डॉ. र. वि. पंडित - लेख सूची

दशावतारांचे पुनरवलोकन

भारतातील बहुसंख्य लोक आपला धर्म हिंदू असल्याची कागदोपत्री नोंद करतात. हिंदू धर्माच्या काही मूलभूत मान्यता अथवा आधारभूत संकल्पना आहेत त्या म्हणजे ईश्वराचे आणि आत्म्याचे अस्तित्व, ब्रह्मा-विष्णु-महेश व शक्ति या प्रमुख देवतांना मान्यता देणे, मोक्ष, पुनर्जन्म, दशावतार, वर्णव्यवस्था, वेद, ब्राह्मणे, पुराणे, उपनिषदे, रामायण-महाभारत (गीतेसह) हे धर्मग्रंथ, इत्यादी. ह्यांपैकी वेद फार पूर्वीपासून, आर्यांचे उत्तर भारतात आगमन झाल्यापासून, …

मराठी विज्ञान संमेलन स्मरणिका-एक परामर्श

औद्योगीकरणाच्या प्रारंभापासूनच जगात सर्वत्र लोकसंख्या-केन्द्रीकरणात झपाट्याने वाढ झाली. जी ठिकाणे औद्योगिक दृष्टीने सोईची आणि मोक्याची होती तेथील लोकसंख्येची घनता सतत वाढत राहिली व तेथे महानगरे उत्पन्न झाली. भारतातील मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, पुणे, इंदूर, कानपूर, पाटणा, अहमदाबाद यांसारखी महानगरे गेल्या शतकात ४०-५० पटीने मोठी झाली आहेत. ज्या प्रमाणात या शहरांची लोकसंख्या वाढली त्या प्रमाणात …

मानवी जीनोम (जैनिक संचित)

२६ जून २०० हा दिवस जीवशास्त्राच्या प्रगतीतील सोन्याच्या अक्षरांनी लिहिण्याजोगा ऐतिहासिक दिवस ठरला. त्या दिवशी वॉशिंग्टन (डी. सी.) येथून प्रसिद्ध होणाऱ्या ‘सायन्स’ या जागतिक प्रतिष्ठेच्या वैज्ञानिक साप्ताहिकात ‘मानवी जीनोम’ निचित करण्याचे कार्य जवळपास ९७% पूर्ण झाल्याची अधिकृत घोषणा प्रसिद्ध झाली व सर्व जगातील प्रसार माध्यमांच्या उत्साहाला उधाण आले. वृत्तपत्रे, नियतकालिके, टेलेव्हिजन, इंटरनेट, रेडियो या सर्वांनी …

असामान्य मानवी जीवनाचा निर्देशक, जन्मकाळ!

आजचा सुधारक’ (९:४, १२३-१२४) मध्ये मी मांडलेल्या एका कल्पनेवर अभ्युपगमावर (hypothesis) भरपूर प्रतिकूल प्रतिक्रिया होण्याची मी वाट पाहत होतो. कारण आ.सु.च्या माध्यमातून चर्चा करण्यासाठीच मी तो लेखप्रपंच केला होता. परंतु केवळ श्री. पंकज कुरुळकर यांच्याखेरीज (आ.सु., ९:८ पृष्ठ २५२, २५३) कोणी या विषयावर आपले मत जाहीरपणे व्यक्त केलेले नाही. पुण्याचे प्रा. प्र.वि. सोवनी यांनीही मी …

पाळणाघरे, अपप्रवृत्ती कशी?

आजचा सुधारकच्या डिसेंबर ९८ च्या अंकात (९:९, २७६-२७८), पाळणाघरांची वाढ : एक अपप्रवृत्ती’ हा स्फुट लेख प्रसिद्ध झाला असून, त्यामध्ये याच विषयावर सप्टेंबर १९९८ च्या अंकातील स्फुट लेखावरील वाचकांच्या प्रतिक्रियांना संपादकांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्या ताज्या स्फुटात कोणताही नवा मुद्दा अथवा विचार आलेला नाही. या विषयावरील संपादकांची भूमिका अवास्तव, असंतुलित व काहीशी …

कौटुंबिक समारंभातील उपस्थिती

माननीय संपादकआजचा सुधारक,आ. सु. मध्ये बर्‍याच महिन्यांपूर्वी एका वाचकाने व्रतबंध समारंभाविषयी; त्याला आस्था नसताना, उपस्थित राहावे काय म्हणून पृच्छा केली होती. त्यानंतर अलीकडे दुसन्या वाचकांनी विवाह समारंभाविषयी त्याच स्वरूपाचा प्रश्न विचारला होता. या दोन्ही वाचकांना आपण ‘‘आ.सु., १९९८, ८:११’ मध्ये वेगवेगळी उत्तरे दिली आहेत व त्यात विश्वास नसेल तर अशा समारंभांमध्ये सहभागी होऊ नये, परंतु …

मानवी शरीर – एक यंत्र वा त्याहून अधिक?

