(२०१६ साली जलिकट्टू शर्यतींवर बंदी आली होती. त्या विषयावरील निखिल जोशी यांचा लेख ‘बिगुल’ ह्या मराठी ऑनलाईल पोर्टलवर जानेवारी २०१७ सालीं प्रकाशित झाला होता. महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठविली असल्याच्या पार्श्वभूमीवर ह्या लेखाचे औचित्य वाटल्याने हा लेख येथे प्रसिद्ध करीत आहोत.)
गेल्यावर्षी दहीहंडीवर न्यायालयाने निर्बंध घातले होते. लहान मुलांना धोकादायक परिस्थितीत टाकण्याविरुद्ध आणि सार्वजनिक जागा व्यापून सण साजरे करण्याविरुद्ध आक्षेप घेणे अर्थातच योग्य असले तरीही, प्रौढांनी किती धोका पत्करावा त्याविषयीही सरकारने आणि न्यायालयाने अतार्किक निर्बंध लादले होते. प्रस्थापित पुरोगामी विचारवंतांनी अर्थातच या निर्णयाचे धर्मनिरपेक्षता म्हणून स्वागत केले होते आणि धर्मप्रेमींनी मात्र त्या निर्बंधांना धर्मविरोधी ठरवून बंदीला न जुमानता परंपरा साजर्या केल्या होत्या. यावर्षीही