विषय «इतिहास»

नागर क्रांतीचा उगम: दोन प्रवाह

इ.स. पूर्व ४००० च्या सुमारास मेसोपोटेमिया येथे जगातील पहिले नगर उदयाला आल्याचे पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी मांडले. गॉर्डन चाइल्ड यांच्या सिद्धान्तानुसार अश्मयुगाच्या अखेरच्या पर्वात शेतीचा शोध लागला. या कृषिक्रांतीच्या विस्तारासोबत आणि परिणामी भटक्या, अन्नशोधक मनुष्यप्राणी ग्रामीण वस्त्यांमध्ये स्थिरावला. कृषिक्रांतीच्या काळात विपुल होत गेलेल्या अन्नसाठ्यांमुळे काही गावांचे नगरांत रूपांतर होणे सुरू झाले. ह्या नागरी क्रांतीचा पहिला उच्च बिंदू म्हणजे मेसोपोटेमियामधील ऊरूक हे नगर. पुढे ही नागरीकरणाची प्रक्रिया वेगवान होत गेली. जागतिक नागरी क्रांतीचे स्वरूप विसाव्या शतकात अधिक स्पष्ट झाले. ग्रामीण भागातून नागरी प्रदेशांत होणाऱ्या लोकसंख्येच्या जागतिक स्थलांतराचा अनुभव या सिद्धान्ताला पोषक असाच होता.

पुढे वाचा

गीता-ज्ञानेश्वरीतील एक अनुत्तरित प्रश्न

‘ही भगवद्गीता अपुरी आहे’ हा प्रा.श्री. म. माटे यांचा एक महत्त्वपूर्ण लेख. ‘विचारशलाका’ या त्यांच्या ग्रंथात तो समाविष्ट केला गेला आहे.

त्या लेखात भगवद्गीतेच्या पहिल्याच म्हणजे मुखाध्यायात अर्जुनाने उपस्थित केलेले दोन प्रश्न मांडले आहेतः
(१) आप्तस्वकीयांच्या मृत्यूविषयीचापहिला चिरंतन स्वरूपाचा प्रश्न.
आणि
(२) कुलक्षयामुळे स्त्रियांमध्ये येणारी दूषितता, स्वैर आचारवत्यातून होणारावर्णसंकर हा दुसरा नैतिक, सामाजिक प्रश्न

पहिल्या प्रश्नाचे उत्तर गीताभर केलेल्या आध्यात्मिक चिंतनात येऊन जाते. देहाचा मृत्यू म्हणजे अमर आत्म्याचा मृत्यूनव्हे हा चिंतनाचा मथितार्थ. त्याअनुरोधाने या जीवात्म्याचे ध्येय काय आणि ते गाठण्याचे मार्ग कोणते याचे विवरण गीतेत येते.

पुढे वाचा

औद्योगिक क्रान्तीचे पडसाद

१९ व्या शतकातील व्हिक्टोरियन वाङ्मयाचा अभ्यास करताना नेहमी जाणवायचा तो त्याची पार्श्वभूमी पूर्णपणे व्यापून टाकणारा औद्योगिक क्रांतीचा प्रचंड बॅकड्रॉप. राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, वैज्ञानिक, साहित्यिक इ. कुठलेही क्षेत्र त्याच्या सर्वव्यापी प्रभावापासून मुक्त नव्हते. १९ वे शतक हा सर्वार्थाने स्थित्यंतराचा काळ. व्हिक्टोरिया राणीच्या स्थिर आणि खंबीर राजवटीच्या खांबाभोवती हे बदलाचे गोफ विणले गेले. प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे ह्या सगळ्या बदलांमागचे महत्त्वाचे कारण होते औद्योगिक क्रांती.

तांत्रिक-औद्योगिक क्षेत्रातील तसेच आर्थिक, सामाजिक, राजकीय वगैरे क्षेत्रांतील हे बदल आमूलाग्र स्वरूपाचे होते. त्यांचे क्रांतिकारक स्वरूप लक्षात येण्याच्या आधीच माणसे ओळखीच्या जगातून अनोळखी जगात लोटली गेली होती.

पुढे वाचा

मनुस्मृती व विवेक

आपल्या चालीरीतींवरील मनुस्मृतींचा पगडा किंवा नामवंतांनी केलेला तिचा पुरस्कार पाहिल्यावर आपण मनुस्मृती वाचण्यास उद्युक्त होतो. वे.शा.सं. विष्णुशास्त्री बापट यांचे मनुस्मृतीचे संपूर्ण मराठी भाषांतर (प्रकाशक: रघुवंशी प्रकाशन, मुंबई) आपल्या तत्संबंधीच्या बहुतांश गरजा पूर्ण करते. चालीरीतींवर जसा परंपरागत संस्कारांचा प्रभाव असतो, तसाच तो त्याविषयी साकल्याने विचार करणाऱ्या सामाजिक नेतृत्वाचाही असतो. हे नेतृत्व जेव्हा, “हे सर्व समाजाच्या व व्यक्तींच्या हितासाठी आहे,” अशी भूमिका घेते, तेव्हा त्यातील तथ्य जाणून घेणे महत्त्वाचे ठरते, व हाच या लेखामागील हेतू आहे. केवळ धर्मवाक्य म्हणून ज्यांची श्रद्धा मनुस्मृतीत गुंतली आहे, त्यांच्यासाठी प्रस्तुत भाषांतर हे निश्चितच उपयोगी आहे.

