निरामय जीवनासाठी

सीने में जलन, आँख में तुफान सा क्यों है?
इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है? आजकाल आजूबाजूला पाहिले तर आपल्या संपर्कात येणारे नातेवाईक जवळचे दूरचे, मित्रमैत्रिणी, सहकारी, कामाला येणारी बाई, दुकानदार, बँका ऑफिसेसमधील कर्मचारी, विद्यार्थी, इतकेच काय पण प्रवासात होणारी घडीभराची संगत, अशा सर्व व्यक्ती ‘सीने में जलन’ व ‘आँखों में तूफान’ घेऊन वावरताना दिसतात. आपापल्या ‘परेशानी’ त बुडून गेलेली व त्याचा आविष्कार त्यांच्या बोली व शारीर भाषेतून (body larguage) प्रकट करताना दिसतात. जीवन धकाधकीचे झाले आहे. सतत स्पर्धेला तोंड द्यावे लागते.

पुढे वाचा

अरवली गाथा

श्री. जयंत फाळके यांचे वरील मथळ्याखाली आ. सु.मध्ये दोन लेख छापल्याबद्दल अभिनंदन. बरेचसे सामाजिक बदल हे आर्थिक बदलांमुळे होत असतात. असे असूनही आ.सु.मध्ये तात्त्विक आणि तत्त्वज्ञानाच्या चर्चांना खूप जास्त प्रमाणात जागा दिली जाते असे माझे मत झाले आहे उ. ११ व्या वर्षातही ‘विवेकवाद’ कशाला म्हणायचे यावर लिखाण चालू असते.
जयंत फाळके यांनी कथन केलेले तरुण भारत संघाचे काम खरोखरच प्रशंसनीय आहे. एखाद्या दुर्गम भागात जाऊन, मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समाजात आपली मते आणि स्व बाजूला ठेवून स्थानिक समाजाचा स्वाभिमान जागृत करून त्याला एकसंध कार्यप्रवृत्त करणे खरोखरीच फार अवघड आहे.

पुढे वाचा

नैतिक प्राणी (भाग १)

प्रस्तावना: एखाद्या माणसाच्या गुणधर्मांपैकी कोणते आनुवंशिक असतात आणि कोणते संगोपनामधून आणि संस्कारामधून घडतात, हा एक जुनाच प्र न आहे. स्वभाव विरुद्ध संस्कार (Nature versus Nurture) ह्या नावाने तो अनेकदा मांडला जातो. सुट्या माणसांच्या पातळीवर प्र न असा असतो —- “ह्या व्यक्तीचे कोणते गुण आईवडलांकडून आनुवंशिकतेने आलेले आहेत आणि कोणते पालनपोषणाच्या काळात संस्कार झाल्याने रुजले आहेत?’ पूर्ण मानवजातीच्या पातळीवरही आपण हा प्र न विचारू शकतो —- “कोणते गुण उत्क्रांतीतून घडलेले आहेत आणि कोणते सामाजिक संस्थांमुळे घडलेले आहेत?”
सुधारणा करू इच्छिणाऱ्यांच्या दृष्टीने हा प्र न महत्त्वाचा आहे.

पुढे वाचा

श्री. ह. चं. घोंगे ह्यांच्या लेखाला (ऑ. २०००) हे माझे उत्तर

स्त्रियांच्या योनिशुचितेला दिल्या गेलेल्या अवास्तव महत्त्वाची स्त्रियांनी जबरदस्त किंमत मोजली आहे. माझ्या मते स्त्रियांना योनिशुचितेच्या कल्पनेच्या बेडीतून मुक्त करण्याची अत्यंत जरुरी आहे. त्यामागचे हेतू श्री. घोंगे लिहितात त्या लेखापेक्षा पूर्ण वेगळे आहेत.
१. विवाहपूर्व, विवाहित अथवा वैधव्यात कामेच्छा पूर्ण करण्यास संधी स्त्रीला मिळावी हा माझा हेतू नाही.
२. “अनोळखी स्त्रीपुरुषांनी जवळीक साधायची कशी?” “साठी उलट-लेल्या स्त्रीपुरुषांना परस्परांबद्दल आकर्षण निर्माण झाले तर रतिक्रीडेत गुर-फटण्याचे क्षण शोधायचे कसे?’ हे प्र न श्री. घोंगे विचारतात. हे प्र नही मला अप्रस्तुत (irrelevant) वाटतात. लैंगिक मुक्तीचा हेतू मुक्त कामजीवन (माझ्या मते) आज तरी नाही.

