मानव जसजसा प्रगत होत जातो तसतसा त्याचा विचारप्रवास/विचारप्रवाहसुद्धा प्रगत होत जाणे अगदी स्वाभाविक तथा क्रमप्राप्त असते. अशा विचार-प्रगती-प्रवासा/प्रवाहादरम्यान कोणत्याही विचारांना त्यांच्या ‘असण्या’तील ‘आखूडदोषी-बहुगुणीपणा’ची कसोटी पार पाडावी लागते. आखूड का असेनात, अंतर्निहित दोषांना पार करून व बहुगुणीपणाची लस टोचूनच विचारांच्या प्रवासा/प्रवाहात प्रगती संभव असते. विचारप्रवास व विचारप्रवाहातील ही कसोटी पार करू न शकणारे विचार कालबाह्य तथा मानवप्रगतीच्या दृष्टिकोनातून सर्वंकषविकासरोधी होऊ लागतात. अर्थातच अशा कालबाह्य व विकासरोधी विचारांना कवटाळून असलेल्या/असणाऱ्या साऱ्या (विचार)’पद्धती’ निसर्गसंमत/निसर्गाधारित/निसर्गानुकूल मानवविकासाला बाधकच नव्हे तर घातकही ठरू लागतात. असे असले तरी विज्ञानाधारित व निसर्गचक्राला, सुसंगत विचारांना प्राणशून्य करून अशा प्राणशून्य विचारांच्या शववाहकांची समाजातील संख्या व शक्तीसुद्धा नाकारून चालणार नाही.
आहे मनोहर तरी…
आजवर जी कामे मानवी बुद्धिमत्तेच्या वापराशिवाय शक्य नव्हती अशी कामे यंत्रांकरवी करून घेण्यासाठी उपयोगात येणाऱ्या प्रणालीस कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) म्हणतात. यात मशीन लर्निंग, पॅटर्न रेकग्निशन, बिग डेटा, न्यूरल नेटवर्क्स, सेल्फ अल्गोरिदम इत्यादी तंत्रज्ञानाचा समावेश आहे. हे तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक संगणक वापरून आधुनिक काळातच संग्रहित प्रोग्रामद्वारे विकसित केले गेले असले तरी या संकल्पनेचा उगम पौराणिक कथांमध्ये तसेच विज्ञानकथांमध्ये आढळतो.
कृत्रिम जीवन आणि स्वयंचलित यंत्रे तयार करण्याचे आकर्षण माणसाला पुराणकाळापासून असल्याचे दिसते. कृत्रिम जीवन म्हणजे जैविक प्रक्रियांचा अभ्यास करून तंत्रज्ञानाच्या आधारे त्यांचे एकीकरण (synthesis) आणि त्यांच्यासारखी पुनर्निर्मिती (simulation) करण्याचा प्रयास होय.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माणूस
माझ्यासारख्या १९७० च्या दशकात जन्मलेल्या अनेक लोकांसाठी आजच्या तंत्रज्ञानाची झेप भंजाळून टाकणारी आहे. १९८५ च्या काळात दुसऱ्या गावातल्या नातेवाईकांना फोन करण्यासाठी सार्वजनिक टेलिफोन कार्यालयात रांगेत एक-दोन तास उभे राहून वाट बघावी लागायची. आता आपण आपल्या हातातल्या वैयक्तिक फोनवरून जगात कुठेही क्षणात फोन लावू शकतो आणि त्या व्यक्तीला प्रत्यक्ष बघू शकतो, बोलू शकतो, तसेच एकाच वेळी अनेक लोक एकत्र गप्पा मारू शकतात.
