भाबडे अर्थशास्त्रः
१)मे २००५ चा आजचा सुधारक गिरणी विशेषांक म्हणून निघाला आहे. यातील काही भागाबद्दल “संघटित क्षेत्रातील १२-१५ टक्के श्रमिक सोडल्यास इतरांना कामावरून काढल्यास नुकसानभरपाई मिळत नाही. दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्था ६.५ ते ७ % दरम्यान विकासदर नोंदवून मुक्तपणे व लक्षणीय प्रमाणात जागतिक पातळीचे अब्जाधीश निर्माण करीत आहे. म्हणजे निर्माण होणारी सम्पत्ती कोणत्या दिशेने वाहत आहे हे स्पष्ट होते.” (पृष्ठ ६२)
२) “संघटित मजुरांना नुकसानभरपाई मिळाली” या वाक्याने असे सूचित केले आहे की सर्वच मजुरांनी संघटित होणे हा मजुरांची स्थिति सुधारण्याचा उपाय आहे.
Author archives
झोपडपट्ट्या व नागरीकरण
नागरीकरणाची जी व्याख्या आहे तीप्रमाणे जेव्हा मनुष्यवस्ती पाच हजारांपेक्षा जास्त असते व पाऊणपेक्षा जास्त पुरुष बिनशेतीधंद्यात काम करतात तेव्हा त्या वस्तीला नगर (Town) म्हणतात. उरलेल्या वस्तीला ग्रामीण वस्ती म्हणतात. जेव्हा ग्रामीण वस्ती लोकसंख्येमुळे व व्यवसायांमुळे नागरी बनते त्या घटनेला नागरीकरण म्हणतात. ह्या घटनेमागे नगरांमध्ये बिनशेतकी व्यवसायाची वाढ असते. हे नागरीकरण वाढत जाऊन लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारते व राहणी गुणात्मकदृष्ट्याही उच्च दर्जाची होते. ह्या गुणात्मक वाढीत शिक्षणाचा दर्जा उंचावणे, संगीत-कलांची वाढ होणे, इतरही अनेक कौशल्यांची वाढ होणे, या गोष्टी अपेक्षित असतात. अशी नगरे मोठमोठी होत जाऊन एक लाखापेक्षाही जास्त वस्तीची होतात तेव्हा त्यांना शहरे (Cities) म्हणतात.
संमतीचे उत्पादन: प्रसारमाध्यमांचे राजकीय अर्थशास्त्र (उत्तरार्ध)
[मागील अंकात या लेखाच्या पूर्वार्धात हर्मन व चोम्स्की ह्यांनी मांडलेल्या प्रचाराच्या प्रारूपातील पहिल्या चार चाळण्यांचे वर्णन केले होते. (१) आकार, मालकी आणि नफाकेन्द्री माध्यमे, (२) जाहिरात, (३) प्रसारमाध्यमांच्या बातम्यांचे स्रोत आणि (४) झोड आणि अंमलदार, अशा या चार चाळण्या. आता पुढे….]
कम्युनिझम-विरोध : एक नियंत्रक यंत्रणा
शेवटचे गाळणे आहे ते कम्युनिझमविरोधाच्या तत्त्वज्ञानाचे. संपत्तिवानांना कम्युनिझम हा निर्वाणीचा शत्रू वाटत राहिला आहे, कारण तो त्यांच्या वर्गीय स्थानाला व उच्च प्रतिष्ठेला धक्का देणारा असतो. सोविएत, क्यूबन व चिनी क्रांत्या पाश्चात्त्य अभिजनांना संकट ठरल्या आहेत.
