क) पैशाचे साध्यमूल्य
साधारणतः पैशाचे साधनमूल्य म्हणून असलेले महत्त्व सर्वच जण स्वीकारतात. तथापि एकदा पैसा मिळविण्यास सुरुवात केली की, त्याचे एक विलक्षण असे आकर्षण निर्माण होते. आणि साधनमूल्य विसरून त्याला साध्याचे स्थान येते. पैसा हेच साध्य ठरल्यावर तो किती व कसा मिळवायचा याला मर्यादा राहत नाहीत. यामुळेच ज्यांच्याकडे मुबलक पैसा आहे असे लोकही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा अवलंब करीत असताना दिसतात. म्हणून मंत्री, ज्येष्ठ सनदी अधिकारी यांच्या स्तरावर भ्रष्टाचाराचे प्रमाण प्रचंड प्रमाणावर वाढल्याचे आपणास दिसून येते. ड) आर्थिक आवश्यकता या उच्चवर्गाबरोबरच कनिष्ठ वर्गातही छोट्यामोठ्या स्वरूपात होणारा भ्रष्टाचार आपणास दिसून येतो.
विवेक आणि अंतःप्रेरणा (Reason and Intuition)
Choose Life या पुस्तकाचे मलपृष्ठावरील अवतरण खालीलप्रमाणे : (टाइम साप्ताहिक, अमेरिका यांच्या अंकातून ): अर्नोल्ड टॉयन्बी यांचेवर टीका करणारे आहेतच. पण त्यांची गणना आइन्स्टाइन, श्वाइट्झर किंवा बरट्रांड रसेल, यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय संतांच्या मालिकेत होते. अनेकानेक विषयांवरील त्यांच्या मतांची चौकशी केली जात असे. डाइसाकु इकेडा त्यांच्या इतर ग्रंथांतून, व्याख्यानांतून आणि लेखांतून इकेडा यांनी ‘जागतिक अन्न बँक’, ‘संरक्षण खर्चात कपात’ व ‘आण्विक शस्त्रांचा त्याग’ याविषयी ऊहापोह केला आहे. त्यांचा सर्वाधिक ओढा मात्र मानवी समूहांतील युद्धविरोधी भावनांची वाढ या विषयांकडे आहे. इकेडा (इ) : अंतःप्रेरणा (Intuition) आणि विवेक (reason) एकमेकांस पूरक असतात.
‘अंतिम’ इतिहास
भावी पिढ्यांतील इतिहासकार ‘अंतिम’ इतिहासाची अपेक्षा ठेवणार नाहीत. त्यांचे संशोधनाचे काम वारंवार नवनव्या संशोधनाने मागे पडणार आहे, हे त्यांना अपेक्षितच असेल. त्यांना जाणीव असेल, की भूतकाळाचे ज्ञान आपल्यापर्यंत काही माणसांमार्फत, त्यांनी केलेल्या प्रक्रियांमधूनच येते. त्या ज्ञानात मूलभूत, व्यक्तिनिरपेक्ष, अपरिवर्तनीय असे काही मानता येत नाही.
काही उतावळे अभ्यासक तर अशा साशंक भूमिकेला येऊन पोचतील, की ऐतिहासिक ज्ञानाचे निष्कर्ष माणसे व दृष्टिकोन यांतूनच आपल्यापर्यंत येत असल्याने एक मांडणी व पर्यायी मांडणी यांतील कोणतीही मानायला हरकत नाही, कारण वस्तुनिष्ठ ऐतिहासिक सत्य असे काही नसतेच.
पत्रसंवाद
आ.सु. सप्टेंबर २००४ च्या अंकात पृष्ठ क्र. २८७ वर श्री.पु.नी. फडके यांचे पत्र आहे. त्याच्या शेवटी असलेल्या संपादकीय टिपणींमधील दोन मुद्दे खटकण्यासारखे आहेत.
