४. शाळा–परिसर, सोयी, वातावरण
१. अपुऱ्या सोयी
प्रोब सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागात शाळांची संख्या वाढली आहे. शाळेला क्रीडांगण असणे, शाळेत खडू–फळा असणे, ह्यासारख्या सोयीही वाढल्या आहेत. पण तरीही शाळेच्या एकूण घडणीसाठी ह्या सोयी फार अपुऱ्या आहेत. नियमानुसार शाळेला निदान दोन पक्क्या खोल्या, दोन शिक्षक, शिकवण्यासाठी फळे, नकाशे, तक्ते, ग्रंथालये यांसारखी साधने असायला हवीत. प्रोब राज्यांमधल्या अगदी मोजक्या शाळांमध्ये ह्या सोयी आहेत. पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह ह्यासारख्या किमान गरजासुद्धा अनेक शाळा भागवत नाहीत त्यामुळे स्त्रीशिक्षिकांची फार अडचण होते. शाळेचा वापर इतर कामांसाठीसुद्धा मोठ्या प्रमाणावर केला जातो.