विषय «देव-धर्म»

भारतातलं राजकारण पाकिस्तानच्या दिशेनं?

गणपती गेले. आता देव्या येतील.
गणपती आले होते तेव्हां प्रत्येक गणपती मंडळाच्या बाहेर राजकीय पक्षांचे फलक होते. गणेश भक्तांचं स्वागत करणारे. बहुतेक फलकांवर त्या त्या पक्षाच्या गल्लीनिहाय पुढाऱ्यांचे फोटो होते. गणपतीचं विसर्जन झालं तेव्हां गणपतींना निरोप देणारे फलक लागले.
नवरात्रात असे किती फलक लागतात ते पहावं लागेल. कारण नवरात्र असेल तेव्हां महाराष्ट्रात निवडणुका असल्यानं आचार संहिता असेल. फलकांवर झालेला खर्च उमेदवाराच्या खर्चात सामिल होईल.
गणपती उत्सव सुरू झाला तोच मुळी राजकीय कारणांसाठी. टिळकाना जनजागृती करायची होती. स्वातंत्र्यासाठी. टिळकांच्या काळात उत्सवाचा खर्च कमी असे.

पुढे वाचा

ईश्वर – एक मुक्त चिंतन

“आस्तिक विरुद्ध नास्तिक” असा एक कायमचा घोळ समाजाच्या वैचारिक विश्वात चालू असतो. हा घोळ आस्तिकांनी घातला आहे. नास्तिकांची विचारसरणी सुस्पष्ट असते. निरीक्षण-परीक्षण-प्रत्यक्ष प्रयोग-गणितीय पडताळणी ह्या वैज्ञानिक प्रक्रियेतून निष्पन्न झालेले सत्य विवेकाच्या प्रकाशात स्पष्ट दिसत असल्यामुळे नास्तिकांच्या मनात कुठलाही संदेह नसतो. आस्तिकांजवळ मात्र काल्पनिक गृहीतकांशिवाय कोणतेच साधन नसते. निराधार परंपरांवर डोळे मिटून श्रद्धा ठेवीत ते अंधारात चाचपडत असतात. कुठलीही प्रायोगिक सिद्धता न लाभलेल्या गूढ, गहन, अनाकलनीय, धूसर अशा गोष्टींचे आस्तिकांना विलक्षण आकर्षण असते. सुबोधतेपेक्षा दुर्बोधतेकडे ओढा असणे, स्पष्टतेपेक्षा धूसरता अधिक आवडणे, प्रकाशापेक्षा अंधार बरा वाटणे, ज्ञानाऐवजी अज्ञानात सुख वाटणे , आकारापेक्षा निराकारात रमावेसे वाटणे हा वैचारिक जगतातील मोठा विरोधाभास आहे.

पुढे वाचा

धर्मसुधारणा – विचाराचा एक अंतर्गत प्रवाह

श्रद्धा आणि परंपरा हीच धर्माची बलस्थाने असतात असे मानले जाते. त्यामुळे धर्म आणि धार्मिक आचार यांच्यात सुधारणा संभवत नाही, असे गृहीत धरले जाते. जो धर्म एकाच धर्मग्रंथाचे प्रामाण्य मानत नाही, त्या हिंदुधर्मात थोडी लवचिकता होती; परंतु पारतंत्र्याच्या काळात ती नष्ट होऊन रूढींना कवटाळून बसण्याची प्रवृत्ती निर्माण झाली.
ह्यावर मात करून धर्मचिकित्सा करण्याचे प्रयत्न दीडशे वर्षांपूर्वी सुरू झाले. धार्मिक परंपरा न मानणाऱ्यांनी व त्या न पाळणाऱ्यांनी धर्मसुधारणेचा विचार मांडला तर तो लोकांना पटणे अवघड असते. वाईसारख्या क्षेत्री धर्मशास्त्राचे अध्ययन आणि अध्यापन करणाऱ्या एका ज्ञाननिष्ठ तपस्व्याने धर्मसुधारणेचा एक क्रांतिकारक प्रयत्न केला.

पुढे वाचा

मी आस्तिक का आहे?

