मासिक संग्रह: ऑगस्ट, २००९

संपादकीय रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

“कोणत्याही संकल्पनेचे महत्त्व जर तिच्याद्वारे प्रेरित वैचारिक परिवर्तनाने मोजण्याचे ठरविले, तर नैसर्गिक निवडीद्वारा उत्क्रांती ही निर्विवादपणे मानवी इतिहासातील सर्वांत महत्त्वपूर्ण संकल्पना ठरेल.”

चार्ल्स डार्विनच्या जन्माला यंदा दोनशे वर्षे पूर्ण झाली. त्याच्या ऑरिजिन ऑफ स्पीशीज ह्या ग्रंथाच्या प्रकाशनालाही दीडशे वर्षे लोटली. पण ह्या ग्रंथामुळे उडालेली खळबळ अजूनही विरली नाही. मानवी बुद्धिमत्तेच्या विविध अंगांना कवेत घेणारा, दैवकशास्त्रापासून वैद्यकशास्त्रापर्यंत अनेक क्षेत्रांत मूलभूत वैचारिक परिवर्तन घडविणारा व एकाच वेळी अनेक नव्या विद्याशाखांना जन्म देणारा असा ग्रंथ मानवी इतिहासात अभूतपूर्वच म्हणायला हवा. त्याहून महत्त्वाची बाब ही की ह्या ग्रंथाने मानवी स्वभाव, प्रेरणा, विचारपद्धती व वर्तन यांच्याविषयी फेरमांडणी करतानाच काही असे प्रश्न उपस्थित केले, ज्यांची चर्चा गेली दीडशे वर्षे सुरू आहे व यापुढेही राहील.

पुढे वाचा

बौद्धिकदृष्ट्या तृप्त

डार्विनने मला बौद्धिकदृष्ट्या तृप्त नास्तिक (intellectually fulfilled atheist) होऊ दिले. – रिचर्ड डॉकिन्स (ब्लाइंड वॉचमेकर, १९९६) नैसर्गिक निवडीतून उत्क्रांतीचे डार्विनचे तत्त्व हे आपल्या अस्तित्वाचे एकुलते एक व्यवहार्य स्पष्टीकरण आहे. फार कशाला, विश्वात जेथे कोठे जीव भेटेल, तेथेही हेच तत्त्व लागू पडेल. सजीवसृष्टीच्या आश्चर्यकारक विविधतेचे, प्राणी, वनस्पती, बुरश्या व बॅक्टीरियांचे ते एकुलते एक ज्ञात स्पष्टीकरण आहे.- रिचर्ड डॉकिन्स (जॉन मेनॉर्ड स्मिथच्या द थिअरी ऑफ इव्होल्यूशन, २००० च्या प्रस्तावनेतून)

उत्क्रांतिवाद, जाणीव आणि ब्रह्म 

प्रथम काही गोष्टी स्पष्ट करणे योग्य ठरेल. 

1. उत्क्रांतिवाद आणि ब्रह्माबाबतचा विचार (आणि अनुभव?) या दोहोंतही मी तज्ज्ञ नाही. 

2. मी उत्क्रांतिवाद मानतो, किंबहुना सर्वच आधुनिक विज्ञाने मानतो. 

3. एका वेगळ्या पातळीवर मी अद्वैत तत्त्वज्ञानही मानतो. हे मानणे श्री रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांना अनुसरून आहे. म्हणजे त्यात सगुण ब्रह्माला व ईश्वरालाही स्थान आहे. अनेक मार्गांनी आपल्याला ब्रह्माचा व ईश्वराचा साक्षात् अनुभव घेता येतो. 

4. अद्वैताचे हे रूप आणि उत्क्रांतिवाद यांचा परस्परसंबंध हाच खरा या लेखाचा विषय असायला हवा. परंतु हे विवेचन एका लेखात होणार नाही व मी ते करू शकणार नाही.. 

पुढे वाचा

तीन टिपणे

शॉर्ट में निपटाओ! डार्विनच्या उत्क्रांतीच्या तत्त्वाचे एक त्रोटक वर्णन पाहा एखादी सजीव रचना टिकून राहते, कारण ती तिच्या परिस्थितीशी अनुरूप असते. ती परिस्थितीशी अनुरूप असण्याचा पुरावा हा, की ती टिकून राहते.

