या लेखात तुम्हाला ‘साठी’ पार केलेल्या पण आजही झेपेल तेवढे काम करणाऱ्या व या कामातून—किंवा विरंगुळ्यातून म्हणा हवे तर—आनंद अनुभवणाऱ्या वृद्धयुवांची ओळख करून देणार आहे. हे वृद्ध युवक किंवा युवावृद्ध ‘विज्ञानवाहिनी’ या संस्थेचे सदस्य आहेत; काही वास्तविक युवक/युवतीसुद्धा विज्ञानवाहिनीत आहेत.
या वृद्धांपैकी काही जणांचा तर ‘पैलतीर’ या संकल्पनेवरच विश्वास नाही. काहींचा असेल पण त्यांची मने ऐलतीरावरच आहेत. कदाचित बऱ्याच वेळा शालेय मुलांच्या संपर्कात असल्याने असे झालेले असेल. त्यांची वैयक्तिक ओळख करून घेण्याआधी त्यांना लाभलेल्या ‘विज्ञानवाहिनी’ या आनंदस्रोताची थोडी ओळख करून घ्यायला हवी.
Author archives
उपयोगितावादाचे टीकाकार
उपयोगितावाद ही उपपत्ति नीतिमीमांसाक्षेत्रात जाहीर झाल्याबरोबर तिच्यावर नीतिमीमांसक तुटून पडले. त्यांत विविध मतांचे बहुतेक सर्व नीतिमीमांसक होते. उप-योगितावादाचे खंडन हा नीतिविचारक्षेत्रात तत्त्वज्ञांचा प्रधान उद्योग होता. उपयोगिता-वादाचे विरोधक नवनवीन आक्षेप हुडकून काढीत होते, आणि ते आक्षेप प्रतिपक्ष्याला निरुत्तर करणारे आहेत असे या क्षेत्रात सामान्य मत होते. आ चर्य हे की या हल्ल्यातून उपयोगितावाद बचावला. आणि दीडदोनशे वर्षानंतर आजही तो निर्भयपणे, ताठ मानेने उभा आहे.
हे आक्षेप काय होते? ते खरोखर निरुत्तर करणारे होते काय? इ. प्रश्नांचे उत्तर आज द्यायचे आहे. विवेचनाच्या सोयीसाठी येथे फक्त महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या तीन-चार आक्षेपांचा विचार करणार आहे.
कलाम यांनी विचारले संपादकांना प्रश्न
देशाच्या राष्ट्रपतींनी पत्रकारांना प्रश्न करून बुचकळ्यात टाकावे, असा दुर्मिळ योगायोग आज घडला.
वृत्तपत्रांच्या आणि वृत्तसंस्थांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना ते आपल्या चिरपरिचित शैलीत म्हणाले की, आपण मला प्रश्न करीत असता. आज मला आपणास काही प्रश्न करायचे आहेत.
‘एडिटर्स गिल्ड’ या पत्रकार संघटनेने राष्ट्रपतींशी संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्या परिषदेत कलाम यांनी संपादकांना चार प्रश्न विचारले. त्यांचे उत्तर कुणालाही देता आले नाही. विकसित भारताच्या ध्येयात वृत्तपत्रे सहभागी होऊ शकतात काय? वृत्तपत्रांना पुरेसे स्वातंत्र्य आहे काय? वांशिक संघर्ष थांबविण्यासाठी काय करायला हवे? तुम्हाला सर्वाधिक चिंतेत टाकणारी बाब कोणती?
