तत्त्वज्ञानाची ओळख - लेख सूची

तत्त्वज्ञानाची ओळख (भाग-१)

तत्त्वज्ञान का शिकले पाहिजे? तत्त्वज्ञान का शिकले पाहिजे? या प्रश्नाला सामान्यपणे पुढील उत्तर दिले जाईल. ‘तत्त्वज्ञान शिकण्याची काहीच आवश्यकता नाही. तत्त्वज्ञान म्हणजे घटपटाची निरर्थक झटापट करणारा उद्योग. रिकामटेकड्या लोकांनी वेळ घालविण्याकरिता निर्माण केलेला एक खेळ. त्याचा जीवनात कसलाही उपयोग नाही. जीवनाच्या कोणत्याही समस्येशी त्याचा कोणताही संबंध नाही. ज्याला हिंदीत ‘बाल की खाल निकालना’, म्हणजे केसाची …

तत्त्वज्ञानाची ओळख (भाग २)

वाक्यांविषयीची वाक्ये गेल्या अंकात प्रसिद्ध झालेला या लेखमालेचा पहिला पाठ ज्यांनी वाचला असेल अशा वाचकांपैकी अनेक वाचकांचे त्याने समाधान होणार नाही. ते म्हणतील : ‘तत्त्वज्ञान म्हणून तुम्ही दुसरेच काहीतरी आमच्या गळी उतरवीत आहात. आम्हाला तत्त्वज्ञानाची फारशी माहिती नसेल, पण आम्हाला इतके नक्की माहीत आहे की तुम्ही सांगता ते तत्त्वज्ञान नव्हे. तत्त्वज्ञान म्हणजे दृश्य जगाच्या मागे …

तत्त्वज्ञानाची ओळख (भाग ३)

विधानांचे समर्थन तत्त्वज्ञानाच्या दोन प्रमुख कार्यापैकी पहिले कार्य म्हणजे विधानांचे समर्थन करण्याच्या प्रक्रियेची चिकित्सा. आपल्यासमोर येणार्याक कोणत्याही विधानाविषयी ते खरे आहे कशावरून?’ हा पहिला प्रश्न आपल्या मनात उद्भवतो. या प्रश्नाचे उत्तर देणे म्हणजे त्या विधानाचे समर्थन करणे. एखाद्या विधानाचे समर्थन द्यायचे म्हणजे ते अन्य एका किंवा अनेक विधानांवरून अपरिहार्यपणे निष्पन्न होते असे दाखविणे. ती अन्य …

तत्त्वज्ञानाची ओळख (भाग ४)

(तार्किकीय ज्ञान) अनुमान शेवटी प्रत्यक्षावर म्हणजे ऐंद्रिय अनुभवावर आधारलेले असते हे आपण गेल्या लेखात पाहिले. जगात कुठे काय आहे, किंवा कुठे काय केव्हा घडले याचे ज्ञान आपल्याला प्रत्यक्षाशिवाय होऊ शकत नाही. अमुक दिवशी सहा महिन्यानंतर सूर्यग्रहण होईल हे आपणअनुमानाने सांगू शकतो. पण या अनुमानात वापरायची साधके शेवटी इंद्रियांनी झालेल्या सामग्रीवरच आधारलेली असतात. अनुमान हे प्रत्यक्षाहून …

तत्त्वज्ञानाची ओळख (भाग ५)

तार्किकीय ज्ञान (२) गेल्या लेखांकात आपण तार्किकीय सत्यांचा (logical truths) किंवा तार्किकीबलाने सत्य असणाऱ्या विधानांचा परिचय करून घेतला. तार्किकीबलाने सत्य असणाऱ्या विधानांत जरी न-तार्किकीय (non-logical) शब्द असले तरी त्या विधानांच्या सत्यतेच्या दृष्टीने त्यांची उपस्थिती व्यर्थ असते, कारण तार्किकीय सत्यांची सत्यता केवळ तार्किकीय शब्दांच्या उपस्थितीवरच अवलंबून असते. म्हणूनच तार्किकीय विधाने आपल्याला जगाविषयी कसलीही माहिती देत नाहीत. …

तत्त्वज्ञानाची ओळख (भाग ६)

विधानांची काही महत्त्वाची विभाजने आपण आतापर्यंत विधानांची काही विभाजने पाहिली आहेत. उदा. अस्तिवाचक (affirmative) आणि नास्तिवाचक (negative) विधाने, तसेच सार्विक (universal) आणि कातिपयिक (particular) विधाने. आज आपण आणखी तीन विभाजनांची ओळख करून घेणार आहोत. ही विभाजने आहेतः (१) विश्लेषक (analytic) आणि संश्लेषक (synthetic) विधाने; (२) अवश्य (necessary) आणि आयत्त (contingent) विधाने; आणि (३) प्रागनुभविक (a …

