प्रिय वाचक
आपल्या प्राचीन संस्कृतीची वैशिष्ट्ये सांगताना गुस्माहात्म्य आणि पूर्वज-पूजा यांचा उल्लेख या आधी आम्ही केला. शुद्धीचे अतोनात स्तोम हे असेच एक उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे. चित्तशुद्धीशिवाय ब्रह्मज्ञान नाही. देहशुद्धीशिवाय चित्तशुद्धी नाही अन्नशुद्धीशिवाय देहशुद्धी नाही. या अन्नशुद्धीच्या समजुतीत पोषक आहाराच्या शास्त्रीय चिकित्सेपेक्षा कल्पनारम्य भागच अधिक. उदा. अन्न शिजवणाऱ्याची तन-शुद्धी, पावित्र्य फार महत्त्वाचे. त्यासाठी त्याची जात तुमच्याइतकी किंवा जास्त शुद्ध हवी, काम शुद्ध हवे. जितके जास्त मेहनतीचे काम तुम्ही करता तेवढी तुमची जात खालची, कमी शुद्ध. म्हणून वरच्या जातीच्यांनी खालच्या जातीच्या हातचे अन्न भक्षण करू नये हा संकेत.
कांहीही न करणारा ईश्वर
ईश्वरावरील श्रद्धा हा एक प्रकारचा पोरखेळ आहे. मनुष्यजातीच्या बाल-पणांत ही श्रद्धा शोभली असती, परंतु प्रौढ वयांत बाललीला शोभत नाहीत. ईश्वराचा मुख्य उपयोग म्हणजे पाप केले तर ते कृष्णार्पण करतां येतें, संकट आले तर जेथे स्वतःचे कांही चालत नाही तेथे ईश्वरावर हवाला ठेवून समाधान मानतां येते, आणि ईश्वराची प्रार्थना केल्याने आपल्या मनासारखे होईल अशी आशा बाळगतां येते, पण या फोल आशेचा उपयोग काय? युद्धांत दोन्ही बाजूच्या लोकांनी ईश्वराची प्रार्थना केली तर तो जय कोणाला देणार? हे देखील समजण्याची ज्यांना अक्कल नाही तेच ईश्वरावर विश्वास ठेवतात.
मनात आलं ते केलं
‘मनात आलं ते केलं’ हे हलके -फुलके तत्त्वज्ञान बाळगणारी व्यक्ती केवढे भरीव काम करू शकते हे शकुन्तलाबाई परांजपे यांनी दाखवून दिले आहे.
“मी बहुधा फ्रान्समध्ये असताना वडिलांना लिहिले की मी आज सिग्रेट ओढली.” वडिलांनी उत्तर दिले, की “हे मला आवडले नाही. पण तू आता मोठी झाली आहेस. तुझ्या मनाप्रमाणे वाग.” पुढे जन्मभर, मनात आले ते केले असे ब्रीद ठेवून वागणाऱ्या शकुन्तला परांजपे ३ मे २००० रोजी वारल्या. दिवंगत झाल्या हे म्हणणेही येथे साजायचे नाही कारण मेल्यावर काहीच राहत नाही मग स्वर्गवास काय नि दिवंगत होणे काय, सारखेच निरर्थक असे मानणाऱ्या पंथाच्या त्या होत्या.
पत्रव्यवहार
संपादक, आजचा सुधारक, यांस,
मी आपल्या आजचा सुधारकचा एक वाचक. अनेक वैचारिक आणि संशोधनात्मक लेख वाचून समाधान वाटते. मी आज न राहवून केशवराव जोशी यांच्या फेब्रु. २००० च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘ब्राह्मणेतर चळवळ’ या लेखा-बद्दल लिहीत आहे. त्यातील काही वाक्ये अत्यंत बेजबाबदार आणि पूर्वग्रहदूषित वाटतात. त्यांची डॉ. आंबेडकरांविषयी दूषित भावना आहे हे त्यांच्या अनेक ओळींवरून दिसते. ते म्हणतात, “ ‘बुद्धिवादी बॅ. आंबेडकर वृद्धापकाळी व विमनस्क परिस्थितीत म्हणू लागले की, बौद्ध धर्मात गेल्याशिवाय गती नाही.’ अस्पृश्य बौद्ध झाले तरी त्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत.
