“बाई”

सुमारे ३० वर्षापूर्वी मी नातूबाईंना प्रथम पाहिले. “वाचक पाहिजे” अशी जाहिरात त्यांनी दिली होती. मला शिक्षण घेता घेता करण्याजोगे काही काम हवे होते. त्यांच्या खोलीत मी प्रवेश केला तेव्हा खोलीत काळोख होता. पडदे सरकवलेले होते. पंखा मंद सुरू होता आणि हाताशी असलेल्या आटोपशीर स्टुलावर डोके खाली केलेला टेबल लॅम्प जळत होता. बाई. पलंगावर किंचित रेलून, विसावून पहुडलेल्या होत्या. अंगावर शुभ्र सुती साडी, कपाळावर अगदी बिंदुले काळे कुंकू, लख्ख गोरा वर्ण, काळेभोर केस. त्यांनी पुस्तक पुढे केले तेव्हा दिसलेला मृदू गुलाबी तळवा आणि नाजुक त्वचा.

पुढे वाचा

खरा सुधारक कोण ? प्रा. य. दि. फडके ह्यांच्या भाषणाचा सारांश

सुधारक कोणाला म्हणावे हा एक मूलभूत मुद्दा आहे. शंभर वर्षापूर्वीच्या ज्या अनेक प्रश्नांना आजही उत्तर दिले गेलेले नाही त्यापैकी हा एक प्रश्न आहे. १८९३ साली प्रार्थनासमाजात दिलेल्या एका व्याख्यानात न्या. मू. रानड्यांनी सुधारक कोण? असा प्रश्न उपस्थित केला होता. लोकांना राजकारणात भाग घेण्याची हौस असते. अशा वाचाळवीरांची सामाजिक सुधारणेच्या वेळी मात्र दातखीळ बसते. राजकारणाच्या वेळी आणलेला ताव पार नाहीसा होतो. त्या काळी केला जाणारा एक सवाल सुधारणाविरोधी आजही करतात. सगळ्या सुधारणा हिंदू समाजालाच तेवढ्या का? असा प्रश्न लोक विचारीत. त्यावेळी जे पाच जणांना जमवू शकत नसत असे वक्ते हा प्रश्न करीत.

पुढे वाचा

‘नवा सुधारक’ चा प्रकाशन समारंभ

दि. ३ एप्रिल १९९० रोजी प्रा. म.गं. नातू द्वितीय स्मृतिदिनी विदर्भ साहित्य संघ, नागपूर येथे ‘नवा सुधारक चे प्रकाशन न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, डॉ. य. दि. फडके यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगाचा वृत्तांत आणि प्रा. राम शेवाळकर, डॉ. य. दि. फडके आणि न्यायमूर्ती धर्माधिकारी यांच्या भाषणांतील महत्त्वाचे अंश खाली देत आहोत.
‘नवा सुधारक च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन ३ एप्रिल १९९० रोजी विदर्भ साहित्य संघाच्या गडकरी सभागृहात समारंभपूर्वक पार पडले. ३ एप्रिल हा श्रीमती म. गं. नातू यांचा दुसरा स्मृतिदिन. प्रकाशन-समारंभ वि.

पुढे वाचा

आगरकर म्हणतात –

‘व्यक्तीच्या शरीरातील अवयवांत आणि समाजाच्या शरीरातील अवयवांत एक मोठा भेद आहे, तो हा की, ज्याप्रमाणे समाजाच्या प्रत्येक अवयवास ज्ञान, संवेदन, इच्छा इत्यादि मनोधर्म पृथक्त्वाने असल्यामुळे सुखदुःखाचा अनुभव प्रत्येकास होत अन्न? संपादण्याविषयी अथवा टाळण्याविषयी प्रत्येकाचा प्रयत्न निरंतर चालू असतो, त्याप्रमाणे व्यक्तीच्या शरीरातील प्रत्येक अवयवाची स्थिती नाही. त्यापैकी प्रत्येकास मन नाही. त्या सर्वांचे व्यापार नीट चालणे ही गोष्ट ज्या एका व्यक्तीचे ते अवयव आहेत त्या व्यक्तीरः कल्याणकारक आहे. समाज हा काल्पनिक पुरुष आहे. समाजाचे कल्याण म्हणजे या काल्पनिक पुरुषाचे कल्याण नव्हे; तर त्याच्या अवयवांचे कल्याण होय.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्री. संपादक नवा सुधारक यांस स. न. वि. वि.
पुष्कळ दिवसांपासून माझ्या मनात एक प्रश्न घोळत आहे. त्या बाबतीत आपले मार्गदर्शन मिळावे ही विनंती. आपणांस इष्ट वाटेल तर ह्या प्रश्नाची आपण आपल्या नवीन मासिकातून प्रकट चर्चा करावी. त्यामुळे कदाचित इतर जिज्ञासूंनासुद्धा लाभ होईल. प्रश्न हिन्दू म्हणून माझी कर्तव्ये काय असा आहे.
मी जन्मतः वा परंपरेने हिन्दू आहे. हे हिन्दुत्व मी जसे विधिपूर्वक स्वीकारले नाही तसेच मी त्याचा विधिवत.त्यागही केलेला नाही; तसेच मी केवळ वेदोक्त धर्माचे पालन करणारा स्वामी दयानन्दानुयायी आर्यसमाजीही नाही.

