“The educator has to be educated,in modern jargon,the brain of the brain-washer has itself been washed.” — Karl Marx
इतिहासाचे चिकित्सक तत्त्वज्ञान हे जेव्हा इतिहासाला स्व-रूपाची जाणीव झाली व ते जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न झाली; तेव्हाच निर्माण होणे शक्य होते. अशी जाणीव पाश्चात्य परंपरेत आपल्याला अठराव्या शतकापासून निर्माण होत आलेली दिसून येते. ही इतिहासविषयक ‘जाणीवेची जाणीव’ असल्याने तिचे स्वरूप ‘चिकित्सक’ होते. इतिहासाविषयीची ही तत्त्वज्ञानात्मक चिकित्सा दोन दिशांनी झालेली आढळून येते. ह्या दोन दिशांतील मूलभूत भेद त्यांच्या मानवी प्रकृतीविषयक तत्त्वज्ञानात, तसेच इतिहास संशोधनाच्या रीतींमधील भेदांमध्ये आहे.