तत्त्वबोध
श्री. प्रकाश अकोलकर यांनी ज्येष्ठ सनदी अधिकारी श्री. एस. एस. गिल यांच्या पुस्तकाचे भाषांतर छान केले आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. “ख्रिश्चन न्यायशास्त्राच्या गाभ्यात पाप ही संकल्पना एखाद्या अग्निज्वालेप्रमाणे सदैव जळत राहिलेली असते’ हे पटण्यासारखे आहे. हिंदू किंवा मुस्लिम धर्मसंस्थापक निष्कलंक चारित्र्याची संकल्पना मांडत नाहीत हे सुद्धा खरे आहे. ख्रिस्ताच्या चारित्र्यात कपटनीती नाही. राजीव गांधींना बोफोर्स प्रकरणात गुंतविले गेले. जे. आर. डी. टाटा म्हणाले होते की “राजीव गांधी पोरकट आहेत” (टाईम्स १४/४/९१). ते श्री. गिलच्या पुस्तकाचे भाषांतर करीत असल्यामुळे त्यांना त्यात काही भर घालण्याचा प्रश्नच नव्हता तरी सर्वसाधारपणे जनमानसात “काँग्रेसवालेच भ्रष्ट आहेत’ असा समज असतो आणि वृद्ध लोक तर याबाबतीत ब्रिटिशांचे राज्य चांगले होते असे समजतात.
बॉम्बिंग बॉम्बे
(‘इंटरनॅशनल फिजिशियन्स फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ न्यूक्लियर वॉर (IPPMW)”, या नोबेल शांतिपुरस्काराने गौरवित संस्थेने प्रकाशित केलेल्या बॉम्बिंग बॉम्बे या एम. व्ही. रमण यांच्या पुस्तकाचा हा सारांश आहे.)
आपण कल्पनेने मुंबईवर एक हिरोशिमावर टाकला गेला होता तसा बॉम्ब टाकू. स्थळ असेल हुतात्मा चौकाच्या वर सहाशे मीटर. यात हुतात्मा चौकाचे ‘भावनिक’ महत्त्व आहे. नुसतीच माणसे मारायची झाली तर हा बॉम्ब चेंबूरजवळ टाकणे जास्त परिणामकारक ठरेल.
आपला बॉम्ब पंधरा किलोटन क्षमतेचाच फक्त आहे, म्हणजे पंधरा हजार टन टीएनटी या स्फोटकाएवढ्या संहारकतेचा. मध्यम आकाराचे हायड्रोजन बॉम्बही आजकाल याच्या दसपट विध्वंसकतेचे असतात.
अमरावतीचा सुधारक-मित्र-मेळावा
अमरावती हे स्वर्गाधीश इंद्राच्या राजधानीचे नाव. ही आठवण राहावी म्हणून तिथल्या कोणा एका छांदिष्ट कलावंताने ‘इंद्रपुरी अमरावती’ या नावाचा चित्रपटही काही वर्षांपूर्वी काढला होता. भूलोकीची अमरावती विदर्भ राजकन्या सक्मिणी हिचे माहेर आहे. या गोष्टीची आठवण ठेवून शहराबाहेर योजनापूर्वक झालेल्या वस्तीला रुक्मिणीनगर असे नावही अमरावतीकरांनी दिलेले आहे. आता ती नवी वस्ती जुनी झाली आहे. आणि तिच्याकडे पाहून विदर्भराजाच्या वैभवाची कल्पना करणे कठीण झाले आहे. पण अमरावतीकर हे आदर्शाचा ध्यास घेणारे आहेत एवढी गोष्ट मात्र कोणालाही कबूल करावे लागेल. उमरावती(उंबरावती) या जुन्या परकोटाने वेढलेल्या शहराबाहेर पहिल्यांदा जेव्हा आखीवरेखीव नवे नगर वसविले गेले तेव्हा त्याला ‘नमुना’ हे नाव अमरावतीकरांनी दिले.
