विज्ञान ही चीज काय आहे? (पूर्वार्ध)

आधुनिक जगात विज्ञानाविषयी आदराची, दराऱ्याची भावना आहे यात शंका नाही. मानवी ज्ञानाच्या कक्षा अणुरेणूंपासून विश्वाच्या उत्पत्तीपर्यंत, विविध क्षेत्रांत, विविध प्रकारे रुंदावण्याचे विज्ञानाचे यश वादातीत आहे. (या लेखाचे ते एक मुख्य गृहीतक ही आहे.) मानवाच्या भौतिक प्रगतीसाठी विज्ञानाची उपयुक्तता, विज्ञानाचे योगदानही सर्वमान्य आहे. विज्ञानाविषयीचा आदर व दरारा मात्र या योगदानातून, उपयुक्ततेतूनच आलेला आहे असे नाही, तर त्याच्यामागे विज्ञानाच्या कार्यपद्धतीत काहीतरी विशेष आहे, खास विश्वसनीय आहे अशी सार्वत्रिक समजूत आहे. प्रसारमाध्यमातील जाहिरातीत-सुद्धा “आमचे उत्पादन वैज्ञानिकरीत्या अधिक ‘शुभ्र’ अधिक ‘चमकदार’, अधिक ‘प्रभावी’, अधिक ‘गुणकारी’ आहे!”

पुढे वाचा

साकल्यवाद, संक्षेपणवाद आणि विज्ञान

मी शाळकरी मुलगा असताना बालकवींच्या ‘फुलराणी’च्या प्रेमात पडलो:
हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती ! ही पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट. त्या ओढीनेच मी अखेर परिसरशास्त्राकडे वळलो. मग सारे आयुष्य हिरवाई पाहत, फुले निरखत, वृक्षांची मापे घेत, वनस्पती जमवत आणि त्यांचे विच्छेदन करत, त्यांच्यातला हिरवा रंग काढून तो स्पेक्ट्रोफोटोमीटर ने तपासत घालवणे आलेच. या साऱ्या विज्ञानाच्या संक्षेपणवादी (reductionist) पद्धतीतल्या क्रिया. या पद्धतीभोवती अनेक गैरसमजुतींचे लेप चढलेले आहेत. परंतु यामुळे निसर्गातल्या काव्याला आणि सौंदर्याला मी मुकलो का?

पुढे वाचा

आधुनिक विज्ञान: स्वरूप आणि स्थिती

विसाव्या शतकात कितीतरी प्रचंड महत्त्वाच्या घडामोडी झाल्या आणि जगाचा चेहरामोहरा बदलून गेला. दोन महायुद्धे, रशियन क्रांतीचा उदयास्त, जुना वसाहतवाद संपुष्टात येऊन झालेली नवस्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती, आणि चीनमधील क्रांती वगैरे. परंतु 21 व्या शतकात प्रवेश करताना जाणवते की या घडामोडी कमी लेखणे शक्य नसले तरी आर्थिक, सामाजिक क्षेत्रांत घडून आलेल्या प्रचंड बदलात अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे तो आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्यांच्या कर्तृत्वाचा. पृथ्वीचे स्वरूप एक ‘जागतिक खेडे’ म्हणून रूपांतरित होत आहे त्यात कोणत्याही तत्त्वज्ञानापेक्षा, विचारप्रणालीपेक्षा विज्ञानाधिष्ठित तंत्रज्ञानाचे योगदान अधिक पायाभूत आहे.

