मासिक संग्रह: फेब्रुवारी, २००८

पत्रचर्चा

सुधाकर कलावडे, पुणे ४११ ००७
हिंदू धर्मानुसार विष्णूचे दहा अवतार मानले जातात. काहींच्या मते ३९ अवतार आहेत. लेखकाचे म्हणणे असे आहे की इतर कोणत्याही धर्मात मानवाचा उदय अथवा विकास उत्क्रांतीमुळे झाला याची पुसटशीसुद्धा कल्पना नाही. सर्व प्राणी, पक्षी व मानव ईश्वराने एका झटक्यात निर्माण केले असे यहुदी (ज्यू), ख्रिस्ती व इस्लाम धर्म मानतात. याला हिंदुधर्मही अपवाद नाही. हिंदुधर्मात ब्रह्मदेवाने हे जीव जगत् निर्माण केले आहे असे मानले जाते तर परमात्म्याने ब्रह्माला निर्माण केले आहे असे मानले जाते.
वेदकाळात तेहतीस [? सं.]

पुढे वाचा

एड्सची जाणीव शालेय वयात

हल्ली कौमार्यावस्था ही पूर्वीपेक्षा कमी वयात मुलामुलींना प्राप्त होत आहे. प्रसारमाध्यमांशी जवळीक व अवती-भवतीच्या घटनांचे आकलन हे शालेय वयातील वैशिष्ट्य होय. एड्सबद्दलची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचत आहे. परंतु योग्य पद्धत व संदेशाविना त्याविषयीची माहिती मिळतेच असे नाही. एड्सच्या टी.व्ही.वरील प्रबोधनपर जाहिराती व माहितीचे कार्यक्रम हे तज्ज्ञमंडळीच्या सल्ल्याने व सहाय्याने आयोजित करण्यात येतात परंतु ते लागले की पालक मुलांना ती माहिती कळू नये, त्यांनी पाहू नये आणि ऐकू नये याची सर्वतोपरी दक्षता घेतात. परिणामी त्यांचे औत्सुक्य वाढते नव्हे तर कुतूहलापोटी समवयस्कांकडून चुकीचे ज्ञान मिळण्याची शक्यता असते.

पुढे वाचा

मेजवानी

डेन्मार्कच्या जुट्लांड प्रांताजवळचे एक बेट. काळ सुमारे १८७० सालाचा. एक मुष्किलीने डझनभर उंबऱ्यांचे खेडे. बहुतेक सारी माणसे वयस्क. नावाजण्यासारखी माणसे तीन एक अविचल, कर्मठ धर्मगुरु ऊर्फ ‘मिनिस्टर’, आणि त्यांच्या दोन देखण्या मुली. पंचक्रोशीतले लोक मिनिस्टरांच्या रविवारच्या प्रवचनांसाठी येरा. रारणे मुलींकडे पाहारा दृष्टिसुख घेरा.
शेजारच्या जमीदारिणीकडे तिचा एक पुतण्या येतो, वाईट वागण्याची शिक्षा म्हणून तीन महिने आत्याकडे काढायला. आत्याला सोबत करत प्रवचन ऐकायला जातो. एका मुलीच्या प्रेमात पडतो. मिनिस्टरांना भेटून मुलीचा हात देण्याची विनंती करतो. मिनिस्टर म्हणतात, “माझ्या मुली म्हणजे माझे डावे-उजवे हात.

पुढे वाचा

अस्थिर, अस्वस्थ पाकिस्तान

प्रपाठक, राज्यशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई. (सध्या व्हिजिटिंग फेलो, सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज, जकार्ता, इंडोनेशिया.)
बेनझीर भुत्तो यांची हत्या ही राजकीय हत्यांमध्ये निश्चितच सर्वाधिक सनसनाटी गणली जाईल. पाकिस्तान, आणि दक्षिण आशियाच नव्हे तर सगळ्या जगात या घटनेचे पडसाद उमटले. पाकिस्तानातील सध्याच्या नाट्यपूर्ण घटनांना त्यामुळे एक वेगळेच वळण लागले आहे. सीमेवरील दहशतवाद्यांच्या वाढत्या कारवाया, जनतेत पसरत चाललेला असंतोष, मुशर्रफ आणि न्यायसंस्था यांच्यातील संघर्ष, या पार्श्वभूमीवर जानेवारीत होऊ घातलेल्या निवडणुकांना महत्त्व प्राप्त झाले होते. नवाझ शरीफ यांची पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) (पीएमएल-एन) या निवडणुकीविषयी द्विधा मनःस्थितीत असताना, बेनझीर यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने (पीपीपी) मात्र निवडणुका लढवण्याचे ठरवले होते.