पुढे वाचा

आदम आणि बाळाची आई

अमेरिकन निसर्गशास्त्र संग्रहालयातले डायनोसॉर्जचे प्रदर्शन पाहून आलेला आदम न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये एका बाकावर बसला आहे, संध्याकाळच्या वेळी, आपल्या जीवजातीच्या हलचाली पाहात.
“आणि ही एवढी सारी माणसं म्हणजे पृथ्वीच्या साऱ्या लोकसंख्येचा एक छोटासा भाग! सारे माझ्या नात्यातले! सारे, सारे! हौवा हवी होती बरोबर. तिला मनापासून आनंद झाला असता. नातलग भेटला की तिचा स्वतःवर ताबा नाही राहात. सगळ्यांच्या पाप्या घ्यायचा प्रयत्न करेल ती. गोरे, काळे, सगळेच्या सगळे”. एक बाबागाडी ढकलत नव्याने आई झालेली बाई बाकावर आदमजवळ येऊन बसते. बाबागाडीला संथ झोका देते.
“किती कमी बदल झालाय—-काहीच नाही, खरं तर—मला पहिलं बाळ आठवतं —- केव्हा बरं?

पुढे वाचा

पत्रसंवाद

सेक्युलॅरिझम् (धर्मनिरपेक्षता) शब्द प्रथम कोणी वापरला?
‘सेक्युलॅरिझम्’ या संकल्पनेच्या आशयाबद्दल वेगवेगळे विचारप्रवाह आहेत आणि म्हणूनच १५० वर्षापूर्वी हा शब्द प्रथम वापरला गेला तेव्हापासून आजतागायत या विषयावर अविरतपणे चर्चा चालू असते.

१८५० साली हा शब्द पहिल्या प्रथम वापरणाऱ्या जॉर्ज जेकब हॉलयोकचा जन्म १८१७ साली, इंग्लडमधील बर्मिंगहॅम या शहरात झाला. तरुण वयात त्याची धर्मावर अढळ श्रद्धा होती. धर्मप्रसारकांच्या सभा-बैठकांमध्येही तो सामील होत असे, एवढेच नव्हे तर या श्रद्धेप्रीत्यर्थ आवश्यक असणारा खर्चही तो स्वतःच्या खिशातून करीत असे. या त्याच्या कार्यातून त्याची बढती झाली, आणि १८३६ मध्ये म्हणजे वयाच्या १९ व्या वर्षी तो दर रविवारी प्रवचनेही करू लागला.

पुढे वाचा

पत्र-संवाद

श्याम कुळकर्णी
‘यमाई’, तंत्रनगर, औरंगाबाद — ४३१ ००५
खाजगी शिकवणी वर्ग
संदर्भ : आजचा सुधारक च्या जुलै २००० चे संपादकीय
शिकवणीवर्गाचे समर्थन विवेकवादात बसत नाही. आ. सु.च्या डिसेंबर १९९१ च्या ‘विवेकवाद’च्या १७ व्या भागात युक्त व अयुक्त कर्म तसेच कर्माची नैतिकता या चर्चेतील दोन उदाहरणे देतो. कारखानदार, व्यापारी इ. मंडळींच्या उद्योगामुळे देशाची समृद्धी वाढते, बेकारांना काम मिळते आणि सर्वांचेच राहणीमान उंचावते हे खरे आहे, पण म्हणून तेवढ्याकरिता त्यांचे उद्योग नैतिकदृष्ट्या प्रशंसनीय आहेत असे म्हणता येत नाही, ही सर्व मंडळी केवळ स्वार्थाने प्रेरित झालेली असल्यामुळे त्यांची कर्मे नैतिक या पदवीस पात्र होत नाहीत असे तेथे म्हटले आहे.

