सर्वांना शुद्धलेखनाचे प्रशिक्षण हवे

संपादक, आजचा सुधारक यांस,
आपल्या अनावृत पत्रात आपण उपस्थित केलेले सर्वच मुद्दे महत्त्वाचे व विचारांना चालना देणारे आहेत. त्या सर्वांचा समग्र विचार करून ऐकमत्य साधणे नितांत आवश्यक झाले आहे. ही प्रक्रिया लवकर व्हावयास हवी. उशीर झाल्यास मराठीची अवस्था आणखी दयनीय होईल आणि मग तिच्यात चैतन्य आणणे आणखी कठीण होईल, असे आपल्याप्रमाणे मलाही वाटत आले आहे. आपल्या अनेक वर्षांच्या व्यावसायिक अनुभवामुळे आपण लिखित मराठीचे दुखणे बरोबर हेरले आहे. समग्र महाराष्ट्रात आणि अन्यत्र प्रमाण मराठीची जाण वाढणे याची आज नितान्त
आवश्यकता आहे.
मराठीच्या अनेक प्रादेशिक बोलीही महाराप्ट्रात विखुरल्या आहेत.

पुढे वाचा

विवेकवाद म्हणजेच आप्तवाक्यप्रामाण्यनिषेध?

संपादक, आजचा सुधारक यांस,
मी आपले सर्व अंक पुरेसे काळजीपूर्वक वाचतो. प्रतिक्रियाही निर्माण होतात. त्यांची तपशीलवार मांडणी करण्यापेक्षा काही निष्कर्प फक्त नोदवीत आहे.
१. आपल्या वहुताश लेखकांचा त्यांच्या मनावद्दलचा शागही आत्मावश्वास अजव वाटतो. विश्वातील संपूर्ण व अंतिम सत्य आपणास समजले आहे असा अविर्भाव त्यात मला दिसतो.
२. जुलै ९९ च्या संपादकीयांतील पान १०० परिच्छेद – २ चा शेवट व पान १०१ परिच्छेद १ चा शेवट यांत ‘अन्याय दूर करण्याचा’ व ‘वास्तव बदलण्याचा तुमचा संकल्प हा फारच महत्त्वाकांक्षी वाटतो. आपले ग्राहक / वाचक यांची संख्या २५०० ते ३००० च्या पुढे नसावी.

पुढे वाचा

चर्चा – पंतप्रधान कोणी व्हावे?

संपादक, आजचा सुधारक यांस,
जून ९९ च्या अंक वाचला. यावेळी नेहमीची तर्कसंगती व विचारांची सुसूत्रता त्यात जाणवली नाही. म्हणून त्याविषयी काही विचार मांडीत आहे.
१) भारतातील सुशिक्षित व अशिक्षित असे दोन्ही प्रकारचे मतदार लोकशाही प्रक्रियेस कसे अयोग्य आहेत यावर दोन परिच्छेद लिहिल्यावर पुढे एके ठिकाणी आपण म्हणता की पंतप्रधान कोणी व्हावे हा जनतेचा प्रश्न नसून जो पक्ष निवडून येईल त्याची ती डोकेदुखी आहे. निवडून आलेला पक्ष हा मतदारांनीच निवडून दिलेला असतो. तेव्हा अशा “अयोग्य” (म्हणजेच आपल्या म्हणण्याप्रमाणे अप्रबुद्ध) मतदारांनी निवडलेल्या पक्षाने सर्व देशावर एखादी व्यक्ती पंदप्रधान म्हणून लादावी हे योग्य कसे?