तत्त्वज्ञानाची ओळख (भाग ७)

निगामी व्यवस्था (Deductive Systems) इ.स. पूर्वी चौथ्या शतकात यूक्लिड या ग्रीक गणितज्ञाने भूमितीची मांडणी निगामी व्यवस्थेच्या रूपात केल्यापासून शास्त्रीय ज्ञानाच्या जगतात निगामी व्यवस्था हा ज्ञानाचा आदर्श मानला गेला आहे आणि तेव्हापासून तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक दोघांचीही आपल्या विषयाची मांडणी निगामी व्यवस्थेत करण्याची धडपड सुरू आहे. Deduction किंवा निगमन म्हणजे काय हे आपण स्थूलरूपाने पाहिले आहे. निगामी …

तत्त्वज्ञानाची ओळख (भाग ८)

उद्गमन (Induction) सहाव्या प्रकरणात आपण विधानांचे दोन प्रमुख प्रकार पाहिले. ते म्हणजे (१) विश्लेषक- अवश्य-प्रागनुभविक विधाने आणि (२) संश्लेषक आयत्त-आनुभविक विधाने. त्याआधी तिसऱ्या प्रकरणात आपण निगामी आणि उद्गामी अनुमानप्रकारांची ओळख करून घेतली होती. आता या प्रकरणात विधानांच्या वरील विभाजनाच्या साह्याने निगामी व उद्गामी अनुमानप्रकारांचे स्वरूप अधिक विस्ताराने समजाऊन घेऊ. ‘उद्गमन’ हा शब्द काहीसा शिथिलपणे वापरला …

तत्त्वज्ञानाची ओळख (भाग ९)

उद्गमन (२) गेल्या लेखांकात आपण उद्गमनाची समस्या समजावून घेतली. ती समस्या अशी आहे की निसर्गाचे ज्ञान मिळविण्याचा एकमेव उपाय म्हणजे उद्गमन. परंतु ही क्रिया अवैध असल्यामुळे तिचे निष्कर्ष कधीही पूर्णपणे सिद्ध झाले असे म्हणता येत नाही. ते कमीअधिक प्रमाणात संभाव्य असू शकतात, पण पूर्णपणे निश्चित असू शकत नाहीत. म्हणून मग उद्गामी अनुमाने त्यातल्या त्यात विश्वासार्ह …

तत्त्वज्ञानाची ओळख (भाग १०)

उद्गमन (३): औपन्यासिक-निगामी रीत गेल्या लेखांकात उद्गमनाच्या दोन प्रमुख रीती आहेत असे मी म्हणालो, या रीती म्हणजे (१) सरल गणना (Simple Enumeration) आणि (२) औपन्यासिक-निगामी रीत (Hypothetico-Deductive Method). निसर्गातील काही साधेसोपे नियम आपल्याला सरल गणनेने सापडतात; परंतु कारणिक नियम शोधून काढण्याकरिता उपन्यासरीतीचा उपयोग अपरिहार्य होतो. ही गोष्ट कारणनियमाहून भिन्न गणितीय स्वरूपाच्या नियमांच्या शोधात अधिकच स्पष्ट …

तत्त्वज्ञानाची ओळख (भाग ११)

आयडियलिझम (Idealism) म्हणजे काय ? रशियामध्ये १९१७ साली क्रांती झाली आणि तेथे मार्क्सप्रणीत कम्युनिस्ट राजवट स्थापन झाली. एवढे मोठे राजकीय यश मिळाल्यामुळे मार्क्सवादाला अभूतपूर्व प्रतिष्ठा प्राप्त झाली. जगभर वेगवेगळ्या देशात कम्युनिस्ट पक्षांची स्थापना झाली आणि कम्युनिस्ट चळवळी सुरू झाल्या. अनेक ठिकाणी त्यांची सरकारेही स्थापन झाली. भारतातही हे लोण लगेच येऊन पोचले आणि नव्या युगाचे तत्त्वज्ञान …

तत्त्वज्ञानाची ओळख (भाग १२)

बाक्र्लीचा आयडियलिझम गेल्या लेखांकात आपण idea’ या शब्दाचे दोन अगदी भिन्न आणि स्वतंत्र अर्थ पाहिले. आधुनिक भाषाशास्त्रज्ञांच्या मताने idea’ हा शब्द एक नसून दोन आहेत. एक, प्लेटोचा ‘आकार’ या अर्थाचा ग्रीक शब्द, आणि दुसरा, अर्वाचीन तत्त्वज्ञानात रूढ असलेला ‘कल्पना या अर्थाचा इंग्लिश शब्द. त्यामुळे idealism’ या शब्दालाही दोन अगदी भिन्न आणि स्वतंत्र अर्थ आहेत. एक, …