जीवन म्हणजे ‘एकमेकां साह्य करूं अवघे धरू सुपंथ’ असा सहयोगाचा प्रवास आहे ? का जीवन म्हणजे एक संघर्ष आहे ? एकमेकांचे गळे कापत ही यात्रा सुरू आहे ? जीवसृष्टीच्या इतिहासाच्या, उत्क्रांतीच्या अभ्यासकांपुढे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जीवनात नक्कीच सहकारही आहे. संघर्षही आहे. नेहमी संघर्षाबद्दल खूप बोलले जाते; पण जीवशास्त्राचे ज्ञान जसजसे सखोल होत चालले आहे, तसे उघड होत आहे, की मोठ्या प्रमाणात जीवन हा एक सहकारी उपक्रम आहे. उत्क्रांतीच्या वाटेवर जीवन सतत विस्तारत जाते, नवी नवी संसाधने वापरू लागते, वैचित्र्याने नटत राहते.
विषमता की विविधता?
ऑलिव्हर जेम्स हा ब्रिटिश मानसशास्त्रज्ञ माणसांच्या मूलभूत भावनिक गरजांवर विचार करत होता. शरीरांसाठी अन्न, वस्त्र, निवारा या जशा मूलभूत गरजा, तशा मनांसाठी कोणत्या ? जेम्सची यादी चार एकमेकांशी निगडित भावनांची आहे. पहिली गरज आहे स्वतःला सुखवस्तू मानता येण्याची. आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व वस्तू आपल्याला उपलब्ध आहेत, असे वाटणे गरजेचे असते. इथे प्रत्यक्षात गरजेच्या वस्तू आहेत की नाहीत हे महत्त्वाचे नाही, तर त्या आहेत अशी भावना महत्त्वाची आहे. दुसरी गरज आहे, ती स्वतःला आजूबाजूच्या समूहाचे आपण एक अंग आहोत असे वाटण्याची. आपण जगण्याची क्रिया सक्षमपणे, स्वायत्तपणे आणि सच्चेपणाने पुरी करतो आहोत असे वाटणे, ही तिसरी गरज.
बेरोजगारीची हमी देता येणार आहे!
आंतरराष्ट्रीय श्रम संघटना (खङज) सांगते की २००३ साली २.८ अब्ज माणसांना औपचारिक रोजगार मिळाला, एकूण लोकसंख्येच्या सुमारे चाळीस टक्के लोकांना. पण हा अंदाज कामगार व त्यांची कुटुंबे यांच्यापुढील अनेक गंभीर आह्वाने दडवतो. सुमारे १.४ अब्ज लोक (औपचारिक रोजंदारांपैकी अर्धे) सरासरीने रोजी दोन डॉलर (रु.८९/-) पेक्षा कमी पगारात खर्च भागवायला धडपडतात. सहाराच्या दक्षिणेकडील आफ्रिकेतील नव्वद टक्के लोक या ‘गरीब रोजगारप्राप्त’ वर्गीकरणातले आहेत. त्यांना सुरक्षित जगण्यासाठी पुरेसे उत्पन्न उपलब्ध नाही. याच काळात १८.६ कोटी लोक बेकार होते. एकूण बेकारांचे प्रमाण ६.२ टक्के आहे.
पत्रसंवाद
आजचा सुधारक, डिसें. २००६ मधील संपादकीयात, निखळ बुद्धिवादाच्या, विवेकवादाच्या पुढे जाण्याचा विचार जाणवला. भावनांनी ध्येय ठरवावे. बुद्धिवादाने मार्ग दाखवावा. साधने पुरवावी.
वाढत्या विषमतेवर आपला रोख दिसतो. वाढत्या विषमतेमध्ये काही जणांना फार पैसा मिळतो ही कमी महत्त्वाची गोष्ट आहे. काही जणांना फार कमी पैसा मिळतो. ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. त्याची कारणे शोधून दूर करण्याचा प्रयत्न करणे हेच आपल्या हातात आहे. १) पालकांच्या दारिद्र्यामुळे अनेक मुलांना कसलेच शिक्षण मिळत नाही. पालकांना शिक्षणाचे महत्त्व न वाटणे हे मुलांना शिक्षण न मिळण्याचे गरिबीशिवाय आणखी एक कारण आहे.
स्त्री-भ्रूणहत्याः कोल्हापुरातले वास्तव (भाग २)
[अमृता वाळिंबे यांनी मालतीबाई बेडेकर अभ्यासवृत्ती २००५-२००६ वापरून केलेले संशोधन आम्हाला प्राप्त झाले. त्याचा जुजबी संक्षेप करून आम्ही काही भागांमध्ये ते संशोधन प्रकाशित करीत आहोत. या प्रकारचे संशोधन महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांकरिता व्हायला हवे. सं.]
पूर्वी म्हणजे ५-७ वर्षांआधी कोल्हापुराजवळच्या निमशहरी भागातले वा खेड्यापाड्यातले पेशन्ट सोनोग्राफी वा गर्भलिंगनिदानासाठी कोल्हापूर शहरात यायचे. पण आता तशी गरज पडत नाही. अनेक डॉक्टरांनी आता ‘मोबाईल युनिट्स’ सुरू केली आहेत. विशिष्ट दिवशी ही युनिट्स गावोगावी पोहोचतात. सोनोग्राफी होते. काहीवेळा तर दुसऱ्या किंवा अडीच महिन्यांतच गर्भ ‘मुलीचा’ आहे असे निदान केले जाते.
