उंदीर न घाबरता मांजरीकडे जाताना दिसला किंवा एखाद्या किड्याने पाण्यात उडी मारून जीव दिला तर आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल. आपल्याला भास होतो आहे का असेही वाटू शकेल. पण निसर्गात सुरस आणि चमत्कारिक वाटणाऱ्या घटना घडत असतात, त्यात या आणि अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी खरोखरच घडतात. त्यांचा अभ्यास केला की दिसून येते की हीपण एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मग लक्षात येते की स्वतःला किंवा स्वजातीच्या भाईबंदांना काहीही उपयोग नसलेली, किंबहुना अपायकारकच असलेल्या अश्या कृती हे सजीव स्वतःहून करत आहेत असे वाटले तरी त्यामागील बोलविता धनी इतर कोणी असतो.
विषय «विज्ञान»
नास्तिकवादः एक अल्प परिचय
अगदी लहानपणापासूनच आपल्यावर संस्काराच्या नावाखाली देव-धर्म यांची शिकवण दिली जाते. पालकांना जरी देव-धर्माचे अवडंबर पसंद नसले तरी समाजात वावरताना त्यांच्या मुलां/मुलींची कळत-नकळत देव-धर्माची, पुसटशी का होईना ओळख होते. सण-उत्सव साजरा करत असताना देव-धर्माच्या उदात्तीकरणाला पर्याय नसतो. कुठल्याही गावातील वा शहरातील गल्लीबोळात एक फेरी मारली तरी कुठे ना कुठे देऊळ दिसते. या देवळाच्या गाभाऱ्यातील देवाच्या/देवीच्या मूर्तींची मनोभावे पूजा-अर्चा करणाऱ्यांची कधीच कमतरता नसते.
परंतु एकविसाव्या शतकात वावरताना आजच्या पिढीतील विचार करू शकणाऱ्या तरुण/तरुणींच्या मनात देव-धर्म, पूजा-अर्चा, सण-उत्सव, जत्रा-यात्रा इत्यादींच्याबद्दल नक्कीच प्रश्न पडत असतील.
हिरण्यकश्यपूचे मिथक* आणि लाप्लासचे उत्तर – नास्तिक परिषदेच्या निमित्ताने
दानव सम्राट हिरण्यकश्यपू याला वरदान प्राप्त झाले होते: तुला मृत्यू दिवसाही नाही; रात्रीही नाही. राजवाड्याच्या आतही नाही; बाहेरही नाही. माणसाकडूनही नाही, मानवेतर प्राण्याकडूनही नाही. हिरण्यकश्यपू विद्वान होता. द्विमूल्य तर्कशास्त्रातील प्राविण्याबद्दल त्याला विद्यावाचस्पती ही सर्वोच्च पदवी देऊन शुक्राचार्य विद्यापीठाने त्याचा गौरव केला होता. त्याला वाटले आता आपण अमर झालो. सामर्थ्यवान तर तो होताच. तो स्वतःलाच परमेश्वर समजू लागला. त्याला राजपुत्र प्रल्हादाच्या परमेश्वराचे अस्तित्व रुचेना.
प्रल्हाद त्याचा मुलगा. पण बापलेकाचे पटत नव्हते. द्विमूल्य तर्कशास्त्र प्रल्हादाला कळत नव्हते. परमेश्वर नाही हे त्याला मान्य नव्हते.
कुंभोजकरांच्या लेखातील काही विसंगती
कुंभोजकरांचा गणिताचा अभ्यास असल्यामुळे त्यांना हे तर माहितीच असेल की एकदा १=२ सिद्ध केले की सिद्धतेच्या इतर पायर्यांमध्ये काहीही चूक न करताही कोणताही चुकीचा निष्कर्ष मांडता येतो. त्याच धर्तीवर, त्यांच्या लेखात काही पायर्यांमध्ये चुका आहेत, बाकीच्या फाफटपसार्याची दखल न घेता चुकीचे दावे पाहू. हे दावे अडवून धरले की बाकीचा साराच डोलारा कोसळतो.
“तो स्वतःलाच परमेश्वर समजू लागला.”
स्वतःला परमेश्वर समजणार्या व्यक्तीला नास्तिक म्हणू नये.
“त्या प्रत्येक स्तंभात ईश्वराचे वास्तव्य आहे अशी प्रल्हादाची श्रद्धा होती.”
त्यांच्याच लेखात पुढे उल्लेख आहे की “हिरण्यकश्यपूने पहिल्याच घावात खांबाचे तुकडे केले.
संविधान संस्कृती : विज्ञान व वैज्ञानिक
ईश्वर, अल्ला, गॉड ही मानवाने निर्माण केलेली एक सांस्कृतिक संकल्पना आहे. माणसावर संस्कार करून त्याला काही प्रमाणात सदाचारी बनवण्यात ही संकल्पना इतिहासकाळात उपयोगी पडलेली असू शकते. या संकल्पनेसाठी संक्षिप्तपणे ‘देव’ हा शब्द वापरूया. देव या संकल्पनेच्या आधारेच मानवाने बराचसा मनोमय सांस्कृतिक विकासही केला. परंतु नंतरच्या काळात स्वतःच निर्माण केलेल्या देवाच्या लोभात माणूस इतका अडकून पडला की तो देवाचा गुलामच झाला. त्यामुळे देवाला आपणच निर्माण केलेले आहे हेही तो विसरला. देवस्तुतीच्या घाण्याभोवती झापडबंद पद्धतीने बैलफेऱ्या मारत राहिला. या बैलफेऱ्यांची सवय लागल्यामुळे त्याला मानवी विकासाच्या नव्या दिशाच दिसू शकल्या नाहीत.
