विषय «पत्र-पत्रोत्तरे»

पत्रसंवाद

पत्रसंवाद
केशवराव जोशी, तत्त्वबोध, हायवे क्र. ३५, नेरळ (रायगड) — ४१० १०१
मला ताठ वागणारी माणसे आवडतात. राजवाडे नातेवाईकांकडे राहत नसत; कारण ते म्हणत, “लोकांकडे राहिले की, त्यांच्या मुलाचे कौतुक करावे लागते. परंतु पात्रता सिद्ध झाल्याशिवाय मला ते जमणारे नाही”. अण्णासाहेब कर्वे मुलाकडे चहा प्यायले, तरी कपात एक आणा टाकून जात. तत्त्वामध्ये थोडीशी जरी तडजोड केली तरी समाज घसरत जातो. म्हणूनच बेडेकर आणि रेगे यांचेपेक्षा मला दि. य. देशपांडे जास्त आदरणीय वाटतात. ईश्वर नाही हे ते स्पष्टपणे सांगतात.
दुर्गाबाई भागवतांनी लिहिले आहे की, “आद्य शंकराचार्यांनी ‘शांकरभाष्यात ज्ञानाच्या वरच्या पातळीवर ईश्वर नाही’ असे म्हटले आहे”.

पुढे वाचा

पत्रसंवाद

उषा गडकरी, २५७, शंकरनगर, नागपूर — ४४० ०१०
जुलै २००१ च्या अंकात श्री. ग. के. केळकर यांची पुण्याच्या ‘सकाळ’च्या १८ मे २००१ च्या अंकात श्री. यशवंत पाठक यांनी ‘नैवेद्य’ या शीर्षकांतर्गत केलेल्या लिखाणासंबंधातली प्रतिक्रिया वाचली. ती मला मननीय वाटली.
विवेकवादानुसार मेंदू, बुद्धी व मन यांचा परस्पर संबंध काय? असा प्रश्न समोर आल्यास विवेकवादी ‘मन’ या संज्ञेला कुठलाही शास्त्रीय वा वैज्ञानिक आधार नसल्यामुळे ‘मना’ला मोडीत काढतील. परंतु आपला प्रत्यक्ष अनुभव आपणास या बाबतीत वेगळी प्रचीती देतो. एखाद्या व्यक्तीने अत्यंत आपुलकीने, जिव्हाळ्याने व प्रेमाने आपले स्वागत केले; विचारपूस केली, आपली दखल घेतली व एखाद्याने केवळ शिष्टाचार म्हणून आपल्या संबंधात काही गोष्टी केल्या तर पहिल्या व्यक्तीच्या कृतीचा आपल्या एकूणच व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक परिणाम झाल्याशिवाय राहत नाही.

पुढे वाचा

नागपूर पत्रसंवाद

नाना ढाकुलकर, १७४, तारांगण, विवेकानंद नगर, वर्धा मार्ग, नागपूर–४४० ०१५ सीता जोस्यम्! एक प्रभावी परीक्षण
आजचा सुधारकच्या जून २००१ च्या अंकात ‘सीता जोस्यम्’ या नाटकाचा परिचय चास्ता नानिवडेकर ह्यांनी करून दिला आहे. श्रीमती नानिवडेकर यांच्या शेवटच्या अभिप्रायाशी ‘विचारप्रवृत्त करणारे हे नाटक मनाला उच्च प्रतीचा बौद्धिक आनंद देते’ मी पूर्ण सहमत आहे. मी विचारप्रवृत्त तर झालोच पण लगेच कार्यप्रवृत्तही जालो. १९८० च्या सुमारास मी ‘रक्षेद्र’ (रावण) हे संगीत नाटक लिहून रंगभूमीवर आणले होते. आणि मी रक्षेद्र (रावण) ही ५०० पानाची कादंबरी लिहिली.