अलीकडे पर्यायी वैद्यकाचा अथवा पारंपारिक उपचार पद्धतींचा बराच गवगवा होऊ लागला आहे. गेल्या २०-२५ वर्षांत आधुनिक पाश्चात्त्य वैद्यकामध्ये प्रचंड प्रगती झाली आहे. मॉल्यिक्यूलर बायॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, बायो-इंजिनियरिंग ही विज्ञानाची नवी दालने विकसित झाल्यामुळे, लुई पास्टरचे जंतुशास्त्र आणि अलेक्झांडर फ्लेमिंगने पाया घातलेले जंतुविरोधक (antibiotics) औषधशास्त्र यापुढे आधुनिक वैद्यकाने फार मोठा पल्ला गाठला आहे. गुणसूत्रे व जीन्स, नैसर्गिक …

विश्वातील सर्वव्यापी मूलतत्त्व

डॉ. हेमंत आडारकरांनी माझ्या पत्राची (आ.सु. ८:४, १११-११२) दखल घेतल्याबद्दल त्यांचे आभार. विश्वाच्या उत्पत्तीत व संरचनेमध्ये कोणा सूत्रधाराचा हात आहे असे डॉ. आडारकरांना जाणवते (आ.सु. ८:२, ५९-६१) या त्यांच्या जाहीर विधानावर आमचा तीव्र आक्षेप आहे. एखादा डॉक्टर, पोलीस अधिकारी, कवी, वकील यांच्यासारखाच शास्त्रज्ञ आस्तिक/नास्तिक असू शकतो ( आ.सु. ८.५, १५२-१५३) हे आडारकरांचे म्हणणे ही शोचनीय …

सामाजिक सुधारणा आणि आजचा सुधारक

विवेकवादाला (rationalism) ला वाहिलेले “आजचा सुधारक’ हे जगातील प्रमुख मराठी मासिक आहे. या मासिकाचे लक्ष्य मराठी भाषिक, विशेषत: महाराष्ट्रातील जनता हेच आहे हे सुद्धा उघड आहे. ही जनता म्हणजे सामान्य जनता नसून, समाजातील विचार करण्याची आवड व कुवत असलेली मंडळी एवढीच “आ.सु.” ची वाचक आहेत. परंतु ही मोजकी मंडळीच नवे तर्कशुद्ध विचारही प्रसवू शकतात. “आजचा …

वैज्ञानिक रीत

डॉ. हेमंत आडारकर यांच्या पत्राच्या (आ. सु., ८:२, ५९-६१) संदर्भात थोडे विवेचन. आपल्या पत्रातील पहिल्याच परिच्छेदात डॉ. आडारकरांनी आम्ही आमच्या लेखात (आ. सु., ८:१, २४-२५) वर्णन केलेल्या भस्मधारी तथाकथित वैज्ञानकांच्या वर्णनाची पुष्टीच केली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार. विज्ञान हे गृहीतकांपासूनच सुरू होते हे खरेच. सर्वप्रथम कोणा एका वैज्ञानिकाच्या (अथवा सामान्यजनांच्याही!) तल्लख डोक्यात एखाद्या भन्नाट कल्पनेचा …

कलमी मानव (Human Clones)

पृथ्वीवरील जीवसृष्टीत तरी प्रजोत्पादनाचे अजून दोनच प्रमुख प्रकार ज्ञात आहेत. काही निम्नस्तरीय जीव वगळता, बहुसंख्य प्राण्यांचे लैंगिक प्रजनन, तसेच वनस्पतींतील लैंगिक आणि अलैंगिक (कलमी) प्रजनन हे ते प्रकार होत. सस्तन प्राण्यांसारख्या सर्वच उत्क्रांत जीवांमध्ये केवळ लैंगिक पद्धतीनेच प्रजोत्पादन शक्य आहे. परंतु अशा लैंगिक प्रजोत्पादनात पुढील पिढी आधीच्यापिढीच्या दोन जीवांच्या मिश्र गुणधर्माचीच असते. त्यामुळे अल्फान्सो (हापूस) …

वैज्ञानिक आणि आस्तिकता

अनेक वैचारिक प्रकाशनांप्रमाणेच ‘आजचा सुधारक’ मध्येही विज्ञान आणि ईश्वर यावर न संपणारी चर्चा चालू आहे. प्रा. एकल्स यांच्या आस्तिकतेविषयी “आ. सु.’ मध्ये अलीकडे प्रसिद्ध झालेले प्रा. ठोसर आणि प्रा. दि. य. देशपांडे यांचे लेख, याच चर्चेचा भाग आहेत. विज्ञान आणि ईश्वरासंबंधी आस्तिकता यात सामान्यतः तीन मतप्रवाह आढळतात. (१) बुद्धिप्रामाण्यावर आणि प्रयोगनिष्ठेवर आधारलेली व ईश्वराचे अस्तित्व …

नैतिक बुद्धिमत्तेचा विकास

दक्षिण कोरियातील किम उंगयोंग या चार वर्षांच्या मेधावी बालकाच्या बुद्धिमत्तेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने १९६८ सालीच घेतलेली अनेकांना परिचित असेल. हा मुलगा वयाच्या चौघ्या वर्षापासूनच कविता करीत असे, चार भाषांमध्ये अस्खलितपणे संभाषण करी आणि टेलिव्हिजनवर त्याने इन्टिग्रल कॅलक्युलसचे प्रश्न सोडविण्याचे प्रात्यक्षिकही करून दाखविले होते. ह्या मुलाचा टर्मन बुद्धयंक २१० मानण्यात आला होता. याचप्रमाणे …