पुढे वाचा

मर्यादा

विज्ञानाशी संबंधित एखादा विशेषांक काढावा असे फार दिवस मनात होते, पण विषय फार मोठा. आज आयुष्याच्या सर्व भागांना तो स्पर्श करतो, व्यक्तिगतही आणि समाजिकही. मग मर्यादा काय घालाव्या?
‘सुरुवात तर करू’ अशा भूमिकेतून ‘विज्ञान : स्वरूप आणि मर्यादा’ हा मथळा निवडला. योग्य अतिथि-संपादकाचाही विचार होत होताच. अशात चिंतामणी देशमुख भेटले. त्यांनी सुचवले, “आधुनिक विज्ञान म्हणा, कारण आजची शिस्त पूर्वी नसायची.” योग्य! “आणि ‘मर्यादा’ म्हटले की लोक गोंधळ घालतात. त्याऐवजी ‘क्षितिजे’ जास्त नेमके ठरेल.’ यावर उत्तर सोपे होते, “तुम्हीच का नाही अतिथि-संपादक होत?”

पुढे वाचा

विशेषांक: आधुनिक विज्ञानाचे स्वरूप – मूलभूत सत्य

“विज्ञान ना पौर्वात्य आहे, ना पाश्चात्त्य. त्याची वैश्विकता त्याला आंतरराष्ट्रीय करते. पण असे असूनही विज्ञानाची काही अंगे त्यांच्या जन्मस्थानांमुळे विशेष समृद्ध झाली आहेत.”
“आधुनिक विज्ञानातील अतिविशेषीकरणामुळे (excessive specialization) एका मूलभूत सत्याकडे दुर्लक्ष होण्याचा धोका संभवतो. हे सत्य म्हणजे—-विज्ञाने नाहीत, एकच सर्वसमावेशक विज्ञान आहे. भारतीय मनोवृत्ती या विस्तृत संश्लेषणासाठी फार अनुरूप आहे.”
जगदीशचंद्र बसूंच्या बनारस हिंदु विश्वविद्यालयातील दोन भाषणांमधले हे उतारे – पहिले भाषण 4 फेब्रु. 1916 ला ब. हिं. वि. च्या उद्घाटनाच्या वेळचे आहे, तर दुसरे 1925 च्या दीक्षांत समारोहातील आहे.]

पुढे वाचा

संपादकीय आगामी विशेषांकांबद्दल

आपला येता (जानेवारी—फेब्रुवारी २००४) अंक हा आधुनिक विज्ञानाचे स्वरूप या विषयावरचा विशेष जोडअंक असेल. त्यानंतरचा अंक मार्चचा असेल.
या विशेषांकाचे संपादक चिंतामणी देशमुख व्ही. जे. टी. आय. मध्ये तीस वर्षे भौतिकीचे अध्यापन करून स्वेच्छानिवृत्त झाले आहेत. डॉ. होमी भाभा आणि दामोदर धर्मानंद कोसंबी यांची चरित्रे, देवांसि जिवें मारिलें (सहलेखक) ही विज्ञान-कादंबरी आणि कोलाहल, अपूर्णमित आणि स्वयंसंघटन (भाषांतरित), ही त्यांची ग्रंथसंपदा आहे. लोक-विज्ञान संघटना आणि विज्ञान ग्रंथालीतही ते कार्यरत असतात. विषय मोठा आणि महत्त्वाचा आहे. लेखही एका जोडअंकात सामावून घेता न येण्याइतके आहेत.

पुढे वाचा

‘बॉम्बे फर्स्ट’ मीन्स ‘सो मेनी थिंग्स लॉस्ट’

टाईम्स ऑफ इंडिया (21-9-03) व इकॉनॉमिक टाईम्स 23 आणि 24-9-03 मध्ये मुंबईतील सध्याची दाटी हटवून विकास करण्यासाठी रु. 2 लक्ष कोटींची 2003-13 अशी दहा वर्षांची योजना बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, राज्य सरकार, मुंबई महानगर पालिका व मेट्रोपोलिटन रीजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी ह्यांनी मिळून तयार केल्याचे व समारंभपूर्वक 15 9-03 रोजी मुख्यमंत्र्यांना सादर केल्याचे वृत्त आहे. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी त्या समारंभातच मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत एक कार्यगट आणि अंमलबजावणीतील सर्व अडथळे दूर करण्यासाठी मुख्यमंत्रि-कार्यालयात प्रधान-सचिवांच्या अध्यक्षतेत एक विशेष कार्यालय (सेल) स्थापण्याची घोषणा केली.