पुढे वाचा

पत्रसंवाद

न. ब. पाटील, अ-३७, कमलपुष्प, वांद्रे रिक्लमेशन, मुंबई — ४०० ०५०
सृष्टिज्ञान मासिक ७३ वर्षांचे झाले. मराठी विज्ञान परिषदेनेही पस्तिशी ओलांडली. विज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावे हेच ह्या दोघांचेही उद्दिष्ट आहे. मागे वळून पाहण्याच्या उद्देशाने त्या दोन्ही संस्थांनी संयुक्तपणे पुण्यात एक छोटासा मेळावा दि. १९ व २० मे २००१ रोजी आयोजित केला होता. या प्रसंगी ‘विज्ञान वाङ्मय निर्मिती’ या विषयावर एक चर्चासत्र आयोजले होते. एका सत्रार्धाचे अध्यक्षत्वही मी केले. दि. १९ रोजी दुपारी १२.३० वाजता हे चर्चासत्र सुरू झाले. पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र आणि संपादन विभागाचे निवृत्त विभाग प्रमुख प्रा.

पुढे वाचा

पत्रसंवाद

प्रियदर्शन पंडित, किल्ला रोड, महाल, नागपूर — ४४० ००२
मे महिन्याच्या आ.सु. मध्ये खादीवर स्फुट आले आहे. मी स्वतः पूर्ण खादी वापरणारा आहे. मी रोज सूत काततो. माझे वडील तर साध्या टकळीवर सूत कातीत. तेही पूर्ण खादी वापरीत. तेव्हा खादी हा माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा भाग आहे. म्हणून हा लेखनाचा प्रपंच करीत आहे.
माझ्या या लिखाणात माझे अनुभव आणि माझी काही वैयक्तिक माहिती येईल तरी तिला अहंमन्यता असे समजू नये ही विनंती, कारण आपल्या एकूण व्यवहारात आपण स्वतःसंबंधी उल्लेख टाळतो त्याचप्रमाणे व्यक्तींची नावे येऊ देत नाही.

पुढे वाचा

पत्रसंवाद

शशिकांत हुमणे, १२, राजीव सह-गृहनिर्माण संघटना, बांद्रा-कुर्ला संकुल, मुंबई — ४०० ०५१
एप्रिल महिन्यात १४ तारखेला डॉ. आंबेडकरांचा जन्मदिवस येतो. त्यानिमित्त एक जुने शुभेच्छापत्र पाठवीत आहे, ज्यात डॉ. आंबेडकरांचे मौलिक विचार आहेत. हे विचार एप्रिलच्या अंकाच्या मुख्यपृष्ठावर छापावे, तसेच नोबेल प्राईझविजेता इलियास कॅनेटी याचे त्याच पत्रातील विचार मे च्या अंकाच्या मुख-पृष्ठावर छापावे.

“ते” आणि “आपण’ हे हिंदुधर्मातील संपूर्ण जातीजमातींचे नाजुक दुखणे आहे. जातीशिवाय हिंदू किंवा हिंदुधर्म नाही. आणि हिंदूंशिवाय जगात इतरत्र कुठेही जाती-वेडेपणा व जाती-मत्सर उपलब्ध नाही. जातीच्या संसर्गरोगाची लागण मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीयांनाही झाली असल्यास नवल नाही, परंतु या पापाचे धनी सुद्धा हिंदू आणि हिंदुधर्मच आहेत असे खेदाने म्हणावे लागते.

पुढे वाचा

पत्रसंवाद

गंगाधर गलांडे, 4 Aldridge Court, Meadway, IIIGII WYCOMBE, Bucks. IIP 11 1SE, UNITED KINGDOM

काही महिन्यांपूर्वी, अकस्मात वाढलेल्या टपालखर्चामुळे, काही आर्थिक मदत करण्याबद्दल आवाहन केले होते आपण वर्गणीदारांना. त्याला साद देण्यासाठी मी अेकदा संगणकापुढे बसलेलोही होतो. मधेच कसलेतरी खुसपट उपटल्याने स्थगित झाले ते लेखन. क्षमस्वमे. सोबत १० पौडांचा धनादेश जोडत आहे. कृपया, त्याचा स्वीकार व्हावा.