कवळे येथील श्रीशांतादुर्गा ही आमची कुलदेवता. शांतादुर्गा आमच्या कुटुंबातीलच एखादी वडीलधारी स्त्री असावी तसं तिच्याविषयी माझे आजोबा-आजी, आई-वडील आणि इतर मोठी माणसं, माझ्या लहानपणी बोलत आणि वागत. अतिशय करडी, सदैव जागरूक असलेली पण अतीव प्रेमळ, संकटात जिच्याकडे कधीही भरवशाने धाव घ्यावी अशी वडीलधारी स्त्री. ती आदिशक्ती, आदिमाया, विश्वजननी आहे हे त्यांना माहीत होते. पण हे विराट, वैश्विक अस्तित्व कुठेतरी दूर, जिथे वाणी आणि मनही पोहोचू शकत नाही अशा दुर्गम स्थानी विराजमान झालेले आहे, तिथून ते आपल्याला न्याहाळत असते, आपले आणि इतरांचे नियंत्रण करते असे त्यांना वाटत नव्हते.

पुढे वाचा

मी आस्तिक का नाही?

प्रा. मे. पुं. रेगे यांचा ‘मी आस्तिक का आहे?’ हा लेख ‘कालनिर्णय’ कॅलेंडरच्या १९९५ च्या आवृत्तीत प्रकाशित झाला आहे. (हा लेख प्रारंभी उद्धृत केला आहे.) प्रा. रेगे यांचा तत्त्वज्ञानातील व्यासंग व अधिकार लक्षात घेता त्यांच्या या लेखाने आस्तिक लोकांना मोठाच दिलासा मिळेल यात शंका नाही. परंतु म्हणूनच आस्तिक्य न मानणाऱ्या विवेकवादी लोकांवर त्या लेखाची दखल घेण्याची गंभीर जबाबदारी येऊन पडते. ती जबाबदारी पार पाडण्याकरिता हा लेख लिहावा लागत आहे.

‘मी आस्तिक का आहे?’ या प्रश्नाचे प्रा. रेगे काय उत्तर देतात? ते उत्तर थोडक्यात असे आहे की आपली वडील मंडळी आस्तिक होती.

पुढे वाचा

धर्म की धर्मापलीकडे?

तुम्हाला धर्म हवा की नको या प्रश्नाचे एका शब्दात नेमके उत्तर द्या, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. धर्म की धर्मापलीकडे, हा प्रश्नही काहीसा याच स्वरूपाचा आहे. समाजामध्ये ‘धर्म हवा’ असे म्हणणारा एक मोठा वर्ग अस्तित्वात असतो, तर धर्म नको असे म्हणून या वर्गाला विरोध करणारा दुसरा एक छोटा वर्गही आढळतो. या दोन वर्गामध्ये आढळणार्‍या विरोधाचे स्वरूप समजावून घेण्यासाठी या विरोधाचे ‘शाब्दिक अणि ‘वास्तव’ असे दोन प्रकार ध्यानात घेतले पाहिजेत.

शाब्दिक विरोध
शाब्दिक विरोधाचे स्वरूप पुढीलप्रमाणे असते. ‘धर्म’ या संज्ञेने कोणता अर्थ अभिप्रेत आहे, याविषयी प्रत्येक व्यक्तीच्या धारणा वेगवेगळ्या असतात.

पुढे वाचा

दहशतवाद आणि धर्म

स्वातंत्र्योत्तर भारताला ज्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले त्यातील दहशतवादाची समस्या ही अत्यंत महत्त्वाची मानावी लागते. सद्यःपरिस्थितीतील दहशतवादाचे स्वरूप व व्याप्ती देशाच्या एकतेला आणि अखंडतेलाच आव्हान देऊ लागली आहे. निरपराध व्यक्तींचे शिरकाण हे ह्या समस्येचे एक प्रभावी अंग आहे. ह्यामुळेच दहशतवादाच्या समस्येचे विश्लेषण करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच दहशतवादी कृत्यांशिवाय कोणत्याही समस्येकडे शासनाचे लक्ष जात नाही, म्हणून अशी कृत्ये करावी लागतात, असाही समज बळावत चालला आहे. दहशतवादाच्या मागे नेहमीच राजकीय, आर्थिक कारणे असतात व म्हणून आर्थिक संपन्नता हेच दहशतवादाला खरे उत्तर आहे असे मतही व्यक्त केले जाते.

पुढे वाचा