मासिक संग्रह: जुलै, २००३

पत्रसंवाद

गांधींना छोटा करणारा नथुराम मोठा कसा?
एप्रिल 2003 चा आजचा सुधारक वाचला त्यातील शांताराम कुलकर्णी यांच्या पत्रावर माझ्या प्रतिक्रिया देत आहे.
‘महात्मा’ही गांधींना मिळालेली पदवी त्यांच्या महान कार्याविषयीची पोहोच पावती होती. ‘अहिंसा’, ‘सत्याग्रह’ यासारख्या प्रभावी हत्यारांनी, शांततामय मार्गांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अध्यात्माचा आधार घेऊन गांधींनी नैतिकतेतून सामान्य माणसाला स्वातंत्र्यलढ्यासाठी तयार केले. म्हणूनच स्वातंत्र्य-प्राप्तीनंतर हाच महात्मा स्वतंत्र भारताचा ‘राष्ट्रपिता’ झाला.
आपल्या पित्याविषयीसुद्धा वाईट विचार व्यक्त करताना मुलगा आपल्या घराण्याच्या संस्कृतीचा चांगल्या विवेकी जीवनमूल्यांचा विचार करतो. ‘पिता’ हा कुटुंबाचा पालक असतो, म्हणूनच कुटुंबीय त्याला गुणदोषासहित स्वीकारीत असतात.

पुढे वाचा

कुटुंबाच्या मर्यादेत वृद्धांचा सांभाळ

आठ पंधरा दिवसांपूर्वी माझ्या सासूबाई हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या 83 व्या वर्षी निवर्तल्या. गेली 8-10 वर्षे त्या आमच्याचकडे होत्या. आणि त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांची एकुलती एक मुलगी-माझी पत्नी–वारल्यानंतरही मी त्यांना प्रेमाने सांभाळले, हवे नको पाहिले, दवापाणी काटेकोरपण बघितले. यात जगावेगळे मी काही करीत आहे अशी माझी भावना नव्हतीच. पण त्या निवर्तल्यानंतरच्या ज्या प्रतिक्रिया माझ्याजवळ व्यक्त झाल्या त्या मात्र धक्कादायक वाटतात.
“काय, म्हातारीचा बोजा उतरला? सुटलात तिच्या …ला.’ ही त्यातली एक प्रतिक्रिया. “काही बोलू नका हो तुम्ही, वस्तुस्थिती हीच होती.” हे वर. हे बोलणारे माझे मित्र एरवी मनाने मायाळू आहेत.

पुढे वाचा

समाजरचना–विचार

समाजरचनेचा विचार करताना तळागाळातील व्यक्तीपासून ‘उच्च’ वर्गातील व्यक्तींसकट सर्वांच्या हितासाठी नेमके काय हवे याचे भान हवे. जोडणारे बंध व्यक्ती-व्यक्तीमध्ये वा एकूण समाजामध्ये वितुष्ट आणणारे असल्यास त्यांचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. सामान्यपणे कुठलाही वाद व विशेषकरून टोकाचा राष्ट्रवाद व अशा राष्ट्रवादांच्या संकेत-संज्ञा वापरण्यावर दुराग्रह या कुठल्याही सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या समाजाला हितावह ठरणाऱ्या नाहीत. भावनांचा उद्रेक होणार नाही याची काळजी घेणारी सक्षम यंत्रणा असणे गरजेचे आहे. समाजातील अभिजन वर्गाकडे role-model म्हणून इतर बघतात. त्यांचे सही सही अनुकरण करतात. म्हणून या अभिजनवर्गाने आपले आचार-विचार, वर्तणूक, सोई-सुविधा, छंद-सवयी इत्यादींबद्दल जास्त जागरूक व संयमित असणे गरजेचे आहे.