पुढे वाचा

नसलेल्या परमेश्वराशी भांडण

आजचा सुधारकचा मी नियमित वाचक आहे. निखळ विवेकवादाचा पुरस्कार करणारे हे मासिक विचारी वाचकांच्या पसंतीस उतरावे यात तिळमात्र शंका नाही.
पण मला खटकणारी एक गोष्ट म्हणजे ऊठसूठ परमेश्वराची कुरापत काढण्याची थोडीही संधी हे मासिक वाया जाऊ देत नाही.
“अध्यात्म:” एक प्रचंड गोंधळ’ हा मे, ९९ च्या अंकातील लेख हा त्याच पठडीतला म्हणावा लागेल.
माझ्याही मनात त्याने गोंधळ होतो. त्याची कारणे अशी –
१. नसलेल्या परमेश्वराची चर्चा कशाला करायची? त्याला महत्त्व देऊन ‘तो नाही’ हे सिद्ध करायला ‘आजचा सुधारक’ मधील बहुमूल्य पाने का खर्चायची?

पुढे वाचा

धर्म आणि श्रद्धा

धर्मचिकित्सा करणा-या विद्वानांचे, ढोबळ मानाने, दोन वर्ग आहेत. एक वर्ग आहे – धर्म मानणा-या आस्तिकांचा, तर दुसरा आहे-धर्म न मानणा-या नास्तिकांचा. आस्तिक धर्मचिकित्सक हे सिद्ध करू पाहतो की धर्म ही अत्यंत कल्याणकर (किंबहुना, एकमेव कल्याणकर) बाब आहे. उलट, नास्तिक धर्मचिकित्सक हे दाखवू पाहतो की धर्म ही अत्यंत घातक आणि मानवाला सर्वस्वी अशोभनीय बाब आहे. धर्मचिकित्सकांच्या या दोन वर्षांनी काढलेले धर्मासंबंधीचे निष्कर्ष भिन्न (किंबहुना, एकमेकांविरुद्ध) असले, तरी त्या दोहोंमध्ये एका बाबतीत मतैक्य असल्याचे आढळते. नास्तिक आणि आस्तिक या दोन्ही प्रकारचे बहुतेक धर्मचिकित्सक असे मानतात की धर्माचा आधार श्रद्धा हा आहे.

पुढे वाचा

मनाचा जो व्यापार चालतो तो सारा इंग्रजी भाषेत

इंग्लिश भाषेचे सामान्य ज्ञान तर आतांशा बहुधा प्रत्येक मनुष्यास जरूर झालें आहे. दिवसेंदिवस तर तींत निपुण होणे हा जीवनाचाच एक उपाय होऊ पहात आहे. चोहोंकडे प्रतिष्ठा मिरविण्याचे तर यासारखे सध्यां दुसरें साधनच नाहीं. तेव्हा तिचा जो हल्ली फैलावा झाला आहे, व होत चालला आहे, त्यापुढे वर सांगितलेल्या भाषांची गोष्ट काय बोलावी? इंग्लिश लोक आपल्या उत्कृष्ट भाषेचा साया भूमंडळावर प्रसार होत चालला आहे याचा अतिशयित गर्व वहातात, व तो त्यांचा गर्व यथार्थ आहे. आमच्या नुसत्या हिंदुस्थानांतच पाहिले तर आमच्या तरुण विद्वानांस तिने इतके वेडावून टाकले आहे की, त्यांस आपल्या आईबापांशी, बायकांशीं, बहिणीशीं, चाकरांशीं सुद्धां शुद्ध व सरळ बोलण्याची मारामार पडते!

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्री. भाटे ह्यांनी रास्त सल्ला डावलला
संपादक, आजचा सुधारक यांस,
आ. सु. च्या जुलै १९९९ च्या अंकात दुस-याच्या मताचे खंडन करायचे असेल तर ते कसे करावे याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून ललिता गंडभीर यांची चर्चा या सदरातील टीप (“हिंदू कोण?”) पाहावी. तसेच निकृष्ट तथा सदभिरुचिहीन खंडन कसे करावे याचा नमुना म्हणून त्याच अंकात अनिलकुमार भाटे यांचा लेख (“दि. य. देशपांडे यांचा प्रचंड वैचारिक गोंधळ”) पाहावा, गंभीर यांनी अत्यंत मुद्देसूदपणे, कमीत कमी शब्दांत, आपले म्हणणे मांडले असून त्याचा रोख संपादकाचा अगर कुणाचाही उपमर्द करण्याकडे नाही.

