मासिक संग्रह: एप्रिल, १९९५

संपादकीय

हा सहाव्या वर्षाचा पहिला अंक. मार्च ९५ चा अंक प्रकाशित झाला तेव्हा आजच्या सुधारकने पाच वर्षांची वाटचाल पुरी केली होती, आणि या अंकाबरोबर तो सहाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. गतेतिहासाकडे मागे वळून पाहिले तर पाच वर्षे संपली हे सांगूनही खरे वाटत नाही. दर महिन्याचा अंक प्रकाशित करण्याच्या धामधुमीत काळाचे भानही नाहीसे होत होते. या काळात अनेक अडचणी आल्या, नाहीत असे नाही; पण त्या आपोआप सुटत गेल्या. जुने वर्गणीदार बरेचसे दरवर्षी गळत गेले, पण नवेही मिळत गेले आणि जरी स्वावलंबी होण्याकरिता अवश्य असलेले साडेसातशे वर्गणीदारांचे लक्ष्य आम्ही गाठू शकलो नाही, तरी कूर्मगतीने का होईना आम्ही त्याच्याजवळ जात राहिलो.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्रीमान संपादक,
“खरी स्त्रीमुक्ती कशात आहे?” या चर्चेत आपण काही मौलिक मुद्द्यांची चर्चा केली आहे. त्या अनुषंगाने माझ्या मनात काही विचार गेल्या काही वर्षांपासून घोळत आहेत. ते व्यक्त करण्याची संधी मला लाभली म्हणून ते येथे नमूद करीत आहे.
स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य दिले पाहिजे? स्वातंत्र्य देणारे तुम्ही आम्ही कोण? खरे तर त्यांनी आपले स्वातंत्र्य उपभोगायला हवे. परंतु कुटुंबव्यवस्थेच्या उगमानंतर मधल्या काळात संस्कृतीच्या नावाखाली स्त्रियांच्या “योनीला” अवास्तव महत्त्व दिले गेले व त्याभोवतीच सर्व सुसंस्कृत लोक फेर धरून विचार करतात, करत होते व आजही करतआहेत.

पुढे वाचा

स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य

श्री. दिवाकर मोहनी यांच्यावर टीकेचा भडिमार न होण्याचे कारण त्यांचे स्त्रीमुक्तीवरील सर्वच विचार पटण्याजोगे आहेत हे नाही एवढेच त्यांना कळावे हा पत्र लिहिण्याचा उद्देश.
स्त्रीमुक्तीचा एक भाग म्हणून स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य द्यावे हा श्री मोहनी यांचा विचार आंधळ्याला बघण्याचे किंवा बहिर्‍याला ऐकण्याचे स्वातंत्र्य देण्यासारखा आहे. याचे कारण कळण्यासाठी आजचा सुधारक मार्च ९२ च्या पान क्र. २९ वरील श्री. विठ्ठल प्रभु यांच्या पत्रातील तिसरा परिच्छेद वाचावा.
स्त्रीला लैंगिक स्वातंत्र्य द्यावे म्हटल्यावर पुरुषासही लैंगिक स्वातंत्र्य देणे हे क्रमप्राप्तच आहे. सध्या पुरुषासही लैंगिक स्वातंत्र्य आहे असे म्हणता येणार नाही.

पुढे वाचा

तुमचे सर्व लिखाण भाबडेपणाचे, तर्कदुष्ट

श्री दिवाकर मोहनी यांस
सप्रेम नमस्कार
गेले सहा महिने आजचा सुधारकच्या वेगवेगळ्या अंकांतून आपले स्त्रीमुक्तिविषयक विचार मोठ्या हिरीरीने तुम्ही मांडत आहात. त्यामुळे समाजकल्याण होणारच असा तुमचा विश्वास तुमच्या लिखाणात दिसतो. स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य हा स्त्रीमुक्तीचा ‘अनिवार्य पैलू तुमच्या मते आहे. स्त्रियांची मागणी असो किंवा नसो, हे दिले नाही तर समाज कर्तव्याला चुकला असे तुम्ही सतत लिहीत असता. यासंबंधी तुमच्याशी सहज बोलणे झाले असता त्यावर तुम्हाला याहून भिन्न दृष्टिकोण समजून घ्यायचा आहे असे तुम्ही सुचविल्यामुळे पुढील विचार तदनुसार कळवीत आहे.
तुमचे हे सर्व लिखाण भाबडेपणाचे, भावनावशतेने लिहिलेले, तर्कविरुद्ध व अयुक्त असल्याचे कां वाटते ते पुढे नमूद करीत आहेत.

पुढे वाचा

चर्चा – खरी स्त्रीमुक्ती कशात आहे?

फेब्रुवारी १९९५ अंकामध्ये माझ्या लेखमालेचा पाचवा भाग प्रकाशित झाल्यानंतर मला जी पत्रे आली ती पुढे दिली आहेत. बहुतेक सार्‍या पत्रलेखकांनी सध्याच्या स्त्रीपुरुषसंबंधविषयक संकल्पनांमुळे मुख्यतः स्त्रियांवर गुलामगिरीसदृश अन्याय होतो ह्या माझ्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले आहे, त्याबद्दल मौन बाळगले आहे. त्यांनी सद्यःपरिस्थितीमध्ये माझ्या कल्पना कश्या व्यवहार्य नाहीत, रोगापेक्षा उपचार कसा भयंकर आहे, मी कसा स्वप्नात वावरत आहे किंवा माझ्या सूचनांमुळे कसा स्वैराचार माजणार आहे ह्याचाच सविस्तर ऊहापोह केला आहे. मी (दिवाकर पुरुषोत्तम मोहनी) कोणी एक राजा आहे. वा स्मृतिकार आहे व मी फर्मान काढल्याबरोबर स्त्रियांना लैंगिक स्वायत्तता प्राप्त होऊन स्त्रीमुक्ती प्रत्यक्षात येणार आहे अशी कल्पना करून घेऊन माझ्यावर बहुतेकांनी टीका केली आहे.