चोम्स्कींचा भाषाविचार
आधुनिक भाषाशास्त्राच्या इतिहासात नोम चोम्स्कीचे स्थान अद्वितीय आहे. सन १९५७ मध्ये प्रकाशित झालेल्या त्याच्या सिन्टॅक्टिक स्ट्रक्चर्स या पुस्तकापासून भाषा-विज्ञानात एका अफलातून क्रांतीची सुरुवात झाली. चोम्स्कीच्या विचारांचा, तत्त्वांचा आणि संकल्पनांचा भाषा-विज्ञानावरच नव्हे तर इतरही अनेक ज्ञानशाखांवर जबरदस्त प्रभाव पडला आहे. चोम्स्कीप्रणीत या क्रांतीच्या पूर्वीही आणि नंतरही असंख्य प्रवाह भाषाशास्त्रात आहेत. परंतु आज भाषाशास्त्रातील विभिन्न प्रवाह चोम्स्कीच्या मांडणीच्या अनुषंगाने आपापली भूमिका मांडत असतात यातच त्याच्या सिद्धान्तांचे महत्त्व दडलले आहे. आपल्या भाषाविषयक संशोधनातून चोम्स्कीने मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, संगणकीय भाषाभ्यास ह्या क्षेत्रांमध्ये मूलभूत योगदान दिले आहेच, पण त्याचबरोबर असंख्य सोपे लेख लिहून, शेकडो भाषणे व चर्चासत्रे घडवून भाषाशास्त्र हा विषय रंजक व लोकप्रिय करण्यास मदत केली आहे.
भारताचे जलभविष्य
एखाद्या अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करणार कसे? जी.एन.पी. ठोकळ राष्ट्रीय उत्पादन, दरडोई उत्पन्न या आकड्यांवरून ? की सामान्य माणसांच्या परिस्थितीवरून? ठोकळ राष्ट्रीय उत्पादन पाहून देशातील माणसांची स्थिती लक्षात येत नही. देशातील माणसांच्या विकासाचा निर्देशांक महत्त्वाचा आहे. शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, जळण, पर्यावरण यांचा विचार करून विख्यात अर्थवेत्ते डॉ. मेहबूब उल हक यांनी मनुष्य विकास निर्देशांक तयार केला. त्याच धर्तीवर जलदारिद्र्य निर्देशांक ही संकल्पना मांडली जात आहे. उपलब्ध जलसंपदा, पाण्यापर्यंत पोच, पाणी खरेदी करण्याची क्षमता, पाणीवापराची कार्यक्षमता आणि पर्यावरण या पाच निकषांवरून भागाचा जलनिर्देशांक ठरविला जातो.
वर्तमानकाळ आणि भूतकाळ
एखादी प्रतिमा एखाद्या कलाकृतीत कशी सादर केली जाते यातून पाहणाऱ्यांच्या कलाक्षेत्राबद्दलच्या अनेक समजुती घडत असतात. सौंदर्य, सत्य, ‘विलक्षण’ कलाकार, संस्कृती, आकार (रूप), सामाजिक स्थिती, अभिरुची अशांबाबतच्या समजुती प्रतिमांच्या आधारे घडतात. जुन्या कलाकृती आज पाहणाऱ्यांच्या समजुती कलाकृती घडतानाच्या समजुतींपेक्षा वेगळ्या झालेल्या असतात. पूर्वीचे जग कसे होते याबद्दलच्या आजच्या समजुती भूतकाळाला स्पष्ट करण्याऐवजी ‘गूढ’ करतात.
आपल्याकडे पाहणाऱ्याला आपण नेमके दिसावे अशा रूपात भूतकाळ पाहणाऱ्याची वाट पाहत बसलेला नसतो. इतिहास हा नेहमीच वर्तमानकाळ आणि भूतकाळ यांच्या संबंधाच्या रूपात असतो. आजची भीती, आजच्या आस्था नेहमीच भूतकाळाला धूसर करत असतात.
संपादकीय विशेषांकासंबंधी
येत्या काही महिन्यांत काही विशेषांक काढायचा प्रयत्न सुरू आहे. पाणी-जमीन-माणूस यांच्यातले परस्परसंबंध, भारतातील आरोग्यसेवा, कुशिक्षण, स्वयंसेवी संस्था, विविधांगी विषमता, असे अनेक विषय सुचत आहेत. काहींसाठी अतिथी संपादकही योजले गेले आहेत.
