मासिक संग्रह: मार्च, १९९२

खरी वैज्ञानिक वृत्ती

वैज्ञानिक वृत्तीचे अलीकडच्या काळातील एक अतिशय लक्षणीय उदाहरण म्हणजे सापेक्षतेच्या उपपत्तीचा सबंध जगाकडून झालेला स्वीकार, आइन्स्टाइन नावाच्या एका जर्मन-स्विस्-ज्यू शांततावाद्याची जर्मन शासनाने संशोधक प्राध्यापक म्हणून पहिल्या महायुद्धाच्या आरंभीच्या काळात नेमणूक केली होती. त्याने वर्तविलेलेली भविष्ये युद्धविरामानंतर १९१९ साली झालेल्या ग्रहणाच्या इंग्लिश अभियानाने केलेल्या निरीक्षणांनी खरी ठरली. त्याच्या उपपत्तीने सबंध प्रस्थापित भौतिकीची उलथापालट झाली. डार्विनने बायबलला दिलेल्या धक्क्यासारखा धक्का आइन्स्टाइनने तत्कालीन भौतिकीला दिला होता, असे असूनही पुरावा त्याला अनुकूल आहे हे जेव्हा दिसून आले तेव्हा सर्व जगातील भौतिकशास्त्रज्ञांनी त्याची उपपत्ती बिनतकार स्वीकारली.

पुढे वाचा

धर्मनिरपेक्षता : वस्तुस्थिती आणि विचारवंत

‘आजचा सुधारक’च्या दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या अंकात धर्मनिरपेक्षतेच्या प्रश्नाशी संबंधित दहा प्रश्न प्रसिद्ध करून त्यावर प्रतिक्रिया पाठवण्याचे आवाहन विचारवंतांना केले होते. वर्षभरातील अंकांतून या प्रतिक्रिया वाचकांसमोर आल्याच आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबरचा अंक धर्मनिरपेक्षता विशेषांक म्हणूनच प्रकाशित झाला आहे. त्यानंतरही एक प्रदीर्घ लेख क्रमशः तीन अंकांतून आला आहे. (लेखांक १, लेखांक २, लेखांक ३) आमच्या प्रश्नावलीला प्रतिसाद देणाऱ्या या सर्व अभ्यासकांचे आम्ही आभार मानतो आणि वर्षभर चाललेल्या या चर्चासत्राच्या समारोपादाखल काही मुद्दे नोंदवतो.

प्रश्नावली तयार करीत असताना आज आणि आताच्या समकालीन संदर्भाचा विचार आमच्या मनात प्रामुख्याने होता.

पुढे वाचा

मरू घातलेली जात (The Endangered Species)

‘आजचा सुधारक’च्या संपादकांनी सेक्युलरिझम व मार्क्सवाद या विषयावर आपल्या वाचकांकडून मतप्रदर्शन मागविले होते. यापैकी ‘सेक्युलॅरिझम’वर बोच लेख आले पण मार्क्सवादासंबंधीच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही असे संपादकांनी लिहिले आहे. मार्क्सवादावर लेख का आले नाहीत यावर विचार करताना, मला असे वाटले की ज्यांनी जन्मभर मार्क्सवादाचे कुंकू लावले ते आज मार्क्सवादावर चर्चा करण्याच्या मनःस्थितीत नाहीत. त्यांचा हा आशौचकाल आहे. आशौचकालात गेलेल्या जीबाबद्दल चर्चा करायची नसते. ज्यांनी मार्क्सवादाचे कुंकू लावले नाही अशाही लोकांत मार्क्सवादाबद्दल भयंकर आदर आहे. त्यांनी मार्क्सवादाचे कुंकू लावले नाही याचे प्रमुख कारण मासन धर्माला अफूची गोळी ठरविले.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग १७)

‘कामप्रेरणा आणि व्यक्तीचे हित’ या प्रकरणात कामप्रेरणा आणि लैंगिक नीती यांच्या व्यक्तीचे हित आणि सुख यावर होणाऱ्या परिणामांविषयी यापूर्वीच्या प्रकरणांत जे लिहिले आहे त्याचा संक्षिप्त आढावा घेण्याचा विचार आहे. या ठिकाणी मानवी जीवनाचा कामप्रेरणा प्रबळ असण्याचा काळ किंवा प्रत्यक्ष लैंगिक संबंध यांच्याशी आपल्याला कर्तव्य नाही. लैंगिक नीतीचे बाल्य, कुमारावस्था(adolesence), आणि वार्धक्यही यांवर विविध प्रकारांनी परिणाम होत असतात, आणि ते प्रसंगवशात् चांगले किंवा वाईट असतात.

रूढिवादी नीतीचा व्यापार बाल्यावस्थेत प्रतिषेध (Laboos) लादण्यापासून सुरू होतो. अतिशय अल्प वयात मुलाला आपल्या शरीराच्या काही अवयवांना चार चौघांसमोर हात लावू नये असे शिकविले जाते.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

तात्पर्य सांगताना ते म्हणतातः …. तात्पर्य, व्यक्ती व समूह-जीवनाची अमुक अमुक अंगे ही राज्यसत्तेच्या नियंत्रणाखालीच असणे योग्य व वैध आहे. राज्यसत्ता धर्मपीठाच्यापेक्षा उच्चतर अशी सार्वभौम सत्ता आहे याला मान्यता मिळाली. गाभ्याचा मुद्दा सार्वभौमत्व व अंतिमतः नियंत्रण व अधिकार कोणाचा हा होता. ‘धर्माचा आधार समाजव्यवहारांना असावा की नसावा हा मुद्दा नव्हता. हाच पळशीकरांचा पायाभूत घोटाळा! युरोपमध्ये १२०० वर्षे चाललेला संघर्ष याच मुद्यासाठी होता. राज्यसत्ता विरुद्ध धर्मपीठ असा केवळ दोन सत्ताकेंद्रांचा सार्वभौमत्वासाठी चालेला हा लढा नव्हता. यामागील तत्त्व महत्त्वाचे होते. धर्मपीठ या कल्पनेमागे ईश्वर, त्याने पृथ्वीवर पाठविलेले प्रेषित, प्रेषितांच्या मुखातून व्यक्त झालेले ईश्वराचे संदेश व आज्ञा आणि हे सर्व ज्यात ग्रथित केलेले आहे असे धर्मग्रंथ या चार वस्तू येतात, तेव्हा एका बाजूला ऐहिक पातळीवरून सामाजिक, राजकीय, आर्थिक, विवाहसंस्थाविषयक, मालकी हक्कविषयक, गुन्हाविषयक-थोडक्यात सांगायचे तर सर्व समाजव्यवहाराचे (परलोकविषयक विचार वगळून) नियमन-नियंत्रण करण्यासाठी अवतरलेली मानवनिर्मित राज्यसत्ता, आणि दुसऱ्या बाजूला ईश्वराने पाठविलेले प्रेषित, त्यांनी प्रगट केलेले ईश्वरी संदेश व आज्ञा, अषितांनी ग्रथित केलेले धर्मग्रंथ आणि त्यांतील विधिनिषेध म्हणजेच ईश्वरी कायदा (Divine Law) यांच्यामधील हा संघर्ष होता.

पुढे वाचा