पुढे वाचा

मरू घातलेली जात (The Endangered Species)

‘आजचा सुधारक’च्या संपादकांनी सेक्युलरिझम व मार्क्सवाद या विषयावर आपल्या वाचकांकडून मतप्रदर्शन मागविले होते. यापैकी ‘सेक्युलॅरिझम’वर बोच लेख आले पण मार्क्सवादासंबंधीच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही असे संपादकांनी लिहिले आहे. मार्क्सवादावर लेख का आले नाहीत यावर विचार करताना, मला असे वाटले की ज्यांनी जन्मभर मार्क्सवादाचे कुंकू लावले ते आज मार्क्सवादावर चर्चा करण्याच्या मनःस्थितीत नाहीत. त्यांचा हा आशौचकाल आहे. आशौचकालात गेलेल्या जीबाबद्दल चर्चा करायची नसते. ज्यांनी मार्क्सवादाचे कुंकू लावले नाही अशाही लोकांत मार्क्सवादाबद्दल भयंकर आदर आहे. त्यांनी मार्क्सवादाचे कुंकू लावले नाही याचे प्रमुख कारण मासन धर्माला अफूची गोळी ठरविले.

पुढे वाचा

आत्मनाशाची ओढ

ज्या दिवशी जपानमधील हिरोशिमा ह्या नगरावर परमाणुबाँबचा भयानक विस्फोट झाला तो दिवस—-६ ऑगस्ट १६४५-—मानवाच्या संपूर्ण इतिहासात (व प्रागैतिहासातही) अत्यंत महत्त्वाचा मानावा लागल, जीवोत्क्रांतीच्या पदार्थ वाटचालीत पायात प्रथमत:च स्व-जाणीव व बुद्धी निर्माण झाली. त्या काळाच्या विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मानवापुढील मृत्यूचे संकट हे व्यक्तिगत स्वरूपाचे होते. पण ज्या वेळी मानवाने भौतिकशास्त्राच्या साहाय्याने परमाणु विदनापर्यंत ‘गनि’ गाठली, न्या अागृत मानवापुढे नुसत्या व्यक्तिगत किंवा लहान समूहाच्या मृत्यूची नव्हे, तर अरिवल मानवजातीच्या संपूर्ण विनाशाची व मानवी संस्कृतीच्या आमूलाग्र विध्वंगावी भयप्रद शक्यता निर्माण झाली आहे. मानवजातीच्या गळ्याभोवती जणू काही एक भयानक काल – विस्फोटक (time bomb) बांधला गेला आहे.

पुढे वाचा

फुले-आंबेडकर शताब्दी समारोहाच्या निमित्ताने

हे वर्ष सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेबद्दल आस्था बाळगणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण या वर्षीपासून जोतीराव फुले यांची मृत्युशताब्दी आणि बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मशताब्दी प्रचंड उत्साहानिशी साजरी होत आहे. कालगतीने जयंतीमयंती आणि त्यांच्या शताब्दीही येतच असतात, पण त्या सगळ्याच समारंभपूर्वक साजऱ्या होत नसतात. तुरळक महापुरुषांच्याच वाट्याला हे सन्मान येत असतात कारण त्यांच्या विचाराबद्दल व कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी समाजाला या सोहळ्यांमधून मिळत असते. पण त्याचबरोबर काळाचा संदर्भही तितकाच महत्त्वाचा असतो. १८२७ साली जन्मलेल्या जोतीरावांची जन्मशताद्वी १९२७ साली कालक्रमाने आली होती. अगदीच नगण्य प्रमाणावर ती साजरी झाली असावी असे काही पुरावेही कागदोपत्री सापडतात, पण एक गोष्ट निश्चित की महाराष्ट्र राज्य-स्थापनेनंतर जोतीरावांच्या प्रतिमेला जेवढा उजाळा मिळाला आणि त्यांच्या कीर्तीचा जेवढा उदोउदो झाला तेवढा पूर्वी कधीच झाला नव्हता.

पुढे वाचा

साम्यवादी जगातील घडामोडी : काही निरीक्षणे

रशियात गोर्बाचेव्ह यांनी गेल्या पाच वर्षांपासून सुरू केलेल्या ग्लासनोस्त व पेरिस्रोयको नामक परिवर्तनपर्वाने आता चांगलेच मूळ धरले असून जगात सर्वत्र खळबळ गाजवली आहे. ‘सर्वत्र’ हा शब्द इथे मुद्दामच वापरला आहे कारण त्याचे परिणाम आता साम्यवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशांपुरते मर्यादित राहिलेले नसून कथित लोकशाही व अलिप्ततावादी या सर्वांना आज नव्याने विचार करण्याची गरज भासू लागली आहे. नुकतीच जेव्हा रशियात साम्यवादी पक्षाच्या सामुदायिक नेतृत्वाची परिसमाप्ती होऊन समावेशक सत्तांचा धारक राष्ट्राध्यक्ष म्हणून गोर्बाचेव्हविरोधकांचे पारडे जड होऊन समजा गोर्बाचेव्ह उद्या सत्ताभ्रष्ट झाले तरी एक गोष्ट वादातीत राहील की त्यांनी केलेली कामगिरी युगप्रवर्तक आहे आणि ते या शतकाचे नायक आहेत.

पुढे वाचा