१. “हे सारे आमच्या भूमिकेच्या पूर्ण विरोधात आहे.” असे संपादकांचे म्हणणे आहे. येथे एक विनंती करावी वाटते की ज्याप्रमाणे वाईच्या ‘नवभारतात’ पहिल्याच पानावर नवभारतची भूमिका छापलेली असते तशी आपली भूमिका आपण छापावी. कारण माझ्यासारख्या नवीन वाचकांना तुमची भूमिका काय आहे हे कधी कळणारच नाही.
२. “घेणे, न घेणे, अर्थातच आपल्यावर सोडतो.’ या टिपणीबाबतीत भाष्य करायचे झाल्यास त्याच शब्दांत हे पत्र छापावे वा न छापावे, मला काही फरक पडत नाही असे म्हणणे औद्धत्याचे आपल्याला वाटणार नाही का?
भ्रष्टाचार : कारणे व उपाय (भाग १)
प्रास्ताविक
आजच्या समाजव्यवस्थेला लागलेला सर्वांत भयंकर रोग म्हणजे ‘भ्रष्टाचार’ होय. भ्रष्टाचारावर सर्वचजण बोलत-लिहीत असतात. परंतु भ्रष्टाचाराची मूळ कारणे कोणती आहेत व त्यांचा बीमोड करता येईल काय, त्यासाठी कोणता ठोस कार्यक्रम हाती घेता येईल, याचे फारसे विश्लेषण सामान्य माणूसही करीत नाही. भ्रष्टाचाराच्या निर्मूलनाविषयी स्वप्नाळू व आदर्शवादी कल्पनांना कठोर वास्तवाचा आधार नसल्याने त्यांचा भ्रष्टाचार-निर्मूलनाच्या दृष्टीने फारसा उपयोग होत नाही. मी भ्रष्टाचाराचे स्वरूप, कारणे, परिणाम व त्याच्या निर्मूलनाचे उपाय यावर चर्चा करणार आहे. या चर्चेत वाचकांनीही सहभागी व्हावे, अशी माझी इच्छा व अपेक्षा आहे.
‘नॉट ओन्ली मिसेस् राऊत’च्या निमित्ताने.
‘नॉट ओन्ली मिसेस् राऊत’ हा इंग्रजी शीर्षक असलेला मराठी चित्रपट. दिग्दर्शिका अदिती देशपांडे. नुकताच हा चित्रपट पाहिला आणि त्याच्या झालेल्या प्रभावातून पुरतेपणी भानावरही आले नव्हते, तर एक प्रतिक्रिया कानावर आली, ‘चावून चावून चोथा झालेला विषय आहे’ प्रतिक्रिया व्यक्त करणारा अर्थात पुरुष! ज्याला मिसेस् राऊतच्या वेदनांशी आपली नाळ जोडता येईल, तो कोणीही अशी प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही. मिसेस् राऊत ज्या परिस्थितीतून गेली आहे तिथे तुम्ही स्वतःला ठेवा अन् मग आपण काय केले असते, ह्याचा विचार करा. मेंदूला झिणझिण्या येतील. “एखादी स्त्री जी कोणाचीच नसते ती सर्वांचीच असते का?’
विवेकवाद – भाग ३
(प्रथम प्रकाशन जून १९९० अंक १.३)
कर्मसिद्धान्त, पूर्वजन्म आणि पुनर्जन्म
या लेखमालेच्या दुसऱ्या लेखांकाच्या शेवटी आपण ‘कर्मसिद्धान्त’ नावाच्या एका प्रसिद्ध उपपत्तीचा उल्लेख केला. तेथे आपण ईश्वराच्या अस्तित्वाचा आणि त्याच्या स्वरूपाचा विचार करीत होतो, आणि आपण असा युक्तिवाद केला होता की जगात जे प्रचंड अशिव आढळते म्हणजे भयानक दुःख, क्रौर्य, अज्ञान, दुष्टाचार, रोगराई इत्यादि जे आढळते ते सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि सर्वथासाधु अशा ईश्वराच्या अस्तित्वाला बाधक आहे. या युक्तिवादाला दिल्या गेलेल्या अनेक उत्तरांचे आपण परीक्षण केले आणि शेवटी कर्मसिद्धान्तापाशी येऊन ठेपलो. कर्मसिद्धान्तानुसार जगातील अशिवाचे कारण आपण मानवच आहोत आणि त्याकरिता ईश्वराला जबाबदार धरणे चूक आहे.