यांत्रिक (कृत्रिम) बुद्धिमत्ता

बुद्धिमत्ता उपयुक्त की भावना या वादात अलीकडे भावनिक गुणवत्तेचे पारडे जड झाल्यासारखे दिसते आहे (आजचा सुधारक ६ : ३९९). केवळ बुद्धिमत्तेवर अवलंबून असलेली मानवाची बरीच कठीण कामे, आता यंत्राद्वारे पार पाडण्याच्या उद्देशाने अनेक वैज्ञानिक कठोर परिश्रम करीत आहेत. यांत्रिक अथवा कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence = AI) नैसर्गिक मानवी बुद्धिमत्तेच्या स्तरावर नेण्याचे प्रयत्न गेल्या चाळीस वर्षांपासून …

बुद्धि उपयुक्त, की भावना?

अति शहाणा, त्याचा बैल रिकामा” अशी एक जुनी म्हण प्रचलित आहे. या म्हणीची पाश्र्वभूमी ग्रामीण महाराष्ट्र ही असली तरी तिचा वापर ग्रामीण तसेच नागरी संदर्भात होत आलेला आहे. एक शेतकरी फार बुद्धिमान होता व आपण आपल्या शेतीची दैनंदिन कामे फार हुशारीने करतो अशी त्याची समजूत होती. शेतीच्या मशागतीसाठी त्याच्याजवळ एक बैल होता. पण इतर सामान्य …

मानवी मनोव्यापार

जीवसृष्टीत मानवजात सर्वाधिक बुद्धिमान असून त्यामुळे मानवाने पृथ्वीतलावर अतिशय प्रगत अशी संस्कृती निर्माण केली आहे, आणि केवळ पृथ्वीच्या पाठीवरीलच नव्हे तर अनंत अपार विश्वातील सर्व शक्तींवर नियंत्रण ठेवण्याची मानवाची धडपड सातत्याने चालूच आहे. मानवाला हे यश लाभले आहे ते सर्वस्वी त्याच्या बुद्धिमत्तेमुळे, त्याच्या मानसिक कर्तृत्वामुळे. माणसाचे मन हृदयात असते या ॲरिस्टॉटलच्या कल्पनेप्रमाणेच मनाचे अधिप्ठान डोक्यात …

आधुनिक जैविक तंत्रविद्येचे सामाजिक आयाम

हल्ली विज्ञानातील संशोधनाचा प्रचंड आवाका आणि वेग जगात सार्वत्रिक क्रांती घडवीत असून, मानवी संस्कृतीच्या ५००० वर्षांच्या ज्ञात इतिहासात एवढी मूलगामी स्थित्यंतरे केवळ अभूतपूर्वच म्हटली पाहिजेत. या वैज्ञानिक संशोधनाचा उगम प्रामुख्याने पाश्चात्त्य प्रगत देशात असला तरी पृथ्वीतलावरील कोणताही मानव समाज या स्थित्यंतरापासून अलिप्त राहू शकत नाही. भौतिक शास्त्रांतील संशोधनामुळे मानवाच्या सुखसोयी वाढल्या व मानवी जीवन अधिक …

स्त्री-पुरुष समता व स्त्री-मुक्तीसंबंधी सर्वेक्षण प्रश्नावलीचा मसुदा (स्त्रियांसाठी)

[आमचे मित्र डॉ. र. वि. पंडित ह्यांनी स्त्रीपुरुष समता व स्त्रीमुक्ती संबंधी एक सर्वेक्षण opinion poll) करावे अशी सूचना केली आणि त्यांनीच त्यासाठी एका प्रश्नावलीचा मसुदा करून आमच्याकडे पाठविला आहे. तो सोबत देत आहोत. त्यामध्ये काहीफेबदल करावयाचा असल्यास तो आमच्या वाचकांनी सुचवावा आणि त्याला परिपूर्ण स्वरूप प्राप्त करून देण्यास साहाय्य करावे. त्याचप्रमाणे ते प्राप्त झाल्यानंतर …

निसर्ग, मानव आणि आनुवंशिक अभियांत्रिकी

मानव हा जीवसृष्टीतील सर्वात बुद्धिमान जीव आहे त्यामुळे मानवाने अनुभवांचे, विचारांचे आणि ज्ञानाचे प्रचंड संचय निर्माण केले आहेत. १८ ते २० लक्ष वर्षांपूर्वी आफ्रिकेतील रिफ्ट व्हॅलीमध्ये व इंडोनेशिया आणि चीनमध्ये सरळ ताठ चालू लागल्यापासून माणूस सतत चालतोच आहे, शिकतोच आहे आणि बुद्धीला सुचेल ते करून पाहून पुढेच चालला आहे. वैयक्तिक आणि गटाधीन विचारमंथन सतत चालूच …