पूर्वी २००१ मध्ये ‘यूजीसी’ने ज्योतिष हा विषय विद्यापीठस्तरावर विज्ञानशाखेत घेण्याचा घाट घातला होता. त्यावेळी सर्व वैज्ञानिकांनी त्याला कडाडून विरोध केला होता. प्रा.यशपाल, खगोलभौतिकतज्ज्ञ व माजी चेअरमन यूजीसी, यांनी असे मत व्यक्त केले होते की ज्या काळात फलज्योतिषाचा उगम व विकास झाला त्या काळातील समाजशास्त्र व मानव्यविद्या यांचा अभ्यास करण्यास काहीच हरकत नाही. पण त्याला विज्ञानशाखेत टाकणे ही घोडचूक ठरेल. म्हणजे ज्योतिष विषयावर आक्षेप हा विज्ञान या शाखेअंतर्गत घेण्याला होता. यूजीसीने त्यावेळी पलटी मारली व तो कलाशाखेत घेत असल्याचे सांगितले. जी गोष्ट विज्ञान नाही तिला विज्ञानशाखेत घेणे ही घोडचूकच.
रेषा आणि कविता…!
१
अंधारात भविष्य शोधताना
मी मेंदूला ठेवत असतो कोंडून
मनगटातील बळ विसरून
दाखवत फिरतो हाताच्या रेषा
वाळूचे कण रगडण्याचे सोडून
दिसरात जपतो दगडाचे नाव
घाम गाळायच्या ऐवजी
देत असतो ग्रह-ताऱ्यांना दूषणं
तरीही,
निघाला नाही कुठलाच प्रश्न निकाली…!
२
सीमेवर शत्रू उभे ठाकले असताना
राजा शांतपणे करत होता यज्ञ
शत्रू महालाजवळ आले असतानाही
राजा करत राहिला मंत्रांचा जाप
पराभवाची फिकीर सोडून
तो देत राहिला जांभई
शेवटी बंदिस्त झाल्यावर,
“छाटण्यात यावे माझे हात”
अशी याचना करत राहिला…!
३
उघड्या डोळ्यांनी
मी नाकारू शकत नाही सत्य म्हणून
ते दाखवत असतात भीती
माझी लायकी ठरवून
ते घट्ट ठेवतात पाय बांधून
देत राहतात धडे मानसिक गुलामीचे
सांगू लागतात नशीब हाताच्या आरशात
अवघं विश्वच बांधून ठेवतात आडव्या उभ्या रेषेत
काळाच्या पुढचं सांगून मिचकवतात डोळे
त्यांचं पोट भरल्यावर
मी मात्र पहात राहतो काळ्याशार आभाळात…!
ज्योतिष: तिसऱ्या जगातील काल्पनिक गोंधळ
ज्योतिष : शास्त्र की थोतांड?
“याचे स्पष्ट आणि निःसंदिग्ध उत्तर थोतांड हेच आहे.” ३ जुलै २०२१ ला साम टीव्ही मराठीवर मी चर्चेत सहभागी झालो होतो. वेळेच्या अभावी अनेक मुद्दे मांडायचे राहून गेले. त्यातील काही मुद्दे सविस्तरपणे मांडतो. प्रसारमाध्यमे असोत वा राजकारण, आपल्या देशात तार्किक आणि मुद्देसूद चर्चा करण्याचे अगदी तुरळक पर्याय आहेत. ‘आजचा सुधारक’ या विषयांवर विशेषांक प्रकशित करत आहे हे निश्चितच आशादायी आहे.
IGNOU सोबत आणखी ७-८ विद्यापीठे आहेत (जसे की बनारस हिंदू विद्यापीठ, कालिदास संस्कृत विद्यापीठ इत्यादी) जिथे हा विषय अभ्यासक्रमात अंतर्भूत केला आहे. पण तो कलाशाखेत! हे
अज्ञानाधारित अभ्यासक्रम
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) २०२१ पासून ज्योतिष विषयाचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम (पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा) प्रारंभ करण्याचे घोषित केले आहे.