पुढे वाचा

समतेचे मिथ्य?

आमचे मित्र डॉ. नी. र. वर्हा डपांडे यांचा ‘समतेचे मिथ्य या शीर्षकाचा एक लेख याच अंकात इतरत्र छापला आहे. त्यात त्यांनी आजचा सुधारकमध्ये प्रसिद्ध झालेल्या स्त्रीमुक्तिवादी लिखाणावर जोरदार हल्ला चढविला आहे. आजचा सुधारकमध्ये प्रसिद्ध झालेले या विषयावरील लिखाण अत्यंत अज्ञतेचे असून ते करणार्याआ लोकांचा या विषयाच्या मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय व ऐतिहासिक संशोधनाचा काडीचाही अभ्यास नसतो, एवढेच नव्हे तर ते त्या लेखकांचे ‘जैविकीचे व मानसशास्त्राचे प्राथमिक अज्ञान दर्शविते असे ते म्हणतात. लेखाच्या शेवटी ते लिहितात की आजच्या सुधारकाने अभ्यासशून्य, बेजबाबदार व पुरोगामी हा छाप आपल्यावर लागावा या एकमात्र उद्देशाने लिहिलेले लिखाण प्रसिद्ध केल्याने तो आपल्या समाजप्रबोधनाच्या कर्तव्यात कसूर करीतआहे असे म्हणण्यास जागा होते.

पुढे वाचा

समतेचे मिथ्य

सुधारणेची चर्चा करायची तर मूल्ये कोणती मानायची हा प्रश्न मूलभूत महत्त्वाचा ठरतो. कारण आहे त्यापेक्षा अधिक चांगले करणे यालाच सुधारणा म्हणतात व चांगलेआणि वाईट हा मूल्यांचा विचार आहे.
सुधारणेच्या बाबतीत समता हे मूल्य असल्याचा वारंवार उद्घोष करण्यात येत असतो. असा उद्घोष करणार्‍यांमध्ये अर्थमीमांसा करून युक्तिवाद करण्याचा दावा करणारे लोकही अन्तर्भूत आहेत.
पण समता या शब्दाच्या अर्थाचे विश्लेषण केले तर समता हे मूल्य मानता येईल काय? समतेचा अर्थ असा होतो की सर्वांना सारखीच वागणूक दिली पाहिजे. म्हणजे चोर असो वा साव असो, दोघांनाही तुरुंगात पाठवले पाहिजे वा दोघांनाही सोडून दिले पाहिजे, सारी गणिते बरोबर असणार्‍या व सारी चूक असलेल्या उत्तरपत्रिकेला सारखेच अंक दिले पाहिजेत, दोघांनाही शून्य द्या वा दोघांनाही शेकडा शंभर द्या.

पुढे वाचा

बंडखोर पण्डिता (भाग २)

एखाद्या महाकाव्याचा विषय व्हावा असे रमाबाईंचे जीवनचरित्र आहे. कलकत्याहून रमाबाई पुण्याला आल्या खर्या , पण मध्यन्तरी अशा काही घटना घडल्या की कदाचित् त्या कधीच पुण्याला आल्या नसत्या. कारण त्यांनी लग्न करून आसामात सिल्चर येथे संसार थाटला होता. हे लग्नही जगावेगळे होते. त्यांचा भाऊ श्रीनिवास याचे एक बंगाली मित्र बिपिनबिहारी दास मेधावी यांनी त्यांना मागणी घातली होती. भावाच्या आकस्मिक मृत्यूनंतर त्या एकाकी झाल्या होत्या. त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला. बिपिनबाबू ब्राह्मोसमाजी होते. पण बंगाल-आसामकडच्या रिवाजाप्रमाणे ते शूद्रच गणले जात. तिकडे ब्राह्मणआणि शूद्र असे दोनच वर्ण मानत.

पुढे वाचा

पुरुषी वर्चस्वाचे दुष्परिणाम

पुरुषी वर्चस्वाचे काही अनिष्ट परिणाम झाले आहेत. मानवी संबंधांपैकी जो अत्यंत जिव्हाळ्याचा – म्हणजे विवाहाचा – त्याला दोन समान भागीदारांतील संबंधाऐवजी स्वामी आणि दास या संबंधाचे रूप त्यामुळे प्राप्त झाले. स्त्रीला आपली पत्नी म्हणून प्राप्त करण्यासाठी तिला सुखविण्याची गरज वाटेनाशी झाली, आणि त्यामुळे प्रियाराधनेचे क्षेत्र विवाहबाह्य संबंध असे ठरले. कुलीन स्त्रियांवर लादल्या गेलेल्या चार भिंतींमधील जीवनामुळे त्यांची बुद्धी आणि मनोहारित्व नाहीसे झाले; आणि मनोहारित्व, साहस हे गुण बहिष्कृत स्त्रियांपुरते सीमित झाले. विवाहसंबंधात समानता नसल्यामुळे पुरुषाची हुकूम गाजविण्याची वृत्ती पक्की झाली. ही स्थिती आता नागरित (civilised) देशांमध्ये बर्‍याच प्रमाणात संपली आहे, परंतु बदललेल्या परिस्थित्यनुरूप आपले आचरण बदलायला खूप कालावधी लागेल.

पुढे वाचा