ज्येष्ठ साहित्य-समीक्षक म.वा. धोंड आपल्या जाळ्यातील चंद्र या पुस्तकाच्या प्रास्ताविकात लिहितात, “एखादे पुस्तक वाचताना मला काही प्रश्न पडतात, काही उणिवा जाणवतात, काही दोष खटकतात. त्या दोषांचे निराकरण कसे करता येईल उणिवा कश्या भरून काढता येतील आणि प्रश्नांचा उलगडा कसा करता येईल, यांचा मी विचार करू लागतो आणि त्यात मन गुंतते. हा गुंता सहजी सुटत नाही.
खऱ्या बदलाचा प्रयत्न
भ्रष्ट लालूप्रसाद यादवांच्या विरोधातील संसद-बहिष्काराने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी विधेयक रखडले आहे. आज त्याचे भवितव्य एका भाजप खासदाराच्या अध्यक्षतेखालील समितीच्या हाती आहे, आणि त्याने काम न करायचे ठरवले आहे. भ्रष्टाचार भारतात अनेक रूपे घेतो.
डिसेंबर २००४ मध्ये विधेयक संसदेपुढे मांडले गेले तेव्हा लक्षावधी गरिबांना रोजगार पुरवण्यासाठीच्या पैशावर बरीच ‘हाथापायी’ करावी लागली होती. शेवटी एक क्षीण केलेले विधेयक घडवण्यात आले अकुशल काम करायची तयारी असलेली प्रौढ माणसे ज्या घरात असतील, त्या घरांमधील एका व्यक्तीला एका आर्थिक वर्षात शंभर दिवसांचा रोजगार देण्याची हमी हे विधेयक देणार.
विवेकवाद – भाग ८(२): अध्यात्म आणि विज्ञान (प्रथम प्रकाशन नोव्हेंबर १९९० अंक १.८, लेखक – दि. य. देशपांडे)
[पायवा’च्या (भाग ८(१) मध्ये विज्ञान, अध्यात्म, तत्त्वज्ञान व त्याचे निकष आणि निष्कर्ष इ. वर चर्चा करण्यात आली. या भागात श्याम कुलकर्णीचे पत्र व त्याला दि.य. देशपांड्यांची प्रतिक्रिया सं.]
एवढ्या प्रस्तावनेनंतर आता आपण प्रा. श्याम कुळकर्त्यांच्या पत्राकडे वळू शकतो.
संपादक, नवा सुधारक यांस,
आपण म्हणता त्याप्रमाणे, व आगरकरही म्हणतात त्याप्रमाणे, विश्वासावलंबी कल्पनांची जागा विवेकवादाने घेणे इष्ट आहे हे उघडच; पण सर्वसाधारण माणसांस विवेकवाद हे आपल्या अपकृत्यांचे समर्थन करण्याचा मार्ग वाटू नये. मी खून केला तर मला त्याचे प्रायश्चित मिळेल ही भावना माणसास खून न करण्यास प्रवृत्त करते.
मूलतत्त्ववाद
ए. श्रीनिवास: तुम्ही मूलतत्त्ववादाची व्याख्या कशी करता? सलमान अख्तर: मूलतत्त्ववाद म्हणजे पाच वैशिष्ट्ये असलेली धर्मव्यवस्था.
१)एखाद्या पोथीचा किंवा धर्मग्रंथाचा संकुचित आणि शब्दशः अर्थ लावणे. २) आपला ग्रंथ किंवा श्रद्धा यावरील आग्रहातून वंशकेंद्री विचारांचा पुरस्कार करणे. ३) जगाच्या स्थितीचे अतिसुलभीकरण केल्याने आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली आहेत, अशी अतिअहंभावी विकृती (megalomania) असणे. ४) याच नाण्याची दुसरी बाजू म्हणून आपल्यावर सतत अन्याय होत असल्याचा समज होणे. आणि ५) अशा समजावरच संघटन बेतून जरूर पडेल तसा त्या संघटनाचा हिंसक वापर करणे.
ही पाच वैशिष्ट्ये आली की मूलतत्त्ववाद आला.