पुढे वाचा

‘अक्षरधन’: विद्यादात्यांची अभिनव संस्मरणे

अक्षरधन हे प्रा. प्र. ब. कुळकर्णी यांच्या वठलेल्या आणि अनुभवसिद्ध लेखन-शैलीतून साकार झालेले पुस्तक. पूर्वी त्यांचे लेखन आजचा सुधारक आणि वृत्तपत्रे यांमधून नियमित प्रकाशित होत असे. माझ्या माहितीप्रमाणे पुस्तकरूपाने आलेले अक्षरधन हे त्यांचे पहिले प्रकाशन. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात प्रा. कुळकर्णी ह्यांचा लौकिक बराच झाला असला तरी साहित्यिक म्हणावे इतकी ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर नाही. आपल्या अविस्मरणीय शिक्षकांना वाहिलेली आदरांजली शब्दबद्ध करणारे अक्षरधन हे भावानुबंध प्रा. कुळकर्णीनी येथे सादर केले आहेत.
ललित लेखक ज्यावेळी स्वतःचे अनुभव शब्दांकित करतो तेव्हा त्या लिखाणाचा अर्थ प्रथम-वाचनातच सामान्य वाचकाला उमगत नसेल तर लेखकाची लेखनशैली, विषयाची अभिव्यक्ती ही कृतक आहे आणि ती त्याच्या अनुभवांशी प्रामाणिक नाही असे खुशाल समजावे.

पुढे वाचा

आज अगर खामोश रहे तो कल सन्नाटा छा जाएगा

जाहिरा शेख गप्प राहिली असती तर? तर सुखाने चाललेल्या ‘रामराज्या’ला असा कलंक लागला नसता. कोर्टाचे काम वाढले नसते. सेक्युलर पक्षांना विरोधाचा मुद्दा मिळाला नसता. अपप्रचारी प्रसारमाध्यमांना न्यूज मिळाली नसती. ‘शांतता सौहार्दाचे वातावरण’ असेच टिकून राहिले असते. पण जाहिरा शेख बोलली. भारतीय लोकशाहीतला हा तसा दुर्मिळ प्रसंग आहे की कुणी सामाजिक कार्यकर्ता किंवा विरोधी पक्षनेता नाही तर एक सामान्य नागरिक असूनही ती उघडपणे सत्तेविरुद्ध बोलली. निकालात निघाले म्हणून गुजरात सरकार आनंदोत्सव साजरा करीत असतानाच बेस्ट बेकरी प्रकरणाला जाहिराच्या बोलण्याने नवे वळण मिळाले.

पुढे वाचा

भारतीय समाजासाठी विज्ञान

सामाजिक स्थिती
सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन व त्यांचे सहकारी ड्रेझ व गझदार यांनी उत्तर प्रदेशातील परिस्थितीच्या मूल्यमापनाचा अहवाल सादर केला आहे. तेथील स्थितीचे वर्णन करताना त्यांनी काही धक्कादायक निष्कर्ष काढले आहेत. या राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण दर हजारी 160 आहे. (हेच प्रमाण अमेरिकेत केवळ 15 आहे.) अकाली मृत्युच्या बाबतीत या राज्याचा क्रमांक भारतात दुसरा आहे. गर्भवती स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमाणही इतर राज्यांच्या तुलनेने फार आहे. गेल्या तीस वर्षात तळागाळातील लोक निकृष्ट जीवन जगत आहेत. राज्यातील बहुसंख्या लोकांना दारिद्र्याचे चटके बसत असले तरी काही जण मात्र ऐषारामाचे जीवन जगत आहेत.

पुढे वाचा