“तत्त्वमीमांसा’ आणि वास्तव

[अर्नेस्ट एव्हरार्ड (Earnest Everhard) या (काल्पनिक!) क्रांतिकारकाच्या आयुष्यातील १९१२ ते १९३२ या काळाचे वर्णन त्याची पत्नी एव्हिस (Avis) हिने लिहिले, व एका झाडाच्या ढोलीत लपवून ठेवले. सातेकशे वर्षांनंतर हा वृत्तांत सटीप रूपात प्रसिद्ध होत आहे, अशी कल्पना करून जॅक लंडनचे द आयर्न हील (The Iron Heel, Jack London, १९०८) हे पुस्तक लिहिले गेले. गेल्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातला लंडन हा प्रसिद्ध अमेरिकन कथाकार. त्याची बरीच पुस्तके आजही पुनःप्रकाशित होत असतात. काही तर अमेरिकन प्रचारसाहित्यातही भेटतात. द आयर्न हील मात्र अनेक वर्षे उपलब्ध नव्हते, कारण ते भांडवली व्यवस्थेची एक जालीम आवृत्ती रेखाटते!

पुढे वाचा

मंगळूर आणि ‘बायकीपणा’

तुमच्या मते स्त्रियांचे सामाजिक स्थान पुरुषांच्या तशा स्थानाच्या तुलनेत कुठे असते? वर? खाली? बरोबरीत? उत्तर देताना घाई करू नये, कारण या एका प्रश्नाबाबत फारदा आपण स्वतःला फसवत असतो. उदाहरणार्थ, “मी माझ्या पत्नीला, मुलीला पूर्ण स्वातंत्र्य देतो. अगदी बरोबरीने वागवतो.”, हे म्हणणारा पुरुष स्वतःला पत्नी, मुलगी, या स्त्रियांचा वर समजून त्यांना स्वातंत्र्य देत’ असतो. “हे मला पूर्ण स्वातंत्र्य देतात.” असे म्हणणारी स्त्री आपण ‘ह्यांच्या’ खाली आहोत, हे मान्य करून वर ‘ह्यांना’ सांभाळून घेत असते! त्या मानाने, ‘आमच्या घरी सर्वांना पूर्ण स्वातंत्र्य आहे.”,

पुढे वाचा

जुळलेपणा, सततचा शोध आणि सत्य

इतरांच्या संपर्कात असणे, किंवा त्याचा चरित्रकार एब्राहम पेज म्हणतो त्याप्रमाणे, इतरांशी जुळलेले (लेपक्षेळपशव) असणे, ही बोरची गरज होती, जवळपास निकड होती, म्हणा. त्याच्या चर्चा सॉक्रेटिक संवादांसाररख्या असत. त्यांमधून त्याच्या कल्पना सावकाश आकार घेत जात, घडत जात. हे इतक्या जास्त प्रमाणात होई, की काही जण त्याला भौतिकशास्त्रज्ञाऐवजी तत्त्वज्ञ मानत, त्याचे विरोधाभासांवर प्रेम असे. प्रश्नांच्या अनेक बाजू समजून घेतघेतच ते स्पष्ट होतात, सुटतात, असा त्याचा विश्वास होता. तो मते कशी व्यक्त करत असे हे सांगताना त्याचा निकटवर्ती स्नेही आइनस्टाइन म्हणतो, “तो सतत इकडेतिकडे शोधत असल्यासारखे बोलायचा; संपूर्ण, निखळ साथ हाती आलेल्या माणसासारखा कधीच बोलत नसे.’

पुढे वाचा

पत्रचर्चा

रविन थत्ते, ४६, शिरीष, १८७, वीर सावरकर मार्ग, मुंबई ४०० ०१६.
आसु (जाने. २००९, १९-१०) मध्ये किशोर वानखडे ह्यांनी आत्म्याचे नास्तित्व ह्यावर लिहिले आहे. माणूस मरतो तेव्हा आत्मा त्याला सोडून जातो ह्या तथाकथित कोठलाही वैज्ञानिक किंवा औपनिषदिक आधार नसलेल्या विधानावर ह्या पत्रात प्रहार करण्यात आले आहेत. मुळात जे सत्य नाही त्याला असत्य ठरवण्याचा हा प्रयत्न दोरीला साप समजून त्याला धोपटण्यासारखा वाटतो. माठ फुटतो तेव्हा किंवा मठ कोसळतो तेव्हा अवकाश, आकाश, पोकळी कोठे जात नाहीत तिथेच राहतात, असे अनेक वेळा अनेक ठिकाणी रूपकात्मकरीत्या सांगून झाले आहे.