हे फक्त एक क्षेत्र आहे. आपल्या जगण्यातल्या प्रत्येकच क्षेत्रात कल्पनातीत बदल झाले आहेत. आमच्या पिढीचेच लोक काय पण आजच्या पिढीचे लोकही या बदलाच्या प्रपाताला सामोरे जाताना गडबडून जात आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली तरुणाई
डिसेंबर २०२२ पासून जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेची म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची म्हणजेच एआयची चर्चा पुन्हा जोरात सुरू झाली आहे. त्याला कारण आहे कृत्रिमप्रज्ञेचा नवा अवतार. यंत्रमानव हा तसा जुना प्रकार आहे. त्यावर अनेक चित्रपटही आले. मायक्रो चिपमधील प्रोग्रामिंगनुसार आधीच देऊन ठेवलेल्या सूचनांप्रमाणे ठरलेली कामे करणारा यंत्रमानव आपण पाहिलेला आहे. पण प्रोग्रामिंगमध्ये दिलेल्या सूचनांपेक्षा वेगळी परिस्थिती उद्भवली तर विचार करून वेगळा निर्णय घेत त्याची कार्यवाही करणारा परिपूर्ण यंत्रमानव अद्याप बनलेला नाही. यंत्रमानव बनवणे हे प्रकरण खर्चिक आहे. सध्या सुरू असलेली कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चा यंत्रमानवापेक्षा फारच वेगळी आहे.
माकडाच्या हाती कोलीत
जंगलात भटकणाऱ्या आदिमानवाने प्रगती करत विज्ञानात आज एवढी झेप घेतली आहे, की आता त्याने निर्माण केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे माणसाच्या अस्तित्वालाच धोका उत्पन्न होईल की काय अशी शंका येऊ लागली आहे. संगणकाची निर्मिती झाल्यापासून मानवी जीवनात खूपच उलथापालथ झाली आहे हे मान्य व्हावे. संगणकाच्या सहाय्याने अनेक माणसांचे काम एकच माणूस, आणि तेही बिनचूक करू लागल्याने ते अनेक आस्थापनांना फायदेशीर ठरत आहे. पण त्यामुळे कर्मचारी कपात होऊन बेरोजगार लोकांची संख्या वाढू लागली आहे. हा मानवी समाजाला धोकाच ठरत आहे. एकीकडे लोकसंख्यावाढ आणि दुसरीकडे नोकऱ्यांची संख्या कमी होणे; असा दुहेरी ताण देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडू लागलेला आहे.
समाजमाध्यमांचा ग्रामीण, आदिवासी समुदायात शिरकाव…
२०१३ मध्ये मी फेसबुक उघडलं तेव्हा, आदिवासी समुदायातला एखादा दुसराच फेसबुक वापरणारा युवक असेल. परंतु गेल्या आठ दहा वर्षामध्ये माध्यमांचा जो शिरकाव मानवी समाजात झाला आहे ना, त्याचे परिणाम ग्रामीण आणि आदिवासी समुदायातली मुलंही भोगत आहेत. व्हॉट्सॲप, फेसबुक, टीक्टॉक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, ही सगळी समाजमाध्यमे आदिवासींच्या मुलांना आता परिचयाची झाली आहेत. चॅटजीपीटीही जास्त दूर नाही. आणि ही सगळी माध्यमे मुलांकडून अतिप्रमाणात वापरली जात असल्यामुळे त्याचा परिणाम प्रत्येक घरामध्ये दिसतोय. मुलांच्या हट्टापायी, किंवा मुलं सारखी चोरून दुसऱ्यांचे मोबाईल पाहत राहतात, म्हणून दहा ते बारा हजार रुपये किमतीचे मोबाईल फक्त पाच ते सहा वर्षांच्या मुला-मुलींना घेऊन दिलेले पालक मी ग्रामीण भागात पाहिले आहेत.
आरोग्यासाठी कृत्रिमप्रज्ञा
डोळे, कान, नाक, जीभ, आणि त्वचा या मुख्य ज्ञानेंद्रियांमधून आपण आजूबाजूच्या जगाची माहिती घेतो, मेंदूमध्ये त्या माहितीचा अर्थ लावतो, आणि आपल्या दृष्टीने योग्य तो प्रतिसाद देतो. योग्य प्रतिसाद काय हे आपण स्वतः, आपले कुटुंबीय, आणि समाजाच्या सामुदायिक अनुभवांमधून शिकतो. विषयामधील गुंतागुंत जसजशी वाढत जाते, तसे ते शिकण्यासाठी लागणारा वेळ वाढत जातो. लहानपणी अक्षरे शिकून आपले नाव लिहिणे काही आठवड्यांत शिकता येते, तर वाक्ये लिहिण्यासाठी काही महिने जावे लागतात. सुसंगत वाक्ये असलेली गोष्ट वाचण्यासाठी आणि सुसंगत वाक्ये स्वतः लिहिण्यासाठी काही वर्षे शिक्षण घ्यावे लागते.