पुढे वाचा

विश्वरूपदर्शन आणि ईश्वराचा शोध

तुमचा सगळा कटाक्ष आमच्यावरच का?
आज गीतेतील नीतिमीमांसेची मीमांसा करण्याचा विचार आहे. पण त्याला आरंभ करण्यापूर्वी एका अक्षेपाला उत्तर द्यायला हवे. हा आक्षेप आमच्या वाचकांपैकी अनेकांनी प्रत्यक्ष बोलून दाखविला आहे, आणि त्याहून कितीतरी अधिक वाचकांच्या मनात तो वारंवार उद्भवत असावा यात संशय नाही. हा आक्षेप असा आहे : ‘तुमचा सारा रोख आम्हा हिंदूंवरच का? आमच्यापेक्षा अधिक, निदान आमच्याइतकेच अंधश्रद्ध, शब्दप्रामाण्यवादी, आणि तुम्ही दाखविता त्या सर्व दोषांनी युक्त असे अनेक धर्म किंबहुना सगळेच धर्म आहेत. असे असताना तुम्ही इतर कोणत्याही धर्माचे नावही उच्चारीत नाही, आणि आमच्या धर्माला मात्र तुम्ही निर्दयपणे झोडपत सुटला आहात याला काय म्हणावे ?’

पुढे वाचा

‘मर्द’, अमानुष हिंसेचे पोषण

माझ्या येऊ घातलेल्या पुस्तकाचा गाभा असा संस्कृतींमधला खरा संघर्ष आजच्या सर्व लोकशाह्यांमधला अंतर्गत संघर्ष आहे. आपल्यापेक्षा वेगळ्या लोकांचा आदर करत त्यांच्यासोबत राहायला तयार असलेले लोक आणि झडझडून वेगळ्या लोकांवर प्रभुत्व गाजवू इच्छिणारे लोक, यांच्यातला संघर्ष. किंवा गांधींच्या भाषेत मी असे म्हणेन की इतरांबाबतची आस्था आणि सहानुभूतीची भावना, आणि इतरांवर सत्ता गाजवायची इच्छा, यांच्यातला हा व्यक्तींच्या आत्म्यातला संघर्ष आहे. मी २००२ साली पुस्तक लिहायला सुरुवात केली तेव्हा मला वाटत होते की भारतातली लोकशाही कोलमडण्याची ही कटुकठोर कहाणी असेल. पण ती लवचीकपणाची कहाणी झाली.

पुढे वाचा

सॉलिप्सिझममधले धोके

[आधुनिकोत्तरवादी विचारांचे दुष्परिणाम कधीकधी आत्यंतिक व्यक्तिनिष्ठेच्या रूपात असतात. त्यामुळे आत्यंतिक व्यक्तिनिष्ठा धोकादायक का, हे दाखवायचा हा प्रयत्न तुला भीती ही कसली वाटते रे?: (चित्रपट: नई देहली)
“तुला जर भविष्याचं चित्र हवं असेल, तर एका मानवी चेहेऱ्याला चिरडणारा बटाचा पाय नजरेपढे आण नेहेमीसाठी.”
ओब्रायन विन्स्टन काहीतरी बोलेल अशा अपेक्षेने थांबला. विन्स्टन स्ट्रेचरमध्ये शिरायचा प्रयत्न करत असल्यासारखा आक्रसला. काही बोलू शकला नाही. हृदय थिजल्यासारखे झाले होते, त्याचे. ओब्रायन पुढे बोलायला लागला. “आणि लक्षात ठेव नेहेमीसाठी. बुटाला चिरडायला नेहेमीच चेहेरा असेल. पाखंडी, समाजाचा शत्रू नेहेमीच असेल आणि त्याला वारंवार लाचार करून हरवलं जाईल.”