पुढे वाचा

साम्यवादी जगातील घडामोडी : काही निरीक्षणे

रशियात गोर्बाचेव्ह यांनी गेल्या पाच वर्षांपासून सुरू केलेल्या ग्लासनोस्त व पेरिस्रोयको नामक परिवर्तन-पर्वाने आता चांगलेच मूळ धरले असून जगात सर्वत्र खळबळ गाजवली आहे. सर्वत्र हा शब्द इथे मुद्दामच वापरला आहे कारण त्याचे परिणाम आता साम्यवादी म्हणून ओळखल्या जाणा-या देशांपुरते मर्यादित राहिलेले नसून कथित लोकशाही व अलिप्ततावादी या सर्वांना आज नव्याने विचार करण्याची गरज भासू लागली आहे. नुकतीच जेव्हा रशियात साम्यवादी पक्षाच्या सामुदायिक नेतृत्वाची परिसमाप्ती होऊन समावेशक सत्तांचा धारक राष्ट्राध्यक्ष म्हणून गोर्बाचेव्हविरोधकांचे पारडे जड होऊन समजा गोर्बाचेव्ह उद्या सत्ताभ्रष्ट झाले तरी एक गोष्ट वादातीत राहील की त्यांनी केलेली कामगिरी युगप्रवर्तक आहे आणि ते या शतकाचे नायक आहेत.

पुढे वाचा

विवाह आणि नीती

{बरट्रेंड रसेल (१८७२ ते १९७०) हे विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञ होते असे सामान्यपणे मानले जाते. तत्त्वज्ञानाखेरीज सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक इ. विषयांवरही त्यांनी विपुल लेखन केले. त्यांचे लिखाण नेहमीच अतिशय मूलगामी, सडेतोड, निर्भय आणि विचारप्रवर्तक असे. त्यांचा Marriage and Morals (१९२९) हा ग्रंथ अतिशय प्रसिद्ध असून तो अत्यंत प्रभावीही ठरला आहे. त्यात रसेल यांनी आपल्या प्रचलित वैवाहिक नीतीची मूलग्राही चर्चा केली असून विवेकवादी वैवाहिक नीती काय असावी याचे दिग्दर्शन केले आहे. प्राध्यापक म. गं. नातूंनी या ग्रंथाचा अनुवाद करावयास घेतला होता.

पुढे वाचा

विवेकवाद -१

विवेकवाद ही केवळ एक विचारसरणी नाही, ती एक जीवनपद्धतीही आहे. मनुष्याने आपले सर्व जीवन विवेकाने जगावे, विवेकाने त्याची सर्व अंगोपांगे नियंत्रित व्हावीत असे त्याचे प्रतिपादन आहे. विवेक म्हणजे विवेचक शक्ती किंवा भेद करण्याची शक्ती, सत्य आणि असत्य, चांगले आणि वाईट, न्याय आणि अन्याय इत्यादींचा भेद ओळखण्याची ती शक्ती आहे. विवेकाच्या व्यापाराची अनेक क्षेत्रे आहेत. त्यांपैकी तूर्त ज्ञानक्षेत्र आणि कार्यक्षेत्र या दोघांचाच उल्लेख केल्यास पुरे होईल. सत्य म्हणजे काय? आणि सत्य ओळखायचे कसे? हे प्रश्न ज्ञानक्षेत्रातील आहेत. या आणि अशाच अन्य प्रश्नांची उत्तरे देणे हे विवेकाचे काम आहे असे म्हणता येईल.

पुढे वाचा

संपादकीय

‘नवा सुधारक’ या नव्या मासिकाचा हा पहिला अंक वाचकांच्या हाती देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. सुधारकाचार्य गोपाळ गणेश आगरकर यांनी १८८८ साली ‘सुधारक’ नावाचे साप्ताहिक पत्र सुरू केले, आणि ते त्यांचा अकाली मृत्यू होईपर्यंत, म्हणजे १८९६ पर्यंत, अत्यंत समर्थपणे आणि प्रभावीपणे चालविले. त्यानंतर ९४ वर्षांनी आज सुरू होणा-या ‘नव्या सुधारका’चा आगरकरांच्या ‘सुधारका’शी काय संबंध आहे? आणि नव्या सुधारका’चे प्रयोजन काय आहे हे प्रश्न सुचणे स्वाभाविक आहे. त्यांची उत्तरे देण्याचा प्रथम प्रयत्न करतो.
पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे, ‘नवा सुधारक’ हा जुन्या ‘सुधारका’ चा नवा अवतार म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहात आहोत.

पुढे वाचा

आगरकर म्हणतात –

‘धर्ममंदिराची रचाई श्रद्धेच्या किंवा विश्वासाच्या पायावर झालेली आहे, असे हिंदू धार्मिकांचेच म्हणणे आहे असे नाही. पृथ्वीवरील कोणत्याही प्रकारच्या धार्मिकांस विश्वासाशिवाय त्राता नाही व थारा नाही, या संबंधान बुद्धिवादाचे नाव काढले की त्यांच्या अंगावर काटा उभा राहतो! एखाद्या दिवाळखोर कर्जबाजा-यास ज्याप्रमाणे आपल्या प्राप्तीचा आकडा आपल्या खर्चाच्या आकड्याशी ताडून पाहण्याचे धैर्य होत नाही, किंवा ज्यांची जीविताशा फार प्रबल झाली आहे त्यांना आपल्या रोगाची चिकित्सा सुप्रसिद्ध
भिषग्वर्याकडून करवत नाही, त्याप्रमाणे श्रद्धाळ धार्गिका आपल्या धर्मसमजुती व त्यावर अवलंबणारे आचार यांस बुद्धिवादाच्या प्रखर मुशीत घालण्याची छाती होत नाही.

पुढे वाचा