संपादकीय नाशिकची ‘अर्थ’ चर्चा
“तेजीमंदी तर चालतच असते’, हे सामान्य व्यापार-उदीम करणाऱ्यांचे एक आवडते सूत्र असते. त्यांच्या मालाची, कसबांची मागणी बदलत जाते; आज गि-हाईक नसले तरी उद्या मिळेल असा त्यांचा विश्वास असतो. नोकरीपेशातल्या लोकांना यातला हताश भाव समजत नाही. आपण मेहनतीने कमावलेली कौशल्ये किंवा घडवलेल्या वस्तू कोणालाच नको आहेत यातून येणारी खिन्नता आणि ‘मी निरर्थक झालो/झाले आहे’ हा तो भाव—-अर्थशास्त्रात ‘मंदी’ म्हणतात त्याला. आज कापडउद्योगात मंदी आहे. मुंबईत गेल्या वीसेक वर्षांत गिरण्यांची संख्या ६५ वरून ५ वर आली. सोलापुरात सातांपैकी एक गिरणी चालते. नागपूर परिसरात वर्षा-सहा महिन्यांत पाच गिरण्या बंद पडल्या—- पाचांपैकी!
धर्म आणि लोकसंख्या
हा लेख म्हणजे एका पुस्तकाचे समीक्षण आहे. हे पुस्तक श्रिया अय्यर यांनी लिहून ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या छापखान्याने २००२ मध्ये प्रसिद्ध केलेले आहे. त्यात २६६ पाने आहेत व त्याची किंमत ५९५ रुपये आहे. ह्या पुस्तकाचे नाव ‘Demography and Religion’ असे आहे. थोडक्यात धर्म व लोकसंख्येबाबतचे प्रश्न असे त्याचे स्वरूप आहे. धर्म व लोकसंख्या नियंत्रण हा विषय १९५० पासूनच चर्चेला येत असे. १९५३ साली मी एक शस्त्रक्रिया शिबिर सातारा जिल्ह्यातील पुसेगाव खेडेगावात आयोजिले होते. त्या अनुषंगाने एक शोधनिबंध मी लिहिला व कलकत्त्याच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ हायजीन व पब्लिक हेल्थ या संस्थेत वाचला.
तिसऱ्या संस्कृतीचा उदय
सुमारे चाळीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध इंग्रजी लेखक, वैज्ञानिक व टेक्नोक्रॅट सी. पी. स्नो यांनी रीड व्याख्यानमालेत भाषण करताना कलावंत व साहित्यिक यांना अभिप्रेत असलेली मानव्य (ह्युमॅनिटी) संस्कृती व तत्कालीन वैज्ञानिकांना अभिप्रेत असलेली विज्ञान-संस्कृती यावर भाष्य केले होते. याच व्याख्यानाच्या विषयाच्या आधारे स्नो यांनी ‘दि टू कल्चर्स’ हे पुस्तक लिहिले होते. व त्यात दोन्ही संस्कृतींविषयी अनेक मुद्दे उपस्थित केले होते. स्नो यांच्या मते कला व साहित्य यांना उच्च स्थान देणारे बुद्धिमंत स्वप्नात मनोरे बांधत असून वास्तव परिस्थितीचे त्यांना भान नाही. शेक्सपीयर, मोझार्ट, होमर, अरिस्टॉटल, जॉर्ज बर्नार्ड शॉ इत्यादींच्या अजरामर कलाकृतींचा अभ्यास व त्या विषयातील प्रभुत्व म्हणजेच संस्कृती हा समज चुकीचा असून उच्चभ्रू वर्गाने वास्तव परिस्थितीची जाणीव ठेवणे गरजेचे आहे, असे स्नो यांना वाटत होते.
भांडवलशाहीच्या शिखरावरील विरळ हवा
आजचा सुधारकच्या नोव्हेंबर २००२ मध्ये संपादकांनी व्यवस्थापन-क्षेत्रातील दोन तज्ज्ञांनी (सी. के. प्रह्लाद व एस. एल. हार्ट) ह्यांनी लिहिलेल्या ‘द फॉर्म्युन ॲट द बॉटम ऑफ द पिरॅमिड’ ह्या लेखाचा संक्षेप केला. त्या लेखात जे विविध दृष्टिकोण त्या तज्ज्ञांनी व्यक्त केले व जी विधाने केली आहेत ती फारच उदबोधक, विवाद्य आणि मनोरंजकही आहेत. आज भांडवलशाहीत जी मंदी आणि मरगळ आली आहे ती झटकण्याचे काम स्वतः उद्योजक व्यवस्थापक करू शकत नाहीत. खरे म्हणजे उद्योजक/व्यवस्थापक ती मरगळ झटकण्याचे कार्य करून थकले आहेत. त्यामुळे डॉ. प्रह्लाद सारख्या व्यवस्थापन-क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ‘गुरूं’ना ते करावे लागते.