पुढे वाचा

भारतीय सेक्युलॅरिझम – ३ उद्देशपत्रिकेतील एक अंश पश्चात्बुद्धी

युरोपातील सामाजिक आणि सांस्कृतिक संचित आणि ऐतिहासिक घडामोडी ह्यांच्यामधून सेक्युलॅरिझम ह्या संज्ञेने तेथे जसा आपला अर्थ उचलला तसाच भारतातही, त्याच कारणांनी ह्या संज्ञेला स्वतःचा एक खास स्वदेशी स्वाद लाभला आहे. असा की जो कोणत्याही व्याख्येत मावूच नये. घटनेच्या शब्दसंहितेच्या चौकटीत बंदिस्त होताना ती कल्पना आपले चापल्य गमावून बसली असती. कधी कधी शब्द असे नेमकेपणा नसलेले, निराकार असल्यागत मोकळे सोडणे बरे असते. त्यांच्यातला लवचीकपणा अनुभवांनी, स्थळा-काळाच्या संदर्भांनी आपोआप आकार घेऊ लागते. ‘सेक्युलर’ हा शब्द बेचाळिसाव्या दुरुस्तीद्वारा घटनेच्या उद्देशपत्रिकेत प्रविष्ट होऊन ना तिची संकल्पनात्मक अस्मिता (Conceptual Concept) वाढली, की कमी झाली!

पुढे वाचा

झापडबंद ‘विज्ञान’

डॉ. जॉन स्नो हा लंडनमध्ये काम करणारा वैद्य आणि पॅथॉलजिस्ट (विकारवैज्ञानिक) होता. कॉलरा (पटकी, हैजा) हा रोग पिण्याच्या पाण्यातील जंतुदोषातून पसरतो, हे त्याने दाखवून दिले. मध्य लंडनच्या नकाशावर त्याने रोगाचे प्रभाग व मारकता जास्त असलेली क्षेत्रे रेखली, आणि त्यातून निष्कर्ष निघाला की ब्रॉड स्ट्रीट पंप हा भूमिगत पाणी उपसणारा पंप रोगाचे मूळ होता. आपण सुचवत असलेले पाणी व रोग यांच्या संबंधाबाबतचे तत्त्व सुस्थापित करण्यासाठी स्नोने प्रत्येक आणि प्रत्येक विसंगत उदाहरण तपासून त्याचे स्पष्टीकरण शोधले. दूरवरचे रोगी, रोगाच्या प्रसारातले चढउतार, सारे मूळ तत्त्वाच्या मदतीने स्पष्ट करत आकडेवारीच्या गोंधळातून व्यवस्थित चित्र रेखले.

पुढे वाचा

विज्ञानाने श्रद्धेशी बोलावे का?

क्राऊसःतुम्ही आणि मी दोघेही या विश्वाबद्दलच्या आपापल्या वैज्ञानिक आकलनासंबंधी आणि लोकांना विज्ञानात रस यावा या हेतूने बरेच बोलत-लिहीत असतो. यामुळे वैज्ञानिक धर्माबद्दल मते व्यक्त करताना त्यांचे उद्दिष्ट काय असते, हा प्रश्न विचारणे योग्य ठरते. कशाला जास्त महत्त्व द्यावे याबद्दल माझा जरा गोंधळ आहे, विज्ञान आणि धर्म यांच्यातला फरक सांगताना विज्ञानाबद्दल काही शिकवावे, की धर्माचे स्थान ठरवून द्यावे, ह्यांमध्ये. बहुधा माझा भर विज्ञान समजावून देण्यावर असतो, तर तुमचा धर्माची जागा दाखवून देण्यावर.
मी असे का म्हणतो ते सांगतो. लोकांना काही शिकवायचे असेल तर त्यांच्यापर्यंत पोचून त्यांच्या भूमिका, धारणा समजून घ्याव्या लागतात, आणि मगच त्यांना आपल्या भूमिकेकडे आकर्षित करून घेता येते.

पुढे वाचा