नोव्हेंबर २०००च्या अंकातील श्री. आत्रे यांचा जातींचा उगम—-एक दृष्टिकोन हा लेख वाचत असता सहज एक विचार मनीं आला व मला उत्तर सापडेना म्हणून आवर्जून हे पत्र लिहीत आहे मी आपणांस.

पुढे वाचा

पत्रसंवाद

सूचना
क) काही महिन्यांपूर्वी ‘सायंटिफिक टेंपर प्रमोशन ट्रस्ट’ने आम्हाला रु. ५००/- पुरस्कार दिला होता. आता या संस्थेने दिलेल्या इतर पुरस्कारांची माहिती उपलब्ध झाली आहे, ती अशी—-
१. डॉ. विठ्ठल प्रभु :– स्त्री-पुरुष-संबंधाविषयी वास्तवपूर्ण आणि सडेतोड विचार प्रचारासाठी, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी गेली ४० वर्षे अविश्रांत धडपड
२. आजचा सुधारक :– गेली ५ वर्षे सातत्याने वैचारिक आणि संशोधनपर लेख लिहून पुरोगामी विचार प्रसृत करण्याबद्दल
३. मासिक चालना :– जातिभेद नष्ट करणे आणि पुरोगामी विचार गेली ५० वर्षे सातत्याने मांडणे ह्याबद्दल.
४. स्त्रीमुक्ति संघटना :– स्त्रियांचे प्रश्न झुंजारवृत्तीने सातत्याने मांडून त्याविषयीची जनजागृती करण्याबद्दल
५.

पुढे वाचा

पत्रसंवाद

र. द. जोशी
आजचा सुधारकच्या ११.८ या अंकात श्री. पळशीकर यांचा जो लेख आहे त्याची एक चांगली प्रतिक्रिया, श्री. देशपांडे यांची त्याच अंकात आहे. मी थोड्या वेगळ्या अंगाने पुढील प्रतिक्रिया देऊ इच्छितो.

लेखाच्या पहिल्याच वाक्यात ‘धर्म या गोष्टीचा उदय झाला’ असे जे म्हटले आहे. ते योग्य नाही. उदय फक्त देव, दैवी शक्ती व श्रद्धा यांचा झाला.

भारतात धर्म या शब्दात कमीत कमी दोन तरी प्रमुख व वेगवेगळ्या संकल्पना अंतर्भूत मानायला हव्यात. एक म्हणजे देव, पितर, प्रत्यक्ष दिसणारी पंचमहाभूते यांना संतुष्ट करण्याच्या भ्रांत कल्पनांनी केली जाणारी, प्रार्थना, पूजा, व्रतवैकल्ये, होमहवन, यज्ञ इत्यादि आणि दुसरी म्हणजे विविध सामाजिक व्यवहार उदा.

पुढे वाचा

पत्रसंवाद

भ. पां. पाटणकर
३-४-२०८, काचीगुडा, हैदराबाद – ५०० ०२७
श्री. संपादक, आ. सु., यांस सप्रेम नमस्कार
आ. सु.चा सप्टेंबर २००० चा अंक बुद्धिवाद-विवेकवादाच्या अनेक अंगांना स्पर्श करून गेला आहे. पण विषय मोठा आहे आणि चर्चा त्रोटक आहे. अर्थात फार लांबलचक चर्चा कंटाळवाणी होते हेही खरे. पण त्रोटक चर्चेत अपूर्णताही पुष्कळ राहते.

प्रथम श्री. दप्तरीचेच विचार घेऊ. धर्म परिवर्तनीय आहे असे मानणे ही ऐतिहासिक पद्धत असल्याचे संपादकांनी म्हटले आहे. त्याने काय सूचित होते हे कळले नाही. ऐतिहासिक पद्धत याचा एवढाच अर्थ असायला पाहिजे की वेळोवेळी काय वस्तुस्थिती होती याची नोंद घेणे.

पुढे वाचा