पुढे वाचा

निष्ठा : दोन पैलू

अॅरिस्टॉटल हा प्रकांड ग्रीक पंडित होता हे त्याच्या ग्रंथ-निर्मितीवरून चटकन कोणाच्याही लक्षात येईल. मानसशास्त्र, तर्कशास्त्र, शरीरविज्ञान, नाट्य-शोकांतिका व इतर विषयांवर त्याने लिहिलेली विद्वत्ताप्रचुर पुस्तके हे त्याच्या पांडित्याचे पुरावे म्हणून देता येतील. प्लेटोचा तो अत्यंत आवडता शिष्य. प्लेटोने “अकॅडमी’ची स्थापना करून जनतेच्या ज्ञानलालसेला जशी चालना दिली तसाच प्रयत्न अॅरिस्टॉटलने “लायसेयम’ही ज्ञानवर्धिनी संस्था निर्माण करून आपली गुरुपरंपरा पुढे चालविली होती.
अॅरिस्टॉटल एकदा आपल्या विद्यार्थ्यांशी वर्गात तत्त्वज्ञानाची चर्चा करीत असताना एका विद्यार्थ्याने प्लेटोचे विधान त्याच्या तोंडावर फेकून अॅरिस्टॉटलला पेचात आणण्याचा प्रयत्न केला. पण प्रथम त्याने त्याकडे दुर्लक्ष केले.

पुढे वाचा

जागतिकीकरण व मानवसमूह

माणूस हा एक सस्तन प्राणी आहे. म्हणून जीवशास्त्राचे मूलभूत नियम माणसाला लागू पडतातच. जीवशास्त्राच्या अभ्यासात पुढील नियम आपल्याला आढळतात :–

१) पर्यावरणाची विविधता प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या जाती-प्रजातींच्या उत्क्रांतीस व टिकून राहण्यास आवश्यक असते. ही विविधता नष्ट केल्यास, सरसकट सारखे पर्यावरण निर्माण केल्यास, अनेक जाती प्रजाती जैविक चढाओढीत मागे पडून नष्ट होतात. पर्यावरणाच्या स्थानिक वैशिष्ट्यांमुळे केवळ काही विशिष्ट जाती प्रजाती शिरजोर ठरत असतात. उदाहरणार्थ डोंगराच्या शिखरावर, मध्य-उतारावर, घळीमध्ये, खालच्या उतारावर, सपाटीवर वेगवेगळ्या झाडांच्या जाती आढळतात. पूर्व दिशेच्या उतारावर व प िचम बाजूच्या उतारावर देखील वेगवेगळ्या जातींचे प्राबल्य आढळते.

पुढे वाचा

सक्षम मेंदूला डोळस अनुभवाची गरज

आपल्या सर्वांचाच मेंदू सक्षम असतो, फक्त त्याला डोळस अनुभव द्या. (We all have same hardware but only different software.) स्थळ आहे ऐने. वांगणीस्टेशन पासून १५-२० कि. मी. अंतरावर असलेले एक आदिवासी छोटेसे गाव. ग्राममंगल संस्थेच्या चवथीपाचवीतल्या १४-१५ मुला-मुलींचा गट. नीलेश गुरुजींनी ३-४ दिवस आधी या मुलांना पोष्ट ऑफीस पाहून यायला सांगितले होते. आणि मुलेमुली काय काय पाहिले ते सांगत होती : कोणाला शिक्के मारण्याचे काम आवडल, काही जणांनी पत्त्यांप्रमाणे पत्रांचे गढे कसे तयार करतात ते पाहिले. असे चालले होते. इतक्यात एका मुलाला प्र न पडला —
गुरुजी नदी आडवी आली तर टेलीफोनची तार कशी नेतात?

पुढे वाचा