भीती आणि विचार
लेखिकेच्या शब्दचित्रातून तिचा अनुभव माझ्यातही साकारला. माझ्या मनावरूनही भीतीची लाट गेली. अशा अनुभवांकडे कसे बघावे, ते कसे घ्यावेत, या पृच्छेवरून तिची या अनुभवामागची प्रक्रिया जाणून घेऊन तो संगणकीय भाषेत भीतीच्या फाईलमधून विचाराच्या ‘फाईल’ मध्ये सामील करण्याचा प्रयत्नही समजला.
मानसशास्त्रीय संस्कारांमुळे माझ्या मनात ‘अतींद्रिय’ असे काही आलेच नाही. मनात आले ते असे : मूल बौद्धिक क्षमता असलेल्या मेंदूसकट जन्मते. त्यावर मुळाक्षरे उमटवतात पालक, शिक्षक, मित्रमंडळ, पुस्तके, प्रसारमाध्यमे आणि एकूण वातावरण ! त्यातून बऱ्या-वाईटाचे भान येते. धोक्यांची जाणीव होते. बचाव कसा करावा, समजू लागते.
व्यक्तिविशिष्ट रसायनांचा मेळ
अंशतः विश्लेषणः पद्मजाचा अनुभव दुर्मिळ आहे खरा, पण त्याला गूढ किंवा अमानवी मानायचे कारण नाही. उपलब्ध शास्त्रीय ज्ञान वापरून त्याचे स्पष्टीकरण इथे थोडक्यात देता येईल.
माणसासकट सर्व प्राण्यांना काही व्यक्तिविशिष्ट रसायने अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म प्रमाणात उपलब्ध असली तरी त्यांची तीव्र जाणीव होऊ शकते. याची अगदी ठळक आणि व्यवहारातली उदाहरणे म्हणजे केवळ वासावरून काही तासांपूर्वी पळालेल्या गुन्हेगाराचा, पुरून टाकलेल्या बळीचाही माग काढू शकणारे कुत्रे, मादीच्या वासाने दोन-तीन किलोमीटर्सपर्यंत तिला शोधत जाणारे भुंगे, औषधाच्या प्रत्येक गोळीत औषधाचे अगदी थोडेच रेणू असतील-नसतील तरी लागू पडणारी होमियोपॅथिक औषधे आणि एखाद्या विशिष्ट पदार्थाची (हिंग, लसूण, शेंगदाणे, अंडी, विशिष्ट प्रकारचे गवत, ऑईल पेन्ट, इ.)
नागरी-जैविक विविधता (भाग २)
नागरीकरणामुळे जैविक वैविध्यावर होणारे आघात आणि ते रोखण्यासाठी आवश्यक असणारे संवर्धन धोरण
५. जैवविविधता जपणाऱ्या ‘नव्या’ नगरांचे नियोजन:
५.१. वस्ती, खेडे, गाव, नगर, महानगर, मोठे नागरी प्रदेश अशी मानवी वस्त्यांची एक श्रेणी असते. कधीकधी एखाद्या ठिकाणी अचानकपणे नवे नगर वसविण्याचे ठरते. त्यामागे काही सामाजिक-राजकीय कारणे असतात. वेगाने नगरनिर्माण करण्याच्या धडपडीमध्ये नियोजन करायला पुरेसा वेळही दिला जात नाही. साध्या नागरी सेवांचा विचार पुरेशा प्रमाणात होत नाही तेथे पर्यावरणाचा विचार तर दूरच राहतो. असे असले तरी स्थानिक जैवविविधता नष्ट होणे हे अपरिहार्यच असते असे मात्र नाही.