विषय «पत्र-पत्रोत्तरे»

पत्रव्यवहार

नोव्हेंबर ‘९९ चा आजचा सुधारकचा अंक वेगळा व लक्षणीय वाटला. लेखांचे विषय अधिक वैविध्यपूर्ण व समाजापुढील वेगवेगळ्या प्रश्नाकडे लक्ष वेधणारे वाटले. अभिनंदन!
डॉ. सुभाष आठले
२५,नागाळा पार्क,
कोल्हापूर – ४१६००३

संपादक, आजचा सुधारक, यांस,
नोव्हेंबरचा अंक खूप माहितीपूर्ण वाटला. समान्यपणे १ ल्या पानांवर थोर व्यक्तींच्या लेखनातील एखादा महत्त्वाचा मुद्दा उद्धृत केलेला असतोच. यावेळच्या अंकातील हमीद दलवाईंचे मुस्लिम समाजाच्या सामाजिक सुधारणाबाबतचे विचार दिलेले आहेत. त्यातील शेवटचे वाक्य तर फारच महत्त्वाचे आहे.
पूर्वीच्या एका अंकातील ‘संपादकीया’ वर मी टीकाटिप्पणी कळवली होती व आपण ती छापलीही होती.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक, आजचा सुधारक, यांस
जून महिन्याच्या अंकातील श्री. किर्लोस्कर, श्री. पांढरे यांचे पत्र आणि संपादकीय मला खूप आवडले. श्री. किर्लोस्करांचा लेख चांगला आहे असे म्हणणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेणे होय. त्यांचे भारतीय संस्कृती आणि बुद्धिवाद आणि चार्वाक ही नाटके माझ्या संग्रही आहेत.
परंतु त्यांनी मूर्तिभंजक होण्यास सांगितले आहे ते मात्र तितकेसे पटत नाही. याबाबत लो. टिळकांची गोष्ट सांगतो. लोकमान्य टिळकांकडे एकदा शिवराम महादेव परांजपे गेले आणि त्यांना म्हणाले की, “तुम्ही सशस्त्र लढ्याची घोषणा का करीत नाही?” त्यावर टिळक म्हणाले, “तू मला ५०० माणसे अशी आणून दे, की जी मरावयास तयार आहेत.”

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्री. भाटे ह्यांनी रास्त सल्ला डावलला
संपादक, आजचा सुधारक यांस,
आ. सु. च्या जुलै १९९९ च्या अंकात दुस-याच्या मताचे खंडन करायचे असेल तर ते कसे करावे याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून ललिता गंडभीर यांची चर्चा या सदरातील टीप (“हिंदू कोण?”) पाहावी. तसेच निकृष्ट तथा सदभिरुचिहीन खंडन कसे करावे याचा नमुना म्हणून त्याच अंकात अनिलकुमार भाटे यांचा लेख (“दि. य. देशपांडे यांचा प्रचंड वैचारिक गोंधळ”) पाहावा, गंभीर यांनी अत्यंत मुद्देसूदपणे, कमीत कमी शब्दांत, आपले म्हणणे मांडले असून त्याचा रोख संपादकाचा अगर कुणाचाही उपमर्द करण्याकडे नाही.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

मनुष्याचा आत्मा अन् विज्ञान
संपादक, आजचा सुधारक यांस,
प्रस्तावना : मनुष्याचा आत्मा व विज्ञान. यांमधील परस्पर संबंधावर इंग्लंडमधील फिजिक्स वर्ल्ड (मे १९९२) या नियतकलिकात काही वेधक विचार वाचावयास मिळाले. त्यांचा स्वैर व संक्षिप्त अनुवाद येथे दिला आहे. मनुष्य जी बुद्धिमत्तेची कामे करू शकतो, त्यांचा कर्ता असतो त्याचा आत्मा. ही संकल्पना होती देकार्त यांची! याच अर्थाने (फंक्शनल) येथे आत्मा ही संज्ञा वापरली आहे. इंग्लंडमध्ये वैज्ञानिक विचाराची एक दीर्घ परंपरा आढळते. आधुनिक विज्ञानाचा आद्यप्रणेता न्यूटन याचा जन्म इंग्लंडमध्येच झाला होता. त्यानंतरच्या सुमारे दोनशे वर्षांच्या कालखंडात ज्या युरोपिअन देशांनी विज्ञानाचा विकास करण्यास साहाय्य केले त्यांमध्ये इंग्लंडचा सहभाग महत्त्वाचा होता.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

आविष्कारस्वातंत्र्यावर गदा
संपादक आजचा सुधारक
श्री. स. ह. देशपांडे ह्यांनी ए. डी. गोरवाला ह्यांच्याबद्दलच्या लेखात असे ध्वनित केले आहे की ‘‘सरकारी सत्ता आविष्कारस्वातंत्र्यावर गदा आणू शकते’ इ. परंतु हे फक्त सरकारंपुरते मर्यादित नाही. सर्वच प्रस्थापित सत्ता आविष्कारस्वातंत्र्य दडपतात. त्याची दोन उदाहरणे –
1) Tunes of India 11-10-84. A. D.Gorwala handed ove editorship of Opinion to J. R. Patel. But an article about G. D. Birla was refused for publication in Opinion by Patel and then A. D. Gorwala closed Opinion in Sept.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