जैवशास्त्रीय दृष्टिकोनातून कृत्रिम बुद्धिमत्ता
मेरिअम वेब्स्टर नावाच्या नामवंत शब्दकोशात जेव्हा आपण ‘intelligence’ ह्या शब्दाची व्याख्या शोधू पाहतो तेव्हा ज्या काही व्याख्या येतात त्या सर्व व्याख्यांचा सारांश हा मी माझ्या शब्दात असा मांडतो; ‘स्वतःच्या ज्ञानाचा वापर करून स्वतःच्या परिस्थितीचे पृथक्करण व त्या परिस्थितीत योग्य तो बदल घडवून आणण्यासाठी करता येऊ शकणारा सर्जनशील प्रयत्न’.
संगणक हा त्याच्याकडे असलेल्या बायनरी स्मृतीचा वापर करून त्यांच्या गणिती क्षमतेनुसार माहितीचा साठा नक्कीच करू शकतो परंतु त्या माहितीचे पृथक्करण करणे त्याला शक्य नाही. संगणक गणिती ज्ञान सहजपणे हाताळू शकतो आणि मोठमोठी गणिते चुटकीसरशी हातावेगळी करू शकतो परंतु त्याला तशा सूचना देणे मात्र गरजेचे असते आणि त्या सूचना फक्त मानवच देऊ शकतो.
कृत्रिमप्रज्ञा वापराचे तारतम्य शक्य होईल का?
मानवी जीवन हे सतत आपल्या अडचणी आणि गरजांमधून शिकत, त्यावर तोडगा म्हणून नवनवीन उपकरणे, युक्त्या, क्लृप्त्या, तंत्र इत्यादी शोधत, विकसित होत गेले आहे. या सगळ्यामुळे मानवी जीवन सुरुवातीला नेहमीच सुखकर, सहज झाले खरे, पण या सर्व उपायांमुळे नवे प्रश्न नक्कीच उभे राहत आले आहेत. हे चक्र अखंड सुरू आहे आणि यापुढेही राहील. मागील काही दशकांपासून विकसित झालेले तंत्रज्ञान, उदाहरणार्थ विमान, अणुऊर्जा, वीज, टीव्ही, फोन, इंटरनेट, मोबाईल, स्मार्टफोन, सीसीटीव्ही, क्लाऊड टेक्नॉलॉजी इत्यादी, आणि आता कृत्रिमप्रज्ञा.
या सर्वांचा दैनंदिन जीवनात समावेश/वापर वाढत गेला, आणि या सर्व सुविधा उपलब्ध झाल्यावर प्रथमदर्शनी आपले जीवन सहज/सोपे/सुखकारक झाले असे नक्कीच म्हणता येईल.
नव्या प्रश्नांची उत्तरे कधी शोधणार?
जुलै २०२२ मध्ये ब्लेक लेमोईन या इंजिनीयरला गूगलच्या गुप्ततेच्या कराराचा भंग केल्याबद्दल प्रथम सक्तीच्या रजेवर पाठवले आणि नंतर बडतर्फ केले. तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स (यापुढे आपण ए.आय. किंवा कृत्रिमप्रज्ञा म्हणू) विभागात काम करत होता. गूगलचे लार्ज लॅंगवेज मॉडेल (दीर्घ भाषा प्रारूप) ‘लामडा‘सोबत केलेली विविध संभाषणे त्याने प्रसिद्ध केली आणि ‘लामडा’ ही कृत्रिमप्रज्ञा असूनही संवेदनशील आहे असे त्याने जाहीर केले.
२ मे २०२३ रोजी कृत्रिमप्रज्ञेचे पितामह आणि ट्युरिंग पारितोषकाचे मानकरी जॉफरी हिंटन यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी गूगलचा राजीनामा दिला. राजीनामा देताना ते म्हणाले, “वातावरणबदलाच्या धोक्यापेक्षा कृत्रिमप्रज्ञा जास्त धोकादायक आहे.”