वरच्या परिच्छेदातले वर्णन हे वर्तुळाकार युक्तिवादाचे (circular argument) उदाहरण आहे. ते तर्कदुष्ट आहे. मुख्य म्हणजे वेगवेगळ्या जीवजाती कशा घडल्या यावर ते काहीही प्रकाश टाकत नाही. पण थोडक्यात उत्क्रांती म्हणजे अशा प्रस्तावनेसकट ते बरेचदा पुढे केले जाते. कार्ल पॉपर हा विज्ञानामागचे तत्त्वज्ञान तपासणारा खंदा तत्त्वज्ञही एका यासारख्या युक्तिवादाने चकून म्हणाला, की डार्विनचे नैसर्गिक निवडीचे तत्त्व हा एक आधिभौतिक संशोधन प्रकल्प (a metaphysical research program) आहे.

पुढे वाचा

उत्क्रांतीचा वेग, माणूस आणि चिंपांझी

उत्क्रांतीच्या चर्चेत जरी परिस्थितीशी अनुरूप गुण आणि तो गुण पुरवणारा जीन अशी भाषा भेटत असली, तरी प्रत्यक्षात गुणसंच, जीनसंच हेच परिस्थितीशी अनुरूप असतात किंवा नसतात. परिस्थितीशी अनुरूप असणे, हा एकसंध गुण नाही. त्यात विभाग आणि अवयव असतात. उदा. एखादा वाघ पाहा. त्याचा वेग जास्त असणे हे परिस्थितीशी अनुरूप असते. पण जास्त वेगाने पळता यायला स्नायू आणि हाडांची रचना, रक्ताचे अभिसरण व त्यातील पेशींची ऑक्सिजन वाहण्याची क्षमता, असे बरेच काही आवश्यक असते. तो सारा गुणांचा संच जमल्यानंतरच वेगाने पळणे, जास्त भक्ष्य कमावणे, सुपोषित होणे, सुदृढ होणे, जास्त प्रजा घडवणे वगैरे नैसर्गिक निवडीत टिकणारी साखळी घडून गुणसंच पुढील पिढ्यांमध्ये पसरून वाघ उत्क्रांत होतात.

पुढे वाचा

संधिकाळातील घालमेल

इंग्रजी वाययाचा अभ्यास करताना त्या वाययाची आवश्यक पार्श्वभूमी म्हणून इंग्लंडच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासाचे काही कालखंड वाचले होते. ते वाचत असताना सगळ्यांत ज्या गोष्टींनी प्रभावित केले ती होती नोंदींची उपलब्धता. तथ्ये, घटना, घटनांवरच्या अनेक टीकाटिप्पणी काळाच्या ओघात नाहीशा होऊनही एवढ्या प्रमाणात शिल्लक राहिल्या ह्याचे आश्चर्य वाटल्याचे आजही आठवते. चर्चच्या रजिस्टरमधील जन्म, मृत्यू, विवाह ह्या अटळपणे होणाऱ्या नोंदी वगळल्या तरी पत्रव्यवहार, डायऱ्या, संस्थांच्या व्यवहारांची रेकॉर्डबुक्स, कवी, नाटककार, कादंबरीकार वगैरेंच्या कलाकृती, वृत्तपत्रांतील बातम्या ह्या सगळ्यांमधून उमटलेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा पाहताना फार मजा आली.

१९९६ च्या आसपास पॅन्डिमोनियम नावाचे हम्फ्री जेनिंग्ज ह्या सिनेमा आणि नाटकाशी प्रामुख्याने संबंधित असलेल्या लेखकाचे पुस्तक वाचनात आले.

पुढे वाचा

डार्विनचा उत्क्रांतिवाद व मार्क्सवाद’

चार्ल्स डार्विन याचा ऑरिजिन ऑफ स्पीशीज हा ग्रंथ १८५९ साली प्रसिद्ध झाला. जीवनावर सखोल भाष्य करणारी अनेक पुस्तके त्याकाळीही प्रसिद्ध होऊ लागली होती. अजून माध्यमक्रांती झाली नव्हती. शिक्षण सार्वत्रिक वा सामुदायिक झाले नव्हते. युरोपमध्येही साक्षरतेचा प्रसार होऊ लागला असला तरी तो बहुशः अक्षरओळखीपुरताच मर्यादित होता. वाचनसंस्कृती अभिजनवर्गापुरतीच मर्यादित होती. गहन विचारांचा प्रसार व प्रभाव अर्थातच सीमित होता. (सार्वत्रिक शिक्षणाचा प्रसार १८७० नंतर सुरू झाला. १८५० मध्ये निदान ३०% वर व ४५% वधू इंग्लंडमध्ये लग्नाच्या नोंदणीवहीत सह्या करू शकत नव्हत्या. १८५० पूर्वी ही परिस्थिती अधिकच वाईट होती.