पुढे वाचा

‘बुश-बटन’ साम्राज्यवाद

इराकी मोहिमेचे वैशिष्ट्य दोन प्रतिमांच्या रूपांत नजरेसमोर येते. बगदादच्या फिरदौस चौकातील सद्दाम हुसेनचा पुतळा उखडून टाकणे ही पहिली प्रतिमा. एका जुलमी राजवटीचा होत असलेला अंत आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखाली जगात प्रस्थापित होत असलेली एक नवी व्यवस्था (World Order) ह्यांचे प्रतीक म्हणजे जणू ही प्रतिमा. दुसरी प्रतिमा आहे इराकी वस्तुसंग्रहालयाची आणि अमेरिकन तैनाती फौजांच्या नजरेसमोर गुंड तिथे करीत असलेल्या लुटीची. “अमेरिकाप्रणीत शांती’ (Pax Americana) ह्याच्या यश-अपयशावर ह्या दोन प्रतिमा फार अचूक टिप्पणी करतात : जबाबदारीशिवाय सत्ता! बुशचे पाठिराखे ह्या ‘बुश तत्त्वज्ञानाचे’ वर्णन साम्राज्यवादाचे पुनरागमन म्हणून करत नाहीत.

पुढे वाचा

विरोधकांबाबतचा अभिमान (राजर्षि शाहू गौरव ग्रंथातून)

छत्रपतींनी “आमच्या स्वराज्यातील कोणत्याही धर्मपीठावरील अधिपती नेमण्याचे अधिकार छत्रपतींचे आहेत. त्याचप्रमाणे चालावे,’ असा लेखी हुकूम जारी केला. “काय जाधवराव, तुम्ही तर कानांवर हात ठेवले होतेत, पण कोदंडाने दिलाच ना पुरावा काढून!” महाराजांच्या या टोमण्यावर जाधवरावादी आम्ही सगळेच हसलो. संध्याकाळी पन्हाळा लॉजवर पुराव्याचे पुस्तक पाठवून दिले.
या घटनेपूर्वी करवीर शंकराचार्यांच्या पीठावर महाराजांनी डॉ. कुर्तकोटींची स्थापना केली होती आणि त्याबद्दल केवळ भारतातूनच नव्हे, तर इंग्लंड अमेरिकेतून शाहूमहाराजांवर अभिनंदनाचा वृत्तपत्री वर्षाव झाला होता. पण वरील प्र न नेमका काय हेतूने त्यांनी विचारला, त्याचे इंगित मात्र माझ्या, जाधवरावांच्या किंवा दिवाणसाहेबांच्या अटकळीत त्या वेळी मुळीच आले नाही.

पुढे वाचा

इराक युद्ध आणि जागतिक व्यवस्था

१९९१ मध्ये पश्चिम आशियात पहिले आखाती युद्ध भडकले. इराकने आपल्या दक्षिणेकडे असलेल्या कुवैत नावाच्या टीचभर देशावर हल्ला करून तो प्रदेश गिळंकृत केल्याचे निमित्त झाले, आणि अमेरिकाप्रणीत आघाडीने इराकवर हल्ला करून कुवैतला मुक्त केले. दोन महिन्यांपूर्वी याच प्रदेशात दुसरे आखाती युद्ध झाले. इराककडे सर्वसंहारक शस्त्रास्त्रे (weapons of mass destruction), म्हणजे अण्वस्त्रे, रासायनिक अस्त्रे, जैविक अस्त्रे प्रचंड प्रमाणात आहेत; ही शस्त्रास्त्रे दहशतवादी संघटनांच्या हाती लागण्याची शक्यता आहे; यामुळे सगळ्या जगाच्या सुरक्षिततेला धोका आहे; असा कांगावा करीत अमेरिकेने इराकवर हल्ला केला. संयुक्त राष्ट्रसंघटनेने अशा आततायी युद्धाला केलेला स्पष्ट विरोध सरळ धाब्यावर बसवून अमेरिकेने जगावर आणखी एक युद्ध लादले.

पुढे वाचा

सतीची चाल, पुनर्विवाह बंदी, बालविवाह आणि . . . जातिभेद??