जातिधर्म निरपेक्ष समुदाय निर्माण व्हावा
संपादक, आजचा सुधारक यांस,
मार्च ९९ च्या अंकातील चिंतामणी गद्रे लिखित जाति-धर्म-निरपेक्ष-विवाह-निर्धारदिन’ त्यातील विचार वाचले. त्यांच्या काही मुद्दयांशी मी सहमत आहे. मी १९७७ साली ग्रॅज्युएट झाले. माझ्या School Leaving Certificate मध्ये जातीचा कॉलम कोरा आहे. त्या जागी छोटी रेघ आहे. (अर्थात् आडनाव हा फॅक्टर जात ओळखण्यास आपल्याकडे फार मोठा आहे.)
हुंडा न देता साधेपणाने लग्न करीन एवढीच प्रथम इच्छा होती. नंतर नोकरी लागल्यावर जातपात कधीच न मानल्याने आंतरजातीय (अर्थात हाच वाक्प्रचार प्रचलित असल्याने) लग्न करीन. त्याची जात विचारण्याचा प्रश्नच झाला नाही.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

घटस्फोटितांच्या कुंडल्यांमध्ये साम्य नाही
श्री. संपादक, आजचा सुधारक
आजचा सुधारक (जानेवारी १९९९) पान ३१६. माधव रिसबुडांचे पत्र : ‘फलज्योतिषाला वैज्ञानिक आधार नाहीच.
वरील पत्र वाचून मला माझा ह्या क्षेत्रातील अनुभव येथे नोंदवावासा वाटला. १९९० च्या सुमारास कै. वि.म. दांडेकर ह्यांच्या सांगण्यावरून घटस्फोट घेतलेल्या ३०० युगुलांची जन्मतारीख आणि जन्मवेळ (मी व वि.म. दांडेकरांनी) जमा केली. संगणकाच्या साहाय्याने त्यांच्या ३०० पत्रिका करणे सोपे गेले. जवळजवळ आठ सेकंदाला एक ह्या वेगाने जन्मतारीख व जन्मवेळ ह्यांच्या सहाय्याने ज्यांना कुंडल्या म्हणतात त्या तयार करून आम्ही एका समंजस वाटणाच्या ज्योतिष्यापुढे टाकल्या.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

निरपराध्यांना आणि गुन्हेगारांना एकच न्याय?
संपादक, आजचा सुधारक
स.न.वि.वि.
श्री. दत्तप्रसाद दाभोलकर यांचे ‘मी नथुराम…. वर बंदी नको’ ह्या शीर्षकाचे पत्र वाचले. मी नथुराम…’वर बंदी नको असे माझेही मत आहे. परंतु हे मत नोंदवताना श्री. दाभोलकरांनी केलेला युक्तिवाद मात्र मला पटत नाही. गांधीजींचा खुन ही एक ऐतिहासिक घटना होती आणि नथुराम ही एक ऐतिहासिक व्यक्ती होती असे म्हणून दाभोलकरांनी गांधी आणि गोडसे या दोघांनाही एकाच मापाने मोजण्याचा प्रयत्न केला आहे.
गोडसेचे आधीचे चरित्र निश्चितच वाईट नव्हते. पण तेवढ्याने त्याने केलेल्या गांधींच्या खुनाला मूल्याधिष्ठित म्हणता येत नाही.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

आजचा सुधारक तरुणांना आवडेल असे काहीतरी करा
संपादक, आजचा सुधारक
नुकतीच ३ आठवड्यांपूर्वी माझी प्रा. प्र. ब. कुलकर्णी यांच्याशी ओळख झाली. त्यांच्याकडून आजचा सुधारक चे काही जुने अंक मला वाचायला मिळाले. ते मला अतिशय
आवडले. विशेषतः आपण लिहिलेले विवेकवादावरचे लेख तर फारच आवडले. सर्वच लिखाण उत्कृष्ट व वाचनीय आहे व त्याचबरोबर विचारप्रवर्तकही आहे. आपले लेख वाचून मनात आलेले विचार मी या पत्राबरोबरच परंतु वेगळे लिहून पाठवीत आहे.
आपण विवेकवादाचा पुरस्कार करून आगरकरांचेच कार्य पुढे चालवत आहात यात शंका नाही. मला स्वतःला आगरकरांबद्दल फार प्रेम आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

मी नथुराम…..वर बंदी नको
संपादक, आजचा सुधारक,
मी नथुराम गोडसे बोलतोय… या नाटकावरील बंदीच्या संदर्भात झालेली चर्चा वाचली. नाटकावर बंदी घालणे चूक आहे असे मला वाटते व या विषयावर अधिक व्यापक चर्चा होणे अगत्याचे आहे. माझ्या भावना दुखावतात म्हणून एखाद्या व्यक्तीबद्दल वा कलाकृतीबद्दल ‘फतवा काढण्यासारखे काही कृत्य करून आपण त्याचे समर्थन करीत आहोत काय?
व्यक्तिगत दृष्ट्या एक गोष्ट मला प्रथमच स्पष्ट करावी वाटते. मी व्यक्तिशः आजपर्यंत तरी गांधीजी हे महात्मा आहेत व नथुरामने केलेले कृत्य चुकीचे व वाईट आहे असे मानत आलो आहे.

पुढे वाचा