अतुल देऊळगावकर - लेख सूची

विश्वाचे अंगण : मायाबाजार आणि बाजारमाया – अतुल देऊळगावकर

‘क्षण एक मना बैसोनी एकांती, विचारी विश्रांती कोठे आहे?’ चारशे वर्षांपूर्वी नामदेवांनी हा प्रश्न विचारला होता. ‘शब्दवेध’ संस्थेच्या ‘अमृतगाथा’मधून चित्रकार, गायक व लेखक माधुरी पुरंदरे यांनी या प्रश्नातील काकुळती त्यांच्या आर्त स्वरातून महाराष्ट्रभर पोहोचवली होती. नामदेवांच्या या प्रश्नाची तीव्रता अद्यापि वाढतेच आहे. आज करोनामुळे संपूर्ण जगाला स्वत:च्याच घरात राहण्याची सक्ती झाली आहे. अशाच काळात अशा …

‘शेती हटाव’ अभियान

‘कुठल्याही पद्धतीची शेती करणे हे आरोग्यास अतिशय घातक आहे. त्यामुळे असंख्य प्रकारचे शारीरिक व मानसिक विकार जडतात. कर्करोगापेक्षा कैकपटीने अधिक वेदना सहन कराव्या लागतात. अखेरीस प्राणास मुकावे लागते..’ सर्व प्रकारची सरकारे, सर्व जाती-धर्माचे, स्तरांतील लोकप्रतिनिधी आणि शाही नोकर हा (अवैधानिक) इशारा वर्षांनुवर्षे देत आले आहेत. या व्यसनामुळे वाढत जाणाऱ्या यातनांतून मुक्त होण्यासाठी कित्येकांना आत्महत्या कराव्या …

त्रुटित जीवनी..

“जनतेच्या मनावर नियंत्रण मिळवण्याकरिता दरवर्षी हजारो कोटी खर्ची पडत असतात. काय घडत आहे यापासून सर्वसामान्य जनता अनभिज्ञ असते आणि याची त्यांना जाणीवदेखील नसते.” – नोम चोमस्की व्यक्ती व नाती दोन्हींचं वस्तुकरण झाल्यामुळे आपल्याला कुणाशीही जोडून घेण्यासाठी (कनेक्ट) उपयोगिता हा एकमेव निकष झाला आहे. बाजारपेठेत आपल्या मूल्यात वृद्धी कशी होईल, या काळजीनं सगळे ग्रासून गेले आहेत. …

भारताचे जलभविष्य

एखाद्या अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करणार कसे? जी.एन.पी. ठोकळ राष्ट्रीय उत्पादन, दरडोई उत्पन्न या आकड्यांवरून ? की सामान्य माणसांच्या परिस्थितीवरून? ठोकळ राष्ट्रीय उत्पादन पाहून देशातील माणसांची स्थिती लक्षात येत नही. देशातील माणसांच्या विकासाचा निर्देशांक महत्त्वाचा आहे. शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, जळण, पर्यावरण यांचा विचार करून विख्यात अर्थवेत्ते डॉ. मेहबूब उल हक यांनी मनुष्य विकास निर्देशांक तयार केला. …

महाराष्ट्रातील पोरके पाणी (लेख-२)

धनवान व निर्धनातील भेदरेषा पाण्याने आखल्या जाणाऱ्या जलविषमतेची वाटचाल आपल्याला इथिओपिया व सोमालियातील हिंसक अनागोंदीकडे नेऊ शकते. काही राजकीय नेते, काही अधिकारी यांना याचे भान आहे. त्यांच्यामुळे काही सकारात्मक पावले उचलली जात आहेत. चेन्नईजवळ मोठी नदी नसल्याने पिण्याच्या पाण्याची कायम रड असते. चेन्नई ते महाबलिपुरम परिसरातून पाणी उपसून टँकर सदासर्वकाळ पळताना दिसतात. ही पाण्याची खाण …

महाराष्ट्रातील पोरके पाणी (लेख-१)

“पाणी नसेल तर आपले जीवन अशक्य होईल एवढी महती असूनही मुबलक उपलब्ध पाण्याला बाजारात किंमत नाही आणि यत्किंचित उपयोगी नसलेल्या हिऱ्याला अतोनात किंमत आहे.” —- अॅडम स्मिथ मराठवाड्यातील 43 तालुके (एकंदर 76 पैकी) टंचाईग्रस्त घोषित झाले आहेत. सध्या 1200 गावांना पाण्याची टंचाई असून पावसापूर्वी या यादीत आणखी 600 गावांची भर पडण्याची शक्यता आहे. लातूर, उस्मानाबाद, …

विनाश पर्व

अकरा सप्टेंबर दोन हजार एक. एकविसावे शतक उदयाचली असतानाच महासत्ता अमेरिकेवर अतिरेक्यांनी हल्ला चढवला. आर्थिक सत्तेचे केंद्र असलेल्या न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरचे गगनचुंबी जुळे मनोरे आणि संरक्षण व्यवस्थेचा किल्ला पेंटॅगॉनच्या इमारती उद्ध्वस्त झाल्या. आणि अमेरिकेसकट जग सैरभैर झाले. महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक व विख्यात विचारवंत श्री. कुमार केतकर हे त्यावेळी शिकागोहून न्यूयॉर्ककडे निघण्याच्या तयारीत होते. …

चौथ्या क्रांतीचे शिल्पकार नररत्न मुरली मनोहर जोशी!

युगायुगाच्या अंधकारानंतर भारतवर्ष पुन्हा एकवार सूर्यासमान तळपणार! देशात दुधाची गंगा वाहणार! अन्नधान्य, फळफळावळांची रेलचेल असेल. समस्त जनता धष्टपुष्ट आणि सुखी समाधानी असणार. रोगराईची निशाणी उरणार नाही. डॉक्टर मंडळी इतर क्षेत्रांत कौशल्याचा ठसा उमटवतील. चौसष्ट कलांमधून आपलाच ध्वज दिसेल. ऑलिंपिकची सगळी सुवर्ण पदके आपल्यासाठीच असतील. बकाल सिलिकॉनच्या व्हॅलीत स्मशान शांतता आणि ऐश्वर्याने नटलेल्या गंगेच्या खोऱ्यात जाल …