पुढे वाचा

मनुस्मृतीच्या दावणीला डार्विन-मेंडेल!

[आनुवंशिक गुणसंच आणि परिस्थितीमुळे येणाऱ्या मर्यादा यांच्या परस्परपरिणामांमधून सजीव सृष्टी घडत जाते, ही डार्विनच्या नैसर्गिक निवडीमागची मर्मदृष्टी (insight). तिला बळ पुरवले मेंडेलला सापडलेल्या आनुवंशिकतेच्या यंत्रणेने. या यंत्रणेचा गाभा म्हणजे आनुवंशिक गुण रेणूंच्या, जीनसंचांच्या रूपात व्यक्तींकडून त्यांच्या संततीकडे जातात.

नैसर्गिक निवड अखेर असे गुणसंच निवडते. यात त्या गुणसंचांची व्यक्तींमधून होणारी अभिव्यक्ती (expression) महत्त्वाची असते. आणि निवड दिसून येते ती जीवजातीच्या वैशिष्ट्यांमधून.

इथे निवडले गेलेले गुण चांगले न मानता केवळ बदलत्या परिस्थितीच्या सध्याच्या टप्याशी अनुरूप मानणे, ही झाली वैज्ञानिक शिस्त. ती शिस्त विसरली गेली, की आहे तेच चांगले असा भाव उपजतो.

पुढे वाचा

सारे काही जीनदत्त?

पाश्चात्त्य देशांत सतरा-अठराव्या शतकात घडलेल्या राज्यक्रांत्या समता प्रस्थापित करण्यासाठी होत्या, असे त्यांची घोषवाक्ये सांगतात. पण या क्रांत्यांमधून आकार घडलेल्या सर्व समाजांमध्ये काही व्यक्तींचा सत्ता-संपत्तीतील वाटा इतरांपेक्षा खूप जास्त आहे, हे सतत दिसत असते. या विरोधाभासातून उद्भवलेले सामाजिक क्लेश गेली दोनशे वर्षे पाश्चात्त्य देशांमध्ये जाणवत आहेत, विशेषतः उत्तर अमेरिका खंडाच्या राजकीय इतिहासाचा मोठा भाग या अंतर्विरोधाच्या निरसनाभोवती केंद्रित आहे.

याबाबत दोन शक्यता सुचतात – एक अशी, की प्रचंड विषमता हा आपल्या राजकीय – सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे, आणि क्रांत्यांची घोषवाक्ये केवळ जन्माधिष्ठित सत्ता हटवून संपत्त्यधिष्ठित सत्ता प्रस्थापित करण्यापुरतीच होती.

पुढे वाचा

भारतात डार्विन

एकोणिसाव्या शतकाने तीन गोरी, दाढीवाली माणसे घडविली. त्यांना कोणी द्रष्टे म्हणतात, तर कोणी राक्षस म्हणतात. हे आहेत डार्विन, मार्क्स आणि फ्रॉईड. यांपैकी फ्रॉईड भारताच्या बौद्धिक जीवनात कुठेच दिसत नाही. त्याचे विचार माणसाचे मन आणि अंतर्मन यांबाबत होते; आणि यासाठी भारतात स्थानिक गुरु आहेत. त्यामुळे फ्रॉईडचा येथील परिणाम नगण्य असणे हे सहज समजण्यासारखे आहे. मार्क्स मात्र भारतात खूपच प्रभावशाली ठरला आहे. त्याच्या नावाचा पक्ष दोन राज्यांमध्ये सत्तेवर आहे. भारतीय समाज आणि राजकारणाचा विचार करताना मार्क्सबाबा नेहमीच आसपास असतो. अनेक पिढ्यांचे विचारवंत मार्क्सला भारतीय गुरुपरंपरेत बसवायला धडपडत आहेत.

पुढे वाचा