मानवी स्वभाव व डार्विनवाद (२)
[जेनेट रॅडक्लिफ रिचर्ड्स (Janet Radcliffe Richards), यांच्या ह्यूमन नेचर आफ्टर डार्विन, Human Nature After Darwin (Routledge, 2000) या पुस्तकाचा परिचय काही लेखांमधून करून देत आहोत. विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी डार्विनचा उत्क्रांतिवाद व त्याभोवतीचे वादवादंग वापरायचे रिचर्ड्सना सुचले. त्या अनुभवांवर प्रस्तुत पुस्तक बेतले आहे. प्रभाकर नानावटींनी संपूर्ण पुस्तकाचे भाषांतरही केले आहे व ते प्रकाशनाच्या प्रयत्नात आहेत. सं.]
डार्विनच्या सिद्धान्ताची सत्यासत्यता
डार्विनने मांडलेला सिद्धान्त खरोखरच धोकादायक आहे का, याचीही शहानिशा करावी लागेल. सैद्धान्तिक स्वरूपात धोका असल्यास घाबरण्याचे कारण नाही. मुळातच सिद्धान्त खरा आहे की नाही यावरून धोका आहे की नाही हे ठरवता येते.
सामाजिक सुरक्षा: अमेरिकन अनुभव (भाग २)
शेतीकडून माणसे उद्योगांकडे वळली, की बहुतांश लोकांचे आणि सर्वच श्रमिकांचे आयुष्य अनिश्चित होते. कधी जिथे काम करायचे तिथली परिस्थिती धोके उत्पन्न करते, अपंगत्व उत्पन्न करते, तर वयोमानाने किंवा इतर स्वस्त कामगार उपलब्ध झाल्याने नोकरी जाऊन उत्पन्नच थांबते. कधी याहीपुढचा प्रकार होऊन कारखाने बंद पडतात म्हणून श्रमिक बेकार होतात. या सर्व बेकारीच्या कारणांमध्ये कामगाराचा दोष नगण्य असतो. सध्या आपण अशा बेकारांना समाजाने आर्थिक मदतीच्या रूपात सुरक्षा पुरवावी हे टाळत आहोत. अशा सामाजिक मदतीच्या दोन प्रमुख पद्धती दिसतात. एक म्हणजे सामाजिक व धार्मिक संस्था धनवानांकडून काही पैसे गोळा करून त्यांतून गरजू लोकांना मदत देतात.
आरक्षणाऐवजी आपणांस दुसरे काय करता येईल ?
आरक्षणाचे तत्त्व संविधानात अन्तर्भूत झाले, त्याला पन्नास वर्षे होऊन गेली असावीत म्हणून त्याविषयीचे सिंहावलोकन करणे आवश्यक वाटते. आरक्षणाच्या हेतूविषयी काहीच शंका नाही कारण आरक्षणामुळे एकूण समाजात आर्थिक समता आणि सामाजिक बंधुभाव निर्माण होईल अशी संविधानकारांची अपेक्षा होती. आरक्षणाचे तत्त्व संविधानात अन्तर्भूत करण्यामागे काही समाजघटकांच्या सामाजिक वागणुकीची पार्श्वभूमी कारणीभूत होती हे जितके खरे तितकेच आरक्षणाचा काळ मर्यादित असावा अशी तरतूदही घटनाकारांनी केली होती. पण एकूणच आरक्षणाच्या तत्त्वाकडे राखीव मतपेटीच्या दृष्टिकोणातून पाहिल्यामुळे आज कोणताही पक्ष या समस्येकडे स्वच्छ नजरेने पाहण्यास तयार नाही.
आज जगामध्ये जागतिकीकरणाचे वारे वाहत आहे.
विज्ञान म्हणजे काय?
विज्ञान म्हणजे अत्यंत वेगळे, बंदिस्त, एकाकी, आपल्या जीवनव्यवहाराशी संबंध नसलेले असे काही तरी आहे असे अनेकांना वाटत आले आहे. यालाच मी आह्वान देत आहे. आपण विज्ञानयुगात राहत आहोत. तरीसुद्धा ज्ञान हे काही मूठभर लोकांच्या हातांतील व त्यांच्या मालकीची मालमत्ता असे वाटत असल्यास ते अत्यंत चुकीचे आहे. विज्ञान हे आपल्या दैनंदिन जीवनाचे, व्यवहाराचे एक अविभाज्य अंग आहे. त्याला आपण वेगळे ठेवू शकत नाही, तोडू शकत नाही. आपल्या अनुभवविश्वातील प्रत्येक अनुभवाला का, कसे व केव्हा असे विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरच विज्ञान आहे.”
[Uncertain Science….
संपादकीय
जातिव्यवस्थेवरच्या लेखांना आजचा सुधारक ने प्रसिद्धी द्यावी, अशी इच्छा काही वाचक वेळोवेळी व्यक्त करतात. दुसऱ्या टोकाला त्या आग्यामोहोळात हात घालू नये, असे एक मत आहे ! एकूणच भारतीयांना जातींबाबत तटस्थपणे लिहिणे अवघड जाते. लेखांतील एखादे निरीक्षण, एखादा निष्कर्ष, एखादे मत, मान्य करावे की नाही याचा निर्णय बहुतांश वेळी लेखकाची जात पाहून घेतला जातो. हे जातींबद्दलच्या लेखांबद्दल नव्हे, तर साहित्यासकट सर्व प्रकाशित मजकुराबद्दल घडत असते. हे अर्थातच विवेकी नाही.
लॅन्सी फर्नाडिस आणि सत्यजित् भटकळ यांचे The Fractured Civilisa-tion : Caste in the Throes of Change (भारतीय जनवादी आघाडी, १९९९) हे पुस्तक जातिसंस्था, तिच्यातले बदल, तिचे परिणाम, यांच्याबद्दलचा एक महत्त्वाचा दृष्टिकोण मांडते.