भूत

आजचा सुधारकचा वाचक भुतां-खेतांवर विश्वास ठेवत असेल असे कुणी म्हणणार नाही. भूत का नाही? त्याच्या संदर्भातील गोष्टी किंवा घटना कश्या बनावट आहेत ? याची चर्चा करण्याचा प्रश्नही येथे उद्भवत नाही. परंतु ‘भूत’ हा विषय जितक्या गांभीर्याने घ्यायला पाहिजे तितका तो गांभीर्याने घेतला जात नाही हेही तितकेच खरे. त्यामुळे ‘भूत’ म्हणजे पडक्या वाड्यात राहते, स्मशानात राहते अशा प्रकारची अंधश्रद्धा इतपतच माहिती सुशिक्षित समाज बाळगतो. फार फार तर लहान मुलांना घाबरवण्यासाठी ‘भूत’ ही कल्पना वापरली जाते. त्यामुळे भुताबद्दल बोलले की बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारला जातो की तुम्ही ‘आहट’ वगैरे मालिकांविरुद्ध मोहीम सुरू करा.

पुढे वाचा

भविष्यकथन

भविष्याची चिंता मानवाला प्राचीन काळापासून सतावत आली आहे. त्यावर मात करण्यासाठी काळाच्या ओघात भविष्यकथनाच्या विविध पद्धतींनी आकार घेतला. या सर्वांचा उगम पुराणकाळात झाल्याचे दिसून येते. सर्वस्वी निसर्गावर अवलंबून असणारा आदिमानव जसजसा निसर्गबदलांशी परिचित होऊ लागला तसतसा निसर्गाच्या अफाट सामर्थ्यात स्वतःला जुळवून घेण्यास शिकला. हे शिकत असताना निसर्गाच्या वर्तमान स्थितीतून अथवा बदलातून भविष्यातील सृष्टी आकार घेत असते हे त्याला समजू लागले. झाड फुलांनी बहरलं की काही दिवसांत झाडाला गोड फळे लागतात. मुंगीसारखे कीटक पृष्ठभागावर दिसू लागले की थोड्याच दिवसांत पाऊस येतो. विशिष्ट प्राणी दिसेनासे झाले की उन्हाळा सुरू होतो.

पुढे वाचा

भाग दोनः विवरणात्मक मंत्र, मांत्रिक व चमत्कारः

[प्रा. मच्छिन्द्र मुंडे (जन्म १९५८) अंधश्रद्धा-निर्मूलनाचे काम करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. दोन हजाराच्या आसपास व्याख्याने, प्रात्यक्षिके, सहा पुस्तकांचे लेखन, भोंदूबाबांची हातचलाखी ओळखण्यात हातखंडा व त्यामुळे पर्दाफाश करणे, भरपूर संघटनात्मक कार्य अशी त्यांची थोडक्यात ओळख आहे.] तुम्ही विवेकी कसे बनलात?
माझे लहानपण खेड्यात व घरच्या वारकरी वातावरणात गेले. डोंबिवलीजवळचे आगासन हे माझे गाव. माझ्या गावात सातवीपर्यंत शाळा होती. हायस्कूल डोंबिवलीत आणि नंतरचे शिक्षण मुंबईत झाले. मी सातवीत असताना (१९७२ साली) आमच्या गावच्या शाळेत संपतराव कदम गुरुजी हे विवेकी विचाराचे शिक्षक तेथे बदलून आले.

पुढे वाचा

अंधश्रद्धाः काही संकल्पना

आपण अंधश्रद्ध आहोत हे जवळपास कोणीच पटकन म्हणणार नाही. जरा खोलवर विचार केल्यावर कदाचित एक दोन बाबी मान्य केल्या जातील पण त्या तेवढ्याच. सर्वसाधारण अंधश्रद्धा म्हणजे दुसऱ्या कुणाची विचित्र समजूत असे म्हटले तर फारसे वावगे ठरू नये. या सापेक्ष व्याख्येचा एक फायदा म्हणजे अंधश्रद्धेविरुद्ध सर्वांचे एकमत होऊ शकते! कारण दुसऱ्यांची अंधश्रद्धा दूर करणे हे प्रत्येकाचे स्वाभाविक कर्तव्य असते.
अंधश्रद्धा शब्द उच्चारला की साहजिकपणे मंत्र-तंत्र, शकुन-अपशकुन, फलज्योतिष्य, नवससायास, व्रतवैकल्ये अशा गोष्टी डोळ्यांसमोर येतात. या सर्वांना अंधश्रद्धा न म्हणता चिपळूणकरांनी ‘लोकभ्रम’ असा शब्दप्रयोग केला.

पुढे वाचा

श्रद्धा आणि अंधश्रद्धा

अंधश्रद्धा-निर्मूलनाच्या चळवळीमध्ये सगळी चळवळ या विषयाभोवती फिरत असते. आणि ज्या काही शिव्या आणि ओव्या आम्हांला चळवळीमध्ये मिळत असतात, त्याचा याच विषयाशी संबंध असतो. काही जणांना असे वाटते, आमचे काम अयोग्य आहे, अनिष्ट आहे, अरास्त आहे. काही जणांना असे वाटते की, हे काम झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने आपला देश २१ व्या शतकात पदार्पण करणार नाही. आणि काहीजणांना असे वाटते की, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली आम्ही देव, धर्म, परंपरा बुडवत आहोत. ते म्हणतात, ‘अंधश्रद्धा म्हणजे काय ? अंधश्रद्धा म्हणजे श्रद्धेच्या निखाऱ्यावरची राख. राख उडवून लावली की आतला निखारा पुन्हा पूर्वीसारखा तेजस्वी होतो.