पुढे वाचा

संघटित भावना आणि नगरसंस्कृती (Collective Emotion and Urban Culture)

मुंबईमध्ये मराठी विरुद्ध बिगरमराठी आंदोलने होणे हे तसे नवीन नाही. राजकीय लाभासाठी काही तरी भावनात्मक निमित्त शोधण्याचे प्रयत्न राजकारणी करीत असतात आणि मुंबईसारखे महानगर ही त्यासाठी सुपीक भूमी असते. सर्व जगातील महानगरी समाजांमध्ये स्थानिक आणि भाषिक अस्मिता दिसतात आणि त्यांचा हिंसक उद्रेक काही ना काही निमित्ताने होत असतो. वैयक्तिक भावनांप्रमाणेच अनियंत्रित संघटित भावनांचा असा सामाजिक उद्रेक मानवी बुद्धीची कवाडे बंद करतो. तसे झाले की त्याचा राजकीय लाभ मतलबी राजकारण्यांना सहजपणे उठवता येतो. मुंबईमध्ये अशी चळवळ जोर धरत असतानाच नोव्हेंबर महिन्याच्या २६ तारखेला मुंबईवर दहशतवाद्यांचा हल्ला हा भारताला हादरा देणारा ठरला.

पुढे वाचा

डार्विनच्या शोधाची एकशेपन्नास वर्षे

येत्या जून-जुलैच्या सुमारास वरील विषयावर विशेषांक काढायची योजना आहे. त्यासाठी नियोजित अतिथि-संपादक, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ ह्यांनी घडवलेले पत्र सोबत देत आहोत. हे पत्र अनेक तज्ज्ञांना तर पाठवले जात आहेच, परंतु आसु च्या लेखकांपैकी कोणास लिहिण्याची इच्छा असल्यास त्यांनी अतिथि-संपादकांशी संपर्क साधावा या हेतूने हे पत्र देत आहोत. संपर्काचा पत्ताः रवींद्र रु. पं., ८ आदर्शनगर, शिरपूर ४२५ ४०१.
ईमेल-rpravindra@rediffmail.com;
भ्रमणध्वनी ९७६४६ ४२४३४, ९८६९० ८७८८३
आजचा सुधारक हे विवेकवादी चिंतनाला वाहिलेले व मुक्त-सर्वंकष विचारविमर्शाचे व्यासपीठ बनू पाहणारे मराठी मासिक आहे. वर्षातील किमान एक अंक एखाद्या विशिष्ट विषयावर सखोल चर्चा घडवून आणणारा विशेषांक असावा असा आमचा प्रयत्न असतो.

पुढे वाचा

एक क्रान्तीः दोन वाद (भाग ३)

[एक क्रान्तीः दोन वाद च्या पहिल्या भागात औद्योगिक क्रान्तीसोबत घडत गेलेल्या भांडवली-उत्पादनव्यवस्थेच्या सुरुवातीच्या रूपाची ओळख आपण करून घेतली. दुसऱ्या भागात आपण इंग्लंडच्या लोकसंख्येवर व कायद्यांवर झालेले परिणाम तपासले. सोबतच आदिम समाजवादी विचार, मार्क्सचे विचार व अमेरिकेतील व्यवस्थापित भांडवलवाद तपासले. आता त्यापुढे-]
क्यूबा
१८९५ साली क्यूबा स्पेनपासून स्वतंत्र झाला. लोकशाही व्यवस्थेत वारंवार सेनेचा हस्तक्षेप, हा क्यूबाचा स्थायीभाव झाला, आजच्या पाकिस्तानसारखा. १९४० साली सेनाप्रमुख फुल्जेंशिओ बातिस्ता राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडला गेला. १९५२ साली निवडणूक हरल्यावर सेनाप्रमुख या नात्याने बातिस्ताने सत्ता काबीज केली. यात अमेरिकेने त्याची पाठराखण केली.

