श्रम, संपत्तिनिर्माण, तंत्रज्ञान
—————————————————————————
आपण बहुतेक वेळी संपत्तीचा संबंध पैशाशी लावतो. पण त्याचा संबंध तंत्रज्ञानाच्या वापरातून माणसाला मिळणाऱ्या फुरसतीशी आहे, अशी अभिनव मांडणी करणारा; भारतात तंत्रज्ञानातील नवसर्जन का घडत नाही, उत्पादन, चलनवाढ व उपभोग ह्यांचा परस्परसंबंध कसा असावा अशा महत्त्वाच्या प्रश्नांचा वेध घेणारा लेख
—————————————————————————
श्रीमंती पैशाने येत नाही. ती श्रम वाचवल्याने येते. येथे श्रम म्हणजे शरीरश्रम, बौद्धिक श्रम नव्हे. आपल्या सर्व गरजा भागवून ज्याला काही फुरसतीचा काळ मिळतो तो श्रीमंत. ज्याला आपल्या गरजा भागवण्यासाठी दिवसभर हातापायांचे श्रम करावे लागतात तो गरीब.