ग्रामीण रोजगाराचा नागरी स्रोत
कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात हाडी नावाचे एक लहानसे गाव आहे. गाव म्हणायचे एवढ्याचसाठी की गेल्या १२-१३ वर्षात या गावाची लोकसंख्या दुपटीपेक्षा अधिक झाली आहे, त्या आधी ते खेडेच होते. निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या गावात मोठ्या प्रमाणात पसरलेली खार जमीन बघावयाला आम्ही गेलो होतो. नदी/खाडी काठा वर वसलेल्या गावच्या अनेक शेतजमिनी, नारळी पोफळीच्या बागा असलेल्या जमिनी उन्हाळ्यात भरतीच्या वेळी येणाऱ्या खाऱ्या पाण्याच्या पुरामुळे नापीक होतात. या जमिनी वाचविण्यासाठी बंधारे बांधून काढण्याची परंपरा कोकणात जुनी आहे. अशा जमिनी मासे आणि आधुनिक कोलंबी संवर्धनासाठी आदर्श असतात.
भारत, एक ‘उभरती’ सत्ता
स्टीफन कोहेन यांचे इंडिया, अॅन इमर्जिंग पॉवर हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. ‘११ सप्टेंबर’च्या आधी लिहिले गेल्यामुळे यात बदलत्या राजकीय समीकरणांचे उल्लेख नाहीत, पण भरपूर मेहेनत, संदर्भ, वेगळा दृष्टिकोन आणि मुख्य म्हणजे त्रयस्थ भाव यामुळे हा ग्रंथ उल्लेखनीय झाला आहे. कोहेन हे ‘भारतज्ञ’ म्हणून नावाजले गेले आहेत. त्यांनी पूर्वी ‘इंडिया, अॅन इमर्जिंग पावर?’ नावाचे पुस्तक लिहिले होते —- यावेळी प्रश्नचिन्ह निघून गेले आहे. त्यांचे म्हणणे मी थोडक्यात सांगणार आहे.
भारताच्या शेजाऱ्यांसाठी भारत ही नेहेमीच मोठी सत्ता राहिली आहे. त्यांच्या आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवहारांसोबत त्यांच्या ‘ओळखीवर’ही (identity) भारताचा मोठा प्रभाव असतो.
धिस फिशर्ड लँड : लेख ८
संघर्षाच्या वाटा आणि व्याप्ती
इंग्रज भारतात येण्याच्या आधीही संकलक समाजांच्या क्षेत्रावर शेती करणाऱ्या समाजांचा दबाव असे. पण शेतकऱ्यांचा जंगलांवरचा दबाव सौम्य असे. मिरे, वेलदोडा, हस्तिदंत अशी उत्पादने वगळता शेतकरी जंगलांकडून फार अपेक्षा ठेवत नसत. व्यापारीकरणाने मात्र हे चित्र बदलले. स्थानिक लोकांचे वनावरील हक्क संपुष्टात आले; वनव्यवस्थापनाची जबाबदारीही त्यांच्या डोक्यावरून हटली; आणि जंगलांचे स्वरूपही बदलले. ओक व बेहडा कुळातील वृक्ष सरपण, पाचोळा, फुटकळ इमारती लाकूड पुरवत असत. आता त्यांचा नायनाट होऊन सागवान– देवदारावर भर वाढला. या वृक्षांना स्थानिक उपयोगच नव्हते, ती शुद्ध व्यापारी ‘पिके’ होती.