पुढे वाचा

‘प्रायोजित’ अहवालाचा पंचनामा

विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात नरेंद्र जाधवांचा अहवाल वादग्रस्त ठरला आहे. जाधव ‘सरकारी तज्ज्ञ’ आणि पी. साईनाथ व इतर हे वास्तवाचे वेगळे चित्र रेखाटणारे, यांच्यात हा वाद आहे.
नोम चोम्स्कीने नोंदले आहे की कोणत्याही घटनेबाबत ‘भरवशाची’ माहिती देणारे तज्ज्ञ प्रस्थापितांपैकीच असण्याने वार्तांकनाचा तटस्थपणा हरवतो, व ते संमतीचे उत्पादन (आसु १६.४, १६.५, जुलै व ऑगस्ट २००५) होऊन बसते. या पातळीवरही जाधव अपुरे पडत आहेत हे ठसवणारी श्रीनिवास खांदेवाले यांची पुस्तिका जाधव समितीची अशास्त्रीयता (लोकवायय, डिसें. ‘०८) संक्षिप्त रूपात आसु च्या वाचकांपुढे ठेवत आहोत.
एक विशेष विनंती-हा लेख जाधवांचा भंडाफोड म्हणून न वाचता शेतीबाबतच्या समस्या, त्याही व हाडः सोन्याची कुन्हाड या क्षेत्रातील, असे समजून वाचावा – सं.]

पुढे वाचा

लढाया नको म्हणून आया ठार करताहेत मुलांना

दोन जमातींमध्ये सतत होणाऱ्या लढाया थांबवण्यासाठी पापुआ न्यू गयानातील आदिवासी भागातील आयांना अत्यंत क्रूर निर्णय घ्यावा लागत आहे. या लढाया थांबवण्यासाठी गेल्या १० वर्षांत जन्माला आलेल्या सर्व मुलांना मारून टाकण्याचा निर्णय या माता घेत असल्याचे इथल्या दोन महिलांनी एका स्थानिक वृत्तपत्राला सांगितले. गेली २० वर्षं पापुआ न्यू गयानातील ईस्टर्न हायलॅण्डस् या भागात सततच्या लढायांनी हे लोक त्रस्त आहेत.
रोना ल्यूक आणि किपीयोना बेलास या दोन महिलांनी एका शांततेसाठी भरवलेल्या बैठकीत ही माहिती दिली. या लढाया संपवण्यासाठी इथल्या मातांना अक्षरशः मनावर दगड ठेवून हा निर्णय घ्यावा लागला आहे.

पुढे वाचा

संपादकीय

मंदीची कहाणी The Grapes of Wrath
आर्थिक मंदी म्हणजे एखाद्या समाजाने केलेली उत्पादने विकत घेण्याइतकी क्रयशक्ती लोकांकडे उपलब्ध नसणे. यातून बेकारी वाढते. लोकांची क्रयशक्ती आणखीनच घटते आणि मंदी अधिकच तीव्र होते. अशी एक महामंदी, द ग्रेट डिप्रेशन, १९२९-३९ या काळात अमेरिकेला त्रासून गेली. अमेरिकेला उत्पादने पुरवणाऱ्या देशांनाही याची झळ लागली. या काळाचे उत्कृष्ट वर्णन जॉन स्टाइनबेकच्या द ग्रेप्स ऑफ ऍथ (The Grapes of Wrath, १९३९) या कादंबरीत भेटते. आज पुन्हा एकदा अमेरिका हे केंद्र असलेली जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या स्थितीजवळ आहे. जगाच्या बऱ्याच भागांत दोन हस्तक, एक मस्तक यांना काम मिळणार नाही, अशी धास्ती सर्व अर्थशास्त्रज्ञांना छळते आहे.

पुढे वाचा