इंग्रजी वाययाचा अभ्यास करताना त्या वाययाची आवश्यक पार्श्वभूमी म्हणून इंग्लंडच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासाचे काही कालखंड वाचले होते. ते वाचत असताना सगळ्यांत ज्या गोष्टींनी प्रभावित केले ती होती नोंदींची उपलब्धता. तथ्ये, घटना, घटनांवरच्या अनेक टीकाटिप्पणी काळाच्या ओघात नाहीशा होऊनही एवढ्या प्रमाणात शिल्लक राहिल्या ह्याचे आश्चर्य वाटल्याचे आजही आठवते. चर्चच्या रजिस्टरमधील जन्म, मृत्यू, विवाह ह्या अटळपणे होणाऱ्या नोंदी वगळल्या तरी पत्रव्यवहार, डायऱ्या, संस्थांच्या व्यवहारांची रेकॉर्डबुक्स, कवी, नाटककार, कादंबरीकार वगैरेंच्या कलाकृती, वृत्तपत्रांतील बातम्या ह्या सगळ्यांमधून उमटलेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा पाहताना फार मजा आली.
१९९६ च्या आसपास पॅन्डिमोनियम नावाचे हम्फ्री जेनिंग्ज ह्या सिनेमा आणि नाटकाशी प्रामुख्याने संबंधित असलेल्या लेखकाचे पुस्तक वाचनात आले.