“आकाशातील ग्रह-तार्यांचा मानवी जीवनावर सतत परिणाम होत असतो.” हे ज्योतिष विषयाचे पहिले गृहीतक आहे. खगोलशास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे की मानवी जीवनावर ग्रहतार्यांचा कोणताही परिणाम होत नाही; असे निरीक्षणांवरून सिद्ध झाले आहे. म्हणजे इग्नूच्या या अभ्यासक्रमासाठी कोणतेही सत्य गृहीतक नाही. म्हणून हा अज्ञानाधारित अभ्यासक्रम नकोच. अशी विज्ञानप्रेमींची मागणी आहे.
फलज्योतिषाची भाकिते किती धादांत खोटी असतात याचे सत्यदर्शन घडविणारा लेख:…..
अष्टग्रही:- ५ फेब्रुवारी १९६२
तुम्ही जन्मकुंडली पाहिली असेल.
मला पडलेले काही प्रश्न
प्रसंग पहिला
एक व्यक्ती एका कार्यालयात कामाला लागली. कधी? १ एप्रिल २०१९, सकाळी नऊ वाजता. नऊ वाजल्यापासून कार्यालय सुरू झाले. व्यक्तीच्या टेबलसमोरची जी खिडकी आहे, त्या खिडकीतून साधारण एक किलोमीटर अंतरावर ट्रॅक आहे आणि तिथून साधारण दिवसातून दोन वेळा ट्रेन पास होताना दिसते. त्या ट्रॅकपलीकडे अडीच ते तीन किलोमीटरवर एक मोठा डोंगर दिसतो. अर्थात डोंगराच्या पार्श्वभूमीवर ट्रेन पास होताना कार्यालयातून दिसते.
दोन वर्षांनी या व्यक्तीला प्रमोशन मिळाल्याचे पत्र मिळाले. हे पत्र मिळाले तेव्हा समोरून ट्रेन पास होत होती. त्यावेळेस तिथे कार्यालयात श्री संस्कारे नावाची व्यक्ती कामासाठी आलेली होती.
फलज्योतिष : विश्वसनीय?
“जन्मवेळेच्या ग्रहस्थितीचा अभ्यास करून त्या व्यक्तीच्या जीवनातील घडणाऱ्या महत्त्वाच्या घटना कोणत्या” हे भविष्य वर्तवणे या पद्धतीला फलज्योतिष असे नाव आहे. या विषयावर जगभरात अनेक भाषांतून अगणित ग्रंथ निर्माण झालेले आहेत. स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणारे अनेक जण या ग्रंथांचा उपयोग करून भविष्य वर्तवण्याचे काम करतात. काही हौशी, तर बहुतेक व्यावसायिक आणि जगातील असंख्य व्यक्ती त्यांचेकडून स्वतःचे भविष्य जाणून घेतात. त्यांचा विश्वास असतो की अशी भाकिते अनेकदा खरी ठरतात. पण खरोखर अशी भाकिते खरी ठरतात का हे शास्त्रीय पद्धतीने तपासून पाहणे जरूरीचे आहे.
मनोगत
सुधारकचा अंक प्रकाशित करण्याच्या टप्प्यात असतानाच दिल्लीच्या इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाने (IGNOU) ज्योतिषावर एक स्नातकोत्तर अभ्यासक्रम सुरू करत असल्याचे जाहीर केले. हे एक अ-शास्त्रीय पाऊल आहे असे आम्हांला वाटते.
२००१ साली मुरलीमनोहर जोशी यांनी वाजपेयींचे सरकार असताना UGC मार्फत असाच एक अभ्यासक्रम विज्ञानशाखेत सुरू करायचा प्रयत्न केला होता. तेव्हा बऱ्याच लोकांनी त्याला विरोध केला होता आणि तो अभ्यासक्रम सुरू व्हायच्या आधीच बंद करण्यात आला. काही वर्षांनी मात्र असे अभ्यासक्रम अनेक ठिकाणी सुरू झाले – ग्वाल्हेर, दिल्ली, रामटेक, बनारस वगैरे. नुकताच जाहीर केलेला हा नवा अभ्यासक्रम ऑनलाईन असल्यामुळे आता अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकणार आहे. IGNOU ने जरी तो कलाविभागात घातला असला तरी अभ्यासक्रमाच्या वर्णनाप्रमाणे विद्यार्थ्यांना ग्रहांचे ज्ञान आणि त्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम काय हे शिकवले जाईल आणि नंतर तेच ज्ञान ते स्वत:च्या उपजीविकेकरता वापरू शकतील असे म्हटले आहे.
