून प्रगट व्हायला ‘साहित्याचे राजकीय जागतिकीकरण’ होण्याची गरज नाही. अगदी कौटुंबिक, सामाजिक कथेतून वा राजकीय कादंबरीतूनही बदलणाऱ्या मानसिकतेचे चित्र रेखाटता येते.
अक्कलखाते
यूनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ही संस्था लहान आणि मध्यम गुंतवणूकदारांना देशातील उद्योगांमध्ये ‘थेट’ गुंतवणूक करता यावी यासाठी घडली. सरकारी नियंत्रणाखाली आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली या संस्थेत गुंतवलेले पैसे उद्योगांचे समभाग (शेअर्स) घेण्यासाठी वापरुन ही गुंतवणूक होत असते. बँका उद्योगांना कर्जे देतात तर युनिट ट्रस्ट थेट मालकीचा भाग विकत घेते, असा हा प्रकार असतो. सध्या यू.ट्र.ऑ.इं.ची यूएस ६४ ही योजना चर्चेत आहे. हिच्यात गुंतवणूक होती १४० अब्ज रुपये, आणि आज हिचा तोटा आहे ४५ अब्ज रुपये. काही उद्योगांचे समभाग अवास्तव किमतींना विकत घेतले गेले, व नंतर ते उद्योग अकार्यक्षम (किंवा फसवणूक करणारे) असल्याने तोटा आला, हे आता जगजाहीर झाले आहे.
हक्क केवळ मातेचाच
वसंत पळशीकर यांच्या लेखात (आ.सु. सप्टें. २००१) पुढील विधान आहे. “मुलांना जन्म देणे, अर्भकावस्थेत त्यांचे पोषण व संगोपन करणे हे कार्य सामान्यपणे माता बनणाऱ्या स्त्रीचे राहावे हे स्वभाविक व इष्टही आहे. ते अटळही आहे.”
“एकदा मुलाचा जन्म झाल्यावर त्याचे पोषण व संगोपन करणे हे मातेचे काम व ते स्वाभाविक व इष्टही आहे” ह्या वसंत पळशीकरांच्या भूमिकेला माझा विरोध आहे. आपल्या मुलांचे संगोपन कुणी करावे हा मातेचा निर्णय आहे. आपल्या मुलांसाठी काय इष्ट आहे हे ठरवण्याचा हक्क फक्त मातेला आहे. तीच स्वतःची कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक परिस्थिती जाणून घेऊन स्वतःच्या व मुलांच्या हिताचा विचार करू शकते.
‘मातृत्व’च्या निमित्ताने (Pair-bonding and Parenting)
नव्हें २००१ च्या आ.सु.च्या अंकात ललित गंडभीर यांनी लिहिलेला ‘मातृत्व’ हा विचारांना चालना देणारा लेख वाचला. त्यावर सुचलेले काही विचार असे —-
मातृत्व म्हणजे काय केवळ मुलांना जन्म देणे? पालनपोषणही त्यात येते का? वडलांचा त्यात किती भाग असावा? मुलांचे संगोपन करत असताना मातेची बौद्धिक भूक कशी पुरी करावी? आजच्या समाजाला पडलेल्या प्रश्नांपैकी हे काही प्रश्न आहेत.
आपण काळात मागे जाऊन आपला समाज कसा उत्क्रांत झाला ते थोडक्यात पाहू. माणूस पाचेक लाख वर्षात अग्नीपासून अग्निबाणापर्यंत कसा पोचला याची कहाणी नाट्यमय आहे. पण आज धोका संभवत आहे की या सर्वाने दिपून जाऊन माणूस विसरेल की झिलईदार पृष्ठमागाखाली तो एक कपीच आहे.