नास्तिक्य मिरवलं तर बिघडलं कुठे?
नमस्कार,
हिंदू धर्मात जन्माला आल्यामुळे सगळ्यांवर साधारणपणे जे संस्कार होतात तसे माझ्यावरसुद्धा झाले. लहानपणी आपल्याला योग्य अयोग्याची तशी समज नसते. आई-वडील सांगतात त्यावर आपला विश्वास असतो. ते सांगतात तसेच आपण करत असतो. माझंही तसंच होतं. पण वाढत्या वयात काही काही गोष्टी निरीक्षणात यायला लागल्या आणि प्रश्नही पडायला लागले. आजूबाजूचे लोक कोणाच्याही आणि कशाच्याही पाया पडतात हे दिसायला लागलं. प्रश्न पडू लागला की गावाच्या वेशीवरची एखादी दगडाची मूर्ती देव कसा काय होऊ शकेल? गणपतीच्या बाबतीत तर विशेषच. त्या मूर्तीत जर देवत्व आहे तर ती मूर्ती काढून नवीन मूर्ती कशी बसवता येईल?