पुढे वाचा

भाग एकः संकल्पनात्मक श्रद्धा प्रमाण आहे काय?

ज्ञान म्हणजे वस्तुस्थितीविषयी यथार्थ माहिती. ‘ज्ञान’ या शब्दाचा हा एकमेव अर्थ नाही. कारण संज्ञा किंवा जाणीव या अर्थानेही या शब्दाचा उपयोग होतो. या अर्थी कोणतीही जाणीव ज्ञानच आहे. त्यामुळे ज्ञानाचे दोन प्रकार आहेत, यथार्थ आणि अयथार्थ, किंवा सत्य आणि मिथ्या ज्ञान असेही म्हणतात. पण या लेखात ‘ज्ञान’ हा शब्द सत्य ज्ञान या अर्थानेच वापरला आहे.
ज्ञानप्राप्तीची अनेक साधने आहेत. त्यांना प्रमाणे म्हणतात. उदा. ज्ञानेंद्रिये ही एक प्रकारची प्रमाणेच आहेत. कारण त्यांनी आपल्या शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या संवेद्य गुणांचे ज्ञान होते.

पुढे वाचा

अब्राहम कोवूर

२० व्या शतकातील भारतातील विवेकवादी चळवळीचे पितामह म्हणून डॉ. अब्राहम कोवूर ह्यांचा उल्लेख करावा लागेल. अमोघ वक्तृत्व, वैज्ञानिक विचारसरणी, परखड टीका आणि चमत्काराची प्रात्यक्षिके ह्यामुळे त्यांची भाषणे गाजत. श्रोतृवर्गाचा त्यांना उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळे. चमत्कार ही बाबाबुवांची केवळ हातचलाखी आहे हे ते दाखवीत आणि तथाकथित अध्यात्म आणि संघटित धर्मावर तुटून पडत. १९६० ते १९७० च्या दशकात त्यांनी भारताच्या गावागावांतून आणि शहराशहरांतून अशी शेकडो भाषणे दिली. बाबाबुवांना चमत्कार करून दाखविण्याचे खुले आह्वान ते देत. त्या काळीही पुट्टपूर्तीच्या सत्य साईबाबांचे बरेच प्रस्थ असे. आपल्या भाषणात डॉ.

पुढे वाचा

र. धों. कर्वे

१८८२ साली ‘सुधारक’मधील ‘स्त्रीदास्यविमोचन’ ह्या अग्रलेखात आगरकर म्हणतात, “कालांतराने फाजील संतत्युत्पत्ती होऊ न देता स्त्री-पुरुषाचा संयोग होऊ देण्याची युक्ती काढता येईल. स्त्रियांच्या आरोग्यरक्षणाला आवश्यक म्हणून जी काय दोन तीन मुले ठरतील तेवढी तरुण वयात करून घेतली म्हणजे पुढे टांकसाळ बंद ठेवण्याचा उपाय शोधून काढण्याकडे वैद्यकशास्त्राचे मन लागले आहे. व या कामात त्यास लवकरच यश येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. असे झाले तर, आताप्रमाणे डझन किंवा दीड डझन अल्पायुषी मनुष्यप्राणी जगात आणण्यापेक्षा आईबापांच्या जागी खुंटास खुंट उभा करण्यापुरती दोन सुदृढ पोरे झाली तरी बस्स आहेत.”

पुढे वाचा

पत्रसंवाद

ऑक्टोबर ०९ च्या अंकातील, देवेन्द्र इंगळे यांच्या लेखावर प्रतिक्रिया – भावनांना हात घालणारे आणि प्रचारकी थाटाचे लिखाण आ.सु.ने प्रसिद्ध करणे चूक आहे. आपल्या मूळ हेतूपासून सुधारक दूर जाऊ नये अशी माझी इच्छा आहे. इंगळे यांच्या लेखातील आक्षेपार्ह वाक्ये (गडद ठशामधील) आणि त्यांवरील आक्षेप पुढीलप्रमाणे आहेत.

जीवसृष्टीच्या उत्क्रांतीचा डार्विनप्रणीत सिद्धान्त त्यावेळच्या सर्वच ईश्वरवादी धर्मपंथासाठी आह्वानास्पद ठरला. डार्विनच्या उत्क्रांतिसिद्धान्त त्यावेळच्या ख्रिस्ती-इस्लामिक जगताला आह्वानास्पद वाटला तसाच तो ब्राह्मणीधर्मासही आह्वान देणारा ठरला.

इंगळे यांची “आपली (मानवाची) उत्पत्ती आणि विकास कसा आणि कोणत्या क्रमाने होत आला हा प्रश्न भेडसावत होता.

पुढे वाचा

नव्या राज्यशास्त्रीय व्याख्या

इंटरनेट

समाजवाद : तुमच्याकडे दोन गाई आहेत. तुम्ही एक गाय शेजाऱ्याला देता.
साम्यवाद : तुमच्याकडे दोन गाई आहेत. सरकार दोन्ही गाई घेते, आणि तुम्हाला थोडे दूध देते.
फॅसिझम : तुमच्याकडे दोन गाई आहेत. सरकार दोन्ही गाई घेते, आणि तुम्हाला थोडे दूध विकते.
नात्झीवाद : तुमच्याकडे दोन गाई आहेत. सरकार दोन्ही गाई घेते, आणि तुम्हाला गोळ्या घालते.
लालफीतवाद : तुमच्याकडे दोन गाई आहेत. सरकार दोन्ही गाई घेते, एकीला गोळी घालते, दुसरीला दोहते, आणि दूध फेकून देते.
पारंपरिक भांडवलवादः तुमच्याकडे दोन गाई आहेत.

पुढे वाचा