पुढे वाचा

स्फुट लेख

हिंदु कोण
१. हिंदुधर्माचे कोणतेही एक पुस्तक, एक देव, समान संस्कार, धार्मिक विधी असे काहीच नसल्यामुळे हिंदु कोण हा प्रश्न निर्माण होतो. आणि हा एक तांत्रिक प्रश्न आहे. हिंदूची सर्वमान्य व्याख्या नसल्यामुळे भारतशासनाने हिंदूंसाठी केलेले कायदे ज्याला लागतात तो हिंदु अशी भारतात सध्या परिस्थिती आहे. ईशान्येकडे अरुणाचल, मेघालय, मिझोराम, मणीपूरपासून नैर्ऋत्येकडे लक्षद्वीपापर्यंत आणि वायव्येतील राजस्थानपासून आग्नेयेकडील अंदमान, निकोवारपर्यंत भारत पसरला आहे. ह्या इतक्या विस्तृत प्रदेशात राहणा-या ज्यांच्या निष्ठा एका पुस्तकावर (वायबल/कुराण, वेद/गुरुग्रंथ साहेव इ.) वर नाहीत अशा लोकांच्या देवता समान नाहीत, त्यांच्या भापा सारख्या नाहीत इतकेच नव्हे तर पौराणिक कथादेखील समान नाहीत, त्यामुळे त्यांना एकत्र बांधणारे सूत्रच नाही.

पुढे वाचा

श्री. भाट्यांचे म्हणणे पटले नाही

श्री अनिलकुमार भाटे यांचा लेख,(आ. सु. जुलै १९९९) मला आवडला नाही व पटलाही नाही. श्री. दि. य. देशपांडे यांना तत्त्वज्ञानातले आणि अध्यात्मातले काही कळलेले नाही, आणि भाटे यांना खूप काही कळले आहे असे त्यांचे प्रतिपादन आहे. कर्मसिद्धान्तावद्दल भाटे यांनी असे म्हटले आहे:-कर्मसिद्धान्त हा निसर्गाचा मूलभूत नियम आहे. ईश्वर माना किंवा न माना, हा सिद्धान्त अवाधित असतो. या सिद्धान्ताचे implementation कोणत्या agency मार्फत होते या प्रश्नाचे उत्तर त्यांनी असे दिले आहे की, आपण स्वतःच हे काम करीत असतो. पूर्वीच्या अनेक जन्मांत केलेल्या कृतींचा व विचारांचा साठा आपल्यावरोवर वागवीत असतो, … वगैरे.

पुढे वाचा

आत्म्याचा अनुभव सार्विक नाही

आजचा सुधारक च्या जुलै १९९९ च्या अंकात “दि. य. देशपांडे ह्यांचा प्रचंड वैचारिक गोंधळ’ या शीर्षकाखाली श्री. अनिलकुमार भाटे यांचे विचार वाचण्यात आले. श्री. देशपांडे यांचा “वैचारिक गोंधळ” आणि त्यांचे “अज्ञान” श्री. भाटे यांनी उघड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्री. देशपांडे यांच्या “अज्ञानातून” वाचकाला ज्ञानाच्या वाटेवर आणण्याचा श्री. भाटे यांचा स्तुत्य प्रयत्न आहे. त्यांच्या ह्या प्रयत्नाने श्री. देशपांडे यांचे “अज्ञान” स्पष्ट झाले की नाही याबरोबरच वाचकांना कितपत “ज्ञानवोध” झाला हेसुद्धा लक्षात घेणे उपयुक्त ठरेल. श्री. भाटे यांच्या मतानुसार श्री. देशपांडे यांनी अनेक चुकीची विधाने केलेली आहेत.

पुढे वाचा