शेतकरी पारतंत्र्य दिवस
आपण ज्या महात्म्यांचा आदर करतो, त्यांची पुस्तके वाचत नाही, त्यांच्या वचनांचे आचरण करीत नाही. ज्या ग्रंथांबद्दल श्रद्धाभाव असतो, ती आपण वाचलेली नसतात. अनेक धर्मांच्या अनुयायांमध्ये त्यांच्या धर्मग्रंथांचे अध्ययन केलेले अभावानेच दिसून येते. पण त्या महात्म्यांबद्दल किंवा धर्मग्रंथांबद्दल कोणी ब्र काढला तर त्यांचे अनुयायी अक्षरश: तुटून पडतात. धर्मग्रंथ आणि महात्मे यांच्याबाबत जी विसंगती दिसून येते, तशीच विसंगती भारतीय राज्यघटनेबद्दलदेखील दिसू लागली आहे. घटनेविषयी आणि कायद्याविषयी काही कळत नसले तरी ‘खबरदार’ वगैरे भाषा वापरली जाते. या श्रद्धाभावाचा अनेकजण गैरफायदा घेतात.
मी एका सभेत लोकांना विचारले की, “तुमच्यापैकी किती जणांनी भारतीय राज्यघटना वाचली आहे, कृपया हात वर करा.”
आयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती?
सध्या वेगवेगळ्या पॅथीचे लोक एकमेकांच्या उरावर बसत आहेत. पण वास्तव लक्षात घेता या सगळ्या उपचारपद्धतींत ॲलोपॅथी ही कालसुसंगत आहे असेच म्हणावे लागते. म्हणूनच अनेक विद्यार्थी ॲलोपॅथीला प्रवेश घेण्यास प्राधान्य देतात. ज्यांना ॲलोपॅथीला प्रवेश न मिळाल्यामुळे नाईलाजाने आयुर्वेदिक डॉक्टर व्हावे लागते अशा लोकांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झालेला असतो. त्यावर मात करण्यासाठी ते मग आयुर्वेद हे ॲलोपॅथीपेक्षा उच्च दर्जाचे असून आपल्या प्राचीन भारताची देण आहे, अश्या बढाया मारू लागतात. पण खरी ‘अंदर की बात’ अशी असते की, ॲलोपॅथीला प्रवेश न मिळाल्यामुळे त्याचा पोटशूळ म्हणून ते ॲलोपॅथीवर खार खात असतात. मग आपले अस्तित्व टिकवण्यासाठी लोकांच्या धार्मिक अस्मितेला साद घालत परंपरांचा बडेजाव मिरवणे त्यांना भाग पडते.
गरजांचे अर्थशास्त्र आणि तृष्णांचे अर्थशास्त्र : एक चिकित्सा – भाग १
‘आपल्या नातवंडांसाठीच्या आर्थिक संभाव्यता’ (The economic possibilities for our grandchildren) ह्या १९३० साली प्रसिद्ध झालेल्या आपल्या लेखात अर्थतज्ज्ञ श्री. जे. एम. केन्स ह्यांनी जे भाकीत वर्तविले होते, ते असे : “२०३० सालापर्यंत जगातील जवळजवळ सर्वच आर्थिक समस्या सुटलेल्या असतील. महामंदीसारख्याच समस्या नव्हे, तर ज्या ज्या म्हणून मूलभूत आर्थिक समस्या आहेत, त्या सर्वच समस्यांची सोडवणूक होऊन, जग हे संघर्षमय युगातून निघून अधिकाधिक सुसंवादी, समृद्ध आणि परस्परपूरक झालेले असेल.”
कोविड-१९ अरिष्टाची परिणिती म्हणून आजच्या आधुनिक मानवापुढे, आधुनिक संस्कृती आणि समाजापुढे जी संकटावस्था निर्माण झाली आहे, ती बघता श्री. केन्स ह्यांचे शतकभरापूर्वीचे भाकीत प्रत्यक्षात येण्यासाठी–जर ते खरोखरच शक्य असेल तर–अजून किती काळ लोटावा लागेल, हे आज निःसंशयपणे सांगणे कठीण आहे.