न्यायाची सावली आणि त्यामुळे होणारे अनाठायी रद्दीकरण
भारतीय दर्शने सहा. त्यातील न्याय अर्थात logic याच्या अंतर्गत येते कारणमीमांसा. या न्यायाचा न्यायालयातील न्याय-अन्यायाशी रूढ अर्थाने संबंध वाटत नसला तरी तो आहे. जे ग्राह्य ते न्याय्य. ते मानवतेच्या अनुषंगाने असो वा कायद्याच्या.
वेगवेगळ्या समूहांची मानवतेची व्याख्या कधीकधी वेगळी असू शकते. त्यामुळे कधीकधी कायदेदेखील अमानवी ठरू शकतात. इतक्यातलंच एक उदाहरण घ्यायचं झालं तर अमेरिकेत गर्भपातावर सर्वोच्च न्यायालयाने आणलेली बंदी. काहींच्या मते गर्भधारणा झाली की लगेच त्या जीवाला संपूर्ण आयुष्य जगण्याचा हक्क मिळतो. परंतु हे लोक ती गर्भधारणा जबरीने झाली असल्याचे विचारातही घेत नाहीत.
जुने वैज्ञानिक सिद्धांत आणि मिथके
जुन्या सिद्धांताऐवजी अधिक व्यापक आणि अधिक अचूक असे नवे सिद्धांत येत जाणे ही विज्ञानाची रीत आहे. यातील जुन्या सिद्धांतांची कधी कधी चांगल्यापैकी हेटाळणी झालेली पाहण्यात येते. म्हणजे पृथ्वी जगाच्या केंद्रस्थानी आहे हा सिद्धांत हेटाळणीस प्राप्त झालेला दिसतो. गॅलिलिओने जे दुर्बिणीतून पहिले ते कुणीही पाहिले तर ताबडतोब पृथ्वी केंद्रस्थानी हे मान्य केले जाईल असे बऱ्याच जणांना वाटते. जुन्या टॉलेमीच्या सिद्धांतांना चिकटून राहणारे कूपमंडूक प्रवृत्तीचे असावेत अशी धारणा केली जाते. पण ते तेवढे खरे नाही. जर पृथ्वी सूर्याभोवती फिरत असेल तर त्यामुळे जशी ग्रहांची वक्री गती होते तशी तारामंडळातील तारकांची का होत नाही या आक्षेपाचे उत्तर सूर्यकेंद्री स्थानीं सिद्धांतींना त्यावेळी देता येत नव्हते.
मानवी प्राण्यातील जाणीव भान (उत्तरार्ध)
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जाणीव
वैज्ञानिक कथा-कादंबऱ्यावरून तयार केलेल्या चित्रपटात, टीव्ही मालिकेत एखादा स्मार्ट रोबो कचरा गोळा करताना, शहाण्यासारखा वागताना दिसतो. तेव्हा आपण टाळ्या वाजवून त्याचे स्वागत करतो. कदाचित प्रत्येकाच्या मनात माणूस बुद्धिमान रोबो बनवू शकतो अशी एक अतृप्त आशा घर करून बसलेली असावी. जाणिवेचा अभ्यास करताना कृत्रिम बुद्धिमत्तेवरील आतापर्यंतच्या संशोधनाचा नक्कीच उपयोग होईल असे तज्ज्ञांना वाटते. जाणीव समजून घ्यायची असल्यास जाणीव असलेले मशीन तयार करा असे विधान एका तज्ज्ञाने केले आहे. हे विधान गंमतीचे वाटत असले तरी ७०च्या दशकात मशीन्सना भाषा शिकवण्याची शिकस्त केली गेली हे आपण विसरू शकत नाही. ध्वनीचे
मानवी प्राण्यातील जाणीव भान (पूर्वार्ध)
मेंदूतील क्रिया–प्रक्रियांचे निरीक्षण
जगाच्या रहाटगाडग्यात वावरत असताना प्रत्येकाला हजारो समस्यांचा सामना करावा लागतो, प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात. काही प्रश्न अगदीच क्षुल्लक असतात; परंतु आपणच त्यांना मोठे समजून आपला श्रम आणि वेळ वाया घालवत असतो. काही वेळा प्रश्न गंभीर असला तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो व त्यामुळे गोत्यात सापडतो. काही समस्या मात्र खरोखरच गुंतागुंतीच्या असल्यामुळे त्यांची उत्तरं शोधण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. काही समस्यांना उत्तरं सापडतात, काहींना अर्धवट अवस्थेत सोडून द्यावे लागते, व इतर कांहींच्या बाबतीत उत्तर नाही म्हणून गप्प बसावे लागते.
विविधतेमध्ये अनेकता
दगडापेक्षा विदा मऊ
भारतातील मुलांच्या मनावर लहानपणापासून पाठ्यपुस्तकांद्वारे ठसवले जाते की भारतात विविधता आहे आणि विविधता असूनही एकता आहे. विविधतेत खाद्यपदार्थ, पेहराव, भौगोलिक स्थिती वगैरे गोष्टी येतात आणि एकतेत मुख्यतः भारतीय असणे आणि त्याचा अभिमान असणे हे. बहुतांश भारतीय हिंदू असूनही विविधतेमध्ये धार्मिक पैलू पण अध्याहृत असत आणि एकता मात्र देशाभिमानाद्वारे केवळ भारतीयता हीच. पाठ्यपुस्तकांमधील हे चित्र फारसे बदलले नाही. प्रत्यक्षात मात्र त्यात थोडीफार तफावत नेहमीच राहिली आहे. काही वर्षांपूर्वी यवतमाळमध्ये एका शाळेच्या स्नेहसंमेलनाला मी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होतो. साहजिकच समोरच्या रांगेत बसून त्या मुलामुलींचे कार्यक्रम पाहिले – नाच, गाणी आणि काही नाटुकल्या.