एकोणिसाव्या व विसाव्या शतकात जातिभेदावर बऱ्याच चर्चा झाल्या आणि त्याची जरूरही होती, कारण अस्पृश्यतेने त्यापूर्वी धुमाकूळ घातला होता. ब्रिटिश राज्यात जगभर त्याला कुप्रसिद्धी मिळून एकूण हिंदू धर्मीयांची निंदा झाली. हिंदू म्हटले की ‘काहीतरी किळसवाणे’ असा सर्वत्र समज झाला. तसे पाहता सर्वच समाजात class consciousness किंवा काही त-हेची गुलामी होती. परंतु जन्मतःच जातिभेदाने फुटीर होणारा समाज भारताशिवाय जगाच्या पाठीवर कोठेच नव्हता. येथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती ही की 1945 सालच्या सुमारास प्रसिद्ध विदुषी कै. इरावतीबाई कर्वे यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जातीतील लोकांच्या चेहऱ्यावर 19 मोजमापे घेऊन जातीनुसार त्यात काही फरक आढळतो का ते पाहिले होते व संख्याशास्त्रानुसार असा निष्कर्ष काढला की त्यात फरक नव्हता.

पुढे वाचा

महाराष्ट्रातील पोरके पाणी (लेख — 1)

“पाणी नसेल तर आपले जीवन अशक्य होईल एवढी महती असूनही मुबलक उपलब्ध पाण्याला बाजारात किंमत नाही आणि यत्किंचित उपयोगी नसलेल्या हिऱ्याला अतोनात किंमत आहे.”
—- अॅडम स्मिथ
मराठवाड्यातील 43 तालुके (एकंदर 76 पैकी) टंचाईग्रस्त घोषित झाले आहेत. सध्या 1200 गावांना पाण्याची टंचाई असून पावसापूर्वी या यादीत आणखी 600 गावांची भर पडण्याची शक्यता आहे. लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांची अवस्था भीषण आहे. नमुन्यादाखल लातूर जिल्ह्याची स्थिती पाहता येईल. एकूण 943 गावांपैकी प्रत्येक वर्षी 450 ते 580 गावांना पाण्याची टंचाई असतेच. यंदा सगळीच गावे ग्रासलेली आहेत.

पुढे वाचा

मानवतेविरुद्ध गुन्हा (लेख–2) स्त्रियांवरील अत्याचार

“गोध्यातील मदतछावणीतील एका बलात्कारितेची कहाणी एक वारंवार घडलेला घटनाक्रम नोंदते. तिचे मूल तिच्यासमोर मारले गेले, तिला मारहाण केली, जाळले व मृत समजून सोडून दिले. कुठेकुठे वैविध्यासाठी अॅसिड टाकले गेले.” “प्रांताभरातील लैंगिक हिंसेच्या घटनांची संख्या तर अचंबित करणारी आहेच, पण मुख्यमंत्री, मंत्री, गुजरातेतील अधिकारी व सर्वात वाईट म्हणजे भारत सरकारचे मंत्री यांनी ज्या थातुर-मातुर आणि उपेक्षागर्भ (trivial and dismissive) त-हेने हे हाताळले, त्याने अचंबित होणे दुणावते.”
“जॉर्ज फर्नाडिस लोकसभेत म्हणाले (30 एप्रिल 2002), ‘गुजरातेतील हिंसेत काही नवीन नाही … गर्भार बाईचे पोट फाडणे, आईच्या पुढ्यात मुलीवर बलात्कार करणे, हे नवीन नाही.’

पुढे वाचा

उत्क्रांतीची तोंडओळख (लेख–2)

19 व्या शतकात पा चात्त्य जगातही धर्म, कर्मकांड, अंधश्रद्धा यांचे साम्राज्य होते. खरे तर डार्विनने 1838 मध्येच उत्क्रांतीची उपपत्ती (theory of cvolution) मांडणारा Origin of Specics नावाचा ग्रंथ लिहिला होता. परंतु डार्विनची ‘उत्क्रांतीची उपपत्ती’ पारंपारिक पा चात्त्य मनाला रूचणारी नव्हती. केवळ यासाठीच त्याने हा ग्रंथ उपपत्ती सुचल्यावर लगेच प्रकाशित केला नाही. एव्हढेच नव्हे, तर त्याने आपल्या पत्नीलाही सांगितले होते की उत्क्रांतीवरचे आपले लेखन अपेक्षेप्रमाणे आपल्या हयातीत झाले नाही, तर या विषयावरची आपली हस्तलिखिते आपल्या मृत्यूनंतरच प्रकाशित करण्यात यावी. ख्रि चन धर्मानुसार ईश्वरानेच सर्व काही घडवून आणले आहे.

पुढे वाचा