पुढील लेख एका अमेरिकन लेखकाने अमेरिकेतील शिक्षणाविषयी लिहिलेला आहे. परंतु तो भारतातील शिक्षणविषयक परिस्थितीलाही तितकाच लागू आहे हे वाचकांच्या लक्षात येईल.
संपादक
‘Tinic’ साप्ताहिकाच्या २९ ऑगस्ट १९९४ च्या अंकात एका पुस्तकाचा काही भाग प्रसिद्ध झाला आहे. पुस्तकाचे नाव आहे ‘In Defense of Elitism’ आणि लेखक आहे William A. Henry III. हेन्री ‘टाईम’मध्ये रंगभूमीबद्दल नियमित समीक्षात्मक लिखाण करीत असत. हे त्यांचे पुस्तक अमेरिकन समाजाबद्दल आहे आणि त्यांच्या अकाली निधनानंतर ते नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. पुस्तकाची आणि लेखकाच्या वैचारिक दृष्टिकोणाची प्राथमिक ओळख करून देताना म्हटले आहे, “माणसाच्या ज्या बौद्धिक गुणांना हेन्री महत्त्वाचे मानत त्यांच्या सध्या होत असलेल्या कोंडीचा ते निषेध करतात.