धर्म आणि धम्म
आधुनिक भारताचे नाव अख्ख्या जगात पसरविणारा एक महान प्रज्ञा-पुरुष (ओशो) म्हणतो, ‘बुद्ध हा भारतमातेचा सर्वोत्तम पुत्र असन त्याच्या विचाराची गंगोत्री ही जगातील बहतेक तत्त्वज्ञानांची जननी ठरली आहे’. आंग्लतत्त्वज्ञ बरटाँड रसेल म्हणतो. ‘माझा स्वतःचा कुठलाही अंगीकृत धर्म नाही. परंतु मला जर एखाद्या धर्माचा स्वीकारच करावयाचा झाला तर मी बुद्धाच्या धर्माचाच अंगीकार करेन. प्रसिद्ध वैज्ञानिक आईन्स्टाईन यांनी तर आपल्या सापेक्षतावाद (रिलेटिव्हिटी) या सिद्धान्ताच्या संशोधनात बौद्धतत्त्वज्ञानाला बरेचसे श्रेय देऊन कृतज्ञता व्यक्त केली आहे. जुंग(युग) नावाच्या मानसशास्त्रज्ञाने बौद्धधर्मातील तत्त्वांच्या आधारावर ‘अभि-धर्म पर्सनॅलिटी’ या शब्दांत व्यक्तिमत्त्व-विकासाचे विश्लेषण केले आहे.
जनाधिकार आणि “प्रत्यक्ष सहभागाची लोकशाही” (Empowerment & Participatory Democracy)
१. आजचा सुधारकच्या एका अंकात श्री. मोहन हिराबाई हिरालाल ह्यांचा ते करत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासींच्या मेंढा-लेखा क्षेत्रातल्या प्रयोगाचे वर्णन आहे. “आमच्या गावात आम्ही सरकार, मुंबई-दिल्लीत आमचे सरकार” अशा तर्हेची घोषणा देऊन हे काम होत आहे त्यावेळी असा प्रश्न उपस्थित केला गेला होता की अशा तर्हेच्या “प्रत्यक्ष सहभागी लोकशाहीच्या’ (direct participatory democracy) लोकसंख्यीय मर्यादा काय असतील? रोमन रिपब्लिक्स आकाराने फार लहान होती आणि तीही पुढे ती टिकली नाहीत. स्वतः श्री मोहन यांनाही असे वाटते की साधारण १००० लोकसंख्येच्यावर हा प्रयोग कार्यप्रवण राहणार नाही.
जीवाचे पीळदार कथासूत्र
येत्या काही महिन्यांत माणसाच्या संपूर्ण जेनोमचा (genom) कच्चा आराखडा आपल्या हातात येईल. या घटनेबद्दलच्या बातम्या तिला वैद्यकीय आणि (बहुधा) नैतिक महत्त्व देतात. माझ्या मते एवढ्याने भागत नाही. मला वाटते की हा माणसाच्या इतिहासातील निरपवादपणे सर्वाधिक बौद्धिक महत्त्वाचा क्षण असेल. कोणी म्हणेल की एखादा माणूस म्हणजे केवळ त्याचे (किंवा तिचे) जीन्स नव्हेत, तर इतरही काही आहे मी हे नाकारत नाही. आपल्या सर्वांमध्ये केवळ जेनेटिक कोडपेक्षा बरेच काही आहे. पण आजवर मानवी जीन्सबाबत जी गूढता होती, जे अज्ञान होते, ते उल्लंघणारी आपली पिढी पहिली असेल.